*पुस्तकांसाठी जगणारा अवलिया.......!!!*
📕📕📗📕📗📕📗📕📗📕
आताच्या काळात फार कमी लोक असतील की जे पुस्तकाच्या विश्वात रममान होतात. कदाचित आमच्याकडे पुस्तके ही नसतील एवढी स्वतः च्या घरात त्या पुस्तकांसाठी कपाट असलेले व्यक्तिमत्व म्हणजे प्रमोद टाले सर ! पुस्तकांसाठी वाटेल ते करण्याची तयारी या व्यक्तिमत्त्वाची असते . अगदी दुर्मिळातील दुर्मिळ पुस्तक कुणाकडे आहे असे जरी कळाले तरी त्या पुस्तकास खरेदी करण्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची तयारी टाले सरांची असते . विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र वाचावे म्हणून बुलढाणा शहरात पुस्तके बघण्यासाठी गेलेले सर ! ज्यावेळेस अशी पुस्तके मिळत नाहीत त्यावेळेस त्यांनी खचून न जाता आता आपणच छत्रपती शिवरायांवरील चरित्र ग्रंथ तथा संदर्भ ग्रंथ तथा संदर्भ साधने एकत्रित केली पाहिजे हा ध्यास त्यांना लागला आणि त्यातूनच हे मातृतिर्थ बुलढाणा नगरीमध्ये भव्यदिव्य असे मराठा इतिहास संदर्भ ग्रंथालय उभे राहिले .
मराठा इतिहास संदर्भ ग्रंथालय बुलढाणा सारख्या शहरात उभे राहणे ही काही सामान्य गोष्ट नाही कारण ज्यावेळेस त्यांच्या संपूर्ण ग्रंथालयामधील पुस्तकांवरून आपण नजर फिरवली तर असे लक्षात येते की जी पुस्तके आपण कधी बघितली देखील नाही अशी दुर्मिळातील दुर्मिळ आणि जुन्यात अत्यंत जुनी असलेली पुस्तके सर संग्रहित करत आहेत . छत्रपती शिवरायांवरील जवळपास सर्वच चरित्र ग्रंथ त्याचबरोबर छत्रपती शिवरायांची शिवकालीन असलेली पत्रकार संग्रह पेशवेकालीन पुस्तक संग्रह मराठ्यांचा समग्र इतिहास अगदी वि का राजवाडे यांच्यापासून तर डॉ आह साळुंखे सरांची सर्वच पुस्तके त्यांच्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहेत . इंग्रजांनी लिहिलेले संदर्भ ग्रंथ त्याचबरोबर मोगलकालीन कालखंडावर असलेले संदर्भ ग्रंथ , संत साहित्यावरील प्रचंड साहित्याचा साठा त्यांच्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहे . विष्णुपुराण ,शिव पुराण आदी सर्वच पुराणांसह अत्यंत दुर्मिळ काळात लिहिली गेलेली पुराणग्रंथ त्याचबरोबर रामायण महाभारत यावर आधारलेले संपूर्ण ग्रंथ सार आदरणीय सरांच्या वाचनालयामध्ये आहेत . भारतरत्न डॉ बाबासाहेबांवरील चरित्र ग्रंथ , अण्णा भाऊ साठे यांचे समग्र साहित्य तथा दलित साहित्य ग्रंथालयात उपलब्ध आहेत .
महिनाभरात आठ ते दहा हजाराची पुस्तके स्वखर्चातून सर विकत घेत असतात आम्ही सरांच्या संपर्कात राहून निश्चितच या संदर्भ ग्रंथालयाचा लाभ घेत आहोत जे संदर्भ आम्हाला कधी सापडले नाहीत जे ग्रंथ आम्हाला कधी अगदी डोळ्यानेही बघायला मिळाले नाही ते केवळ आणि केवळ टाले सरांच्या या अलौकिक असामान्य कार्यामुळे आम्हाला बघायला मिळत आहे .छत्रपती शिवरायांचा छत्रपती, संभाजी राजांचा सत्य इतिहास संदर्भासह याच ठिकाणी आम्ही शोधत आहोत विविध गड किल्ल्यावरील असलेले अत्यंत दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह त्याचबरोबर विविध ग्रंथातील संदर्भ आम्ही आमचे लिखाण करत असताना त्यामधून घेत आहोत आणि निश्चितच यामुळे नवनवीन माहिती जगाच्या समोर येत आहे एक ज्ञानाचा भंडार म्हणून सरांनी उभं केलेलं हे ग्रंथालय बुलढाणाकरांसाठी भूषणवह आहे .आतापर्यंत जवळपास 25 ते 30 लाखांची पुस्तके सरांच्या घरांमध्ये त्या वाचनालयामध्ये आहेत याचबरोबर इतरही छंद सर जोपासतात यामध्ये दुर्मिळातील दुर्मिळ नाण्यांचा संग्रह असेल किंवा इतिहासकालीन एखादी संदर्भ असलेली वस्तू जरी सरांना दिसली तर सर त्या वस्तूची वाटेल ती किंमत मोजतात आणि आपल्या इतिहासाप्रती आपल्या पुर्वजाप्रती कृतज्ञ राहून त्यांची सेवा करत असल्याची भावना ते व्यक्त करतात आणि या मराठा इतिहास संदर्भ ग्रंथालयाचा फायदा उपयोग हा बुलढाणा करांनी घेतला पाहिजे अशी भावना ती यातून व्यक्त करतात खरंच पुस्तकांसाठी जगणारा अवलिया आपल्या मातृतिर्थ शहरात आहे आणि त्यांचा सहवास आम्हाला लाभतो आहे म्हणून त्या परिसराच्या सानिध्यात राहून आमचं सोनंच होत आहे . आज आदरणीय सरांचा वाढदिवस सरांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शिव शुभेच्छा !
मराठा इतिहास संदर्भ ग्रंथालयाच्या माध्यमातून आपल्या महामानवांचा सत्य इतिहास जगासमोर येऊ या सदिच्छासह आदरणीय सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
📕📕📕📕📕📕📕📕♦️
संजय खांडवे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा