शनिवार, ४ जुलै, २०२६

प्रयत्नवादाचा साक्षात्कार म्हणजे सुरेश देवकर सर*

 *प्रयत्नवादाचा साक्षात्कार म्हणजे सुरेश देवकर सर*





           यशाचं असामान्य शिखर गाठणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या यशामागचं गमक समजण्यासाठी सर्वप्रथम त्या पाठीमागचा वारसा शोधला जातो, मग तो औद्योगिक, राजकीय,व्यावसायिक,सहकार अश्या क्षेत्रात अधिकच परिणामकारक असतो .पण शून्यातून पुढे जाणे ही एक असामान्य गोष्ट असते . यासाठी ज्ञान, जिद्द, चिकाटी, नियोजन येवढंच असून चालत नाही तर त्या मधील सातत्य व पुर्वानुमान, अष्टावधानी असणे ह्या गोष्टी देखील तेवढ्याच महत्वाच्या ठरतात. येवढं करूनही पुढच्या यशापशाचे जबाबदारी बहुतेकजन प्रारब्धावर सोडत असतात . पण प्रयत्नवादी पुरुषाच्या बाबतीत प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा अर्थ होत नाही, आपल्या वागण्यातून,आपल्या बोलण्यातून आणि आपल्या कृतीतून आपण आपले प्रारब्ध घडवत असतो.कर्म हे सर्वश्रेष्ठ असते.आपले कर्म चांगले असतील तर प्रारब्ध निश्चितच चांगलेच ठरते .अन कर्म वाईट असेल तर प्रारब्धही निश्चीतच वाईटच ठरते .या दृढ निश्चयावर चालणारे व आपल्या विचारांशी निश्चीतच कधीच फारकत घेत नसतात ती स्थिर, संयमी, शांत व विचारशील असतात .असं व्यक्तीमत्व म्हणजे सुरेश देवकर सर !

          मराठवाडा - विदर्भ सिमेवरचं शेवटच गावं धामणगाव या धामनाईच्या मातीत माखलेले बालपण आणि ग्रामीण भागाशी जुळलेली नाळ ही  सरांची खरी ओळख ! कृषीपरंरेतून आलेल्या अगदी सामान्य शेतकरी परंतु शिक्षणाचे महत्व जाणणाऱ्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला . वडील लष्करी देशसेवेत म्हणून शिस्तीची परंपरा अन कुटुंबाला आकार देणाऱ्या आईचे संस्कार हा त्यांचा जडनघडणीतील मुख्य पाया होता.वडीलांनंतर आईने मोठ्या कष्टाने त्यांना शिकविले . अगदी बालपणापासून त्यांची अभ्यासू अन चिकित्सक बुद्धी त्यांना कधी स्थिर बसू देत नव्हती . समाजाचा शाळेने त्यांना खूप काही शिकविले .शालेय शिक्षण बुलढाणा जिल्हातच पूर्ण झाले व पहिली सरकारी नोकरी त्यांनी काही वर्ष हिंगोली केली . सेवेत असतांना स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सुरु ठेवला होता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून ते मुलाखती पर्यन्त पोहचले . खडू - फळया पासून सुरु केलेले शिक्षकीपेशाचे काम त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे केले . धाड परिसरात त्यांची सेवा ही उल्लेखनिय म्हणता येईल . आज या परिसरातील विद्यार्थी ताठ मानेने सांगतात की आम्ही त्यांचे विद्यार्थी आहोत . या क्षेत्रात त्यांनी सपत्नीक सेवा दिली. सर थांबणाऱ्या पैकी नव्हते  मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा प्रचंड मोठा मित्र परिवार अन दांडगा लोक संपर्क ह्यामुळे सहकारक्षेत्रातील अधिकारी मित्राने त्यांना या क्षेत्राची ओळख करून दिली . चिकित्सक अन अभ्यासू स्वभाव व मिळालेल्या संधीचं सोन करण्याची मन - मस्तक अन मनगटातील ताकद त्यांना स्वस्त बसूच देत नव्हती आणि येथून खरा प्रवास सुरु झाला . प्रचंड वाचनातून व राज्यभर सतत फिरून नवनवीन योजना आखणे व माणसं जोडण्याचं काम त्यांनी सुरु केले . विश्वासाचं एक नातं त्यांनी भेटलेल्या प्रत्येक व्यक्ती सोबत निर्माण केलं . आजपर्यन्त सरांना भेटलेला कोणताच व्यक्ती त्यांना विसरु शकत नाही आणि त्यांच्या स्मरणातही ते साठवून ठेवतात, अनेक वर्षानंतरही ते त्यांना ओळखतात कारण ते माणूस म्हणूनच ओळख ठेवतात .गेल्या दहा वर्षा पासून मला सरांचा अगदी जवळून सहवास लाभला हे त्याच अनुभवावरून लिहण्याचं धाडस करतोय .

        एखादया दाताच्या डॉक्टरास ह्यदयाचा आजार असल्यास त्याला ह्यदयतज्ञाकडे जावे लागते . एखादया कॉप्युटर इंजिनिअरला घर बांधायचे असल्यास सिव्हील इंजिनिअरकडेच जावे लागते . तुम्ही कितीही मोठे अर्थतज्ञ असू दया पण आर्थिक वर्षाच्या शेवटी एखादा सी ए शोधावा लागतो, पण शिक्षक हा असा प्राणी आहे की तो काही ठिकाणी अपवाद ठरतो त्यापैकीच सर एक ! सहकार क्षेत्राचा एखादया अर्थतज्ञालाही लाजवेल एवढा सखोल अभ्यास शिक्षण क्षेत्रात राहून केला अन सहकार क्षेत्रात सपूर्ण महाराष्ट्रात आपली छाप अवघ्या काही वर्षातच निर्माण केली . सहकार क्षेत्रात शंभरी पर्यन्त पोहचत आंलेल्या पतसंस्थेच्या शाखेंचे जाळे अन हजार कोटी पर्यन्तच्या ठेवी व सर्वात महत्वाचे म्हणजे आजपर्यन्त कुठलाही डाग न लागता चालविलेले प्रशासन हे त्यांचे एक उत्तम कुशल प्रशासक असल्याची प्रचीती देतात . सहकार क्षेत्रातील अर्थक्रांती बरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे कार्य असामान्यच आहे . वारकरी संत परंपरेचा विचारांचा  प्रचंड प्रभाव त्यांच्या वागण्या बोलण्यातूनच जाणवतो . प्रामाणिकपणे काम करून धन जोडण्याचा आदर्श त्यांना तुकोबारायाच्या गाथेतूनच मिळाला . कुणाचाही द्वेष वा मत्सर न करता आपला प्रपंच चालवत मानवतावादी विचार पेरायचे हे संत परंपरेच्या अभ्यासातूनच त्यांनी घेतले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रयत्नवादाचा साक्षात्कार म्हणजे सुरेश देवकर सर*

 *प्रयत्नवादाचा साक्षात्कार म्हणजे सुरेश देवकर सर*            यशाचं असामान्य शिखर गाठणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या यशामागचं गमक समजण्य...