विज्ञाननिष्ठ,विवेकवादी विचारांचे धनी....
आपल्या विचारबंधू असलेल्या चांगल्या मित्राचा सहवास लाभला की, आपसूकच मनातील शब्द कागदावर उमटतात त्यापैकीच एक आमचे मित्र तथा वैचारीक चळवळीतील सहकारी गणेशदादा निकम! आपल्या कामासोबतच सदैव विज्ञाननिष्ठ . व विवेकवादी विचारांची पेरणी करत राहणे हा त्यांचा मूळ स्वभाव. समाजव्यवस्थेत एक प्रमुख अडथळा म्हणजे समाजात पसरलेली अंधश्रद्धा असते . श्रद्धा असावी पण ती आंधळी नसावी पण आपल्याला अंधश्रद्धेने प्रचंड प्रमाणात बंदिस्त केलेले दिसते बरेचसे विकासाचे मार्ग हे या अडथळ्यांमुळे ध्येयापर्यंत उशिरा पोचवतात अन आपला माणूस मागे पडतो याचे भान सदैव जपत समाजाप्रति सकारात्मक भावना ठेऊन आपल्या पत्रकारीतेतही त्याचा छाप उमटवितांना दिसतात .
आपली वैचारीक बैठक मानवीमूल्य जपणारी असेल तर त्यांना मानवतेची अधिक अगं सापडतात त्यांच्या विचारांच्या कक्षा रुंदावतात ते संकुचित राहत नाही आणि समाजाकडे सकारात्मक दृष्टीने बघायला लागतात ,यात समाजाच्या हिताच्या दृष्टीने ते सरसावतात .हा विचार सदैव मनी ध्यानी ठेवतात .
आपल्या आदर्शाचे विचार त्यांच्या चरित्रातून अभ्यासून आपण जपले पाहिजे ही प्रेरणा त्यांना कोठून मिळाली हे सांगतांना गणेशदादा नेहमी सांगतात की
आपला इतिहास सांगतो स्वराज्य स्थापनेसाठी जिजाऊंनी पुणे वसविले व त्या ठिकाणची फुटकी कवटी चप्पल व पहार शिवरायांच्या हाताने उध्वस्त करुन त्याठिकाणी बाल शिवबाच्या हाताने सोन्याचा नागर चालविला ती भूमी कसायला मुक्त केली तेथे वस्ती करून पुणे शहर वसविले आणि खऱ्या अर्थाने अंधश्रद्धेला मुठ माती देण्याचं काम जिजाऊंनी व शिवबा यांनी मिळून केले शहाजीराजांनी पूर्वी पासून कल्पिलेल्या स्वप्नाला उभारी मिळाली. समाज ,रयत भयमुक्त करण्याचे पहिले काम आऊसाहेबांनी शिवबांना सोबत घेऊन केले ,नाहीतर आज रस्त्याने साधा लिंबू दिसला तर आई लेकराला बाजूने घेऊन जाते या मानसिकतेतील तुम्ही आणि आम्ही आहोत. ही विज्ञाननिष्ठता जपतांना तडजोड कधीच नाही हा त्यांचा स्वभावगुण मनाला भावतो .
गणेशदादा सोबतचा एक प्रसंग मला चांगला आठवतो आपण केवळ बोलण्यापुरते विज्ञान निष्ठ नसुन कृतीतूनही आहोत याची प्रचीती देणारा हा प्रसंग होता . त्यांच्या सोबत बाहेर एका सामाजिक कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो होतो . सायंकाळी निघून सकाळी पोहचायचे होते रात्रीचे जेवण करून प्रवासाला सुरुवात केली . दोघेच प्रवासात असल्याने गप्पा मारत प्रवास सुरु होता . झोप येऊ नये म्हणून हायवे वरील एका हॉटेलवर चहा घेऊन निघालो रात्रीचे बारा वाजले होते आणि त्याच दिवशी अमवश्याही होती . म्हणून मी भूत - आत्मा वगैरे चा विषय मुद्दाम काढला त्यावर ते हसले आणि म्हणाले पुढ्च्या गावात अलिकडेच एक स्मशान भूमी आहे आपण थांबून बघू काही असते का ? आम्ही थांबलो पण त्यांच्या मनात त्यांच्या नेहमीच्या स्वभावा प्रमाणे हसून !" इथं नाहीच त नाही दिसू राहिलं सरजी ! " म्हणून सहजपणे चला म्हणण्याचा शब्द आमच्या सारख्याच्या नेहमीच कानी पडत असतांना आमच्याही विज्ञाननिष्ठ विचारास नेहमी प्रेरणा अन चालना देत राहतो .


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा