सोमवार, ४ नोव्हेंबर, २०२४
त्र्यंबक डोंगर रांगेतील :भास्करगड (बसगड)*
मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४
शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन : किल्ले विश्रामगड (पट्टागड )
सोमवार, १४ ऑक्टोबर, २०२४
चावंड किल्ला
मंगळवार, १ ऑक्टोबर, २०२४
महा वारसा
शनिवार, ३१ ऑगस्ट, २०२४
मराठा सेवा संघ
मराठा सेवा संघ : एक विचार
१ सप्टेबर १९९० रोजी मराठा सेवा संघाची स्थापना युग पुरुष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी अकोला येथे केली . विश्ववंदनिय छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या हिंदवी स्वराज्यात अभितप्रेत असलेला मराठा हाच मराठा सेवा संघाचा मूळ आधार होता . असंघटित असलेल्या या घटकाला एकत्रित करून प्रबोधनाच्या माध्यमातून एक शोषणमुक्त , विज्ञाननिष्ठ , स्वाभिमानी व उत्पादक समाज व्यवस्था उभी करण्यासाठी मराठा सेवा संघ हा आकार घेत होता . याच उद्देशांने शासकिय ,निमशासकिय ' कार्पोरेट अधिकारी , कर्मचारी तथा इतर खाजगी क्षेत्रात काम करणारे पगारदार लोकांचे संघटन, "मी या समाजाचा घटक आहे आणि त्याचे मला काही देणे लागते " या कृतज्ञतेच्या भावनेने समाजभिमुख लोकांचे संघटन आदरनिय साहेबांच्या प्रेरणेने कामास लागले व आज आपण त्याचा वटवृक्ष झालेला आपण पाहत आहोत . मातृशक्तीची ताकद किती प्रचंड असते हे जिजाऊंच्या रूपाने संपूर्ण जगाने बघितले. एका कर्तृत्ववान स्त्रीने जर ठरवले तर ती असाध्याचे साध्य करू शकते. स्त्रीशक्ती मधील प्रचंड आत्मविश्वास, जिद्द ,स्वाभिमान जागृत झाल्यावर युग परिवर्तनाचे सामर्थ्य त्या शक्तीमध्ये निर्माण होते . मुळात जगातील प्रत्येक संस्कृतीच्या मुळाशी स्त्रीच असते हे अभ्यासांती सिद्ध झाले आहे .विश्ववंदनीय ठरलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेल्या एत्तद्देशियांच्या हिंदवी स्वराज्याची खरी प्रेरणा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ठरते हे वैश्विक सत्य आहे, त्याला कुणीही नाकारू शकत नाही. मराठा सेवा संघाने राजमाता जिजाऊ यांचे चरित्र, विचार व कार्य हा आदर्श ठेवून मातृशक्तीच्या प्रेरणेने मातृतीर्थ सिंदखेड राजा जगाच्या नकाशावर आणण्याचे महान कार्य केले .इतिहासाचा शास्त्र म्हणून अभ्यास करण्याची प्रेरणा मराठा सेवा संघाने या मातीतल्या माणसाला दिली . राजमाता जिजाऊंचा दैदीप्यमान इतिहासही अनंत काळापर्यंत काळाच्या पडद्याआडच होता. जिजाऊ जन्मापासून बखरकारांनी अनेक कल्पित कथांचे मनोरे उभे केले अनेक दंतकथा रचल्या गेल्या .ज्यांना कुठलाही तर्कशुध्द आधार नाही समकालिन विश्वासअर्ह साधन साहित्याचा पुरावाही नाही .अर्कज्ञ शहाजीराजे भोसले , राजे लखुजीराव जाधव , छत्रपती शिवाजी महाराज, शंभू राजे यांचा अत्यंत पराक्रमी इतिहास मराठा सेवा संघाच्या तालमित घडलेल्या अनेक इतिहासकारांनी तथा अभ्यासकांनी समोर आणण्याचे मोठे ऐतिहासिक काम केले आणि आजही ते होत आहे . महात्मा बसवेश्वरांनी जातीअंताची चळवळ सुरु केली त्यानंतर मानवी मनांची साखळी जोडणारे समतेचे सेतू संत श्रीचक्रधर स्वामी ठरले त्यानंतर संतशिरोमणी संत नामदेवांनी उभारलेली प्रबोधनाची भगवी पताका पुढच्या काळात वारकरी संत परंपरेने पुढे चालवत आणली . अनेक भाषिक अन सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून उपेक्षित व शोषित समाजाला उभारणी देण्याचं काम केले . सकलशस्त्रशास्त्र कोविद छत्रपती संभाजीराजे यांनी लिहलेल्या बुधभूषणम या संस्कृत ग्रंथातील एक महत्वाचा श्लोक इथे सांगावासा वाटतो ,
प्रियः प्रजानां दातैव न पुनर्द्रविणेश्वर: ।
आगच्छन्काड्र.क्ष्यते लोकैर्वारिदो न वारिधिः।
छत्रपती संभाजीराजे आपल्या या महान ग्रंथातील प्रकिर्ण नीति मध्ये म्हणतात की प्रजेला देणारच प्रिय असतो. संपत्तीचा स्वामी किंवा संपत्ती साठवणारा प्रिय नसतो. पाणी घेऊन येणाऱ्याचे म्हणजे मेघाची तो अपेक्षा करत असतो .तशी पाणी साठवणाऱ्या सागराची तो कधीही अपेक्षा करत नाही. प्रकांड पंडित असलेले संभाजी राजे यांनी त्या काळात ही प्रकिर्ण नीतिची मांडणी केली म्हणून छत्रपती संभाजी राजे एक महान विचारवंत ठरतात.
देत राहणाऱ्यांची प्रचंड मोठी श्रृंखला आपल्या पवित्र भूमिची आहे मग ती धन संपत्ती असो की ज्ञान ! संतांनी मेघाप्रमाणे देण्याचेच काम केले . जगतगुरू तुकाराम महाराजांनी तर आपल्या जवळील धना सोबतच आयुष्य भर शब्द रुपी धन वाटण्याचे काम निर्भिडपणे केले .याच महान संत व महापुरुषांच्या विचारांचे अनुयायी म्हणून मराठा सेवा संघ आपले काम करत आहे .आज चौथ्या दशकात काम करत असताना मराठा सेवा संघ हा देणाराच ठरला आहे काळाची गरज ओळखत मराठा सेवा संघाने मन ,मस्तक आणि मनगट मजबूत करत विचारवंतांची एक फळीच निर्माण केली आहे बहुजनांच्या मुलांच्या मेंदूची मालिश हो करून देणारी संघटना म्हणजे मराठा सेवा संघ होय . महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपली वैचारीक बैठक मजबूत असणारा हाडामासाचा सच्चा मराठा सेवा संघाचा एक कार्यकर्ता हा लाखा येवढा ठरतो . तो कधीही आपल्या विचारापासून दूर जात नाही . कधीही आपली चिकित्सक वृत्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन तो सोडत नाही .आज मी सेवा संघाच्या विचाराचा आहे असे बोलतांना अनेकदा ऐकतो . त्याचे कारण हेच आहे . आज आपल्या 33 कक्षाच्या माध्यमातून जगभर आपले विचारांचे जाळे विणले आहे . कृषी, उदयोग , कला , साहित्य, क्रिडा , संशोधन , विज्ञान आदि विविध क्षेत्रात काम करत समाजातीत अगदी शेवटच्या घटका पर्यन्त संधी निर्माण करून देण्याचे काम या कक्षाच्या माध्यमातून होत आहे .
कर्मवीर भाऊराव पाटिल यांनी दिलेला संदेश मराठा सेवा संघाने पुढे चालवला .
"एका वर्षाची बिदागी हवी असल्यास धान्य पेरा;शंभर वर्षाची बिदागी हवी असल्यास माणसं पेरा; व पाच हजार वर्षाची बिदागी हवी असल्यास विचार पेरा. "
मराठा सेवा संघाने गत चार दशकात हेच विचार जोडण्याचं काम केलं .विचारांनी माणसाची मन जोडली. मराठा सेवा संघ हा विचार आहे आणि हा विचार आज आपल्याला महाराष्ट्रातच नव्हे तर देश -विदेशातही दृढ झाला. मातृतिर्थ सिंदखेडराजा येथे जागतीक स्तरावरील जिजाऊ जन्मोंत्सवाच्या निमित्ताने लाखो जिजाऊ प्रेमी एकत्र येवून जिजाऊ चरणी नतमस्तक होतात . विचारांची देवाव घेवाण होऊन करोडो रुपयांची केवळ पुस्तकाची उलाढाल होते .शोषण मुक्त समाजाची निर्मिती हेच मराठा सेवा संघाचे ध्येय आहे. या देशातील ऐतखाऊ व्यवस्था नष्ट करून उत्पादक समाज व्यवस्थेला समाजात त्याचे स्थान निर्माण करून देणे . तथा तरुणांना योग्य दिशा दाखऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम या माध्यमातून सतत सुरू आहे. तरुणांच्या हातात दगड नाही तर पेन आणि पुस्तक देण्याचे काम सेवा संघ करत आहे . कोणत्याही व्यवसायाची लाज न बाळगता तरुणांनी बुट पॉलिश ते तेल मालिश पर्यन्तचा कोणताही व्यवसाय करण्याची तयारी ठेवली पाहीजे . विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील होणारे सततचे परिवर्तन तरुणांनी लक्षात घेऊन त्यामधे संधी शोधली पाहीजे . शेतात काय पिकत या पेक्षा बाजारात काय विकतं याच भान ठेवत शेतकर्यांनी आधुनिक तत्रज्ञानाची कास धरली पाहीजे . तरुणांनी आपले स्वहीत तथा राष्ट्रहीत जपत आजच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक संधी आहेत त्याचा शोध घेतला पाहीजे . असे कुटुंब अन आपोआपच मग समाज घडविण्याचे काम मराठा
सेवा संघ करत आहे .
हे एक विचारांचे संघटन असल्याने खेड्यापाड्यातही आज हा विचार घराघरात पोहोचलेला आहे.
आमच्यासारख्याच्या दृष्टिकोनातून मराठा सेवा संघ काय आहे, तर मराठा सेवा संघ
एक दिशा.......एक परिवर्तन.......एक विचार.......एक मार्ग.......मन -मस्तक अन मनगट मजबूतीचं .........!!!!
नतमस्तक व्हायला शिकलो.....विचार आणि आदर्शा पुढे......!!! लढायला शिकलो......सत्यासाठी......!!
वाचायला शिकलो....चिकित्सेसाठी.......!!
बोलायला शिकलो ....न्यायासाठी.......!!
🌿🌿🌿🌿🌿
॥ तुमच आमचं नातं काय,जय जिजाऊ जय शिवराय॥
🌿🌿🌿🌿🌿
मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
🌿🌿🌿🌿
संजय खांडवे
बुलढाणा जिल्हाध्यक्ष इतिहास कक्ष
9011971122
बुधवार, १४ ऑगस्ट, २०२४
महाभूमि
*मायभूमीशी नाळ जुळलेला : दै महाभूमी*
शब्दांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते शब्द ही शस्त्र आणि अस्रही असतात . या शब्दाचे महात्म्य याच भूमीत म्हणजे महाराष्ट्र भूमीत जन्मलेल्या जगद्गुरु तुकोबारायांनी जनसामान्याच्या मुखा -मुखात रूढ केले . कोणे एकेकाळी ज्या शब्दज्ञानाने आमचा नाश केला होता त्याच शब्दांना शस्त्र करण्याचा मार्ग आम्हाला तुकाराम महाराजांच्या गाथेतून मिळाला . हीच या महाराष्ट्र भूमीची शिकवण आहे . या मातीत जन्मलेला प्रत्येक जण या पवित्र माती प्रति निश्चितच कृतज्ञ असतों . हीच शिकवण आहे . महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी राहिली आहे याच संत परंपरेतून वारकरी संप्रदाय उदयास आला या मातीत जन्मलेल्या अगदी शेवटच्या व्यक्तीच्या उन्नती आणि उद्धारासाठी त्याच्या कल्याणार्थ वारकरी विचारधारेने काम केले. संत नामदेव - संत ज्ञानेश्वर -संत एकनाथ - संत सावता - संत गोरोबा काका - संत चोखोबा अन - संत तुकोबा पर्यंत हातात टाळ मृदुंग घेऊन गावागावात अन घराघरात अभंग - भारुडे अनओवीच्या रूपाने मुखदगत होऊन ही शब्दरूपी शस्त्रे पोहोचत गेली अन समाजप्रबोधन होऊन जनसामान्यांना जगण्याचा सोपा मार्ग मिळाला . परमेश्वरापर्यंत सहज पोहोचणारा भक्तिमार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडी दूर होऊन सामान्य माणूस अगदी सहजपणे कुठलीही आडकाठी न घेता भक्ती मार्गावर मार्गस्थ झाला .
आजच्या काळात शब्द हे प्रमाण मानले जाते. विश्वासअर्हता आणि लोकमान्यता मिळाली की शब्दाची किंमत अधिकच वाढते आणि या शब्दाची नाळ जर मायभूमीशी जुळलेली असेल तर मग यासाठी शब्दच नाही ! असं म्हणावे लागेल .याच लोकप्रबोधनाचा आणि लोककल्याणाचा प्रामाणिक वसा घेऊन दैनिक महाभूमिचे मुख्य संपादक तथा संस्थापक सुरेश देवकर यांनी जनसामान्याच्या प्रश्नांना वाचा फुटावी म्हणजे त्यांचे शब्द हे प्रखरतेने प्रत्येक जबाबदार व्यवस्थेकडे पोहोचावेत, त्यांच्या व्यथा आणि संघर्ष सर्वांना कळावा याचबरोबर या मातीत जन्मलेल्या लेखक , कवी, समिक्षक तथा संशोधक यांचे शब्द विचार घराघरात पोहोचावे शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुखातील शब्द व्यवस्थेने जाणावे, कर्तबगार संघर्ष कन्या आणि महिला तथा यशस्वी उद्योजकांची प्रेरणा जिजाऊंच्या महा भूमीत प्रत्येक महिलेने घ्यावी हा मानस त्यांनी ठेवला . शिक्षण अन अर्थक्रांती घडवून आणण्यासाठी या आपल्या मराठी मुखपत्रातून या मातीच्या कल्याणार्थ झटणारी युवा पिढी घडविण्यासाठी प्रयत्नशील अन कृतिशील होऊन दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी मातृतिर्थ बुलढाणा जिल्ह्यात दैनिक महाभूमीचा जन्म झाला .
संस्थापक तथा मुख्य संपादक यांचा संपूर्ण जीवनप्रवास संघर्षमय आहे . प्रसंगी काळ्या पाषाणातूनही पाणी काढण्याचे सामर्थ्य त्यांनी याच महाभूमीत जन्मलेल्या महापुरुषांच्या विचारातून आणि प्रेरणेतून घेतले आहे . प्रचंड वाचन आणि त्याचे विश्लेषण करून यथायोग्य आचरण हा त्यांचा स्वभाव गुण . माता-मातृभूमी आणि आपली माणसे ही त्यांची बलस्थाने .या तीन मकारांसाठी ते सदैव तत्पर असतात या शुद्ध विचारातून त्यांचा उत्तम व्यवहार आपसूक लोकांपुढे येतो म्हणून आज मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा तथा जालना - छत्रपती संभाजीनगर - जळगाव - मुंबई आदी जिल्ह्यातून सहकार क्षेत्रात एक विश्वास निर्माण केला आहे .
दैनिक महाभूमीस आज एक वर्ष पूर्ण होत आहे या एका वर्षातच मराठवाडा विदर्भ या दोन प्रांतांना जोडणारे विश्वास अर्ह मराठी मुखपत्राच्या रूपाने ते समोर आले आहे आजही ग्रामीण मराठवाडा अन वऱ्हाड ही त्यांची विशेष असलेली एकूण १२ पानापैकी सकाळीच त्या त्या प्रांतातील वाचकांसाठी एक पर्वनीच ठरत आहे .खेड्यापाड्यात अन वाडी वस्तीवरही महाभूमी शब्द रूपाने पोहोचला आहे ही मातृभूमीशी असलेली नाळ अतूट आहे .निर्मळ - निकोप अन निपक्ष असलेल्या महाभूमीच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देऊन हे शब्दरूपी शस्त्र अंन धन जनमान्यात वाटण्याचे पवित्र कार्य अखंड अविरत चालू राहो हीच शुभेच्छा .
संजय खांडवे
9011971122
बुलढाणा
स्वांतत्र्य एक जबाबदारी
स्वांतत्र्य एक जबाबदारी*
इसवी सन पूर्व 300 च्या काळात चक्रवर्ती सम्राट अशोक एक प्रियदर्शी राजा होऊन गेला . त्यांनी त्यांच्या चाळीस वर्षाच्या काळात संपूर्ण भारतासह आजूबाजूचा बहुतांश प्रांत काबीज केला होता .भारतात पूर्वी सोन्याचा धूर निघायचा तो हाच काळ होता . आज आपली भारतीय राजमुद्रा आपण पाहतो की प्रत्यक्षात चार सिंहमुख असलेल्या अशोक चक्राच्या खाली "सत्यमेव जयते " हे ब्रीद आहे .यावरून सदैव सत्याचा विजय असणारे , सत्याच्या बाजूने असलेले अत्यंत प्रगत असे लोककल्याणकारी साम्राज्याचे मौर्य सम्राट अशोक हे लोकशासक होते हे सिद्ध होते .सातवाहन, वाकाटक हे इसवी सन तिसऱ्या शतकापर्यंत भारतामध्ये प्रगत शासकापैकी एक .पुढील काळात तिसऱ्या ते पाचव्या शतकामध्ये अत्यंत समृद्ध असा गुप्त काळ आला या काळात साहित्य ,कला ,संस्कृती तथा व्यापार याला सम्राट अशोकाच्या काळा प्रमाणेच अधिक वाव मिळाला.इतिहासाच्या संदर्भावरून सम्राट अशोकांच्या काळात लोककल्याणार्थ अनेक कामे झाली असे दिसून येते .परंतु यानंतर मात्र साधारणपणे 9 व्या 10 व्या शतकापासून भारत खंडास परदेशी आक्रमणाची संकटे सतत भेडसावू लागली .या काळात अनेक आक्रमणे उत्तरेकडून भारतावर होऊ लागली पुढील काळात मोघलांनी शेकडो वर्ष आपल्या या भारतभूमीला स्वातंत्र्यापासून वंचित ठेवले .17 व्या शतकात मात्र राजे लखुजी जाधव , शहाजीराजे भोसले , राजमाता जिजाऊ , छत्रपती शिवाजी राजे यांच्या रयतवत्सल भावनेने त्यांच्या संघर्ष व त्यागातून एतद्देशियांचे स्वराज्य म्हणजे हिंदवी स्वराज्य उभे राहिले . स्वराज्य हे या मातीत जन्मलेल्या तथा मातीसाठी स्वाभिमान आपल्या उरात बाळगणाऱ्या मावळ्यांचे राज्य होते .त्यांच्या स्वाभिमानाने त्यांना स्वातंत्र्याची ओढ लावून दिली .अठरापगड जाती-धर्माचे वज्रमूठ बांधून स्वातंत्र्य हाच खरा मोक्ष याची जाणीव त्यांना झाली . परस्परांमध्ये प्रचंड विश्वास निर्माण झाला मातृभूमीसाठी हसत हसत बलिदान देणारे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने उभे होत गेले .रयतेचे राज्य म्हणजे स्वराज्य ही निरपेक्ष भावना प्रत्येक मावळ्याच्या मनात निर्माण झाली. स्वराज्यासाठी लढणारा मावळा ही ओळख मिळाली हीच स्वातंत्र्य , समता व बंधूतेची नांदी होती .यातूनच स्वराज्य न्याय देणारे ठरले पुढे शिवरायांच्या आणि छत्रपती शंभुराजांच्या निर्वाणानंतर दिडशे वर्षापर्यंत मावळे स्वराज्यासाठी मोठ्या स्वाभिमानाने स्वातंत्र्यासाठी लढत राहिले ते कधीही झुकले नाही हीच प्रेरणा इंग्रजांशी लढताना भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक महावीरांना मिळाली .
एका चर्चेमध्ये तथागत गौतम बुद्ध अंम्ब ट्ठाला म्हणतात "अंम्बट्ठा छोटीशी चिमणी देखील स्वतःच्या घरट्यात स्वच्छंदपणे चिव चिव करीत असते . " यामधून स्वातंत्र्याचा अर्थ प्रतीत होतो . स्वातंत्र्याची व्याप्ती कळते .डॉ . बाबासाहेबांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अखंड मानव जातीचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी संविधानाची निर्मिती केली . "आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपण स्वातंत्र्याचे रक्षण करू असा आपण निश्चय केला पाहिजे " असे त्यांनी आपल्या 25 नोव्हेंबर 1949 च्या संविधान सभेतील भाषणात सांगितले होते . स्वातंत्र्य ही खूप मोठी आनंददायी बाब आहे त्यासाठी सामाजिक लोकशाही आपण जपली पाहिजे . आपल्या हक्क , अधिकारासाठी तथा आपले सामाजिक व आर्थिक हेतू साध्य करण्यासाठी घटनात्मक मार्गाने गेले पाहिजे हा संदेश त्यांनी संविधानातून दिला . शिवरायांनी जसे "रयतेचे राज्य " म्हटले तसेच भारतीय संविधानाने "आम्ही भारताचे लोक " या वाक्याने संविधानाची सुरुवात केली . शिवरायांच्या स्वराज्यातील लढणाऱ्या विरास "मावळा " म्हटले गेले संविधानाने आपली ओळख आपल्याला "आम्ही भारताचे लोक " अशी करून दिली ही ओळख कुठलाही जात - धर्म -पंथ दर्शवणारी नव्हती सार्वभौम , समाजवादी व धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य न्याय ,स्वातंत्र्य , समता व बंधुता याची रुजवन करणारे आहे त्यामुळे स्वाभिमान जागृत होतो व समाजाच्या अगदी शेवटच्या घटकाचे मन - मस्तक आणि मनगट मजबूत होते .
स्वातंत्र्य म्हणजे मी कुणाचाही अंकित नाही . मी पूर्णपणे सर्वांगाने मुक्त आहे . स्वैर आहे कोणाचाही देणेदार नाही . मानवतेची मूल्य जोपासत मी मानवधर्मास जपणारा स्वतंत्र मानवतावादी आहे . स्वातंत्र्य जेवढे महत्त्वाचे तेवढेच स्वातंत्र्यात मानवीमूल्य जोपासत जगणे ही आपली जबाबदारी ठरते .स्वातंत्र्याचा खरा अर्थ तर मानव कल्याणार्थ झटणे , दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा आदर करणे तथा त्याच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणे असाच होतो . दया , क्षमा , शांती ,समता , बंधुता याचे भान ठेवत कृतघ्न न होता कृतज्ञ राहणे असाच आहे . आज आपण स्वातंत्र्यात जगत आहोत आपल्याला काहीही करावे लागत नाही असा समज आपला सुखी जीवन जगत असताना आहे , पण येणाऱ्या काळात आपल्यासमोर काय वाढून ठेवले आहे याचाही वेध घेण्याची कुवत आपल्यात असली पाहिजे तरच आपले स्वातंत्र्य अबाधित राहील .शहीद भगतसिंह यांची " जेल डायरी "
मधील पान 19 वरील जेम्स रसेल लॉवेल या अमेरिकन तत्त्ववेत्याने "स्वातंत्र्य " या विषयावर लिहिलेली कविता या ठिकाणी नमूद करावीशी वाटते .
*मर्दानो , फुशारक्या मारता तुम्ही ,*
*मर्दुमकी आणि स्वातंत्र्याच्या,*
*परंतु ,खरंच आहे का,*
*तुमच्यात धमक आणि तुम्हाला स्वातंत्र्य ?*
*साखळदंडात कुजणाऱ्या बांधवांच्या वेदना जाणवत ,*
*तुम्ही मुक्त असताना कोणी गुलामीत मरत असेल,*
*तर तुम्ही सुद्धा षंढपणा पांघरलेले गुलामच नाही का ?*
*मुक्त वावरण्याच्यातुम्हाला हक्क तरी काय ?*
*फक्त स्वतःला मुक्त कर विणे,*
*यालाच का खरे स्वातंत्र्य म्हणतात ?*
*मानवजातीप्रती जबाबदारी विसरणे,*
*यालाच का खरे स्वातंत्र्य म्हणतात ?*
*खरे स्वातंत्र्य तर त्याला म्हणावे,*
*जिथे प्रत्येकाने दुसऱ्याच्या गुलामीचा भार ,*
*अखंड मानवजात मुक्त करण्याचा ध्यास घ्यावा*
*जे गुलामगिरीच्या विरोधात उभे राहू शकत नाही,*
*त्यांना खरे गुलाम म्हणावे ,*
*उपहास आणि तिरस्काराच्या भीतीने जे शांत बसतात,*
*त्या गुन्हेगारांना गुलाम म्हणावे ,*
*केवळ संख्या कमी आहे म्हणून सत्याच्या बाजूने उभे राहायला जे घाबरतात,*
*त्या नामर्दांना गुलाम म्हणावे .*
संजय खांडवे
इतिहास अभ्यासक
बुलढाणा
9011971122
गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४
शनिवार, २३ मार्च, २०२४
शिवाची १ ०८ रुपे
महादेव
वीरूपाक्ष
चंद्रार्धककृतशेखर
अमृत
शाश्वत
स्थानू
नीलकंठ
पिनाकी
वृषाभाक्ष
महाज्ञेय
पुरुष
सर्वकामद
कामारी
कामदहन
कामरूप
कपर्दी
विरूप
गिरीश
भीम
सॄक्की (म्हणजे मोठे मोठे जबडे वाले)
रक्तवासा
योगी
काल दहन
त्रिपुरघ्न
कपाली
गूढव्रत
गुप्त मंत्र
गंभीर
भाव गोचर
अणिमादीगुणाधार
त्रिलोकेश्वर्यदायक
वीर
वीरहंता
घोर
विरूप
मासल
पटू
महामासाद
उन्मत
भैरव
महेश्वर
त्रैलोक्यद्रावण
लुब्ध
लुब्धक
यज्ञसूदन
कृतिकासुतयुक्त
उन्मत
कृत्तीवासा
गजकृत्तीपरिधान
क्षुब्द
भुजंग भूषण
दत्तालंब
वेताल
घोर
शाकिनी पूजित
अघोर
घोरदैत्यग्न
घोरघोष
वनस्पती
भस्मांग
जटिल
शुद्ध
भेरुड शतसेवित
भूतेश्वर
भूतनाथ
पंचभूताश्रित
खग
क्रोधित
निष्ठूर
चंड
चंडिश
चंडिका प्रिय
चंडतुंड
गरुत्मान
निस्त्रिश
शव भोजन
लेलिहान
महारौद्र
मृत्यू
मृत्यूर गोचर
मृत्योमृत्यु
महासेन
स्मशानारण्यवासी
राग
विराग
रागांध
वितराग
शतार्ची
सत्व
रज
तम
धर्म
अधर्म
वासनवानुज
सत्य
असत्य
सदृप
असदृप
अहेतुक
अर्धनारीश्वर
भानू
भानुकोटीशतप्रभ
यज्ञ
यज्ञपती
रुद्र
ईशान
वरद
शिव
शिवाची १ ०८ रुपे
*क्रांतिची प्रेरणा :शहीद भगतसिंह*
*क्रांतिची प्रेरणा :शहीद भगतसिंह*
➖➖➖➖
आजचा पाकिस्तानचा भाग असलेला ल्यालपूर बंगा येथे 28 सप्टेंबर 1907 रोजी भगतसिंहाचा जन्म झाला . आई विद्यावती कौर आणि वडील किशनसिंह यांच्या संस्कारातून भगत सिंहासारख्या महापुरुषाची जडणघडण झाली . देशभक्तीचे वातावरण त्यांच्या घरातच होते त्यांच्या आजोबापासून प्रत्येक जन क्रांतिकारी चळवळीशी जुळलेले होते . यावरून लक्षात येते की भगतसिंह ज्या गोतावळयात वाढले त्यात क्रांती केवळ बोलण्याचा विषय नसून तर प्रत्यक्ष कृतीचा विषय येतो . संघर्ष , त्याग, बलिदान या गोष्टी तर त्यांच्या कुटुंबीयांसाठी जगण्याची प्रेरणाच होती . त्यांचे काका स्वर्णसिंह आणि अजितसिंह यांच्या देशभक्तीच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता .आजही भगतसिंहाचे नाव जरी उच्चारले तरी मानवतेशी जुळलेल्या चेतना ज्यांच्या हयदयात आहे त्यांची देशभक्ती आपसूकपणे जागृत होते . देशासाठी अन मानवतेसाठी काहीतरी करावं ही भावना मनात तयार होते . भगतसिंहाचे चरित्र तरुणांसाठी एक आदर्श आहे स्वातंत्र्यासाठी आणि मानवाच्या कल्याणार्थ स्वाभिमान कसा जागृत ठेवावा आणि त्यासाठी संघर्ष कसा करावा ,याचबरोबर त्यागाचे ही सर्वोच्च प्रेरणास्थान भगतसिंह ठरतात . अगदी बालपणापासून त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात देशभक्ती किती ओत प्रत भरलेली आहे हे त्यांच्या एका प्रसंगावरून दिसून येते .एकदा मेहता आनंद किशोर हे क्रांतिकारक भगतसिंहाच्या घरी आले होते . तेव्हा चार वर्षाचा भगत लाकडी बंदुका शेतात चिखलात फिरत होता . मेहतांनी विचारले, "काय करतोस ? "तेव्हा भगतने उत्तर दिले कि, "मी बंदुका पेरतो आहे ,उद्या या झाडांना बंदुका लागतील आणि त्या घेऊन मी ब्रिटिशांना या देशातून हाकलून लावेल . " चार वर्षाच्या भगतसिंहामध्ये हा अलौकिक आत्मविश्वास कोठून निर्माण झाला ? असा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा त्यांच्या कुटुंबीयापुढे आणि त्यांनी केलेल्या संस्कारापुढे आपसूकपणे आपण नतमस्तक होतो .ही त्याग अन देशाप्रती समर्पित होण्याची भावना त्या बालकाच्या मनात निर्माण होणे ही त्यांच्या आई-वडिलांच्या आणि कुटुंबीयांच्या मातृभूमी प्रति असलेल्या उच्च कोटीच्या असामान्य देशभक्तीचीच प्रचीती आहे .
देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून बाहेर काढून स्वतंत्र करणे हा त्यांच्या जीवनाचा मुख्य उद्देश होता . गुलामगिरीत खितपत पडणे त्यांना कदापिही मान्य नव्हते . स्वातंत्र्यासाठी ते आयुष्यात कोणतीही किंमत मोजण्यास तयार होते .आपला देश गुलामगिरीत आहे आणि आपण स्वस्थ बसायचं हे त्यांना अजिबात मान्य नव्हते . भगतसिंह जेलमध्ये असताना देखील ते कधीच थांबले नाही त्या ठिकाणी सुद्धा वाचन ,चिंतन आणि लेखनाचा विडा त्यांनी उचलला होता .1929 मध्ये भगतसिंहांना अटक झाल्यावर ते जवळपास अडीच वर्ष तुरुंगात होते .त्यांना फाशीची शिक्षा झालेली असून सुद्धा ते किंचितही विचलित झाले नव्हते . कोणत्याही प्रकारचे दुःख त्यांना जाणवत नव्हते .अलौकिक आत्मविश्वासासह अगदी निर्भीडपणे शिस्तबध्द तेने त्यांनी आपला वेळ तुरुंगात असताना अभ्यासात ,वाचनात अन लेखणात घालविला .713 दिवसाच्या तुरुंगवासात इंग्रजी ,हिंदी ,बंगाली , उर्दू भाषेतील 302 ग्रंथ वाचून काढले .या वाचनातून आपले क्रांतिकारी विचार त्यांनी पुढे लेखनबद्ध केले .तत्कालीन परिस्थितीचा विचार करत देशाच्या च नव्हे तर जगाच्या सुद्धा सामाजिक, राजकीय ,धार्मिक ,आर्थिक ' सांस्कृतिक विषयांची तर्कसंगत पद्धतीने विचार करून त्याची मांडणी केली . साम्राज्यवाद , सामंत शाही ,लोकशाही , भांडवलशाही या विषयावरही भाष्य केले . जगातील सर्वच महत्वाच्या राजकीय क्रांतीचा अभ्यास केला . स्वातंत्र्याच्या महानकार्यासाठी , मातृभूमीच्या रक्षणासाठी बलिदानाचे महत्त्वही त्यांनी आपल्या लिखाणातून विषद करत धर्माचा ही तुलनात्मक अभ्यास करून नास्तिकतेची परिभाषा त्यांनी या बंदीवासात असताना केली आहे .या काळात त्यांनी चार ग्रंथ लिहून काढले . यामधील "Why I am an Atheist " हा लेख प्रत्येक भारतीय तरुणांनी वाचलाच पाहिजे असा आहे .भारतीय तरुणांपुढे भगतसिंहांचा आदर्श आहेच, पण फोटो पाहून आजच्या सोशल मीडियाच्या युगात स्टेटस ठेवण्यापुरता किंवा "इन्कलाब जिंदाबाद ! " एवढंच म्हणण्यापुरता नसावा .तर भगतसिंहांनी लिहिलेले तुम्हा आम्हा सारख्या तरुणांना प्रेरणादायी ठरणारे भगतसिंहाचे साहित्य प्रत्येकाने वाचलेच पाहिजे .
त्यांच्या जेल डायरीमधील पान 19 वरील जेम्स रसेल लॉवेल या अमेरिकन तत्त्ववेत्याने "स्वातंत्र्य " या विषयावर लिहिलेली कविता या ठिकाणी नमूद करावीशी वाटते .
*मर्दानो , फुशारक्या मारता तुम्ही ,*
*मर्दुमकी आणि स्वातंत्र्याच्या,*
*परंतु ,खरंच आहे का,*
*तुमच्यात धमक आणि तुम्हाला स्वातंत्र्य ?*
*साखळदंडात कुजणाऱ्या बांधवांच्या वेदना जाणवत ,*
*तुम्ही मुक्त असताना कोणी गुलामीत मरत असेल,*
*तर तुम्ही सुद्धा षंढपणा पांघरलेले गुलामच नाही का ?*
*मुक्त वावरण्याच्यातुम्हाला हक्क तरी काय ?*
*फक्त स्वतःला मुक्त कर विणे,*
*यालाच का खरे स्वातंत्र्य म्हणतात ?*
*मानवजातीप्रती जबाबदारी विसरणे,*
*यालाच का खरे स्वातंत्र्य म्हणतात ?*
*खरे स्वातंत्र्य तर त्याला म्हणावे,*
*जिथे प्रत्येकाने दुसऱ्याच्या गुलामीचा भार ,*
*अखंड मानवजात मुक्त करण्याचा ध्यास घ्यावा*
*जे गुलामगिरीच्या विरोधात उभे राहू शकत नाही,*
*त्यांना खरे गुलाम म्हणावे ,*
*उपहास आणि तिरस्काराच्या भीतीने जे शांत बसतात,*
*त्या गुन्हेगारांना गुलाम म्हणावे ,*
*केवळ संख्या कमी आहे म्हणून सत्याच्या बाजूने उभे राहायला जे घाबरतात,*
*त्या नामर्दांना गुलाम म्हणावे .*
यावरून लक्षात येते की शहीद भगतसिंह हे स्वातंत्र्य आणि गुलामगिरी याबद्दल काय म्हणत होते . सत्याच्या बाजूने उभे राहणे हे 17 व्या शतकातील महाराष्ट्रातील पहिले मराठी लोककवी जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी आपल्या काव्यातून सांगितले होते "सत्य असत्याशी मन केले ग्वाही । मानिअले नाही बहुमता ॥" तेच पुढे 19 व्या शतकात जेम्स रसेल आपल्या काव्यातून मांडतात व पुढे सत्याची अन सत्यासाठीची त्याग अन समर्पनाची क्रांतिकारी धार भगतसिंह आपल्या क्रांतीतून दाखवून देतात .ते म्हणत मानवतेला प्रभावित करणाऱ्या सर्वच गोष्टीशी माझा संबंध आहे .त्यांना लाभलेल्या अत्यल्प आयुष्यातही प्रतिकूल परिस्थितीत सखोल वैचारिक चिंतन घडवून एक आदर्श नव तरुणांपुढे उभा केला .आपल्या देशाचे उज्वल भविष्य कोठे आहे हे त्यांनी जाणले होते म्हणून त्यांचे विचार हे मानवतेच्या कल्याणार्थ आजही लागू पडतात .
*तुझे जब़ह करने की खुशी मुझे मरने का शौक,*
*मेरी भी मर्जी है , जो मेरे सैय्याद की है ।*
हसत हसत देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या क्रांतिकारी वीर शहीद भगतसिंहास विनम्र अभिवादन .
➖➖➖➖➖🌷
संजय खांडवे
9011971122
शनिवार, ९ मार्च, २०२४
नमः शिवाय
*नमः शिवाय ।*
〰️〰️〰️〰️〰️〰️
सर्वेश्वर महादेव हे सर्वव्यापी समजले जातात .आज आपण आपल्या परिसरामध्ये पाहतो की भगवान शिव शंकराची अनेक प्राचीन मंदिरे आहेत या मंदिरांमध्ये अगदी मनोभावे भक्त शिवाची भक्ति करत असतात . यामध्ये पुरुष असो वा स्त्री हे दोघेही तेवढीच श्रद्धा शिवशंकरावर ठे वतात .अनेक ठिकाणी यात्रा उत्सवही अगदी प्राचीन काळापासून सुरू आहेत .शिवलिंगाच्या रूपाने सर्वत्र शिवउपासना होते . हे शक्तीचे प्रतीक मानले जाते . स्वर्ग व पृथ्वीची निर्मिती करून त्याचे संचलनार्थ सर्व दिशांनी मुख असलेले सर्व दिशांना हात व पाय असलेले भगवान शिव हे महान असे महादेव ठरतात .भगवान महादेवाच्या डाव्या अंगातून विष्णू म्हणजेच श्रीहरीची तथा उजव्या अंगातून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली आहे या ब्रह्मदेवांना नारायणाच्या नाभीत त्यांनी स्थापित केले आहे ब्रह्मदेव पुढे शिवांच्या प्रेरणेनेच देव, असूर, मनुष्य आदी सृष्टीची रचना करतात .असे शिवपुराण सांगते .भगवान शिव शंकराचा पुराण व इतर आधुनिक साहित्यातून अभ्यास केल्या नंतर त्यांच्या केलेल्या कार्यानुसार मान्यता पावलेल्या नावांची एक मोठी यादीच तयार होते .आदिनाथ, आदी योगी या नावाने ते प्रसिध्दच आहे .आदी हा शब्द त्यांचे प्राचीनत्व सिद्ध करतो .गंजांतक, जिमूतवाहन, सदाशिव , वृषभध्वज ,परमात्मा , परब्रम्ह ,श्रीनिलकंठ ,ईश्वर , शंभू , महेश्वर , हर ,चिदानंदस्वरूप अशी कितीतरी नावे शिवाची आहेत .निर्विकार, प्रकाशपूर्ण, करुणामय , चंद्रकला विभूषण, विष्णूकमल, विष्णूक्षेत्र, वेदांतवेद्य ,जटाजुटधारी, त्रिगुणातीत,भ्रमणशील, भक्तवत्सला, दयासिंधू , शंभू ,जितेंद्रिय , महेश , सृष्टीकर्ता , दुर्गेश, जगन्नाथ , मृत्युंजय , दीनबंधू ,दयासिंधू ,शर्वा, , परमतत्वमय, अविनाशी , सर्वेश्वर सहारा कर्ता, दिनबंधू ,पशुपतीनाथ,भैरव , वीरभद्र अशी अनंत नावे त्यांच्या कार्यसिद्दी मुळेच त्यांना प्राप्त झाली आहेत . ' "सर्वो वै रूद्र: " रुद्रच सर्व आहे या महा वाक्यातून ते सिध्द होते . स्थानिक भूप्रदेशातही त्या भागाच्या नावानुसार त्यांना ओळखले जाते जसे सिध्देश्वर ,मानकेश्वर ,बुदनेश्वर,पाताळेश्वर ,केहाळेश्वर ,रामेश्वर अशी अनेक नावे आहेत .
आणखी कितीतरी रुपे ही शिवाची आहे.भ्रमर कोषात शिवाची ४८ नावे आहेत .वेदांची निर्मिती होण्याअगोदर पासून शिवाची पूजा होत आली आहे .प्रागैतिहासिक काळात शिव निरंजन निराकार होते .ते स्मशानात राहत ,शरीराला भस्म लावत ,मुंडमाला धारण करत,साप अलंकार रूपाने धारण करत,ते महायोगी पेक्षाही मोठे होते.
सर्व संस्कृतीने त्यांचा स्वीकार केला होता .त्यागी -निर्लोभी-निर्लेप दैवत म्हणजे शिव होय .
शिवाची अतिप्राचीन काळापासून उपासना केली जाते .यांचे काही मूर्तीप्रकार आहेत .
सुखासन,सोमस्कध,चंद्रशेखर,वृषारूढ,नृत्यमूर्ती,गंगाधर,त्रिपुरान्तक,कल्याणमूर्ती,अर्धनारीश्वर,भद्ममूर्ती,पाशुपत,कंकाल,हरीहर,भिक्षाटन,गणेशानुग्रह,दक्षिणमूर्ती कालारि,लिंगोद्वव,श्रीपंचाश्रीपंचाधर,ललाट तिलक ही शिवाची मूर्ती रुपे आहेत .
उत्तर भारतात शिवाची १२ रूपांची उपासना केली जाते .
सद्योजात,वामदेव,भ्रषोर,तत्पुरुष,ईश,मृत्युजय विजय,किरणाक्ष,भदोरास्त्र,श्रीकंठ,सदाशिव,द्वादशकला संपूर्ण मूर्ती ही ती १२ रुपे आहे .आपण दक्षिण भारतात गेलो तर १८ रूपाचे पूजन होते.ही पुढील सहा रूपे त्यामधे येतात . अर्धनारीश्वर,चंदेशानुग्रह,कालाहमूर्ति,कल्याणमूर्ती,त्रिपुरान्तक,उमास्कंध .
शिवलिंगाचेही प्राचीन काळापासून खूप महत्व आहे.नदीच्या उगमस्थानावर किंवा काठावर शिवलिंगाची स्थापणा प्राचीन काळापासून होतांना दिसते .मंदीराच्या आकाराच्या प्रमाणात शिवलिंगाची रचना केलेली दिसते .शिवलिंग मोठे असल्यास त्याची स्थापणा बाहेर ओटयावर केलेली दिसते .
शिलादपुत्र नंदी हा चंद्रार्थभूषणांचा अत्यंत प्रिय पार्षद होता . तो अत्यंत परमज्ञानी व विवेकपारायणी होता .नंदी हे शिवाचे प्रिय वाहन आहे .शिवमंदिरात नंदीची स्थापणा अनिवार्य असते.प्राचीन काळात विदेशातही नंदीची पूजा होत असे.मिस्त्र,बेबोलियन,
सिरिया आदि विदेशी संस्कृतीत बैल (नंदी)चे महत्व दिसते .५००० वर्षापूर्वीच्या सिंधू संस्कृती मध्ये वृषभ मूर्ती आढळलेल्या आहेत.आपण दक्षिण भारतात गेलो की नंदीच्या विशाल मूर्ती दिसुन येतात .शिवालयासमोर नंदीसाठी स्वंतत्र मंडप असल्याचा नेम दिसून येतो .महाराष्ट्रात कैलास लेणीमध्ये नंदीसाठी स्वंतत्र दालन शिवालयासमोर आहे . अगदी तसेच सुंदर असे नंदीमंडप गडचिरोली मधील मार्कडेश्वराच्या मंदिरा समोर स्थित आहे . यज्ञ प्रसंगी दक्षाच्या शिवविरोधाला नंदिने परखडपणे प्रति उत्तर दिल्याचे शिव पुराण सांगते .
शिव हा एक विचार प्रवाहच आहे गत पाच हजार वर्षापासून चालत आलेला दिसतो .शिव हे कृषीसंस्कृतीचे एक प्रेरणादायी स्वरूप आहे त्यांना पशुपतीनाथही याच अर्थाने म्हटले जाते .हिमवान व मेना यांची पुत्री उमा व शिव यांच्या शिवविवाहात असंख्य कोटी गण , देवी , देवता व ऋषी मुनीच्या उपस्थितीत गंगा , यमुना , गोदावरी तथा असंख्य नद्यांच्या सानिध्यात विवाह पार पडत असतांना ध्वज ,पताके , आंबे केळी आदि खांबाचे मनोरे उभारून मंडप टाकला जातो . सप्तमातृ कांची उपस्थिती व गर्गाने उमा पार्वतीची तांदुळाने ओटी भरणे . अक्षदा, कुश व जलाने शिवाची ओवाळणी हे शिवविवाहाचे प्रसंग कृषी परंपरेचे नाते सांगतात व आजही ते आपण आपल्या शुभ कार्यात जपतो .
शिवाचे तांडव हे या विश्वाचा नाश नाही तर संचलणार्थ आहे ,ज्याने निर्मिले तो नाश कसा करेल ?
शिवाने 'सत्य' ह्यासाठी व विश्वाच्या संचलणार्थ असंख्य निवाडे पुराणात आढळतात
महादेवास भोळा सांभ ही म्हटले जाते म्हणजे महादेव हे अगदी सहजतेने म्हटल्यापेक्षा कोणताही भेदभाव न पाळता सदैव मदतीस तत्पर अशी देवता !
अन्न,वस्त्र,निवारा ह्या मनुष्याच्या मूलभूत गरजा या गरजे व्यतिरिक्त मिळवणे म्हणजे मोह ,वासना,आसक्ती
आणि मनुष्य प्राण्याने मूलभूत गरजा व्यक्तीरिक्त जे धन आहे त्यापैकी काही ज्याचा मूलभूत गरजा अपूर्ण आहेत त्यांना दान करावे असे सांगत धनसंचय करणाऱ्या कुबेरासही महादेवांनी फटकारले होते हे माझ्या वाचनात आहे.
समुद्रमंथनातील विष सृष्टीच्या संचलणार्थ आपल्या कंठात सामावणारे संपुर्ण विश्वाच्या न्यायनिवाड्यात ही केवळ आणि केवळ सत्य ह्या विषयावर ठाम राहूण पुराणामध्ये न्याय देतांना दिसतात
न्याय दर्शनाचा विचार सांगत पुढील येणाऱ्या काळात सत्याच्या चिकित्सेसाठी गौतम ॠषींना सहा दर्शना पैकी "न्याय" दर्शनाची मांडणी करायला सांगतात
शिवाची अनंत रुपे हया विश्वाच्या अनंत हर्षासाठी आजही तुमच्या आमच्यात जेथे सत्य आहे
जेथे पविञता आहे
जेथे विचाराची सुंदरता आहे
जेथें मनुष्यजातीची सेवा आहे
जेथे मोह,माया,लोभ,आसक्तीला
स्थान नाही
तेथे निश्चितच देवादीदेव शिवाचाच वास आहे
➖➖➖➖➖➖
नमः शिवाय
संजय खांडवे
9011971122
सोमवार, २२ जानेवारी, २०२४
छत्रपती राजाराम महाराज
छत्रपती राजाराम महाराज
🚩🚩🚩🚩🚩🚩
तीन पिढयांची अखंड मेहनत,पारिश्रम ,शौर्य,धाडस,त्याग,पराक्रम,विश्वास,प्रजाहितक्षता याच्या जोरावर आदर्श घेत मराठयांचे साम्राज्य मोठया आत्मविश्वासाने पराक्रम गाजवत होते.
आईजिजाऊंच्या प्रेरणेतून साकार झालेले....
महाबलीनी सूचीत केलेले स्वराज्याचे स्वप्न 'सनय 'होऊन शिवरायांनी उभे केले होते.
शिवरायांचा विश्वास ,मॉसाहेबांचीप्रेरणा ही रयतेला स्वराज्यरक्षणार्थ सिद्ध करत होती सोबत तुकोबारायांचे अभंग मावळ्यासांठी प्रेरणा देत होते.लाखाच्या पोशिदयाला जपण्यासाठी प्रत्येक मावळा निधड्या छातीने पुढ येत होता
आबासाहेबानंतरही स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा महाराष्ट्राच्या रक्तात भिनली ,अन्यायाविरुध्दची प्रेरणा आबासाहेव देऊन गेले ,स्वराज्यरक्षकाची भूमिका पुढे शंभूराजांनी बलिदान देऊन पूर्णत्वास नेली,आपले प्राण दिले पण स्वाभिमान सोडला नाही,महाराजांनी उभी केलेली गडकोट ही औंरंगजेबाविरुद्ध लढत ठेवा हा संदेश शंभूराजांनी दिला ही रयतेची कळवळ त्यात होती एकदा हातून गेलेले स्वराज्य पुन्हा उभे करणे हे अवघड काम होईल !
आबासाहेब,मॉसाहेबांच्या तालमित वाढलेली येसूराणीसाहेबांनी धीरगंभीरपणे ही जबाबदारी स्वीकारली,हा भोसले घराण्याचा संस्कार ......
शंभूराजांनी दिलेली बिरूदावली " श्री सखी राज्ञी जयति ।"
आपल्या पतीच्या पश्चात स्वराज्याची सूत्र सांभाळण्याचा संस्कृतीचा वारसा त्यांना मिळाला अर्कज्ञ,सहस्त्रकरविक्रम,महाबली शहाजीराजे व स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ मॉ साहेब यांच्याकडूनच........
महाबली शहाजीराजांच्या दक्षिणेतील शिवरायांच्या जडणघडणीतील एक भाग म्हणजे शिवरायांचे सनय होणे ,म्हणजे विविधअंगी ज्ञान प्राप्त करणे. पुढे दक्षिण दिग्विजयात महाराजांनी जिंजी जिंकला त्या जिजींचे अधिकचे बांधकाम करून अभेदय केले,त्याठीकाणी महाडीकांची नेमणुक केली जिंजी अधिक मजबुत केला ,हा शिवचरित्रातील सनयाचाच एक भाग आहे,याची प्रचीती पुढे येते. संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर स्वराज्यावर फार मोठे संकट कोसळले या संकटाला मोठया धैर्याने तोंड देत स्वराज्याचे मनोधैर्य वाढविण्याचे काम महाराणी येसूबाईंनी केले .संभाजीराजे मुघलांच्या कैदेत पडल्यावर सुटकेची काही आशा नव्हती काळाचा वेध घेत येसूराणीसाहेबांनी छत्रपती राजारामांचे मंचकरोहन ९ फेब्रुवारी १६८९ ला रायगडावर केले . त्यावेळी शंभूपुत्र शाहूराजे केवळ ७ वर्षाचे होते आणि राजाराम राजे हे १९ वर्षाचे होते . वेढा घालण्याचे धाडस मोगलांना शंभूराजे गेल्यानंतरच झाले .२५मार्च १६८९ ला औरंगजेबाचा वजीर असदखान याचा मुलगा इतिकादखान हा औंरगजेबाचा मावसभाऊ याने रायगडला वेढा दिला .येसूराणीसाहेबांच्या मसलतीनुसार राजारामराजे यांना ५ एप्रिल १६८९ ला ताराराणी ,राजसबाई यांच्यासह प्रल्हाद निराजी,धनाजी जाधव,संताजी घोरपडे यांच्यासह गुप्तपणे रायगड सोडला.जावळी _प्रतापगड _पन्हाळगड मार्गाने अत्यंत शिताफीने जिंजीकडे प्रयान सुरु केले .मराठयांचा हा राजा हुल देवून कर्नाटकात जाईल हा अंदाज मोगली सैन्याला होता . पन्हाळ्याकडे येतांना प्रतापगडाच्या पायथ्याशीही लढाई झाली ती अज्ञात आहे. त्यामुळे या मार्गावर मोगलांनी आपले चौकी पहारे अधिक सक्त केले होते .मोगली सैन्य वेगाने दक्षिणेत एकवटायला सुरुवात झाली होती.मराठे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जय जयकार करत मोगली सैन्यावर छापे घालत होते .अंधाऱ्या रात्री औरंगजेबाच्या छावणीवर गनिमी काव्याने हल्ला करून त्या लाखाच्या सैन्यातून त्याच्या छावणीचा कळस कापून आणला . संभाजी राजे यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा हा हल्ला होता . या अतुलनिय पराक्रमावर रामचंद्रपंत अमात्य म्हणतात " बादशहाचे डेऱ्याचे कळसच आणून झुलफिकारखान याचे पाच हत्ती आणिले त्यापेक्षा यांची (संताजीची) मर्दुनकी कोठवर वर्णावी "
दुसऱ्या बाजूने धनाजी जाधव रणमस्तखान व शहाबुध्दीन खानाच्या सैन्यास शह देत होत्या .संताजी -धनाजींच्या पराक्रमाने मराठयांमधे एक नवचैतन्य संचारले होते .राजाराम महाराजांनी कर्नाटकाच्या प्रवासास निघण्या अगोदर स्वराज्याची जबाबदारी सचीव रामचंद्रपंत यांच्याकडे सोपविला त्यांच्या सेवेत शंकरजी नारायण यांना ठेवले .संताजी घोरपडे व धनाजी जाधव हे नरवीर नाशिक ते जिंजी पर्यन्तचा प्रान्त लढवत ठेवण्याचे नियोजन केले .सहयाद्रीच्या मदतीने मराठे एक एक किल्ला लढवत ठेवून मोगलांना चकमा देत होते .राजारामराजे पन्हाळ्याच्या वेढयात असतांना तो वेढा मोगलांनी अधिक कडक केला अशा परिस्थितीत सुद्धा २६ सप्टेंबर १६८९ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास राजाराम महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांसह पन्हाळगड सोडला.शत्रूला याची भनक सुद्धा लागली नाही .आग्रावरून सुटकेच्या वेळी जे तंत्र शिवरायांनी वापरले त्याच पध्दतीने राजाराम महाराजांनी अत्यंत शिताफीने आपल्या बुद्धीचार्तुर्याने हा प्रवास जिंजीपर्यन्त केला .येथून महाराजांचा जिंजीचा प्रवास सुरू झाला . या प्रवासावर केशव पंडितांनी एक छोटेखानी काव्याची रचना केली आहे. या प्रवासावर आणि स्वराज्याची दक्षिणेतील राजधानी अत्यंत चातुर्याने ,पराक्रमाने व मुत्सदी युद्ध नितीने राजारामराजेंनी टिकवून ठेवली यात तंजावरच्या मराठा साम्राज्याचीही त्यांना खूप मोठी मदत झाली .प्रवासात बेदनूरच्या राणी चन्नमा हिने राजधर्म पाळत मराठयांच्या राजाचे रक्षण केले . यामुळे रागाने राणीवर चालून आलेल्या सैन्यास संताजी घोरपडेनी हतबल करुन परत पाठवले.तुंगभद्रानदीतील बेटावर राजारामराजे मुककामास असतांना अब्दुल्लाखानाच्या हल्यात महाराजांनी वेषपरावर्तन करून सुटका केली त्यावेळी राजवस्त्र परिधान करून मीच राजारामराजे आहे हे छातीठोक पणे सांगत आपल्या मराठयांच्या राजासाठी आत्मबलिदान दिले .या अनामिक वीर मावळ्यांचे नाव इतिहासाला ज्ञात नाही.हा वीर म्हणजे स्वराज्याचा दुसरा शिवाजी काशिदच म्हणावे लागेल .हा जिंजीचा प्रवास अत्यंत संक्षिप्त आहे यावर अधिक लिखान होणे आवश्यक आहे.त्यांनंतर जिंजी व त्या परिसरातील छत्रपती राजारामराजे यांच्या पराक्रमाची गाथा घरा-घरात पोहचणेही तितकेच महत्वाचे !
स्वराज्याचे छत्रपती राजाराम महाराज यांनी ही स्वराज्याची राजधानी लढत ठेवली . मराठयांनी त्यांच्या नेतृत्वात औरंगजेबास हैरान करून सोडले ७ वर्ष मुघलांचा वेढा होता ,मुघल झुंजत राहीले पण गडावरची रसद संपली नाही. राजाराम महाराजांनी हा लढा सुरू ठेवला ही त्यांची युध्दनिती होती यावर आता अभ्यास होतांना दिसत आहे.हे शहाजीराजे आणि शिवरायांचे दुरदृष्टीचे नियोजन होते . रायगड जर धोक्यात आला तर ही महाराजांची पर्यायी योजना शिवचरित्रातून दिसते हेच शिवतंत्र आहे .
आज छत्रपती राजाराम महाराजांची जयंती या निमित्ताने स्वराज्याचे तिसरे छत्रपती यांना मानाचा मुजरा!
- संजय खांडवे
9011971122
जगतगुरू तुकोबाराय -जयंती विशेष
जगतगुरू तुकोबाराय -जयंती विशेष
भक्ती चळवळीचा पाया महाराष्ट्रातच घातला गेला.भारतात ही चळवळ दक्षिणेकडून उत्तरेकडे कालांतराने सरकत गेली .पुंडलिकाची विठ्ठल भक्ती सर्वश्रृत आहे .अनेक अभ्यासकाच्या मते पुंडलिकाचा कालखंड काढता आला तर वारकरी पंथाचा उदय काळही समजेल .कृतयुगातील हरी,त्रेतायुगातील राम,द्वापरातील कृष्ण हे तिन्हीमिळून साकारलेल्या कलयुगीचा समचरणी विटेवरी उभा असलेला, सर्वाभूती समदृष्टी असलेला विठ्ठल हे वारकरी पंथाचे वैष्णवांचे एकमेव दैवत होय . संतशिरोमनी नामदेवांनी पंढरीचे वर्णन करतांना म्हटले आहे
"जेव्हा नव्हते चराचर |तेव्हा होते पढ़रपूर ॥
या पूर्वी विठ्ठल उपासना होत होती विठ्ठल संप्रदायही होता पण संघटीत पध्दतीने वारी करण्याची वारकरी परंपरा संत नामदेव,संत ज्ञानेश्वर यांच्या काळात सुरु झाली .पुढे संत एकनाथांच्या भारुड,किर्तनातून व संत तुकारामाच्या अंभगातून हा विठूरायांच्या वारकरी प्रबोधनाचा मेळा अखंड सुरू होता .संत बहीणाबाईच्या नुसार या वारकरी भक्ती परंपरेचा कळस तुकारामांच्या रूपाने पूर्ण झाला . तुकारामांच्या गाथेतून भागवत धर्माचे सार सोप्या भाषेत जनमानसात पोहचले.जगण्याचे सार सांगणारी व जगण्याचं बळ देणारे तुकारामांचे जीवनही तेवढेच संकटमय होते .त्याच्या आयुष्यात त्यांनी असंख्य घाव सोसले ,आत्मकेद्री व चिंतनशील तुकारामांनी समाजाप्रती आपले आयुष्य वाहीले होते .स्वतःच्या संसाराबरोबर समाजाच्या संसारासाठीही तुकाराम महाराज जगले .बोल्होबा व कनकई यांच्या पोटी तुकारामांचा जन्म झाला .सावजी व कान्होबा हे त्यांचे बंधू .देहू परिसरातील एक प्रतिष्ठीत धनधान्य सपन्नता त्यांना लाभलेली होती.१३ वर्षाचे असतांनाच त्यांचे लग्न झाले वडील लवकरच वारले पाठोपाठ आई सुद्धा त्यांना सोडून गेल्या . त्यावेळी तुकारामांचे वय १७ -१८ वर्षाचे होते .त्यांच्या पत्नी रखमाबाई हया दम्याच्या आजाराने लवकरच गेल्या .त्यांचा मुलगा संताजी सुद्धा आजारपणातच गेला .त्याच वेळी त्यांचे मोठे बंधू सावजी यांच्या पत्नी सुद्धा गेल्या यामधे सावजी घर सोडून गेले .हा सर्व दुःखाचा डोंगर तुकारामांच्या सुरूवातीच्या आयुष्यातच त्यांच्यावर कोसळला.जगण्याचा मंत्र देणारे तुकाराम महाराज कधीही डगमगले नाही.आपल्या कुटुंबाची जबाबदारी त्यांनी अत्यंत निष्ठेने सांभाळली .त्यांच्या डोक्यात कधी नकारात्मक विचार आलाच नाही .त्याच काळात प्रचंड दुष्काळही पडला होता .तत्कालीन धार्मिक, सामाजिक,सांस्कृतिक व राजकिय समाजजीवनाचा अभ्यास तुकारामांना होता .बुडणाऱ्या समाजाला जर वाचवायचे असेल तर मला काहीतरी केले पाहिजे नव्हे तर करावेच लागेल ही भावना त्यांची होती .तुकारामांना अवघे ४२ वर्षाचे आयुष्य लाभले .त्यांचे चरित्र हे सदैव प्रेरणादायी ठरते.धर्मशास्त्र,वेद,पुराने आदिची चिकित्सा करून मानवजातीच्या कल्याणार्थ आदर्श समाजरचनेचा पाया त्यांनी जगासमोर मांडला .त्यांच्या अभंग गाथेतून मानवी जीवनाशी निगडीत प्रत्येक मुद्दा साध्या व सोप्या भाषेत हातळला गेला.मानवी जीवनात सार्वकालिक मार्गदर्शक ठरणारे विचार या गाथेतून तुकारामांनी मांडले .संत तुकारामांचे अभंगशतक या पुस्तकातुन आईवडील,संत,संगत,हितासाठी उपदेश,शब्द,अनुभव,चमत्कार,संसार,शेती,प्रयत्न,आघात,सत्य,शुद्धता,नम्रता,क्षमा,शांती,प्रसिध्दी,किर्ती,मन,आनंद या विषयावर आधारीत त्यांचा गाथेतून निवडक १०० अभंगांचे विश्लेषण डॉ आ ह साळुके सरांनी त्यांच्या समपर्क भाषेतून केले आहे.शब्द हेच धन,शस्त्र तुकारामांनी तत्कालीन शोषण व्यवस्थेवर थेट पणे प्रहार केलेला दिसतो .तुकोबांनी मांडलेला एक एक शद्ब या स्वातंत्र्य युद्धातील एक एक शस्त्रच होते .व त्यांनी मांडलेला एक एक शद्ब म्हणजे समाजाच्या नव्या रचनेसाठी काळजीपूर्वक ठेवलेला एक एक वीटही होता असे डॉ आ ह साळुके सर मांडतात .त्यांचा प्रत्येक अभंग म्हणजे एक पुस्तकच म्हणावे लागेल .आज आमच्या सारख्या नव वाचकांना तुकारामांच्या अभंगाची गोडी डॉ आ ह साळुंखे सरासारख्या महाविद्वान विचारवंताच्या लेखनातून झाली .विद्रोही तुकाराम या माध्यमातूम तुकारामांचा विद्रोह कळाला.अलिकडच्या काळात विजय गवळी सरांच्या तुकास्त्रामधून अधिकच तुकाराम जवळचे वाटू लागले .गाथा परिवारातील उल्हास पाटिल सरांचे अभंगानुसार प्रत्येक अभंग कसा सार्वकालिक आहे आजही तो आधुनिक समाजव्यवस्थेत कसा लागू पडतो हे उल्हास पाटील सरांच्या विश्लेषणावरून लक्षात येते .या ना त्या कारणाने संत तुकाराम जवळचे वाटू लागतात त्यांचा संघर्ष आजही आपला संघर्ष वाटू लागतो .त्यांचा विद्रोह हा आजही आपला विद्रोह वाटून त्यांच्या विचारांचा अनुयायी बनण्याची प्रेरणा देत राहतो .सर्व जाती धर्माच्या माणसाला संतपदापर्यन्त नेवून पोहचविणारे ; अध्यात्मीक लोकशाहीचा पाया रचणाऱ्या व आपल्या संस्कृतीचे प्रातिके निर्माण करणाऱ्या वारकरी सप्रदायात तुकारामांची गाथा मैलाचा दगड ठरते .
का जुळते ही नाळ तुकारामांशी ? का भिडतात त्यांचे शद्ब त्रीक्ष्ण हत्याराप्रमाणे ?का वाटत नाही भिड भाड प्रश्न विचारायची ?का गळून पडतो अहंकार ?
का आग्रह धरावासा वाटतो सत्याचा ?
का वाटू लागतात वृक्ष वेली आपली सगी सोयरी ? असे ना ना विध प्रश्न पुढे उभे राहतात प्रत्येक अभंग एक तरी प्रश्न पुढे उभा करतो व ते हयदयाला भिडतात .
सिद्धीचा दास नव्हे श्रृतीचा आंकिला । होईल विठ्ठला सर्व तुझा ॥
कोणत्याही बाहय शक्तीच्या अधिन न जाता ,अंकित न होतां सर्वशक्तीमान अश्या विठ्ठलाचा पर्याय सामान्याला देतात .कोणत्याही पाप पुण्याचे भय विठोबा समोर त्यांना राहीले नव्हते. पूर्ण पणे विठ्ठला।ला स्वाधिन झाल्याने कशाचेही भय उरले नव्हते .सावळे रूप डोळ्यानी पहावे ,देच सहा शास्त्रे ,चार वेद व अठरा पुराने यांचे सार आहे.शास्त्राचे सार आणि वेदांची मूर्ती असलेला ईश्वर हा माझा प्राणसखा सांगाती आहे .म्हणून मला इतर कोणाची इच्छा नाही ,विठ्ठलाच्या ठिकाणी शुद्ध भाव ठेवणें हाच माझा धर्म व हीच अवघी निती होय . या वारकरी चळवळीत आपल्या कुटुंबाची सेवा व रक्षण करणे हे विठ्ठल उभारणीचे एक कारणच म्हणावे लागेल .समचरणी उभा असलेला विठ्ठल हे समतेचे तत्व आहे.एकादशी,कार्तिकी ,आषाढीला एकत्र येणे ही अध्यात्मीक लोकशाहीची बांधणीच आहे.समतेची भगवी पताका ही त्याचे प्रतिकच आहे.या सामाजिक व सास्कृतिक लढयात साक्षात देवांनाही प्रश्न विचारण्याचे सामर्थ्य निर्माण करुन ईश्वराच्या वर्तनालाही नैतीकतेची कसोटी लावली . त्याच परंपरेने वेदांनाही आव्हाण दिलेले आहे .
वेदांचा तो अर्थ आम्हाची ठावा । येरांनी वाहवा भार माथा ॥
या नंतर तुकारांमांना कोणत्या प्रसंगाना सामोरे जावे लागले तो वेगळा भाग आहे त्याचे विवेचन स्वतंत्र होऊ शकते .
आता आम्हा भय बा कोणाचे ।
बळ विठोबाचे आले ऐसे ।।
कुणाचेही भय न बाळगता सर्व सामान्याना कोणत्याही आडकाठी न ठेवता सहज भेटणारा विठ्ठलाचे बळ त्यांच्यात निर्माण झाले .कोणत्याही मूर्तीपूजेचा आग्रह न धरता निर्गुण भक्तीचा मार्ग त्यांनी सांगितला.निर्गुण भक्ती म्हणजे कुणीही केवळ गंध टिळा लावून नामस्मरण केले तरी तुम्हाला परमेंश्वर भेटू शकतो .कुणीही सान थोर न ठरता समतेची मांडणी करुन आपला व्यवसाय व कुटुंबाचे पालन निष्ठेने करत ह्या भक्तीमार्गात दृढता निर्माण केली.
कासाया एकांत सेवू वाडा ।
आनंद जो जनामाचि असे ॥
मी जंगलात,वनामधे एकटा राहुण काय करणार आहे ?माझा खरा आनंद माझ्या कुटुंबात, माझ्या समाजात ,माझ्या लोकात राहून त्यांच्या साठी झिजण्यात आहे हा निर्गुण भक्तीचा आदर्श त्यांनी घालून दिला .
योग तप याचि नावे ।
गळीत न्हावे अभिमाने ।।
कोणत्याही प्रकारचे बडेजावपणा न करता योग आणि तप कशाला म्हणायचे तर अहंकार गळून पडतो तोच योग व तप आहे येवढया तोडक्या शद्वात अलौकिक वाटणाऱ्या संकल्पणा तुकारामांनी जन सामान्यात मांडल्या आणि त्या त्याच्या पर्यन्त अभंगाच्या रूपाने पोहचविल्या .हीच भावना सामान्याच्या हयदयात आजही भिडलेलीच आहे .या पवित्र मातीत अशी कुठली जागा नसेल ,त्या ठिकाणा पर्यन्त तुकारामांची शब्दवाणी पोहचली नसेल .चराचही उत्साहाने आज त्यांचे अभंग व्यक्त होतांना जाणवतो .तुकारामांची गाथा बुडविणाऱ्या हातांनी आणि त्यामागच्या शक्तीनेही कधी गाथा बुडवत असतांनाही विचार केला नसेल ! आज या मातीत जगतगुरुच्या रूपाने संत तुकाराम वास करत आहे.
जनमानसात ,घराघरापर्यन्त पोहचलेले अन मुखोतगत झालेले तुकाेबांचे अभंग हाच परिवर्तनासाठी सर्वात सोपा मार्ग वाटतो,प्रत्येक घरात जगतगुरू तुकाेबांची गाथा असणे अत्यंत आवश्यक वाटते,तुकोबांची शब्दरत्ने ही खूप महत्वाची मानवी मूल्ये ,नैतिकमूल्ये जपणारी आहेत ,अगदी जन्मापासून मृत्युपर्यन्त जीवनातील प्रत्येक पैलूवर अगदी निर्भिड भाष्य आढळते .
आजच्या काळात माणूस परिर्वतन आपल्या सोईने स्वीकारतो व घोळ होतो,सुईच न घेता सोईच स्वीकारतो आधुनिकतेच्या गप्पा मारणारे आपण आपल्या मूळच्या आदर्शोंना विसरतो,वास्तवतेला विसरुन कल्पना विलासातील बाबी खऱ्या मानायला लागतो मग श्रद्धा-अंधश्रध्देचा घोळ होतो . मानवी स्वभावच असा आहे की तो अदभूत,विलक्षण,चमत्कारीकबाबीकडे वास्तविक गोष्टीपेक्षा अधिक आकर्षित होतो व त्याच्या कुतुहलाच्या कल्पनाविलासात गुंग होतो .तुकाेबांचा गाथेत वास्तविकता आहे ती समाजाभिमूख ,विज्ञानवादी मन मनाला भिडणारी आहे .
जगतगुरू तुकोबांचे सपूर्ण चरित्र हे प्रेरणादायी आहे.आज जगतगुरू तुकाराम महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण आपल्या आदर्शाना जपू या ! विचारांच्या रूपाने जीवन सार्थकी करणाऱ्या तुकारामांच्या गाथा ह्या प्रत्येक कुंटुंबात पोहचवू या ! एक नवा संकल्पाने जगतगुरू तुकाराम महाराजांच्या जयंती सोहळा घराघरात या वर्षी पासून साजरा करू या !
संजय खांडवे
9011971122
मराठा साम्राज्याची जननी -स्वराज्यप्रेरिका जिजामाता
मराठा साम्राज्याची जननी -स्वराज्यप्रेरिका जिजामाता
🚩🚩🚩🚩🚩🚩
आपल्या महाराष्ट्राच्या या शौर्य भूमीकडे शिवजन्मानंतर पुढची दिडशे वर्ष तरी वाकडी नजर करण्याची कुणाची मजल झाली नाही,ज्याने हा प्रयन्त केला त्याला याच मातीत दफन व्हावं लागलं हा या मातीचा इतिहास आहे .शेकडो वर्षानंतरही स्वातंत्र्याची ज्योत आपल्या हयदयात तेवत ठेवत रयतेच्या कल्याणार्थ यदु- भोसलेवंशीय या स्वांतंत्र्य संग्राम आपल्या परिने लढत होते.रयतेच्या कल्याणाची भावना व या भूमीविषयीचा आदर हा त्यांच्या चरित्रातुन वारंवार जाणवतो.तत्कालीन परिस्थितीनुसार आपली बुध्दीमत्ता,शौर्य,स्वाभिमान, त्याग,संघर्ष,पराक्रम या जोरावर दोन्ही वंशीयांनी आपले अस्तित्व दाखवत एक दरारा निर्माण केला होता .या विषयावर मातृतीर्थ बुलढाणा जिल्हयाचे इतिहासकार श्री संतोषराव बाहेकर सर यांनी जाधव_भोसले घराण्याचा सखोल अभ्यास करून राजे लखुजी जाधवरावा सह महाबली शहाजीराजे व राजमाता जिजाऊ यांचे चरित्र आपल्या अखंड परिश्रमातून जगासमोर आणण्याचे महान कार्य त्यांनी केले आहे.जाधव -भोसले वंशातील आजपर्यन्त ज्ञात नसलेल्या वीरांचा इतिहास सरांच्या लेखणातून आमच्यासारख्या वाचकांना कळाला या मातीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने आवर्जुन वाचावा.
खऱ्या अर्थाने मराठा साम्राज्याची पाया भरणी या दोन वंशीयाच्या त्याग व संघर्षात दिसते .मनात स्वाभिमान जागृत ठेवत त्यांच्या नेतृत्वात याच मातीतील अनेक ज्ञात-अज्ञात नरवीरांनी आपले बलीदान दिले.
बाबाजीराजे भोसले यांच्या वंश बेलीत त्यांना मालोजीराजे व विठोजी राजे हे दोन पराक्रमी पुत्र होते.मालोजीराजे यांचा विवाह फलटणचे देशमुख जगपाळराव निंबाळकर यांची बहीण दिपाबाई यांच्याशी झाला .मि.किक्रेड व रा ब. पारसनीस शेडगावकरांच्या बखरीनुसार असे म्हणतात की ,लखुजीजाधवरावांच्या शिफारशीवरून जगपाळरावाने आपली बहीण दिपाबाई मालोजीराजास दिली होती .त्यांच्या पोटी शहाजी व शरीफजी या पराक्रमी वीरांचा जन्तम झाला .विठोजीराजे यांना सुध्दा कर्तबगार आठ पुत्र होती .
जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज होते.हेमाद्रिकृत व्रतखंडातील राजप्रशस्ती मधील यादवांची वंशावळ इतिहासकार श्री एस ए बाहेकर सरांनी आपल्या आधिकच्या संशोधनातून मांडलेली आहे .
जाधव, आदय देवगिरी घराणे
रामदेव यादव
शंकर देव (मृत्यु १३३२)
गोविंद देव(१३१२-१३८०)
ठाकूरजी (१३८० -१४२९)
भुकण देव उर्फ भेतोजी (१४३०-१५००)
अचलकर्ण उर्फ अचलोजी(१५००-१५४०)
विठ्ठल देव उर्फ विठोजी(१५४० -१५७०)
लक्ष्मण देव उर्फ लखुजी(१५७०-१६२९)
सिंदखेडराजा ही जाधवांची राजधानी या ठिकाणी त्यांनी भव्य वाडयाचे निर्माण केले .या परिसरात अनेक पेठा वसविल्या .निळकंठेश्वर ,रामेश्वर,केशवराज आदि मंदिराचा जिर्णोद्धारासह अनेक लोकउपयोगी कामे केली .रंगमहाल,नृत्यमहाल आदि वास्तूची निर्मिती केली,साहित्य ,कला,स्थापत्य यामधे त्यांना ज्ञानासह रुची होती हे यावरुन दिसते .एका स्वतंत्र राज्याची ही नांदीच होती . २४००० पायदळ ,१५००० घोडदळ व ५२ चावडयांचे वतन पुढच्या काळात लखुजी राजे जाधवांनी स्वकर्तुत्वावर उभे केले होते.
राजे लखुजी व म्हाळसाबाई उर्फ गिरजाबाई यांच्या पोटी १२ जानेवारी १५९८ ला जिजाबाईचा जन्म झाला .
भोसले -जाधव या दोन घराण्यामधील कर्तबगार वीरांनी त्या काळच्या सामाजिक,आर्थिक,राजकिय व वास्तव परिस्थितीचे भान ठेवत आपला स्वाभीमान राखत वाटचाल केलेली दिसतें.या सर्व बाबी जिजाबाईनी अगदी जवळून अनुभवलेल्या होत्या.
महाबली शहाजीराजे व राजमाता जिजाबाई यांचा विवाह हा मध्ययुगीन इतिहासाला वळण देणारा ठरला.वेरुळचे भोसले व सिंदखेडचे जाधव हे दोन्ही तुल्यबळ मराठा घराणे होती .या विवाहाने दोन्ही कुटुंबात आनंद व उत्साह होता .प्रामुख्याने या विवाहसंमधी उत्तरकालिन लिखानामधे शहाजी -जिजाबाई यांच्या विवाहातून जाधव -भोसले वैराची कथानके सांगितली गेली .रंगपंचमीच्या दिवशी या दोघाचा विवाह बाबत दरबारात मालोजी राजेनी घोषणा केली होती व विवाह निश्चित केला पण याला जाधवाकडील स्त्रीयांनी लखुजीराजे सोबत ते आपल्या तोडीचे नाहीत असा वाद घातला व दुसऱ्या दिवशी लखुजी जाधवांनी आपण सहज बोललो असे मालोजीस सांगितले.पुढे मालोजीस व विठोजीस नोकरीवरून काढले व ते वेरुळला परत गेले .तेथे त्यांना गुप्त धन सापडले .त्यामधून त्यांनी आपली फौज जमवली व सिंदखेडला येऊन विवाहाचा दावा केला .यापुढे त्यांनी निजामाचेही लक्ष वळवून विवाहासाठी दबाव आणला व हा विवाह पार पडला पण या कथानकाला काही अर्थ उरत नाही हे लिखान उत्तर कालिन आहे.मालोजीराजे व दिपाबाई यांच्या विवाहासाठी राजे लखुजी जाधवांनी मध्यस्ती केली नसती.यावरून त्यांचे नाते संबध त्यांच्या तोडीचे होते असे यावरून दिसते . समकालिन शिवभारतात अशी कोणतीच कथा नाही .परमानंद या विवाहाचे खूप सुंदर वर्णन करतो .शहाजीराजांना ऊतम लक्षणांनी युक्त,दयाशील,युद्धकुशल,महातेजस्वी असे म्हणतो व जिजामातेस विजयलक्षण ,कमलनेत्रा,कुळवान संबोधतो व यासाठी कुबेरासमान लखुजीजाधवांची अनुकुलता दर्शवितो .
सा तं महाशयं प्राप्य वपुरुज्वलम्।
गंगेव गुणगंभीरा व्यराजत महोदधिम् ।।
ज्याप्रमाणे शुभ्र खोल गंगा सागरास मिळाली असता शोभते त्याप्रमाणे तेजपुंज शरीर धारण करणारी गुणवती जिजाबाई गुण गंभीर थोर मनाच्या शहाजी पतींशी संयोग पावून शोभू लागली.हा समकालिन संदर्भ आहे .या अनैतीहासिक विवाहा प्रसंगीच्या कथानकाचा संदर्भ पुढे खंडागळे हत्ती प्रकरणाशी जोडला जातो व त्यांच्या हाड वैराच्या कथा सांगितल्या जातात .वास्तविक हत्ती प्रकरण हे तात्कालिक प्रासंगिक होते. पुढे भातवडीच्या लढाईत लखुजीराजे यांच्या भमिकेवरून हे लक्षात येते .शिवभारतकारही याचा खुलासा करतो .श्री एस ए बाहेकर सरांनी आपल्या लिखानातून विश्वसनिय संदर्भ देवून याबाबत मांडणी केली आहे. भोसले जाधव असा कोणताही वाद नव्हता हे समकालिन संदर्भावरून दिसून येते.वास्तविक पाहता त्या काळात मराठा सरदारांचा वरचढपणा हा निजाम,आदिल व मोगलशाहीमधील सरदारांना खुपत असे .मलिक अंबरसारखे सरदार त्यांचा द्वेष करत.त्यांना महत्वाच्या मोहीमेंपासून दूर ठेवले जाई .त्याच्या पराक्रमाची दखलही त्या काळात त्यांच्या लेखनकारांनी घेतलेली दिसत नाही .या संघर्षामधून ही सर्व मंडळी जात होती .
राजे लखुजी यांचे वर्चस्व पाहून ,शहाजी राजे सारखी ही दोन शक्ती एकत्र येऊ नये म्हणून की काय ,खंडागळे हत्ती प्रकरण घडविण्यासाठी हवा दिलेली असू शकते यात शंकेला वाव मिळतो .२५ जुलै १६२९ म्हणजे देवगिरीवर निजामाच्या भेटीसाठी आलेले राजे लखुजी,पुत्र अचलोजी,नातू यशवंत तथा अमात्य अशी ४० जनांची अमानवी हत्या करण्यात आली .निजामाच्या डोक्यात त्याच्या वजीराने विष कालवून हा रक्तपात घडवून आणला होता.
जिजाबाईच्या समोर हे सर्व प्रसंग घडत होते .रयतवत्सल जाधवरावांची ही लेक भोसले कुळाची लक्ष्मी आपला वारसा पुढे तेवत ठेवत स्वराज्याची प्रेरणादायी ठरली .अर्कज्ञ,सहस्रकरविक्रम महाबली शहाजीराजे यांची संकल्पणा त्यांचा त्याग,संघर्ष,पराक्रमातून स्वातंत्र्याची पहाट होण्यास सुरूवात झाली ." शहाजीराजे भोसले यांनी एक निजामपुत्र गादीवर बसवून ,त्यास एका किल्यात बंदीत ठेवून ,नाशिक,त्र्यबकेश्वर,संगमनेर,जुन्न२,ताब्यात घेऊन स्वातंत्र्याचा झेंडा उभारला होता .''असे बादशहानामा सांगतो.१६२९ ते १६३६ पर्यन्त त्यांनी हा कारभार पाहीला.
जिजाऊमासाहैबांनी स्वराज्यासाठी दोन वीर पुत्राना जन्म दिला .या मधे थोरले पुत्र संभाजी व छत्रपती शिवाजी राजे . शिवनेरीवर १९ फेब्रु १६३० ला हा शिवसुर्य उगवला .मातृ-पितृ तथा स्वकुलीन पूर्वजांच्या अथक संघर्षाचा ,पराक्रमाचा,त्यागाचा वारसा मातेच्या संस्कारातून सतत पाझरत होता .शिवाजी राजे वयाच्या सहा वर्षापर्यन्त महाराष्ट्रातच होते .शिवनेरी व काही काळ सिंदखेडराजा येथे माता जिजाऊंच्या संस्कारात ते वाढत होते .शिवरायांच्या जन्मानंतर शहाजीराजे यांच्या यशात अधिकाधिक भर पडत गेली .कर्नाटकात बंगलुरु येथे शिवरायांचे बालपण वयाच्या बाराव्या वर्षापर्यन्त गेले .सातव्या वर्षोच शिवबाना लिपिचे ज्ञान झाले .त्यांच्यासाठी शहाजी-जिजाऊंच्या तालमित निष्नात आचार्य नेमले गेले.राजकारण,युद्धकौशल्य या सारखी राजा होण्यासाठी लागणारे संस्कार जिजाऊ-शहाजीराजेंनी शिवबावर केले व वयाच्या १२ व्या वर्षो शिवबा 'सनय ' होऊन महाराष्ट्रात आले असे समकालिन शिवभारत सांगतो .एका राजाला लागणाऱ्या सर्व बाबी ध्वज,राजमुद्रा,अमात्य तथा विश्वासु सेवक शहाजीराजे यांनी जिजाऊ-शिवबा यांना पुण्याच्या जहागिरिवर पाठविले.दुसऱ्या बाजू।ला थोरले पुत्र संभाजीराजे ,तुकाबाई व पुत्र व्यंकोजीराजे यांना सोबत दक्षिणेत ठेवले.ही खऱ्या अर्थाने जिजाऊ-शहाजीराजे यांच्या संकल्पनेतील व प्रेरणेतील "स्वराज्य " म्हणजेच पुढच्या काळातील "मराठा साम्राज्याची" पायाभरनीच होती .स्वराज्यजननीचा हा महान त्याग होतां पती- पुत्रा पासून दुर राहून बाल शिवबाला घडवत रयतेचे राज्य निर्मायचे होते . स्वराज्यासाठी दोन छत्रपती घडविणाऱ्या या मातेचा आदर्श पुढे येसूराणीसाहेब,ताराराणीसाहेब यांनी घेतलेला दिसतो ."श्री सखी राज्ञी जयती ।" ही शिक्का कटयार घेत आपल्या पतीच्या पश्चात स्वराज्याची सूत्र सांभाळणारी संस्कृती आमची ,आणि त्या संस्कृतीचा वारसा त्यांना जिजाऊ मॉसाहेबाकडूनच मिळाला होता . एका छत्रपतींनी स्वराज्य उभं केल व दुसऱ्या छत्रपतींनी ते आपल्या खांदयावर शेवटच्या श्वासापर्यन्त तोलून धरलें.या पाठीमागे जिजाऊचेंच संस्कार होते .स्वराज्य स्थापनेपासून तर राज्यभिषेकापर्यन्त वेळोवेंळी मॉसाहेबांची प्रेरणा शिवरायासोबत होती. अफजल खानाच्या भेटी वेळी स्वराज्यासाठी पुत्र मोह बाजूला ठेवून छत्रपतींना विजयी आर्शिवाद देणारी राजमाता या मातीने बघीतली.....छत्रपती पन्हाळावेढयात असतांना प्रसंगी हातात तलवार घेऊन राजमाता सज्ज होतांना याच मातीने बघीतलं .......
जननी शिवराजस्य सा राजगिरी वर्धिनी।
महाराजांच्या आग्राभेटीच्या वेळी ते नजरकैदेत असतांना यशश्वीपणे स्वराज्य सांभाळण्याचं काम याच मातेने केले.....
एक लोककल्याणकारी छत्रपती रायगडी सुवर्ण सिंहासनाधिश्वर होतांना याची देही आणि याची डोळा या मातेने बघीतले.....रायगडी छत्रपती सिहासनाधिश्वर होणे ही गोष्ट काही सामान्य नव्हती.हा शेकडो वर्षाच्या गुलामगिरीचा अंत होता ,ही एक सार्वभौमत्वाची नांदी होती नव्हे तर मध्ययुगीन इतिहासातील पहिला स्वातंत्र्य दिवसच होता .
पुढच्या काळात या स्वराज्य रक्षणार्थ अनेक बलिदाने झाली याचे कारण एकच मॉसाहेब जिजाऊ व छत्रपती शिवरायांनी घालून दिलेला आदर्श,स्वाभिमान व अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची शिकवण हेच आहे .यातूनच पुढे " मराठासाम्राज्य " अटकेपार गेले.दिल्लीच्या तत्खाला हलविण्याची ताकद मराठयात निर्माण झाली .
शंभूछत्रपतींनी ९ वर्ष आपल्या खांद्यावर स्वराज्य तोलून ठेवले त्यांच्या बलिदानानंतर राजाराम महाराजांनी आपल्या हयातीत ११वर्ष औरंगजेबास झुलत ठेवले ,रायगडावरून प्रतापगड,सज्जनगड,सातारा,पन्हाळा असा प्रवास करत छत्रपती राजाराम महाराज मोगलांना शह देत होते ,येसूराणीसाहेबांनी शंभूराजानंतर राजारामाचे मंचकरोहन केले व या मराठयाच्या राजास पकडण्यासाठी ओरंगजेबाने आपले सैन्य जंग जंग पछाडले होते
पन्हाळगडावर राजाराममहाराज असतांना मोठया शिताफिने आपल्या अनेक सरदारासह वेषांतर करून ते जिंजीकडे निघाले
संताजी ,धनाजी,बहिजी ,खंडो बल्लाळ व आपले गुप्तहैरासह मार्ग क्रमण करत होते
वाटेत अनेक मावळे शहिद झाले यात एका बेटावर छावणी असताना मोगलीसरदारानी (अबदुल खान)अचानक छापा टाकला मराठयांनी जोरदार शह दिला यात मराठयाचा राजा पकडला गेला म्हणून त्यांना आनंद झाला पण तो नकली निघाला ,शिवा काशिदांसारखे एका अनामिक मावळयाचे आत्मबलिदान स्वराज्यासाठी झाले पुढे पन्हाळगड ते वेल्लोर हे अंतर ३३ दिवसात कापले
शिवरायांनी जिंजीचा किल्ला अभेदय करून ठेवला होता स्वराज्याची पुढची राजधानी जिंजी ,मद्रासकडील समुद्र किनाऱ्यापासून तर नाशिक पर्यन्त ,सहयाद्रीच्या कान्या कोपऱ्यात राजारामांच्या नेतृत्वात स्वराज्यच भगवं निशान फडकत होत या काळात बहिर्जी घोरपडे, मालोजी घोरपडे, संताजी जगताप, रूपाजी भोसले ,।बिदनूरच्या चन्नमा राणी,मानसिंग मोरे, प्रल्हाद, निराजी, कृष्णाजी अनंत, निळो मोरेश्वर, खंडो बल्लाळ, बाजी कदम इत्यादीनी मोलाची साथ दिली .महाराणी येसूबाई व छत्रपती शाहूनी २९ वर्ष स्वराज्यासाठी वनवास भोगला.संताजी घोरपडे,धनाजी जाधवासारखी नरव्याघ्र आपल्या पराक्रमाची शर्थ लावून लढत राहिली .पुढची सात वर्ष महाराणी ताराराणी साहेबांनी मोघलांना सळो की पळो करुन सोडले .लाखाचा लवाजमा घेऊन येणारा इराणपासूनचा बादशहा याच मराठा साम्राज्यात हतबल होऊन संपला.
"जिजाऊ -शहाजी राजेची प्रेरणा,शिवरांयांचे प्रजावात्सल्य म्हणजेच स्वराज्य ,आणि स्वराज्य म्हणजेच स्वातंत्र्य पुढे ते साहित्यवीर,स्वराज्यरक्षक संभाजीराजे यांनी आपल्या खांद्यावर पेलले या स्वातंत्र्य युद्धात छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाईसाहेब सरकार,संताजी घोरपडे,धनाजी जाधव छत्रपती थोरले शाहूराजे ,द ग्रेट मराठा महादजी शिंदे पर्यन्त त्यांच्यासोबत सर्व जाती धर्माची मावळे या स्वांतत्र्यसमरात लढली.
अटकेपार भगवा झेंडा फडकविणारे हेच स्वराज्यजननी जिजामातेचे "मराठा साम्राज्य ".
संजय खांडवे
9011971122
प्रवास वर्णन
माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...
-
*महा वारसा* विश्वाची निर्मिती संदर्भात चर्चा करतांना जो महत्वाचा विचार समोर येतो की, एका मोठ्या महाविस्फोटातून विश्वाने आकार घ...
-
* *दुर्ग दुर्गेश्वराशी साम्य असलेला- सुधागड* स्थान - ता - सुधागड (पाली ) जि . रायगड , पुणे - लोणावळा - खोपोली - पाली १३८कि. मी ., मुंबई वर...


















