गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०२४

वेताळगड/वसईचा किल्ला। एक भ्रंमंती

वेताळगडावरील उत्तरेकडील भाग

गडावरील घसरंडीची वाट

बारादरीची कमान


 गडावरील तलाव

हळदाघाटातून दिसणारा वेताळगड



हेमाडपंथी मंदीर


आन्वा येथील हेमाडपंथी मंदीर


वेताळगडावरील गुहा

बांगडीतोंफ

बालेकिल्लावरील भाग

जमीनीमधील राजणं

गडावरून पश्मिम भागात दिसणारा जंजाळा किल्ला व वेताळवाडी धरण



गडावरील इमारती

गडावरील तलाव

वेताळवाडी गाव


गडावरील घुमट असलेली छोटी इमारत

निमुळती पाऊलवाट

गडावरील दरवाजावरील शिल्प
आमची इतिहासप्रेमी टिम



वेताळवाडी गड /वसईचा किल्ला /हळदा


सुटीचा दिवस आला म्हणून जमेल तशी सवड काढून दुर्ग अथवा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या स्थळाना भेट देत भ्रमंती करणारी आमची टीम सदैंव तत्पर असते .आजच्या काळात व्यस्त जीवनशैलीत वेळ काढणे ही फार मोठी गोष्ट आहे त्यातल्या त्यात आम्ही  राऊत सर,किशोर पंवार सर ,सुशिल पनाड सर,आणि इतिहासाचे अभ्यासक राजेश साळवे सर  सोडले तर  कामाचा मोठा व्याप असूनही भ्रमतीचे नियोजनाची आखणी सुरेश देवकर सरांचीच असते .आमचे काही मित्र ,मार्गदर्शक वेळेअभावी आमच्या सोबत वेळेअभावी येऊ शकले नसले तरी ते पूर्णवेळ आमच्या भ्रंमंतीचा आढावा घेत असतात बरींच आल्यांनंतर चर्चेसाठी तत्पर असतात येवढी ही माणसे आपल्या वासश्या विषयी आपुलकी जपतात हे पाहतांना असे मार्गदर्शक व सहकारी असल्याचा अभिमान वाटतो .
    खर तर आम्ही निघालो होतो अंतुर या किल्ल्यासाठी भराडी ,करजखेड या मार्गे पण भोकरदन तालुक्यातील हेमाडपंथी मंदीराला भेट दिली .प्राचीन नक्षीकाम ,असलेले  असे सुंदर मंदीर आजही  आहे आता त्याला लोखंडी खांबाने आधार देत त्याचे काम सुरू आहे .काहीस्वरूपात दुरूस्तीचे कामही सुरु आहे मंदिराच्या आतील कोरीव काम शेकडो वर्षानंतरही जसेच्या तसे आहे त्या दगडावर मारलेती पॉलीशही स्पष्ट जाणवते ,पुढील गड फिरण्यासाठी वेळ मिळावा म्हणून तेथून आम्ही निघालो व स्थानिकांच्या सूचनेनुसार ह्ळदा घाटातील किल्ला जवळ व पाहण्यासारखा आहे असे कळाले म्हणून किल्ला महत्वाचा या आशेने हळदा गावाकडे निघालो ,गोळेगाव -उंडणगावमार्गे -हळदा या गावात पाउण तासात पोहचलो व हळदा घाटात उतरतांना वेताळगडाचे /वसईचा किल्ला दर्शन् झाले बुलढाणा शहरापासून दोन अडीच तासाच्या अंतरावर असलेला वेताळगड आजपर्यन्त पाहीला नव्हता .आपण जवळ येवढा सुंदर किल्ला आहे हे पाहूण खूप आनंद झाला .घाटातून जात असतांना गडाची मजबुत तटबंदी व बुरुज लगेच दिसतात पण किल्ल्याचे प्रवेशद्वारमात्र समजत नाही .
         गडाच्या बाजूला घाटातूनच वर जाण्यास निमुळती पाऊलवाट आहे ती आपल्याला गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे घेऊन जाते .घाटात बाजूला गाडी लावून आम्ही त्या वाटेने मुख्य प्रवेश द्वारा पर्यन्त पोहचलो .आजही मुख्यप्रवेशद्वार मजबूत स्थितीत आहे या हे द्वार निमुळते असून जवळ येईपर्यन्तं दरवाजा दिसत नाही दरवाज्याच्या वर दोन प्रचंड सुस्थितीमधील बुरुज आहे शत्रू आत येणे शक्यच नाही तोफा,दगड,तेल,अंगार ओतण्यासाठी चाऱ्या आहेत .मुख्य द्वाराच्या बाजूला प्राण्याचे चित्र असलेले शिल्प आहे याच पद्धतीचे शिल्प पुढे जंजाळा /वैशागडावर सुद्धा आहे त्याची चर्चा पुढच्या लेखात स्वतंत्र करू .
        दरवाज्यातून येताना भव्य खोली दिसते दगडी बांधकामात कमानीमधून केलेले बांधकाम आहे वर आल्यावर एका निमूळत्या वाटेतून बुरूजावरील एका खोलीत उतरणारा रस्ता आहे त्या छोटयाश्या खोलीमधून गडात येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीवर मुख्य द्वारापासून हळदाघाटात व जंजाळा गडापर्यन्तच्या हालचालीवर लक्ष ठेवता येते .पुढे गड चढावा लागणार म्हणून त्या थंडगार खोलीत आम्ही जेवन केले व पुढे निघालो ,वर जातांना एक मोठी गुहा आहे  त्यात निघालेले दगड या गडासाठी वापरले असावेत त्यात पाणी आहे व प्रचंड बटवाघुळीचा आवाज आत जाणे योग्य नाही म्हणून पुरेसे पाणी घेऊन निघालो. येवढया मोठया गडावर वरून येतांना दोनच औरंगाबाद येथून आलेले दुर्गवेडे भेटले व वर गड सुंदर व खूप मोठा आहे असे सांगीतले व पाणी सोबत ठेवा सांगून गडउतार झाले
       गडाचे दुरूस्तीचे काम बऱ्यापैकी चालू असल्याचे दिसले ढासाळलेली तटबंदी व बुरुज बांधणी(दुरूस्ती) काम सुरु आहे  .मुख्य दरवाज्याच्या वर एक तोफ आहे बांगडी प्रकारातील ही लोखंडी तोफ बुरुजावर् आता व्यवस्थितपणे उभी केली आहे  .थोडा वळसा घेत काही अंतर चढाई केल्यावर आपण गडावर पोहचतो' ,गडाचे क्षेत्र मोठे आहे आता वर सिताफळांची दाट झाडी आहे. थोडे चालत गेल्यावर त्या झाडीमध्ये जिर्ण अवस्थेमधील इमारती आहे ,जमीनीमध्ये दगडापासून तयार केलेला भला मोठा राजंण आहे तेलतुपाचा राजंण त्याला म्हटलं जाते ,त्याच्या बाजूला कमाणीचे  छत असलेली इमारत आहे वर प्रकाश येण्यासाठीचे झरोके आहेत ही धान्यकोठी असावा असे वाटते
त्याच इमारतीसमोर काहीवर्षापूर्वीच छत कोसळलली इमारत दाट झाडीत आहे हा बालेकिल्ला असावा .त्या दाट झाडीत खूप मो०या इमारतीचा पाया आहे दगड पडलेल आहे,प्राचीन विटा,कौलारु /भांडी तुकडे यांचे अवशेष दिसतात. थोड पुढ गेले की प्राचीन तलाव आहे मार्च मध्ये सुद्धा तलाव ६०% भरलेला दिसला गडाला याच तलावाचे पाणी वर्षभर पुरत असावे .त्या तलावासमोरच एक प्राचीन इमारत आहे छत नसलेली पण आजही मजबूत स्थितीमध्ये आहे कोरिव काम केलेले पायाचे दगड दिसतात .
        गडाच्या उत्तरेकडे थोड चालत गेले की एक जिर्ण कमानीची बारादरी इमारत आहे त्या कमानीमधून खाली वेताळवाडी गाव दिसते या ठीकाणाहून संपूर्ण खान्देश भागात लक्ष ठेवता येते .त्या इमारतीच्या खाली वेताळवाडीकडे निघणारा गडाचा जंजाळा किल्याकडे जाणारा दरवाजा आहे. संपूर्ण गडाला मजबूत तटबंदी व बुरूज आहेत या तटबंदीवरून संपूर्ण गडाला वेढा मारता येतो ,गडाला म्हणजे बालेकिल्यालाही तटबंदी असावी असे अवशेषावरुन वाटते. गडाच्या दक्षिण बाजूस एक दुहेरी तटबंदीमधील बुरुज दिसतो त्याच्याच बाजूला घुमट असलेती एक छोटी समाधीसारखी नक्षीकाम केलेली इमारत आहे यात दोन्ही बाजूला एक माणूस उभा राहील येवढयाच झरोका असलेल्या खोल्या आहेत अतिक्षय दाट झाडी व पडझड ह्यामुळे बऱ्याच गोष्टी गडावर दबून पडलेल्या आहेत.
सैन्याची मोठी रसद व दारुगोळा मुबलक असल्यावर हा किल्ला कुणीही जिंकू शकणार नाही  अशी रचना आहे उत्तरेकडील हालचालीवर लक्ष ठेवण्याच्या उद्देशाने हा किल्ला बांधला असावा,किल्याच्या पश्चिमेस जंजाळा /वैशागड दिसतो त्याच वाटेत असलेले वेताळवाडीचे धरण दिसते . या दोन्ही किल्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी या भागातील औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा ते वेरूळच्या डोंगररांगात  अंतूर, लहुगड नांद्रा, तालतम, भांगसीमाता, सुतोंडा , राहिलगड, मस्तगड असे तब्बल आठ दुर्लक्षित गड-किल्ले आहेत ह्यांना भेट दिल्यानंतर सविस्तरपणे मांडू या
             तेथून आम्ही परत फिरलो एक परिपूर्ण असा किल्ला पाहण्याचे आम्हा सर्वांना समाधान झाले दुपारचे दिड वाजले होते व पुढे आम्ही रूद्रेश्वर लेणीकडे वेताळवाडी मार्गे निघालो  ..........


( हा किल्ला बुलढाणा,जालना,औरंगाबाद,सिल्लोड,जळगाव या शहरापासून एका दिवसात होईल असा आहे या पारिसरात रूद्रेश्वर लेणी ,घटत्कोच लेणी व जंजाळा किल्ला पर्यटनासाठी आहे )

क्रमशः.....................

संजय खांडवे
बुलढाणा 9011971122
       

रविवार, १० नोव्हेंबर, २०२४

*गिरिदुर्ग व भूदुर्गचा संगम : वैशागड (जंजाळा किल्ला )*

*गिरिदुर्ग व भूदुर्गचा संगम : वैशागड (जंजाळा किल्ला )*

➖➖➖➖➖➖➖
स्थान : ता. सिल्लोड , जि . छत्रपती संभाजी नगर
उंची : ६२५ मी.
बुलढाण्यावरून धाड - पिंपळगाव रे - गोळेगाव - अंभई मार्गे ९० कि मी., सिल्लोड किंवा अंजिठ्या वरुन गोळेगावला येवून जाता येते .
➖➖➖➖➖➖➖➖➖
छत्रपती संभाजी नगर जिल्हयात सात महत्वाचे किल्ले आहेत . यामधील देवगिरी हा इतिहास प्रसिद्ध किल्ला सोडला तर इतर किल्ले हे दुर्लक्षितच वाटतात .त्यापैकीच एक म्हणजे वैशागड होय .याला जंजाळा किल्ला किंवा तालतम किल्ला असेही म्हणतात . छत्रपती संभाजीनगर - अजिंठा रोड वरील गोळेगाव पासून उंडणगाव अंभई मार्गाने जंजाळा गावात पोहचता येते व पुढे कच्च्या वाटेने दोन तीन किलोमीटर शेतातून पाऊल वाटेने जावे लागते . दुसरा मार्ग सोयगाव वरून जरांडी गावातून पुढे पाऊल वाटेने पश्चिमेतील जरांडी दराज्यातून गडावर पोहचता येते . जंजाळा गावातून जाणारा मार्ग सोपा वाटतो . दुर्गाचे गिरिदुर्ग , जलदुर्ग, भूदुर्ग, वनदुर्ग असे प्रकार पडतात पण जंजाळा म्हणजे गिरिदुर्ग व भूदुर्ग प्रकाराचा संगम आहे . दक्षिण बाजूस भूदुर्ग व इतर बाजूस गिरिदुर्ग प्रकारात येतो . अजिंठा डोंगर रांगेत असलेला हा दुर्ग विस्ताराने खुप मोठा आहे . यावर भ्रमंती करायची म्हणजे दोन अडीच तास लागतात .  गडावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने जंजाळा गावातून पाणी सोबत घ्यावे . पाऊल वाटेने तासाभरात गडाच्या बुरुजा पर्यन्त पोहचतो ही बाजू भुदुर्गाची असल्याने पूर्व - पश्चिम मोठा खंदक त्या काळी खोदून मजबूत तटबंदी दुहेरी बुरुजासह उभी केलेली आहे . सपाट भूप्रदेशावरून येणारे दोन तीन किलो मीटर अंतरावरील शत्रू टेहाळता येतो व माऱ्याच्या कक्षेत येतो . आता या बुरुजाची तटबंदी फोडून किल्याच्या आत प्रवेश करण्यासाठी  मार्ग केलेला दिसतो  . पूर्व बाजूची तटबंदी आजही अस्तीत्वात आहे . या तटबंदीत एक छोटा कमानीचा दरवाजा आजही अस्तीत्वात आहे .पश्चिमेस खोल दरी असल्याने काही गरज असलेल्या ठिकाणी तटबंदी दिसते . या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे जागोजागी बुरुज बांधलेले आहेत . पूर्वेकडील तटबंदी वरून खोल दरीत वाकाटकांच्या काळात पाचव्या शतकात कोरली गेलेली घटत्कोच लेणी समूह दिसतो व समोरच वेताळवाडी धरण व त्या पलिकडे वेताळ वाडी किल्ला नजरेस पडतो . आता या किल्ल्याचे संवर्धनाचे काम सुरु आहे . या तटबंदी खाली उतरून पाऊल वाटेने चालत गेलो की दरवाजा दिसतो . हा महादरवाजा  घटकोत्कोच लेणीच्या दरीत जातो . आता मात्र हा रस्ता वापरात नाही .प्रथम दर्शनी दूर वरून पाहिले की हे दोन बुरुज वाटतात पण दोन बुरुजाच्या मध्ये हा आजही कमानीच्या वर नगारखाना व दुमजली इमारतीच्या पडक्या भिंतीसह संवर्धनाच्या प्रतिक्षेत दिसतो  .या दरवाज्यातून येणाऱ्या व्यक्तीवर व त्याच्या हालचाली वर  चौफेर नजर ठेवता येते .सैनिकांच्या राहण्या साठी व चौकी साठी सुंदर कमानीच्या देवड्या चांगल्या स्थितीत आहेत . खाली कोरीव नक्षीकाम केलेले अनेक दगड पडलेले आहेत .दरवाज्यातून वर आल्यावर उजव्या बाजूला दारुगोळा कोठारा सारखी आजही भक्कम मजबूत असलेली मोठी दगडी इमारत आहे . संपूर्ण किल्ल्यावर जागो जागी सिताफळे व इतर तत्सम झाडे मोठ्या प्रमाणात आहेत व या मधेच किल्ल्यातील अनेक महत्वाच्या इतर इमारती झाकल्या गेल्या आहेत . पठारावर चार पाच तलाव आहेत त्यापैकीच हा दक्षिण बाजूच्या पठारावरील मातीचा गोल तलाव आहे . पूर्वी या किल्ल्यावर मोठी मानवी वस्ती असावी हे त्या ठिकाणा वरील अवशेषावरून कळते . या तलावाच्या पश्चीम दिशेला थोडे चालत गेले की जरांडी दरवाजा आहे .किल्ल्याच्या पायथ्यापासून हा बुरुज भासतो कारण याचे द्वार उत्तर दिशेला आहे . या ठिकाणी एक पारशी शिलालेख आहे . या दरवाज्यात पोहचणेही अडचणीचे आहे . पश्चीम बाजूस एक समोर आलेल्या डोंगर कड्याच्या टोकावर एक बुरुज आहे . या बुरुजावरून उत्तर - पश्चीम भागातील बऱ्याच प्रदेशावर नजर ठेवता येते . किल्ल्याच्या मध्यभागी झुडपात एक कमान दिसते व आतमधे अनेक पडक्या भिंती आहेत  . हा शाहीमहल असावा असे दिसते बाजूला दोन मोठे बुरज आहेत बुरुजावर इमारत असावी असे अवशेष आहेत . हा बालेकिल्ला आहे . या बुरुजावर दगडात कोरलेले सिंहच्या पंजात  हत्ती असल्याचे क्षरभ चिन्ह आहे .पडक्या राणी महलापासून पुढे गेलो, दाट झाडीमधे छत कोसळलेला सहा खोल्यांचा वाडा दाट सिताफळाच्या झाडी उगवलेल्या अवस्थेत दिसतो . तेथून पूर्वेला प्रचंड दोन झाडे भिंतीवर घेऊन उभी असलेली एक चांगल्या स्थितीमधील इमारत दिसते थोडी वाट शोधतच तेथे पोहचावे लागते .थोड चालत गेल्यावर उंच टेकडीवर पूर्व दिशेला तोंड असलेले प्रचंड नक्षीकाम केलेले ते प्रार्थनास्थळ आहे . ही इमारत अजूनही चांगल्या स्थितीत आहे .समोरच गडावरील आणखी एक तलाव दिसतो . पूर्वकडील पठारही खूप मोठे आहे त्या बाजूला देखीत काही बुरुज व तटबंदी नजरेस पडते . सोयगाव - वेताळ वाडी  या दिशेने दोन बुरुजाच्या मध्ये पडझड झालेल्या इमारती सह दरवाजा आहे . कामकाज व चौकशी साठी दोन्ही बाजूनी दोन कमानीच्या  इमारती आहे पूर्वी त्यावर छत होते आता दगडांचा ढाचा शिल्लक दिसतो .
          टेकडीरून उजव्या बाजूला पाऊल वाटेने सय्यदपीर बाबाच्या दर्ग्या पर्यन्त येतो बाजूलाच मोठा खोदलेला तलाव आहे या तलावाला बालेकिल्ल्या च्या बाजूने पायऱ्या दिसतात .दर्गा परिसरात दोन दगडी शिलालेख आहेत . असा हा विस्तीर्ण किल्ला पावसाळयात अगदी हिरवळीने नटलेला असतो .
          उत्तरेचे प्रवेशद्वार  असलेले ऐतिहासिक बऱ्हाणपूर शहर हे जवळ असल्याने या डोंगर रांगेतीत अंतुर , जंजाळा , वेताळवाडी हे किल्ले मध्ययुगीन इतिहासात महत्वाचे होते .१५५३ मध्ये अहमदनगरच्या बुऱ्हाननिजामशहाने हा जिंकला व त्यानंतर १६३१ मध्ये शहाजहानने जिंकला अशी माहीती मिळते . या किल्ल्या वरून उत्तरेतीत मोठ्या भूभागावर टेहाळणी करत पहारा ठेवता  येत असे हे आजही कळते . या परिसरात रुद्रेश्वर लेणी , वेताळवाडी किल्ला ,घटत्कोच लेणी , अंभई व अन्वा येथील प्राचीन मंदिर या ठिकाणांना भेटी देता येतात .


संजय खांडवे

सोमवार, ४ नोव्हेंबर, २०२४

त्र्यंबक डोंगर रांगेतील :भास्करगड (बसगड)*

*त्र्यंबक डोंगर रांगेतील :भास्करगड (बसगड)*


➖➖➖➖➖➖➖➖
स्थान : ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक
उंचीः१०८६ मी.
नाशिक पासून त्र्यंबकेश्वर मार्गे ४७ किमी., मुंबई- नाशिक महामार्गावरून घोटी मार्गे सुद्धा जाता येते .
➖➖➖➖➖➖➖➖➖
नाशिक जिल्हयात ५० पेक्षा अधिक लहान मोठे किल्ले आहेत . यामधील बरीच ही गिरीदुर्ग प्रकारात असून बहुतेक किल्ले अत्यंत दुर्गम आहेत . चढाई करण्यासही अवघड आहेत . सहयाद्रीची विस्तिर्ण पर्वत रांग जिल्हयाच्या पश्चिम भागात उत्तर दक्षिण पसरलेली आहे .  सेलबारी , हिंदबारी, घोलबारी , सातमाळ , अजिंठा , त्र्यंबक आदि डोंगर रांगा आहेत . नाशिक जिल्हात प्राचीन लेणी समूह देखील या डोंगर रांगेत आढळतात . आकाशा सोबत स्पर्धा करणारी उंच आणि महाकाय डोंगर निर्सगाचे सौदर्य अधिकच वाढवतात . याशिवाय त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योर्तीलिंगा पैकी एक हे नाशिक मधेच आहे . दर १२ वर्षानी या ठिकाणी सिहस्थ कुंभमेळा भरतो . रामायण , महाभारत या पौराणिक ग्रंथात नाशिक व त्या परिसरातील उल्लेख येतो मध्ययुगीन कालखंडात हा प्रदेश म्हणजे अत्यंत धामधुमीचा होता . या परिसरात अनेक ऐतिहासिक घडामोडी घडल्या हे या परिसरातील गडकोटावरून दिसून येते , पण या ऐतिहासिक घटना अजूनही पडदया आड गेलेल्या दिसतात . याचे शास्त्रशुद्ध संशोधन होणे गरजेचे आहे . दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी याच त्र्यंबक रांगेतून उगम पावते .
        याच त्र्यंबक डोंगर रांगेमधे ब्रम्हगिरी , अजनेरी , राजनगिरी ,गडगडा , बहुला व सर्वात उंच उतवड या सोबत असलेला बसगड म्हणजे भास्करगड हा एक महत्वाचा किल्ला आहे . उंच डोंगरावर खालून टोपीच्या आकाराचा दिसणारा हा किल्ला पाहताच क्षणी मन वेधून घेतो . गोंडे घाटावर नियंत्रण ठेवण्यासाठी या किल्लयाची निर्मिती झाली . त्रिंबक वरून गोंडे घाटातून उतरून प्राचीन काळी कोकणातून दाभोसा - खानवेल - वापी - गणदेवी - सूरत असा व्यापारी मार्ग असावा . म्हणूनच त्यावेळी या परिसरातील किल्ल्याना विशेष महत्व होते .भास्कर गडावर पोहचण्यासाठी त्र्यंबकेश्वर वरून निर्गुडपाडा येथे पोहचता येते तसेच मुंबई - नाशिक महामार्गावरून सुदधा या पाडया पर्यन्त पोहचता येते .निर्गुडपाड्या वरून हरिहरगडावर सुद्धा जाता येते . या पाड्यात जेवणाची चांगली व्यवस्था होते . निर्गुडपाड्या वरून जांभुळवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याने चारचाकी वाहनाने नागफणी टेकडी व भास्करगडच्या खिंडीत वाहने उभी करून डाव्या बाजूला जंगलातून जाणारी पायवाट आपल्याला भास्करगडावर घेवून जाते .या गडावर भ्रमंती करतांना अत्यंत महत्वाचे म्हणजे आपण समुहाने भ्रमंती करावी . पाऊल वाट दाट झाडी मधून जाते करवंदीच्या दाट किर्र करणारी जाळी मधून वाट काढत पुढे जावे लागते . फणसादि सारखी काही मोठी वृक्ष असल्याने गडाची निश्चीत दिशा न समजल्याने भूलभुलैय्या सारख्या पाऊल वाटा आपला मार्ग भटकवू शकतात . दुर्ग प्रेमीनी वाटेवर केलेल्या खुणा समजून घेत जावे लागते त्यामुळे शक्यतो स्थानिकांची मदत जरूर घ्यावी . दिड ते दोन तास गडाच्या पठारावर पोहचण्यासाठी लागतात . वाटेत व गडावरही पिण्याच्या पाण्याची सोय नाही . त्यामुळे सोबत पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे . तासाभराची पायपीट केल्यावर दाट झाडी मधून आपण छोटया मोकळ्या पठारावर येतो तेव्हा समोर गडाचे कातळ टोक दिसते . पाठीमागे डाव्या बाजूला आपल्याला नागफणी डोंगर व हरिहर गड दिसतो व त्या पाठीमागे त्र्यंबक गड ही दिसतो . पुन्हा थोडी चढाई केली की गडाच्या कातळाच्या जवळ पोहचतो .हा जहानासारखा समोर आलेला त्रिकोणी भाग आहे . याच्या डाव्या बाजूला कातळ पाय वाटेने गेले की एक भली मोठी गुफा आहे व या गुफेत ग्रामदेवता आहे . गडावर जायचे असल्याने आपल्याला डाव्या बाजूने न जाता उजव्या बाजूने पुढे कातर कड्याला लागून पाऊलवाटेने चालत जावे लागते वर उंच सरळ कडा व खाली खोल दरी आहे . बहुतेक ठिकाणी दरड कोसळल्याने दगड पडलेली आहे काही ठिकाणी काळजी घ्यावी लागते . हरिशचंद्र गडावर जातांना सुद्धा अशीच वाट लागते . कपारात नैसगीक गुहा तयार झालेल्या दिसतात . हिवाळ्यात गेल्यावर हा ट्रेक करताना जाणवणाऱ्या थंडीची म जाचं वेगळी वाटते चालून घामही येतो अन थंडीही जाणवते . पक्षांचा किलबिलाट अन मंजूळ वाहणारा वारा सुखावून टाकतो . पुढे आपल्याला दिसतात काताळात कोरलेल्या पायऱ्या अगदी हडसर किल्लयावर जश्या आहेत त्या पद्धतीच्याच ह्या पायऱ्या आहेत . प्रचंड मोठी दगड या मधे पडलेली आहे . थोडे वर गेल्यावर किल्ल्याचा मुख्य दरवाजा लागतो . पूर्वी अर्धा हा दरवाजा माती दगडांनी भरलेला होता पण गडवाट तथा शिवछत्रपती परिवार व इतर दुर्गप्रेमींनी या ठिकाणी हा रस्ता व गडावरील पाण्यांची टाकी गाळातून मुक्त करण्याचे काम केले आहे व अजूनही करत आहेत . वळण घेवून जावे लागते त्यामुळे अगदी जवळ जाईपर्यन्त दरवाजा दिसत नाही . पायरीसह  सर्व ढाचा एकाच दगडात कोरलेला आहे . दरवाज्यावर दोन्ही बाजूने चक्राकार दोन फुले कोरलेली आहेत दरवाज्याची उंची मध्यम आहे आत मध्ये देवळ्या कोरलेल्या आहेत .
                     दरवाज्या पासून थोडे वर चालत आले की दोन मार्ग आहे . किल्ल्याच्या विस्तीर्ण पठारावर दोन्ही वाटेने जाता येते . या ठिकाणी अनेक उध्वस्त इमारतीचे केवळ अवशेष दाट गवतामधे दिसतात . संपूर्ण पठारावर फेर फटका मारतांना किल्ल्याची जागोजागी उध्वस्त झालेली तटबंदी नजरेस पडते . ७ ते ८ पाण्याची टाकी आढळतात . एका दगडी समाधी ची शिळा देखील या किल्ल्यावर आहे . एका तलावाच्या बाजूला वीर हनुमानाची शेंदूर लावलेली दगडी मूर्ती आहे मंदिराला पडलेल्या दगडांची चार पाच फुटांची भिंत रचलेली आहे आत काही कोरीव दगडवरून त्या ठिकाणी छोटे मंदिर असावे असे दिसते . समोरच कातरकड्याची खोल दरी आहे अश्या ठिकाणी निश्चितच काळजी घ्यावी लागते .
          हा किल्ला अत्यंत प्राचीन आहे . यादव ,बहामणी , मुघल , मराठे, इंग्रज आदि शासकांचे या किल्ल्यावर राज्य होते . शहाजी राजें यांनी देखील हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता . १८१८ नंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला . दिड दोन तास जंगलातून पायपीट करत जाऊन गडावरील पायऱ्यामधील गाळ व मोठमोठी दगड हटविण्याचे काम करणाऱ्या तथा पठारावरील गाळाने  गच्च भरलेल्या दगडी कोरीव पाण्याच्या टाक्या गाळातून मुक्त करणाऱ्या सर्व गड किल्ले संवर्धन करणारे विविध सेवाभावी संस्थाचे मावळे हे खऱ्या अर्थाने शिवरायांचे सच्चे मावळे म्हणून काम करतांना दिसतात हे या भागाचे विशेष .

मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४

शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन : किल्ले विश्रामगड (पट्टागड )



शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन : किल्ले विश्रामगड (पट्टागड )

➖➖➖➖➖➖➖➖➖
स्थान : ता . अकोले जि. अहमदनगर
उंची : १३९१ मी
मार्ग :  समृध्दी महामार्गावरून सिन्नर किंवा भारवीर इंटरचेंज जवळून उतरून, किंवा संगमनेर वरून अकोले - राजूर मार्गे जाता येते .
➖➖➖➖➖➖➖➖➖
निर्सगाचं अप्रतीम सौदर्य हे सहयाद्रीत च बघायला मिळते . याच कुशीत अहमदनगर व नाशिकच्या अकोले तालुक्यात उत्तर दक्षिण दक्षिण पसरलेल्या सहयाद्रीच्या पर्वतरांगेत हा किल्ला येतो .संगमनेरवरुन जातांना अकोले-राजूर-वाकी-मानेरे-देवगाव -खिरवडी मार्गे या विश्रामगडावर जाता येते .दुसरा ठाणगाव मार्गे सिन्नरवरुनही जाता येते .याच परिसरात महाराष्ट्राचे एव्हरेस्ट कळसूबाई शिखरही आहे .दुर्गप्रेमीसाठी अत्यंत अवघड श्रेणीत येणारे गिरिदुर्ग अलंग,मदन,कुलंग याच डोंगर रांगेत येतात .हरिशचंद्रगड ,रतनगड,भंडारदरा धरण,सानंददरी याच परिसरात येतात . सर्वतीर्थ जटायु मंदिर टाकेद व सिन्नर येथील प्राचीन गोंडेश्वर  मंदीर जवळच आहेत . एका भल्या मोठ्या लांब पट्टया सारखा दिसणारा हा गिरीदुर्ग पट्टा गड मन प्रसन्न करतो . शिवाजी महाराजांनी या किल्यावर काही दिवस विश्रांती केली होती म्हणून याचे नाव विश्रामगड पडले . वरील मार्गाने आपण पट्टावाडी जवळ पोहचलो की डांबरी रोडने थोडे पुढे गेले की आधुनिक काळातीत एक सिमेन्टची कमान दिसते . या ठिकाणी चौकी आहे .नाम मात्र प्रवेश फी भरून प्रवेश मिळतो . वनखात्याच्या माध्यमातून या परिसरात सवंर्धनाचे काम झालेले दिसते . समोरच एक तोफ व आताच्या काळात बसविलेला हत्ती दिसतो . समोरच किल्याच्या माहिती विषयीचे नकाशासह फलक दिसून येतात यावर नजर फिरवून गेले म्हणजे भ्रमंती करतांना किल्ला चांगला समजून घेता येतो . वळणदार चढाई करत गेले की वन खात्याने बनविलेला पायऱ्या लागतात वाटेतच आताच्या काळात बनविलेला एक दरवाजा वजा स्वागत कमान लागते . तटबंदीचे अवशेषही नजरेस येतात . या वाटेने चढाई करत असतांना काताळात कोरलेल्या लहान मोठ्या गुफांचा समूहच आहे . सैनिकांच्या निवाऱ्या साठी वापरला जात असावा असे दिसते . यामधे एक लक्ष्मणस्वामी गुफा आहे  बाहेर देवदेवतांची सुंदर शिल्पे आहेत .येथूनच आपल्याला दोन काताळाच्या मध्ये असलेल्या चीऱ्यात भव्य तटबंदी बांधलेली दिसते . पुढे वर  चढत आल्यावर एक प्रशस्त गुफा आहे २५ ते ३० व्यक्ती राहू शकतील अशी आहे . थोड्याच अंतरावर एक छोटा भुयारी मार्ग आहे आत पाणी साचलेले दिसते . उजव्या बाजूला मजबुती ने उभा असलेला त्र्यंबक दरवाजा आहे . या वाटेने पट्टावाडीत उतरता येते . काळ्या दगडात कोरलेल्या काही पायऱ्या चढून गेले की एक पाण्याचे टाके आहे .या टाक्याचे दोन भाग आहेत अगदी शिवनेरीवरील साखळी मार्गा जवळ असलेल्या टाक्यासारखे आहे . अष्टभूजाधारी पट्टादेवी मंदिर या टाक्याच्या परिसरात आहे . 
              पठारावर पोहचत आलो की मेघडंबरी मधे असलेला शिवरायांचा अर्धाकृती पुतळा पाहिल्यावर येणाऱ्या  मावळयाचा थकवा नाहीसा होतो अन प्रत्येकजन जय जिजाऊ जय शिवराय अश्या घोषणा देत आपसूकच नतमस्तक होतो . पाठीमागे अंबरखाना दिसतो . किल्यावरी ही वास्तु सुस्थितीत आहे आत शिवचरित्रातील अनेक प्रेरणादायी प्रसंग उठावदार शिल्पामधे आहे . शिवराज्याभिषेकाचा प्रसंग जीवंत वाटणाऱ्या मूर्ती रूपाने उभारला आहे .अंबरखान्याच्या आजू बाजूला जुन्या वाडे व वास्तुचे अवशेष आढळतात . हा किल्ला नैर्सगीक कातळाची तटबंदी लाभलेला आहे हे प्रचंड लांबलचक पठारावर गेल्यावर  कळते . येथून सोन टेकडी व त्याच्या विरुध्द बाजूस जाता येते . पाण्यासाठी अनगिणत टाके हजारो वर्षापूर्वी येथे निर्माण केले गेले व ते आजही वापरात आहेत .
     कोकणवाडीच्या बाजूला कडेलोट दरवाजा आहे . त्याच्या पुढे कोकण दरवाजा आहे दोन्हीचेही आता फक्त अवशेष दिसतात . शिवकालिन बंधारा आजही पाणी साठवून ठेवण्याचे काम करतो . त्याच्या खाली सुद्धा अजून एक तलाव आहे म्हणजे पट्टा किल्या वरील थोड देखील पाणी वाया जात नाही त्याच्या बाजूला तटबंदी व बुरुज दिसतात . पठारावर काताळात कोटलेल्या अजस्त्र पाण्याच्या टाकी आहेत . समोरच बारा टाके समुह आहे . बरेच टाके भूमीगत पद्धतीने आतुन जोडलेली आहेत पाणी अत्यंत शुद्ध व थंड आहे . बारा टाकी समुहा पेक्षा आकाराने मोठ्या  सात टाक्यांचा समूह आहे . यासोबतच अनेक गुहा किल्यावर आहेत त्यापैकी एक धान्यकोठार म्हणून आहे .ऐसपैस जागा असलेल्या या गुहेत जमीनीत धान्यसाठवणी साठी दोन खोल राजंणा सारखे कोठ्या आहेत प्राचीन काळापासून याचा उपयोग होत असावा .
          किल्यावरील सर्वात उंच भाग म्हणजे सोनटेकडी या टेकडीकडे जातांना डाव्या बाजूला कातरकडा आहे सुरक्षेसाठी लोखंडी रिलिंग आहे . सोनटेकडीच्या सर्वोच्च शिखरावर सुरक्षित केलेला व्हयु पॉईन्ट आहे . वारा प्रचंड वाटत असल्याने काळजी घ्यावी लागते .सोनटेकडी वरुन टेहाळनी करतांना C आकाराची कातरकडा दिसते . समोरच औंढा किल्ला दिसतो .या टेकडीवर जातांना काळजी घ्यावी लागते प्रचंड वेगाने वारे वाहतात व बाजूला खोल दरी आहे .सुरक्षा म्हणून लोखंडी कटघरे लावली आहे .पण काळजी घेणे महत्वाचे आहे .
          हा किल्ला अत्यंत प्राचीन आहे .पण शिवचरीत्रात या किल्ल्याचे वेगळे महत्व आहे , १६७२ मध्ये मोगलाकडून हा किल्ला मोरोपंत पिगळे यांनी स्वराज्यात आणला होता .शिवरायांच्या १८३०६ दिवसाच्या आयुष्यात त्यांनी अहोरात्र रयतेच्या सुखासाठी सतत घोडदौड  केली .त्यांच्या आयुष्यात  थोडी देखील उसंत त्यांनी घेतलीच नाही .या किल्यावर मात्र शिवरायांनी १६७९ मध्ये १७ दिवस विश्रामासाठी वास्तव्य केले कारणही तसेच होते , शिवरायांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या किल्यास विशेष महत्व आहे . महाराजांनी१६ ते १९ नोव्हेंबर १६७९ मध्ये जालनापूरवर स्वारी करून लुटले . महाराजांनी व्यकोजीराजे यांना लिहलेल्या पत्रात याचा उल्लेख येतो .मुघल मुलुखाच्या या स्वारीत त्यांनी चांंगला वचक बसविला त्यावेळी शहजादा मुअज्जम हा औरंगाबादातच होता . त्याला वळसा घालून महाराज संगमनेरकडे निघाले त्यावेळी अहमदनगरहून येणाऱ्या  रणमस्तखा, आसिकखान व जाबताखान यांच्या ८ ते १० हजार फौजेने महाराजांच्या सैन्यावर हल्ला  केला . त्यावेळी सिदोजी निंबाळकर , हंबीरराव मोहिते , संताजी घोरपडे , मानाजी मोरे हे महाराजा सोबत होते . सिदोजी व हंबीररावांनी रणमस्तखा सोबत लढाई केली व महाराजांना स्वराज्य कार्यासाठी लागणारी लूटीच्या सर्व सामानासह पट्टा किल्याकडे पाठविले या लढाईत सिदोजीराव धारातीर्थी पडले स्वराज्य कार्यासाठी इतरही सरदारांनी जीवाची पर्वा न करता लढाई जिंकली या महान बलीदानानेच महाराजांना पुढे जाणे शक्य झाले .ही लढाई पावनखिंडच्या लढाईची आठवण करून देते . महाराज बर्हीर्जी नाईकांच्या सुचविलेल्या मार्गानुसार म्हाळुंगी नदीच्या काठाने 30 नोव्हेंबर १६७९ रोजी  पट्टा किल्यावर पोहचले . या ठिकाणी ते १७ दिवस होते . हा किल्ला अत्यंत मजबूत होता मुबलक पाणी ,तटबंदीची व घनदाट जंगलाची सुरक्षितता व मोठी शिबंदी ह्या कारणाने महाराज येथे थांबले . रमणीय निर्सग व आरोग्यास उत्तम असे वातावरणाने महाराज समाधानी झाले असावे . महाराजांच्या आयुष्यातील ही शेवटची मोहीम ठरली . या किल्यावर केलेली विश्रांती यामुळे या किल्यास विश्रामगड असे नाव पडले. 



संजय खांडवे

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०२४

चावंड किल्ला

प्राचीन व्यापारी मार्गाचा पहारेकरी : किल्ले चावंड
➖➖➖➖➖➖➖➖➖
स्थान : ता . जुन्नर जि. पुणे
उंची : ३४०० फुट
मार्ग : जुन्नर वरून आपटाळे मार्गे २० कि मी., छत्रपती संभाजी नगरहून नगर - आळेफाटा किंवा समृध्दी महमार्गारून सिन्नर जवळून उतरून जाता येते 
➖➖➖➖➖➖➖

जुन्नर परिसरातील शिवनेरी नंतर अत्यंत महत्वाचा किल्ला म्हणजे चावंड किल्ला होय . याला चामुंडगड,चावंडस,चाऊड,चामुंडगिरी ,जोंद,चौंद,चौड,जौंद ,प्रसन्नगड अशी कालानुरूप नावे प्राप्त झाली . गिरिदुर्ग प्रकारात येणारा हा किल्ला आहे . हा किल्ला दुर वरून पाहताच एक महाकाय दगड़ा सारखा दिसतो . चारही बाजूने नैर्सगिक कातरकडा आहेत . त्यामुळे पूर्वीच्या युध्दतंत्रा नुसार शत्रूंना  हा गड चढाई करण्यास अशक्य असे . त्या कातरकडावरही काही ठिकाणी तटबंदी केल्याचे अवशेष आजही दिसतात .
            जुन्नरवरून नाणेघाट मार्गावरील आपटाळे मार्गे तास दिड तासात आपण चावंडवाडी कमान असलेल्या फाट्यावर पोहचतो कमानीतून थोड आत गेले की डाव्या बाजूला एक छोटी घरघुती हॉटेल व पार्कींग साठी जागा आहे . उजव्या हाताला समोर महाकाय चावंड किल्ला दिसतो आम्ही सकाळी नऊच्या  सुमारास किल्ल्याच्या छायेत होतो सूर्य त्यामागे लपला होता . वनविभागाच्या हददीतून चालत असतांना आताच्या काळातील बाधीव पायऱ्याने चढाईस सुरुवात करावी लागते . १५ ते २० मिनिटाची बांधीव पायऱ्याची वळण घेत जाणारी श्रृंखला संपली की खडकात फसविलेले लोखंडी रिलिंग दिसतात पूर्वी पायऱ्या होत्या पण त्या ब्लांस्टींग करून इंग्रजांनी उडविल्या . वाट एकेरी आहे पण लोखंडी आधाराने खोल दरीची भिती कमी होते . कमी अधिक ठिकाणी लोखंडी वायर रोपही आधाराला आहेत . थोड पुढं गेले की नळीच्या आकाराच्या खोलगट चरीतून दगडी पायऱ्या चढत गेले की , थोड्या ओट्या सारख्या भागात येतो . या ठिकाणी आलेला शत्रू बरोबर दोन बुरुजांच्या टापूत येतो .  डाव्या हाताला गणेश दरवाजा दिसतो . येथील दरवाजा व बुरुजाच्या अर्ध्याच्या अधिक भाग त्याच जागेवरील अखंड दगडात कोरलेला आहे व उर्वरीत वरील भाग दगडाने बांधीव आहे . मध्यभागी सुंदर गणेशाची मूर्ती शिल्प आहे . पुढे काही पायऱ्या चढून गेले की  तोफ नजरेस पडते . इथपर्यन्तच्या चढाईस तास दिडदासाचा वेळ लागतो . आजूबाजूला अनेक इमारतीचे दगडी अवशेष आढळतात . उंच वाढलेले गवत अन दाट झाडीमधेही वाडे आदि इमारतीचे भाग दिसतात . या उंच गवतामधे अनेक पायवाटा आहेत त्या भुलभुलैय्या सारख्या वाटतात . किल्ल्याच्या मध्य भागाकडे उंच टेकडीकडे चालत गेल्यावर  चावंड देवीचे दगडी मंदिर दिसते . मंदिर अगदी छोटे आहे आजू बाजूला कोरीव दगडांचे अवशेष आहे . हा भाग बाले किल्या सारखा वाटतो . समोरच एक दगडी दिपमाळ आहे . समोर मिळेल तशी पायवाट चालत गेले की पाण्याची काही टाके वाटेत लागतात . या ठिकाणी एक दगडी शौचकुप बघायला मिळतो . ड्रेनीज ची व्यवस्था सह याचा वापर कसा होत असावा याचीही प्रचीती येते. थोड चालत गेलं की एक पुष्करणी आहे त्याच्या समोर अत्यंत कोरीव दगडांचे पडझड झालेले शिव मंदिर व समोर नंदी आहे . पुष्करणी मधे पाणी असून त्या ठीकाणी सात 
कोनडे कोरलेले आहे. उजव्या बाजूला पायवाटेने  गेले की माणिकडोह (शहाजी सागर ) धरणाचे विहंगम दृष्य दिसते व ही वाट आपल्याला लेणी समुहाकडे घेवून जाते . दगडात कोरलेल्या लेण्या हया धान्य कोठार किंवा सैन्याच्या निवासासाठी वापरत असावे . पुन्हा परत वर येऊन थोडे पुढे गेले की सप्तमातृका टाके नजरेस येते . पाण्याची ७ टाके एकमेकांना जोडलेली दिसतात . एकाच दगडात ही पाण्यासाठी कोरली गेली . खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत आत जाण्यासाठी दगडात दरवाजा कोरलेला आहे त्यावर गणेशाची मुर्ती आहे . सप्तमातृका ह्या पाण्याचा देवता आहेत ह्या जलस्त्रोताचे रक्षण करतात . प्रत्येक पाण्याच्या टाक्यांची पाण्याची पातळी वेग वेगळी आहेत. वेरूळ च्या कैलास लेणी मधील क्रमांक १४ च्या लेणीत गाभाऱ्यातील भिंतीवर सप्तमातृकाचे शिल्प आहेत .यात हंसारूढ -ब्राम्ही,नंदीवर -महेश्वरी,मयूरावर -कौमारी,गरुडावर -वैष्णवी,महिषावर -वाराही,गजावर -इंद्राणी ,घुबडावर -चामुंडा अशी वाहनावर ललितासनात या सप्तमातृका आहेत . पटना येथील बिहार म्युझिअम मध्ये या सात मातृ कांची सुंदर शिल्पे जतन करून ठेवली  आहेत . तशीच छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्राहलय मुंबई येथे सुद्धा अशी सुंदर शिल्पे बघायला मिळतात.ही सप्त मातृका आपल्या प्राचीन् परंपरेतील भाग आहे अगदी सिंधू संस्कृती पासून याचा संदर्भ जोडता येईल.यातील घुबडावरील चामुंडा या मातृकेवरुनच या गडाला चामुंडगिरी असेही म्हटले जायचे .ती या सप्त मातृकापैकीच एक आहे .या गडाचा इतिहास फार प्राचीन आहे .नाणेघाटातून येणाऱ्या मार्गावरील हा पहारेकरीच म्हणावा लागेल .कल्याण बंदर,कोकण या मधून जे व्यापार देशावर चालायचे या साठी सातवाहन काळात जीवधन,हडसर व शिवनेरी सोबत या सुद्धा किल्ल्याची निर्मिती करण्यात आली . येथूनच उगम पावणाऱ्या कुकडी नदीच्या खोऱ्यातून जाणाऱ्या या मार्गावर अचूकतेने लक्ष ठेवता येईल अशी रचना चावंड किल्याची आहे .

    १४८७ मध्ये मलिक अहमद या निजामाने हा किल्ला जिंकण्याचा उल्लेख आहे .शहाजी राजे यांच्या वतनदारीत १६३७ पर्यन्त हा किल्ला त्यांच्या ताब्यात होता नंतर मोगलाकडे गेला .१६७२ -७३ मध्ये जुन्नर परीसरातील हडसर,हरीशचंद्रगड आदी किल्ले शिवरायांनी जिंकून स्वराज्यात आणली त्या वेळी चावंड सुध्दा जिंकला होता व या गडाचा परिसर पाहून महाराजांनी याचे नाव प्रसन्नगड ठेवले .पुढे औरंगजेब जेव्हा दक्षिणेत आला होता तेव्हा त्याने या किल्यावर सुरतसिंग गौड याला किलेदार नेमले होते पण तो यायच्या आतच हा किल्ला मराठ्यांनी जिंकला होता .पुढे लगेच गाजीउद्दीन बहादुर याने हा किल्ला काबीज केला .पेशवे काळात हा किल्ला राजकैदी ठेवण्यासाठी होता .२ मे १८१८ ला हा किल्ला इंग्रजांनी जिंकला शेकडो तोफगोळे या किल्यावर इंग्रजांनी डागले होते .वर जाण्याच्या पायऱ्याही इंग्रजांनी ब्लॉस्ट करुन उडविल्या .त्याचे खानाखुणा आजही निरिक्षणातून जाणवतात .
      किल्ल्यावर मुककामाची सोय नाही पण जेवण्याची सोय पायथ्याशी चावंडवाडीत होते .  किल्ल्यावर जातांना पाणी सोबत घेवून जावे . चढाई साठी ग्रीफ असलेले बुट वापरावे . पाण्याच्या खाली बाटल्या परत येतांना खाली आणाव्यात .कातरकडा काटकोनात असल्याने फोटो किंवा सेल्फी काढतांना काळजी घेणे आवश्यक आहे.

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०२४

महा वारसा

*महा वारसा*

विश्वाची निर्मिती संदर्भात चर्चा करतांना जो महत्वाचा विचार समोर येतो की,   एका मोठ्या महाविस्फोटातून विश्वाने आकार घेतला . अगणित धुलीकण व वायु पासून ही आकाशगंगा तयार झाली .आईनस्टाईन व स्टिफन हॉकीन्स सारख्या जगविख्यात शास्त्रज्ञांनी याची मांडणी केली . असंख्य कोटी वर्षाच्या कालखंडाच्या उत्क्रांती नंतर पाणी- सूक्ष्मजीव - जलचर आदि जीवांचे स्थित्यांतरे होऊन मानवी उत्क्रांती होत मानव अश्मयुगापर्यन्त आला . निर्सग शक्ती पुढे लीन होत ताम्रपाशान काळापर्यन्त आला .पृथ्वी , जल , वायू, अग्नी या निर्गुण शक्ती ची उपासना करत जंगलात समूहाने पर्वत गुहा आदि अधिवासात राहू लागला . मध्यप्रदेशातील  भोपाळ जवळील भिमबेटका या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिल्यावर दहाहजार वर्षापूर्वीचा मानवी संस्कृतीची कल्पना येते . आजही शाबूत असलेल्या भित्ती चित्रावरून त्या काळच्या लोकजीवनाची प्रचीती येते . पुढे हाच मानव वसाहतीच्या समृध्दी बरोबरच सृजन व सुफलतेच्या मातृदेवतांचे उपासना करत तो निर्गुण उपासनेकडे वळू लागला . मग याच गरजेतून कृत्रीम अधिवास , वर्षावास , शैलगृहे , लेणी , मंदिरे , सुरक्षितते साठी  दुर्ग, गावांना तटबंदी ,प्रार्थना स्थळे आदि निर्माण झाली विविध राजवटीत त्यांच्या आर्थिक, सामाजिक, धार्मिक तथा सुरक्षाविषयक व सांस्कृतीक परिस्थिती नुसार वास्तु निर्माण कार्य केले गेले .
      ऋग्वेदामधे तटबंदी करून लोक राहत व ही तटबंदी जल , गिरी , वाळवंट, खंदक, कृत्रीम तटबंदी , विषारी वनस्पती याची असत व त्या अधिवासास 'पूर ' म्हणत . सिंधू संस्कृतीमधेही अशीच कृत्रीम  तटबंदी पूरांना होती. ही पूर म्हणजे दुर्गच !  महाभारतातही शांतीपर्वात दुर्गाची माहिती येते . रामायणातही दुर्गाचा उल्लेख आलेला आहे . कौटिल्याच्य अर्थशास्त्रात सुद्धा अध्याय 2 मधे दुर्गरचना व किल्याची नगररचनेचे विवेचन केले गेले आहे . 'अभिलाषितार्थचिंतामणी ' या ग्रंथाचा कर्ता सोमेश्वर दुर्गाचे नऊ प्रकार सांगतो .रघुनाथपंत हनुमंते कृत 'राज्यव्यवहारकोषात ' दुर्गवर्ग म्हणून स्वंतत्र प्रकरण आहे . 'संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग ' असे रामचंद्रपंत अमात्य यांनी लिहलेल्या आज्ञापत्रातील दुर्ग या प्रकरणात येते.
धन्विदुर्गं महीदुर्ग नरदुर्ग तथैव च ।
वार्क्ष चैवाम्बुदुर्गं च गिरिदुर्ग तथैव च ॥
छत्रपती संभाजी राजे आपल्या बुधभूषण या ग्रंथात दुर्ग निरूपण या भागात दुर्गाचे सहा प्रकार सांगतात .
           लयनम्  हा संस्कृत शब्द, यालाच प्राकृत मध्ये लेणं व मराठीत लेणी आणि या लेण्याना  वर्षावास असेही म्हणतात . ध्यान साधना व विविध कार्यासाठी पावसात सुरक्षित राहता यावे यासाठी पर्वतात ही शैलगृह खोदली गेली .प्राचीन काळी सर्वात सुरक्षित असा आदिवास म्हणून अशा प्रकारची शैलगृहे ही संकल्पना समोर आली. तथागत गौतम बुद्धाच्या निर्वाणानंतर त्यांच्या अनुयायांनी वेळोवेळी धर्मपरिषदा बोलावल्या अशी परिषद मगधचा राजा अजातशत्रू याने वेभार डोंगररांगेतील सतपर्णी या गुहेत भरविली .अशा गिरिकंदातील एकांत, सुंदर ,शांत ठिकाणे बौद्ध भिक्षुना सोयिस्कर ठरतील या भावनेने गुहा शिल्पाच्या निर्मितीला सुरवात झाली . सम्राट अशोकाच्या काळात लेणी निर्मितीचा प्रथम प्रयत्न झाला त्याचा नातू दशरथ यांनी आजीवक पंथाच्या उपासकांसाठी दक्षिण बिहार मधील बारबर या ठिकाणी लेणी खोदली हा उल्लेख तेथील शिलालेखात आढळतो.   दुर्ग हे व्यापारी मार्गावरील पहारेकरी तर लेणी ह्या आश्रयगृहे म्हणून होती . नाणे घाटाच्या व्यापारी मार्गातील सर्वच किल्ले व लेणी याची साक्ष देतात . लेण्या प्रामुख्याने बौद्ध ,जैन व हिंदू आहेत. राष्ट्रकूटांच्या काळात कोरले गेलेले वेरूळ येथील कैलास लेणे हे अप्रतिम मानले जाते. भारतात गुप्त काळात मूर्तिकलेचा अधिक विकास झाला . सातवाहन , वाकाटक ,गुप्त , राष्ट्रकूट , चालुक्य , यादव आदि काळात अनेक मंदिर व शिल्पे निर्माण झाली. पुढील काळात लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक प्राचीन मंदिरांचा जिर्णोध्दार केला. शेकडो बारव, तलाव घाट व पाणवठे लोकोपयोगासाठी  बांधले . अशा या समृध्द व भव्य निर्माणा मागे आपल्या पूर्वजांची एकजूट दिसते . हजारो वर्षानंतर आजही टिकून असल्याने या निर्माण कार्यातील प्रामाणिकपणा, वैज्ञानिक अचूकता , स्थापत्य निपुणता , भौगोलिक ज्ञानाची परिपूर्णता जाणवते . हा आपल्या महाभूमिचा समृद्ध वारसा आहे. आज मात्र हा काळाच्या ओघात नष्ट होत आहे . गडकोट, बुरुज ' तटबंदी ढासाळतांना दिसत आहे . बहुतेक वारसास्थळे तर अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेली दिसतात .अनेक प्राचीन मंदिरे व लेण्या सर्वधनाच्या प्रतिक्षेत आहेत .लेण्या मधील प्राचीन चित्रशैली पुसत चालली आहे. कोणे एके काळी मुबलक पाणी पुरवणारी प्राचीन बारव , पुष्कर्णी व तलाव गाळवटत आहेत . प्राचीन मंदिराचे सिमेंटीकरण व त्यावरील आधुनिक रंगलेपन हे मूळ वास्तु पासून दूर घेवून जात आहे . स्मृतीपटलातून दूर होत आहे . आपल्या पूर्वजांच्या डोळयांनी जे पाहीले ते पुढच्या पिढीतील डोळ्यांना आता आहे तसे तरी  बघायला मिळेल की नाही याची शाश्वती कमीच वाटायला लागली आहे . *दै महाभूमि मध्ये प्रत्येक सोमवारला " महा वारसा " या साप्ताहिक सदरामध्ये आपल्या महाराष्ट्र भूमितील प्रत्यक्ष भेटी दिलेल्या गड किल्ले ,लेणी , मंदिरे , बारव आदि प्राचीन वारसा स्थळांचे ऐतिहासिक महत्व विश्वासर्ह संदर्भासह आम्ही वाचकापुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत . गड किल्ले ,लेणी ,मंदिरे या विषयी सविस्तर माहिती सह भ्रमंतीकारांना पोहचण्याचा मार्ग व त्या ठिकाणची महत्वाची ठिकाणे , संभाव्य धोके टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी आदि विषयी माहिती देणार आहे या माध्यमातून आपल्या प्राचीन महा वारसा  संवर्धन व जतनाच्या कार्याची छोटीशी सुरुवात करत आहोत .*


संजय खांडवे
इतिहास अभ्यासक 
9011971122

शनिवार, ३१ ऑगस्ट, २०२४

मराठा सेवा संघ

 मराठा सेवा संघ : एक विचार


 १ सप्टेबर १९९० रोजी मराठा सेवा संघाची स्थापना युग पुरुष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी अकोला येथे केली . विश्ववंदनिय छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या हिंदवी स्वराज्यात अभितप्रेत असलेला मराठा हाच मराठा सेवा संघाचा मूळ आधार होता . असंघटित असलेल्या या घटकाला एकत्रित करून प्रबोधनाच्या माध्यमातून एक शोषणमुक्त , विज्ञाननिष्ठ , स्वाभिमानी व उत्पादक समाज व्यवस्था उभी करण्यासाठी मराठा सेवा संघ हा आकार घेत होता . याच उद्देशांने शासकिय ,निमशासकिय ' कार्पोरेट  अधिकारी , कर्मचारी तथा इतर खाजगी क्षेत्रात काम करणारे पगारदार लोकांचे संघटन, "मी या समाजाचा घटक आहे आणि त्याचे मला काही देणे लागते " या कृतज्ञतेच्या भावनेने समाजभिमुख लोकांचे संघटन आदरनिय साहेबांच्या प्रेरणेने कामास लागले व आज आपण त्याचा वटवृक्ष झालेला आपण पाहत आहोत .  मातृशक्तीची ताकद किती प्रचंड असते हे जिजाऊंच्या रूपाने संपूर्ण जगाने बघितले. एका कर्तृत्ववान स्त्रीने जर ठरवले तर ती असाध्याचे साध्य करू शकते.  स्त्रीशक्ती मधील प्रचंड आत्मविश्वास, जिद्द ,स्वाभिमान जागृत झाल्यावर युग परिवर्तनाचे सामर्थ्य त्या शक्तीमध्ये निर्माण होते . मुळात जगातील प्रत्येक संस्कृतीच्या मुळाशी स्त्रीच असते हे अभ्यासांती सिद्ध झाले आहे .विश्ववंदनीय ठरलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेल्या एत्तद्देशियांच्या हिंदवी स्वराज्याची खरी प्रेरणा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ठरते हे वैश्विक सत्य आहे, त्याला कुणीही नाकारू शकत नाही. मराठा सेवा संघाने राजमाता जिजाऊ यांचे चरित्र, विचार व कार्य हा आदर्श ठेवून मातृशक्तीच्या प्रेरणेने मातृतीर्थ सिंदखेड राजा जगाच्या नकाशावर आणण्याचे महान कार्य केले .इतिहासाचा शास्त्र म्हणून अभ्यास करण्याची प्रेरणा मराठा सेवा संघाने या मातीतल्या माणसाला दिली . राजमाता जिजाऊंचा  दैदीप्यमान इतिहासही अनंत काळापर्यंत काळाच्या पडद्याआडच होता. जिजाऊ जन्मापासून बखरकारांनी अनेक कल्पित कथांचे मनोरे उभे केले अनेक दंतकथा रचल्या गेल्या .ज्यांना कुठलाही तर्कशुध्द आधार नाही समकालिन विश्वासअर्ह साधन साहित्याचा पुरावाही नाही .अर्कज्ञ शहाजीराजे भोसले , राजे लखुजीराव जाधव , छत्रपती शिवाजी महाराज, शंभू राजे यांचा अत्यंत पराक्रमी इतिहास मराठा सेवा संघाच्या तालमित घडलेल्या अनेक इतिहासकारांनी तथा अभ्यासकांनी समोर आणण्याचे मोठे ऐतिहासिक काम केले आणि आजही ते होत आहे . महात्मा बसवेश्वरांनी जातीअंताची चळवळ सुरु केली त्यानंतर मानवी मनांची साखळी जोडणारे समतेचे सेतू  संत श्रीचक्रधर स्वामी ठरले त्यानंतर संतशिरोमणी संत नामदेवांनी उभारलेली प्रबोधनाची भगवी पताका पुढच्या काळात वारकरी संत परंपरेने पुढे चालवत आणली . अनेक भाषिक अन सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून उपेक्षित व शोषित समाजाला उभारणी देण्याचं काम केले . सकलशस्त्रशास्त्र कोविद छत्रपती संभाजीराजे यांनी लिहलेल्या बुधभूषणम या संस्कृत ग्रंथातील एक महत्वाचा श्लोक इथे सांगावासा वाटतो , 

प्रियः प्रजानां दातैव  न पुनर्द्रविणेश्वर: ।


आगच्छन्काड्र.क्ष्यते   लोकैर्वारिदो  न वारिधिः।


         छत्रपती संभाजीराजे आपल्या या महान ग्रंथातील प्रकिर्ण नीति मध्ये म्हणतात की प्रजेला देणारच प्रिय असतो. संपत्तीचा स्वामी किंवा संपत्ती साठवणारा प्रिय नसतो. पाणी घेऊन येणाऱ्याचे म्हणजे मेघाची तो अपेक्षा करत असतो .तशी पाणी साठवणाऱ्या सागराची तो कधीही अपेक्षा करत नाही. प्रकांड पंडित असलेले संभाजी राजे यांनी त्या काळात ही प्रकिर्ण नीतिची मांडणी केली म्हणून छत्रपती संभाजी राजे एक महान विचारवंत ठरतात.

      देत राहणाऱ्यांची प्रचंड मोठी श्रृंखला आपल्या पवित्र भूमिची आहे मग ती धन संपत्ती असो की ज्ञान ! संतांनी मेघाप्रमाणे देण्याचेच काम केले . जगतगुरू तुकाराम महाराजांनी तर आपल्या जवळील धना सोबतच आयुष्य भर शब्द रुपी धन वाटण्याचे काम निर्भिडपणे केले .याच  महान संत व महापुरुषांच्या विचारांचे अनुयायी म्हणून मराठा सेवा संघ आपले काम करत आहे .आज चौथ्या दशकात काम करत असताना मराठा सेवा संघ हा देणाराच ठरला आहे काळाची गरज ओळखत मराठा सेवा संघाने मन ,मस्तक आणि मनगट मजबूत करत विचारवंतांची एक फळीच निर्माण केली आहे बहुजनांच्या मुलांच्या मेंदूची मालिश हो करून देणारी संघटना म्हणजे मराठा सेवा संघ होय . महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपली वैचारीक बैठक मजबूत असणारा हाडामासाचा  सच्चा मराठा सेवा संघाचा एक कार्यकर्ता हा लाखा येवढा ठरतो . तो कधीही आपल्या विचारापासून दूर जात नाही . कधीही आपली चिकित्सक वृत्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन तो सोडत नाही .आज मी सेवा संघाच्या विचाराचा आहे असे बोलतांना अनेकदा ऐकतो . त्याचे कारण हेच आहे . आज आपल्या 33 कक्षाच्या माध्यमातून जगभर आपले विचारांचे जाळे विणले आहे . कृषी, उदयोग , कला , साहित्य, क्रिडा , संशोधन , विज्ञान आदि विविध क्षेत्रात काम करत समाजातीत अगदी शेवटच्या घटका पर्यन्त संधी निर्माण करून देण्याचे काम या कक्षाच्या माध्यमातून होत आहे .

         कर्मवीर भाऊराव पाटिल यांनी दिलेला संदेश मराठा सेवा संघाने पुढे चालवला .

"एका वर्षाची बिदागी हवी असल्यास धान्य पेरा;शंभर वर्षाची बिदागी हवी असल्यास माणसं पेरा; व पाच हजार वर्षाची बिदागी हवी असल्यास विचार पेरा. "

      मराठा सेवा संघाने गत चार दशकात हेच विचार जोडण्याचं काम केलं .विचारांनी माणसाची मन जोडली. मराठा सेवा संघ हा विचार आहे आणि हा विचार आज आपल्याला महाराष्ट्रातच नव्हे तर देश -विदेशातही दृढ झाला. मातृतिर्थ सिंदखेडराजा येथे जागतीक स्तरावरील जिजाऊ जन्मोंत्सवाच्या निमित्ताने लाखो जिजाऊ प्रेमी एकत्र येवून जिजाऊ चरणी नतमस्तक होतात . विचारांची देवाव घेवाण होऊन करोडो रुपयांची केवळ पुस्तकाची उलाढाल होते .शोषण मुक्त समाजाची निर्मिती हेच मराठा सेवा संघाचे ध्येय आहे. या देशातील ऐतखाऊ व्यवस्था नष्ट करून उत्पादक समाज व्यवस्थेला समाजात त्याचे स्थान निर्माण करून देणे . तथा तरुणांना योग्य दिशा दाखऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम या माध्यमातून सतत सुरू आहे. तरुणांच्या हातात दगड नाही तर पेन आणि पुस्तक देण्याचे काम सेवा संघ करत आहे . कोणत्याही व्यवसायाची लाज न बाळगता तरुणांनी बुट पॉलिश ते तेल मालिश पर्यन्तचा कोणताही व्यवसाय करण्याची तयारी ठेवली पाहीजे . विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील होणारे सततचे परिवर्तन तरुणांनी लक्षात घेऊन त्यामधे संधी शोधली पाहीजे . शेतात काय पिकत या पेक्षा बाजारात काय विकतं याच भान ठेवत शेतकर्यांनी आधुनिक तत्रज्ञानाची कास धरली पाहीजे . तरुणांनी आपले स्वहीत तथा राष्ट्रहीत  जपत  आजच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक संधी आहेत त्याचा शोध घेतला पाहीजे . असे कुटुंब अन आपोआपच मग समाज घडविण्याचे काम मराठा

सेवा संघ करत आहे .

हे एक विचारांचे संघटन असल्याने खेड्यापाड्यातही आज हा विचार घराघरात पोहोचलेला आहे.

       आमच्यासारख्याच्या दृष्टिकोनातून मराठा सेवा संघ काय आहे, तर मराठा सेवा संघ 

एक दिशा.......एक परिवर्तन.......एक विचार.......एक मार्ग.......मन -मस्तक  अन मनगट मजबूतीचं .........!!!!

नतमस्तक व्हायला शिकलो.....विचार आणि आदर्शा पुढे......!!! लढायला शिकलो......सत्यासाठी......!!

वाचायला शिकलो....चिकित्सेसाठी.......!!

बोलायला शिकलो ....न्यायासाठी.......!!

🌿🌿🌿🌿🌿

॥ तुमच आमचं नातं काय,जय जिजाऊ जय शिवराय॥

🌿🌿🌿🌿🌿

मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

🌿🌿🌿🌿

संजय खांडवे

 बुलढाणा जिल्हाध्यक्ष इतिहास कक्ष

9011971122


बुधवार, १४ ऑगस्ट, २०२४

महाभूमि

 *मायभूमीशी नाळ जुळलेला : दै महाभूमी*


शब्दांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते शब्द ही शस्त्र आणि अस्रही असतात . या शब्दाचे महात्म्य याच भूमीत म्हणजे महाराष्ट्र भूमीत जन्मलेल्या जगद्गुरु तुकोबारायांनी जनसामान्याच्या मुखा -मुखात रूढ केले . कोणे एकेकाळी ज्या शब्दज्ञानाने आमचा नाश केला होता त्याच शब्दांना शस्त्र करण्याचा मार्ग आम्हाला तुकाराम महाराजांच्या गाथेतून मिळाला . हीच या महाराष्ट्र भूमीची शिकवण आहे . या मातीत जन्मलेला प्रत्येक जण या पवित्र माती प्रति निश्चितच कृतज्ञ असतों . हीच शिकवण आहे . महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी राहिली आहे याच संत परंपरेतून वारकरी संप्रदाय उदयास आला या मातीत जन्मलेल्या अगदी शेवटच्या व्यक्तीच्या उन्नती आणि उद्धारासाठी त्याच्या कल्याणार्थ वारकरी विचारधारेने काम केले. संत नामदेव - संत ज्ञानेश्वर -संत एकनाथ - संत सावता - संत गोरोबा काका - संत चोखोबा अन - संत तुकोबा पर्यंत हातात टाळ मृदुंग घेऊन गावागावात अन घराघरात अभंग - भारुडे  अनओवीच्या रूपाने मुखदगत होऊन ही शब्दरूपी शस्त्रे पोहोचत गेली  अन समाजप्रबोधन होऊन जनसामान्यांना जगण्याचा सोपा मार्ग मिळाला . परमेश्वरापर्यंत सहज पोहोचणारा भक्तिमार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडी दूर होऊन सामान्य माणूस अगदी सहजपणे कुठलीही आडकाठी न घेता भक्ती मार्गावर मार्गस्थ झाला .

      आजच्या काळात शब्द हे प्रमाण मानले जाते. विश्वासअर्हता आणि लोकमान्यता मिळाली की शब्दाची किंमत अधिकच वाढते  आणि या शब्दाची नाळ जर मायभूमीशी जुळलेली असेल तर मग यासाठी शब्दच नाही ! असं म्हणावे लागेल .याच लोकप्रबोधनाचा आणि लोककल्याणाचा प्रामाणिक वसा घेऊन दैनिक महाभूमिचे मुख्य संपादक तथा संस्थापक सुरेश देवकर यांनी जनसामान्याच्या प्रश्नांना वाचा फुटावी म्हणजे त्यांचे शब्द हे प्रखरतेने प्रत्येक जबाबदार व्यवस्थेकडे पोहोचावेत, त्यांच्या व्यथा आणि संघर्ष सर्वांना कळावा याचबरोबर या मातीत जन्मलेल्या लेखक , कवी, समिक्षक तथा संशोधक यांचे शब्द विचार घराघरात पोहोचावे शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुखातील शब्द व्यवस्थेने जाणावे, कर्तबगार संघर्ष कन्या आणि महिला तथा यशस्वी उद्योजकांची प्रेरणा जिजाऊंच्या महा भूमीत प्रत्येक महिलेने घ्यावी हा मानस त्यांनी ठेवला . शिक्षण अन अर्थक्रांती घडवून आणण्यासाठी या आपल्या मराठी मुखपत्रातून या मातीच्या कल्याणार्थ झटणारी युवा पिढी घडविण्यासाठी प्रयत्नशील अन कृतिशील होऊन दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी मातृतिर्थ बुलढाणा जिल्ह्यात दैनिक महाभूमीचा जन्म झाला .

      संस्थापक तथा मुख्य संपादक यांचा संपूर्ण जीवनप्रवास संघर्षमय आहे . प्रसंगी काळ्या पाषाणातूनही पाणी काढण्याचे सामर्थ्य त्यांनी याच महाभूमीत जन्मलेल्या महापुरुषांच्या विचारातून आणि प्रेरणेतून घेतले आहे . प्रचंड वाचन आणि त्याचे विश्लेषण करून यथायोग्य आचरण हा त्यांचा स्वभाव गुण . माता-मातृभूमी आणि आपली माणसे ही त्यांची बलस्थाने .या तीन मकारांसाठी ते सदैव तत्पर असतात या शुद्ध विचारातून त्यांचा उत्तम व्यवहार आपसूक लोकांपुढे येतो म्हणून आज मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा तथा जालना - छत्रपती संभाजीनगर - जळगाव - मुंबई आदी जिल्ह्यातून सहकार क्षेत्रात एक विश्वास निर्माण केला आहे .

      दैनिक महाभूमीस आज एक वर्ष पूर्ण होत आहे या एका वर्षातच मराठवाडा विदर्भ या दोन प्रांतांना जोडणारे विश्वास अर्ह मराठी मुखपत्राच्या रूपाने ते समोर आले आहे आजही ग्रामीण मराठवाडा अन वऱ्हाड ही त्यांची विशेष असलेली एकूण १२ पानापैकी सकाळीच त्या त्या प्रांतातील वाचकांसाठी एक पर्वनीच ठरत आहे .खेड्यापाड्यात अन वाडी वस्तीवरही महाभूमी शब्द रूपाने पोहोचला आहे ही मातृभूमीशी असलेली नाळ अतूट आहे .निर्मळ - निकोप अन निपक्ष असलेल्या महाभूमीच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देऊन हे शब्दरूपी शस्त्र अंन धन जनमान्यात वाटण्याचे पवित्र कार्य अखंड अविरत चालू राहो हीच शुभेच्छा .




संजय खांडवे

9011971122

बुलढाणा

स्वांतत्र्य एक जबाबदारी

 स्वांतत्र्य एक जबाबदारी*


इसवी सन पूर्व 300 च्या काळात चक्रवर्ती सम्राट अशोक एक प्रियदर्शी राजा होऊन गेला . त्यांनी त्यांच्या चाळीस वर्षाच्या काळात संपूर्ण भारतासह आजूबाजूचा बहुतांश प्रांत काबीज केला होता .भारतात पूर्वी सोन्याचा धूर निघायचा तो हाच काळ होता . आज आपली भारतीय राजमुद्रा आपण पाहतो की प्रत्यक्षात चार सिंहमुख असलेल्या अशोक चक्राच्या खाली "सत्यमेव जयते " हे ब्रीद आहे .यावरून सदैव सत्याचा विजय असणारे , सत्याच्या बाजूने असलेले अत्यंत प्रगत असे लोककल्याणकारी साम्राज्याचे मौर्य सम्राट अशोक हे लोकशासक होते हे सिद्ध होते .सातवाहन, वाकाटक हे इसवी सन तिसऱ्या शतकापर्यंत भारतामध्ये प्रगत शासकापैकी एक .पुढील काळात तिसऱ्या ते पाचव्या शतकामध्ये अत्यंत समृद्ध असा गुप्त काळ आला या काळात साहित्य ,कला ,संस्कृती तथा व्यापार याला सम्राट अशोकाच्या काळा प्रमाणेच अधिक वाव मिळाला.इतिहासाच्या संदर्भावरून सम्राट अशोकांच्या काळात लोककल्याणार्थ अनेक कामे झाली असे दिसून येते .परंतु यानंतर मात्र साधारणपणे 9 व्या 10 व्या शतकापासून भारत खंडास परदेशी आक्रमणाची संकटे सतत भेडसावू लागली .या काळात अनेक आक्रमणे उत्तरेकडून भारतावर होऊ लागली पुढील काळात मोघलांनी शेकडो वर्ष आपल्या या भारतभूमीला स्वातंत्र्यापासून वंचित ठेवले .17 व्या शतकात मात्र राजे लखुजी जाधव , शहाजीराजे भोसले , राजमाता जिजाऊ , छत्रपती शिवाजी राजे यांच्या रयतवत्सल भावनेने त्यांच्या संघर्ष व त्यागातून एतद्देशियांचे स्वराज्य म्हणजे हिंदवी स्वराज्य उभे राहिले .  स्वराज्य हे या मातीत जन्मलेल्या तथा मातीसाठी स्वाभिमान आपल्या उरात बाळगणाऱ्या मावळ्यांचे राज्य होते .त्यांच्या स्वाभिमानाने त्यांना स्वातंत्र्याची ओढ लावून दिली .अठरापगड जाती-धर्माचे वज्रमूठ बांधून स्वातंत्र्य हाच खरा मोक्ष याची जाणीव त्यांना झाली . परस्परांमध्ये प्रचंड विश्वास निर्माण झाला मातृभूमीसाठी हसत हसत बलिदान देणारे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने उभे होत गेले .रयतेचे राज्य म्हणजे स्वराज्य ही निरपेक्ष भावना प्रत्येक मावळ्याच्या मनात निर्माण झाली. स्वराज्यासाठी लढणारा मावळा ही ओळख मिळाली हीच स्वातंत्र्य , समता व बंधूतेची  नांदी होती .यातूनच स्वराज्य न्याय देणारे ठरले पुढे शिवरायांच्या आणि छत्रपती शंभुराजांच्या निर्वाणानंतर दिडशे वर्षापर्यंत मावळे स्वराज्यासाठी मोठ्या स्वाभिमानाने स्वातंत्र्यासाठी लढत राहिले ते कधीही झुकले नाही हीच प्रेरणा इंग्रजांशी लढताना भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक महावीरांना मिळाली .

     एका चर्चेमध्ये तथागत गौतम बुद्ध अंम्ब ट्ठाला म्हणतात "अंम्बट्ठा छोटीशी चिमणी देखील स्वतःच्या घरट्यात स्वच्छंदपणे चिव चिव करीत असते . " यामधून स्वातंत्र्याचा अर्थ प्रतीत होतो . स्वातंत्र्याची व्याप्ती कळते .डॉ . बाबासाहेबांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अखंड मानव जातीचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी संविधानाची निर्मिती केली . "आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपण स्वातंत्र्याचे रक्षण करू असा आपण निश्चय केला पाहिजे " असे त्यांनी आपल्या 25 नोव्हेंबर 1949 च्या संविधान सभेतील भाषणात सांगितले होते . स्वातंत्र्य ही खूप मोठी आनंददायी बाब आहे त्यासाठी सामाजिक लोकशाही आपण जपली पाहिजे . आपल्या हक्क  , अधिकारासाठी तथा आपले सामाजिक व आर्थिक हेतू साध्य करण्यासाठी घटनात्मक मार्गाने गेले पाहिजे हा संदेश त्यांनी संविधानातून दिला . शिवरायांनी जसे "रयतेचे राज्य " म्हटले तसेच भारतीय संविधानाने "आम्ही भारताचे लोक " या वाक्याने संविधानाची सुरुवात केली . शिवरायांच्या स्वराज्यातील लढणाऱ्या विरास "मावळा " म्हटले गेले संविधानाने आपली ओळख आपल्याला "आम्ही भारताचे लोक " अशी करून दिली ही ओळख कुठलाही जात - धर्म -पंथ दर्शवणारी नव्हती सार्वभौम , समाजवादी व धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य न्याय ,स्वातंत्र्य , समता व बंधुता याची रुजवन करणारे आहे त्यामुळे स्वाभिमान जागृत होतो व समाजाच्या अगदी शेवटच्या घटकाचे मन - मस्तक आणि मनगट मजबूत होते .


    स्वातंत्र्य म्हणजे मी कुणाचाही अंकित नाही . मी पूर्णपणे सर्वांगाने मुक्त आहे . स्वैर आहे कोणाचाही देणेदार नाही . मानवतेची मूल्य जोपासत मी मानवधर्मास जपणारा स्वतंत्र मानवतावादी आहे . स्वातंत्र्य जेवढे महत्त्वाचे तेवढेच स्वातंत्र्यात मानवीमूल्य जोपासत जगणे ही आपली जबाबदारी ठरते .स्वातंत्र्याचा खरा अर्थ तर मानव कल्याणार्थ झटणे , दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा आदर करणे तथा त्याच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणे असाच होतो . दया , क्षमा , शांती ,समता , बंधुता याचे भान ठेवत कृतघ्न न होता कृतज्ञ राहणे असाच आहे . आज आपण स्वातंत्र्यात जगत आहोत आपल्याला काहीही करावे लागत नाही असा समज आपला सुखी जीवन जगत असताना आहे , पण येणाऱ्या काळात आपल्यासमोर काय वाढून ठेवले आहे याचाही वेध घेण्याची कुवत आपल्यात असली पाहिजे तरच आपले स्वातंत्र्य अबाधित राहील .शहीद भगतसिंह यांची " जेल डायरी "

  मधील पान 19 वरील जेम्स रसेल लॉवेल या अमेरिकन तत्त्ववेत्याने "स्वातंत्र्य " या विषयावर लिहिलेली कविता या ठिकाणी नमूद करावीशी वाटते .


*मर्दानो , फुशारक्या मारता तुम्ही ,*


 *मर्दुमकी आणि स्वातंत्र्याच्या,*


 *परंतु ,खरंच आहे का,*


 *तुमच्यात धमक आणि  तुम्हाला स्वातंत्र्य ?*


*साखळदंडात कुजणाऱ्या बांधवांच्या वेदना जाणवत ,*


 *तुम्ही मुक्त असताना कोणी गुलामीत मरत असेल,*


 *तर तुम्ही सुद्धा षंढपणा पांघरलेले गुलामच नाही का ?*


 *मुक्त वावरण्याच्यातुम्हाला हक्क तरी काय ?*


*फक्त स्वतःला मुक्त कर विणे,*


 *यालाच का खरे स्वातंत्र्य म्हणतात ?*


 *मानवजातीप्रती जबाबदारी विसरणे,*


 *यालाच का खरे स्वातंत्र्य म्हणतात ?*


 *खरे स्वातंत्र्य तर त्याला म्हणावे,*


 *जिथे प्रत्येकाने दुसऱ्याच्या गुलामीचा भार ,*


 *अखंड मानवजात मुक्त करण्याचा ध्यास घ्यावा*


 *जे गुलामगिरीच्या विरोधात उभे राहू शकत नाही,*


 *त्यांना खरे गुलाम म्हणावे ,*


 *उपहास आणि तिरस्काराच्या भीतीने जे शांत बसतात,*


 *त्या गुन्हेगारांना गुलाम म्हणावे ,*


 *केवळ संख्या कमी आहे म्हणून सत्याच्या बाजूने उभे राहायला जे घाबरतात,*


 *त्या नामर्दांना गुलाम म्हणावे .*  



संजय खांडवे

इतिहास अभ्यासक

बुलढाणा

9011971122

शनिवार, २३ मार्च, २०२४

शिवाची १ ०८ रुपे

 



महादेव

 वीरूपाक्ष

 चंद्रार्धककृतशेखर

 अमृत 

शाश्वत

 स्थानू

 नीलकंठ

 पिनाकी 

वृषाभाक्ष

 महाज्ञेय

 पुरुष

 सर्वकामद

 कामारी

 कामदहन

 कामरूप

 कपर्दी 

विरूप

 गिरीश

 भीम

 सॄक्की (म्हणजे मोठे मोठे जबडे वाले)

 रक्तवासा

 योगी

 काल दहन

 त्रिपुरघ्न

 कपाली

 गूढव्रत 

गुप्त मंत्र 

गंभीर

 भाव गोचर 

अणिमादीगुणाधार

 त्रिलोकेश्वर्यदायक

 वीर

 वीरहंता

 घोर

 विरूप

 मासल

 पटू 

महामासाद

 उन्मत

 भैरव

 महेश्वर

 त्रैलोक्यद्रावण

लुब्ध

लुब्धक


 यज्ञसूदन

 कृतिकासुतयुक्त 

उन्मत 

कृत्तीवासा

 गजकृत्तीपरिधान

 क्षुब्द 

भुजंग भूषण

 दत्तालंब

 वेताल

 घोर 

शाकिनी पूजित

 अघोर

 घोरदैत्यग्न

 घोरघोष

 वनस्पती

 भस्मांग 

जटिल 

शुद्ध 

भेरुड शतसेवित

 भूतेश्वर 

भूतनाथ

 पंचभूताश्रित

 खग

 क्रोधित

 निष्ठूर

चंड

 चंडिश 

चंडिका प्रिय

 चंडतुंड

 गरुत्मान

निस्त्रिश

शव भोजन

 लेलिहान

 महारौद्र

 मृत्यू 

मृत्यूर गोचर

 मृत्योमृत्यु

 महासेन

 स्मशानारण्यवासी

 राग 

विराग

 रागांध

 वितराग

 शतार्ची

 सत्व

 रज 

तम 

धर्म 

अधर्म

 वासनवानुज

 सत्य 

असत्य

 सदृप 

असदृप 

अहेतुक 


अर्धनारीश्वर

 भानू 

भानुकोटीशतप्रभ 

यज्ञ 


यज्ञपती

 रुद्र

 ईशान

 वरद

 शिव

शिवाची १ ०८ रुपे

*क्रांतिची प्रेरणा :शहीद भगतसिंह*

 *क्रांतिची प्रेरणा :शहीद भगतसिंह*


➖➖➖➖

आजचा पाकिस्तानचा भाग असलेला ल्यालपूर बंगा येथे 28 सप्टेंबर 1907 रोजी भगतसिंहाचा जन्म झाला . आई विद्यावती कौर आणि वडील किशनसिंह यांच्या संस्कारातून भगत सिंहासारख्या महापुरुषाची जडणघडण झाली . देशभक्तीचे वातावरण त्यांच्या घरातच होते त्यांच्या आजोबापासून प्रत्येक जन क्रांतिकारी चळवळीशी जुळलेले होते . यावरून लक्षात येते की भगतसिंह ज्या गोतावळयात वाढले त्यात क्रांती केवळ बोलण्याचा विषय नसून तर प्रत्यक्ष कृतीचा विषय येतो . संघर्ष , त्याग, बलिदान या गोष्टी तर त्यांच्या कुटुंबीयांसाठी जगण्याची प्रेरणाच होती . त्यांचे काका स्वर्णसिंह आणि अजितसिंह यांच्या देशभक्तीच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता .आजही भगतसिंहाचे नाव जरी उच्चारले तरी मानवतेशी जुळलेल्या चेतना ज्यांच्या हयदयात आहे त्यांची देशभक्ती आपसूकपणे जागृत होते .  देशासाठी अन मानवतेसाठी काहीतरी करावं ही भावना मनात तयार होते . भगतसिंहाचे चरित्र तरुणांसाठी एक आदर्श आहे स्वातंत्र्यासाठी आणि मानवाच्या कल्याणार्थ स्वाभिमान कसा जागृत ठेवावा आणि त्यासाठी संघर्ष कसा करावा ,याचबरोबर त्यागाचे ही सर्वोच्च प्रेरणास्थान भगतसिंह ठरतात . अगदी बालपणापासून त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात देशभक्ती किती ओत प्रत भरलेली आहे हे त्यांच्या एका प्रसंगावरून दिसून येते .एकदा मेहता आनंद किशोर हे क्रांतिकारक भगतसिंहाच्या घरी आले होते . तेव्हा चार वर्षाचा भगत लाकडी बंदुका शेतात चिखलात फिरत होता . मेहतांनी विचारले, "काय करतोस ? "तेव्हा भगतने उत्तर दिले कि, "मी बंदुका पेरतो आहे ,उद्या या झाडांना बंदुका लागतील आणि त्या घेऊन मी ब्रिटिशांना या देशातून हाकलून लावेल . " चार वर्षाच्या भगतसिंहामध्ये हा अलौकिक आत्मविश्वास कोठून निर्माण झाला ? असा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा त्यांच्या कुटुंबीयापुढे आणि त्यांनी केलेल्या संस्कारापुढे आपसूकपणे आपण नतमस्तक होतो .ही त्याग अन देशाप्रती समर्पित होण्याची भावना त्या बालकाच्या मनात निर्माण होणे ही त्यांच्या आई-वडिलांच्या आणि कुटुंबीयांच्या मातृभूमी प्रति असलेल्या उच्च कोटीच्या असामान्य देशभक्तीचीच प्रचीती आहे . 

         देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून बाहेर काढून स्वतंत्र करणे हा त्यांच्या जीवनाचा मुख्य उद्देश होता . गुलामगिरीत खितपत पडणे त्यांना कदापिही मान्य नव्हते . स्वातंत्र्यासाठी ते आयुष्यात कोणतीही किंमत मोजण्यास तयार होते .आपला देश गुलामगिरीत आहे आणि आपण स्वस्थ बसायचं हे त्यांना अजिबात मान्य नव्हते . भगतसिंह जेलमध्ये असताना देखील ते कधीच थांबले नाही त्या ठिकाणी सुद्धा वाचन ,चिंतन आणि लेखनाचा विडा त्यांनी उचलला होता .1929 मध्ये भगतसिंहांना अटक झाल्यावर ते जवळपास अडीच वर्ष तुरुंगात होते .त्यांना फाशीची शिक्षा झालेली असून सुद्धा ते किंचितही विचलित झाले नव्हते .  कोणत्याही प्रकारचे दुःख त्यांना जाणवत नव्हते .अलौकिक आत्मविश्वासासह अगदी निर्भीडपणे शिस्तबध्द तेने  त्यांनी आपला वेळ तुरुंगात असताना अभ्यासात ,वाचनात अन लेखणात घालविला .713 दिवसाच्या तुरुंगवासात इंग्रजी ,हिंदी ,बंगाली , उर्दू भाषेतील 302 ग्रंथ वाचून काढले .या वाचनातून आपले क्रांतिकारी विचार त्यांनी पुढे लेखनबद्ध केले .तत्कालीन परिस्थितीचा विचार करत  देशाच्या च नव्हे तर जगाच्या सुद्धा सामाजिक, राजकीय ,धार्मिक ,आर्थिक ' सांस्कृतिक विषयांची तर्कसंगत पद्धतीने विचार करून त्याची मांडणी केली . साम्राज्यवाद , सामंत शाही ,लोकशाही , भांडवलशाही या विषयावरही भाष्य केले . जगातील सर्वच महत्वाच्या राजकीय क्रांतीचा अभ्यास केला . स्वातंत्र्याच्या महानकार्यासाठी , मातृभूमीच्या रक्षणासाठी बलिदानाचे महत्त्वही त्यांनी आपल्या लिखाणातून विषद करत धर्माचा ही तुलनात्मक अभ्यास करून नास्तिकतेची परिभाषा त्यांनी या बंदीवासात असताना केली आहे .या काळात त्यांनी चार ग्रंथ लिहून काढले . यामधील "Why I am an Atheist " हा लेख प्रत्येक भारतीय तरुणांनी वाचलाच पाहिजे असा आहे .भारतीय तरुणांपुढे भगतसिंहांचा आदर्श आहेच, पण फोटो पाहून आजच्या सोशल मीडियाच्या युगात स्टेटस ठेवण्यापुरता किंवा "इन्कलाब जिंदाबाद ! " एवढंच म्हणण्यापुरता नसावा .तर भगतसिंहांनी लिहिलेले तुम्हा आम्हा सारख्या तरुणांना प्रेरणादायी ठरणारे भगतसिंहाचे साहित्य प्रत्येकाने वाचलेच पाहिजे .

         त्यांच्या जेल डायरीमधील पान 19 वरील जेम्स रसेल लॉवेल या अमेरिकन तत्त्ववेत्याने "स्वातंत्र्य " या विषयावर लिहिलेली कविता या ठिकाणी नमूद करावीशी वाटते .


*मर्दानो , फुशारक्या मारता तुम्ही ,*

 *मर्दुमकी आणि स्वातंत्र्याच्या,*

 *परंतु ,खरंच आहे का,*

 *तुमच्यात धमक आणि  तुम्हाला स्वातंत्र्य ?*

*साखळदंडात कुजणाऱ्या बांधवांच्या वेदना जाणवत ,*

 *तुम्ही मुक्त असताना कोणी गुलामीत मरत असेल,*

 *तर तुम्ही सुद्धा षंढपणा पांघरलेले गुलामच नाही का ?*

 *मुक्त वावरण्याच्यातुम्हाला हक्क तरी काय ?*

*फक्त स्वतःला मुक्त कर विणे,*

 *यालाच का खरे स्वातंत्र्य म्हणतात ?*

 *मानवजातीप्रती जबाबदारी विसरणे,*

 *यालाच का खरे स्वातंत्र्य म्हणतात ?*

 *खरे स्वातंत्र्य तर त्याला म्हणावे,*

 *जिथे प्रत्येकाने दुसऱ्याच्या गुलामीचा भार ,*

 *अखंड मानवजात मुक्त करण्याचा ध्यास घ्यावा*

 *जे गुलामगिरीच्या विरोधात उभे राहू शकत नाही,*

 *त्यांना खरे गुलाम म्हणावे ,*

 *उपहास आणि तिरस्काराच्या भीतीने जे शांत बसतात,*

 *त्या गुन्हेगारांना गुलाम म्हणावे ,*

 *केवळ संख्या कमी आहे म्हणून सत्याच्या बाजूने उभे राहायला जे घाबरतात,*

 *त्या नामर्दांना गुलाम म्हणावे .*  


     यावरून लक्षात येते की शहीद भगतसिंह हे स्वातंत्र्य आणि गुलामगिरी याबद्दल काय म्हणत होते . सत्याच्या बाजूने उभे राहणे हे 17 व्या शतकातील महाराष्ट्रातील पहिले मराठी लोककवी जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी आपल्या काव्यातून सांगितले होते "सत्य असत्याशी मन केले ग्वाही । मानिअले नाही बहुमता ॥" तेच पुढे 19 व्या शतकात जेम्स रसेल आपल्या काव्यातून मांडतात व पुढे सत्याची अन सत्यासाठीची त्याग अन समर्पनाची  क्रांतिकारी धार भगतसिंह आपल्या क्रांतीतून दाखवून देतात .ते म्हणत मानवतेला प्रभावित करणाऱ्या सर्वच गोष्टीशी माझा संबंध आहे .त्यांना लाभलेल्या अत्यल्प आयुष्यातही प्रतिकूल परिस्थितीत सखोल वैचारिक चिंतन घडवून एक आदर्श नव तरुणांपुढे उभा केला .आपल्या देशाचे  उज्वल भविष्य कोठे आहे हे त्यांनी जाणले होते म्हणून त्यांचे विचार हे मानवतेच्या कल्याणार्थ आजही लागू पडतात .


*तुझे जब़ह करने की खुशी मुझे मरने का शौक,*

*मेरी भी मर्जी है , जो मेरे सैय्याद की है ।*


हसत हसत देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या  क्रांतिकारी वीर शहीद भगतसिंहास विनम्र अभिवादन .

➖➖➖➖➖🌷

संजय खांडवे

9011971122

शनिवार, ९ मार्च, २०२४

नमः शिवाय

 *नमः शिवाय ।*

〰️〰️〰️〰️〰️〰️


सर्वेश्वर महादेव हे सर्वव्यापी समजले जातात .आज आपण आपल्या परिसरामध्ये पाहतो की भगवान शिव शंकराची अनेक प्राचीन मंदिरे आहेत या मंदिरांमध्ये अगदी मनोभावे भक्त शिवाची भक्ति करत असतात . यामध्ये पुरुष असो वा स्त्री  हे दोघेही तेवढीच श्रद्धा शिवशंकरावर ठे वतात .अनेक ठिकाणी यात्रा उत्सवही अगदी प्राचीन काळापासून सुरू आहेत .शिवलिंगाच्या रूपाने सर्वत्र शिवउपासना होते . हे  शक्तीचे प्रतीक मानले जाते . स्वर्ग व पृथ्वीची निर्मिती करून त्याचे संचलनार्थ सर्व दिशांनी मुख असलेले सर्व दिशांना हात व पाय असलेले भगवान शिव हे महान असे महादेव ठरतात .भगवान महादेवाच्या डाव्या अंगातून विष्णू म्हणजेच श्रीहरीची तथा उजव्या अंगातून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली आहे या ब्रह्मदेवांना नारायणाच्या नाभीत त्यांनी स्थापित केले आहे ब्रह्मदेव पुढे शिवांच्या प्रेरणेनेच देव, असूर, मनुष्य आदी सृष्टीची रचना करतात .असे शिवपुराण सांगते .भगवान शिव शंकराचा पुराण व इतर आधुनिक साहित्यातून अभ्यास केल्या नंतर त्यांच्या केलेल्या कार्यानुसार मान्यता पावलेल्या नावांची एक मोठी यादीच तयार होते .आदिनाथ, आदी योगी या नावाने ते प्रसिध्दच आहे .आदी हा शब्द त्यांचे प्राचीनत्व सिद्ध करतो .गंजांतक,  जिमूतवाहन, सदाशिव , वृषभध्वज ,परमात्मा , परब्रम्ह ,श्रीनिलकंठ ,ईश्वर , शंभू  , महेश्वर , हर ,चिदानंदस्वरूप अशी कितीतरी नावे शिवाची आहेत .निर्विकार, प्रकाशपूर्ण, करुणामय , चंद्रकला विभूषण, विष्णूकमल, विष्णूक्षेत्र, वेदांतवेद्य ,जटाजुटधारी, त्रिगुणातीत,भ्रमणशील, भक्तवत्सला, दयासिंधू , शंभू ,जितेंद्रिय , महेश , सृष्टीकर्ता , दुर्गेश, जगन्नाथ , मृत्युंजय , दीनबंधू ,दयासिंधू ,शर्वा, , परमतत्वमय, अविनाशी , सर्वेश्वर सहारा कर्ता, दिनबंधू ,पशुपतीनाथ,भैरव , वीरभद्र अशी अनंत नावे त्यांच्या कार्यसिद्दी मुळेच त्यांना प्राप्त झाली आहेत . ' "सर्वो वै रूद्र: " रुद्रच सर्व आहे या महा वाक्यातून ते सिध्द होते . स्थानिक भूप्रदेशातही त्या भागाच्या नावानुसार त्यांना ओळखले जाते जसे सिध्देश्वर ,मानकेश्वर ,बुदनेश्वर,पाताळेश्वर ,केहाळेश्वर ,रामेश्वर अशी अनेक नावे आहेत .

   आणखी कितीतरी रुपे ही शिवाची आहे.भ्रमर कोषात शिवाची ४८ नावे आहेत .वेदांची निर्मिती होण्याअगोदर पासून शिवाची पूजा होत आली आहे .प्रागैतिहासिक काळात शिव निरंजन निराकार होते .ते स्मशानात राहत ,शरीराला भस्म लावत ,मुंडमाला धारण करत,साप अलंकार रूपाने धारण करत,ते महायोगी पेक्षाही मोठे होते.

सर्व संस्कृतीने त्यांचा स्वीकार केला होता .त्यागी -निर्लोभी-निर्लेप दैवत म्हणजे शिव होय .

        शिवाची अतिप्राचीन काळापासून उपासना केली जाते .यांचे काही मूर्तीप्रकार आहेत .

सुखासन,सोमस्कध,चंद्रशेखर,वृषारूढ,नृत्यमूर्ती,गंगाधर,त्रिपुरान्तक,कल्याणमूर्ती,अर्धनारीश्वर,भद्ममूर्ती,पाशुपत,कंकाल,हरीहर,भिक्षाटन,गणेशानुग्रह,दक्षिणमूर्ती कालारि,लिंगोद्वव,श्रीपंचाश्रीपंचाधर,ललाट तिलक ही शिवाची मूर्ती रुपे आहेत .

     उत्तर भारतात शिवाची १२ रूपांची उपासना केली जाते .

सद्योजात,वामदेव,भ्रषोर,तत्पुरुष,ईश,मृत्युजय विजय,किरणाक्ष,भदोरास्त्र,श्रीकंठ,सदाशिव,द्वादशकला संपूर्ण मूर्ती ही ती १२ रुपे आहे .आपण दक्षिण भारतात गेलो तर १८ रूपाचे पूजन होते.ही पुढील सहा रूपे त्यामधे येतात . अर्धनारीश्वर,चंदेशानुग्रह,कालाहमूर्ति,कल्याणमूर्ती,त्रिपुरान्तक,उमास्कंध .

       शिवलिंगाचेही प्राचीन काळापासून खूप महत्व आहे.नदीच्या उगमस्थानावर किंवा काठावर शिवलिंगाची स्थापणा प्राचीन काळापासून होतांना दिसते .मंदीराच्या आकाराच्या प्रमाणात शिवलिंगाची रचना केलेली दिसते .शिवलिंग मोठे असल्यास त्याची स्थापणा बाहेर ओटयावर केलेली दिसते . 

       शिलादपुत्र नंदी हा चंद्रार्थभूषणांचा अत्यंत प्रिय पार्षद होता . तो अत्यंत परमज्ञानी व विवेकपारायणी होता .नंदी हे शिवाचे प्रिय वाहन आहे .शिवमंदिरात नंदीची स्थापणा अनिवार्य असते.प्राचीन काळात विदेशातही नंदीची पूजा होत असे.मिस्त्र,बेबोलियन,

सिरिया आदि विदेशी संस्कृतीत बैल (नंदी)चे महत्व दिसते .५००० वर्षापूर्वीच्या सिंधू संस्कृती मध्ये वृषभ मूर्ती आढळलेल्या आहेत.आपण दक्षिण भारतात गेलो की नंदीच्या विशाल मूर्ती दिसुन येतात .शिवालयासमोर नंदीसाठी स्वंतत्र मंडप असल्याचा नेम दिसून येतो .महाराष्ट्रात कैलास लेणीमध्ये नंदीसाठी स्वंतत्र दालन शिवालयासमोर आहे . अगदी तसेच सुंदर असे नंदीमंडप  गडचिरोली मधील मार्कडेश्वराच्या मंदिरा समोर स्थित आहे . यज्ञ प्रसंगी  दक्षाच्या शिवविरोधाला नंदिने परखडपणे प्रति उत्तर दिल्याचे शिव पुराण सांगते .

         शिव हा एक विचार प्रवाहच आहे गत पाच हजार वर्षापासून चालत आलेला दिसतो .शिव हे कृषीसंस्कृतीचे एक प्रेरणादायी स्वरूप आहे त्यांना पशुपतीनाथही याच अर्थाने म्हटले जाते .हिमवान व मेना यांची पुत्री उमा व शिव यांच्या शिवविवाहात असंख्य कोटी गण , देवी , देवता व ऋषी मुनीच्या उपस्थितीत गंगा , यमुना , गोदावरी तथा असंख्य नद्यांच्या सानिध्यात विवाह पार पडत असतांना ध्वज ,पताके , आंबे केळी आदि खांबाचे मनोरे उभारून मंडप टाकला जातो . सप्तमातृ कांची उपस्थिती व गर्गाने उमा पार्वतीची तांदुळाने ओटी भरणे . अक्षदा, कुश व जलाने शिवाची ओवाळणी हे शिवविवाहाचे प्रसंग कृषी परंपरेचे नाते सांगतात व आजही ते आपण आपल्या शुभ कार्यात जपतो .

           शिवाचे तांडव हे या विश्वाचा नाश नाही तर संचलणार्थ आहे ,ज्याने निर्मिले तो नाश कसा करेल ?

शिवाने 'सत्य' ह्यासाठी व विश्वाच्या संचलणार्थ असंख्य निवाडे पुराणात आढळतात

महादेवास भोळा सांभ ही म्हटले जाते म्हणजे महादेव हे अगदी सहजतेने म्हटल्यापेक्षा कोणताही भेदभाव न पाळता सदैव मदतीस तत्पर अशी देवता !

       अन्न,वस्त्र,निवारा ह्या मनुष्याच्या मूलभूत गरजा या गरजे व्यतिरिक्त मिळवणे म्हणजे मोह ,वासना,आसक्ती 

आणि मनुष्य प्राण्याने मूलभूत गरजा व्यक्तीरिक्त जे धन आहे त्यापैकी काही ज्याचा मूलभूत गरजा अपूर्ण आहेत त्यांना दान करावे असे सांगत धनसंचय करणाऱ्या कुबेरासही महादेवांनी फटकारले होते हे माझ्या वाचनात आहे.

        समुद्रमंथनातील विष सृष्टीच्या संचलणार्थ आपल्या कंठात सामावणारे संपुर्ण विश्वाच्या न्यायनिवाड्यात ही केवळ आणि केवळ सत्य ह्या विषयावर ठाम राहूण पुराणामध्ये न्याय देतांना दिसतात

      न्याय दर्शनाचा विचार सांगत पुढील येणाऱ्या काळात सत्याच्या चिकित्सेसाठी गौतम ॠषींना सहा दर्शना पैकी "न्याय" दर्शनाची मांडणी करायला सांगतात

     शिवाची अनंत रुपे हया विश्वाच्या अनंत हर्षासाठी आजही तुमच्या आमच्यात जेथे सत्य आहे

जेथे पविञता आहे

जेथे विचाराची सुंदरता आहे

जेथें मनुष्यजातीची सेवा आहे

जेथे मोह,माया,लोभ,आसक्तीला

स्थान नाही 

तेथे निश्चितच देवादीदेव शिवाचाच वास आहे

➖➖➖➖➖➖

नमः शिवाय




संजय खांडवे

9011971122

सोमवार, २२ जानेवारी, २०२४

छत्रपती राजाराम महाराज

 छत्रपती राजाराम महाराज




🚩🚩🚩🚩🚩🚩




तीन पिढयांची अखंड मेहनत,पारिश्रम ,शौर्य,धाडस,त्याग,पराक्रम,विश्वास,प्रजाहितक्षता याच्या जोरावर आदर्श घेत मराठयांचे साम्राज्य मोठया आत्मविश्वासाने पराक्रम गाजवत होते.




      आईजिजाऊंच्या प्रेरणेतून साकार झालेले....




महाबलीनी सूचीत केलेले स्वराज्याचे स्वप्न 'सनय 'होऊन शिवरायांनी उभे केले होते.




     शिवरायांचा विश्वास ,मॉसाहेबांचीप्रेरणा ही रयतेला स्वराज्यरक्षणार्थ सिद्ध करत होती सोबत तुकोबारायांचे अभंग मावळ्यासांठी प्रेरणा देत होते.लाखाच्या पोशिदयाला जपण्यासाठी प्रत्येक मावळा निधड्या छातीने पुढ येत होता 




   आबासाहेबानंतरही स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा महाराष्ट्राच्या रक्तात भिनली ,अन्यायाविरुध्दची प्रेरणा आबासाहेव देऊन गेले ,स्वराज्यरक्षकाची भूमिका पुढे शंभूराजांनी बलिदान देऊन पूर्णत्वास नेली,आपले प्राण दिले पण स्वाभिमान सोडला नाही,महाराजांनी उभी केलेली गडकोट ही औंरंगजेबाविरुद्ध लढत ठेवा हा संदेश शंभूराजांनी दिला ही रयतेची कळवळ त्यात होती एकदा हातून गेलेले स्वराज्य पुन्हा उभे करणे हे अवघड काम होईल !




    आबासाहेब,मॉसाहेबांच्या तालमित वाढलेली येसूराणीसाहेबांनी धीरगंभीरपणे ही जबाबदारी स्वीकारली,हा भोसले घराण्याचा संस्कार ......




शंभूराजांनी दिलेली बिरूदावली " श्री सखी राज्ञी जयति ।"




      आपल्या पतीच्या पश्चात स्वराज्याची सूत्र सांभाळण्याचा संस्कृतीचा वारसा त्यांना मिळाला अर्कज्ञ,सहस्त्रकरविक्रम,महाबली शहाजीराजे व स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ मॉ साहेब यांच्याकडूनच........




            महाबली शहाजीराजांच्या दक्षिणेतील शिवरायांच्या जडणघडणीतील एक भाग म्हणजे शिवरायांचे सनय होणे ,म्हणजे विविधअंगी ज्ञान प्राप्त करणे. पुढे दक्षिण दिग्विजयात महाराजांनी जिंजी जिंकला त्या जिजींचे अधिकचे बांधकाम करून अभेदय केले,त्याठीकाणी महाडीकांची नेमणुक केली जिंजी अधिक मजबुत केला ,हा शिवचरित्रातील सनयाचाच एक भाग आहे,याची प्रचीती पुढे येते. संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर स्वराज्यावर फार मोठे संकट कोसळले या संकटाला मोठया धैर्याने तोंड देत स्वराज्याचे मनोधैर्य वाढविण्याचे काम महाराणी येसूबाईंनी केले .संभाजीराजे मुघलांच्या कैदेत पडल्यावर सुटकेची काही आशा नव्हती काळाचा वेध घेत येसूराणीसाहेबांनी छत्रपती राजारामांचे मंचकरोहन  ९ फेब्रुवारी १६८९ ला रायगडावर केले . त्यावेळी शंभूपुत्र शाहूराजे केवळ ७ वर्षाचे होते आणि राजाराम राजे हे १९ वर्षाचे होते . वेढा घालण्याचे धाडस मोगलांना शंभूराजे गेल्यानंतरच झाले .२५मार्च १६८९ ला औरंगजेबाचा वजीर असदखान याचा मुलगा इतिकादखान हा औंरगजेबाचा मावसभाऊ याने रायगडला वेढा दिला .येसूराणीसाहेबांच्या मसलतीनुसार  राजारामराजे यांना ५ एप्रिल १६८९ ला ताराराणी ,राजसबाई यांच्यासह प्रल्हाद निराजी,धनाजी जाधव,संताजी घोरपडे यांच्यासह गुप्तपणे रायगड सोडला.जावळी _प्रतापगड _पन्हाळगड मार्गाने अत्यंत शिताफीने जिंजीकडे प्रयान सुरु केले .मराठयांचा हा राजा हुल देवून कर्नाटकात जाईल हा अंदाज मोगली सैन्याला होता . पन्हाळ्याकडे येतांना प्रतापगडाच्या पायथ्याशीही लढाई झाली ती अज्ञात आहे. त्यामुळे या मार्गावर मोगलांनी आपले चौकी पहारे अधिक सक्त केले होते .मोगली सैन्य वेगाने दक्षिणेत एकवटायला सुरुवात झाली होती.मराठे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जय जयकार करत मोगली सैन्यावर छापे घालत होते .अंधाऱ्या रात्री औरंगजेबाच्या छावणीवर गनिमी काव्याने हल्ला करून त्या लाखाच्या सैन्यातून त्याच्या छावणीचा कळस कापून आणला . संभाजी राजे यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा हा हल्ला होता . या अतुलनिय पराक्रमावर रामचंद्रपंत अमात्य म्हणतात " बादशहाचे  डेऱ्याचे कळसच आणून झुलफिकारखान याचे पाच हत्ती आणिले त्यापेक्षा यांची (संताजीची) मर्दुनकी कोठवर वर्णावी "




दुसऱ्या बाजूने धनाजी जाधव रणमस्तखान व शहाबुध्दीन खानाच्या सैन्यास शह देत होत्या .संताजी -धनाजींच्या पराक्रमाने मराठयांमधे एक नवचैतन्य संचारले होते .राजाराम महाराजांनी कर्नाटकाच्या प्रवासास निघण्या अगोदर स्वराज्याची जबाबदारी सचीव रामचंद्रपंत यांच्याकडे सोपविला त्यांच्या सेवेत शंकरजी नारायण यांना ठेवले .संताजी घोरपडे व धनाजी जाधव हे नरवीर नाशिक ते जिंजी पर्यन्तचा प्रान्त लढवत ठेवण्याचे नियोजन केले .सहयाद्रीच्या मदतीने मराठे एक एक किल्ला लढवत ठेवून मोगलांना चकमा देत होते .राजारामराजे पन्हाळ्याच्या वेढयात असतांना तो वेढा मोगलांनी अधिक कडक केला अशा परिस्थितीत सुद्धा २६ सप्टेंबर १६८९ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास राजाराम महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांसह पन्हाळगड सोडला.शत्रूला याची भनक सुद्धा लागली नाही .आग्रावरून सुटकेच्या वेळी जे तंत्र शिवरायांनी वापरले त्याच पध्दतीने राजाराम महाराजांनी अत्यंत शिताफीने आपल्या बुद्धीचार्तुर्याने हा प्रवास जिंजीपर्यन्त केला .येथून महाराजांचा जिंजीचा प्रवास सुरू झाला . या प्रवासावर केशव पंडितांनी एक छोटेखानी काव्याची रचना केली आहे. या प्रवासावर आणि स्वराज्याची दक्षिणेतील राजधानी अत्यंत चातुर्याने ,पराक्रमाने व मुत्सदी युद्ध नितीने राजारामराजेंनी टिकवून ठेवली यात तंजावरच्या मराठा साम्राज्याचीही त्यांना खूप मोठी मदत झाली .प्रवासात बेदनूरच्या राणी चन्नमा हिने राजधर्म पाळत मराठयांच्या राजाचे रक्षण केले . यामुळे रागाने राणीवर चालून आलेल्या सैन्यास संताजी घोरपडेनी हतबल करुन परत पाठवले.तुंगभद्रानदीतील  बेटावर राजारामराजे मुककामास असतांना अब्दुल्लाखानाच्या हल्यात महाराजांनी वेषपरावर्तन करून सुटका केली त्यावेळी राजवस्त्र परिधान करून मीच राजारामराजे आहे हे छातीठोक पणे सांगत आपल्या मराठयांच्या  राजासाठी आत्मबलिदान दिले .या अनामिक वीर मावळ्यांचे नाव इतिहासाला ज्ञात नाही.हा वीर म्हणजे स्वराज्याचा दुसरा शिवाजी काशिदच म्हणावे लागेल .हा  जिंजीचा प्रवास अत्यंत संक्षिप्त आहे यावर अधिक लिखान होणे आवश्यक आहे.त्यांनंतर जिंजी व त्या परिसरातील  छत्रपती राजारामराजे यांच्या पराक्रमाची गाथा घरा-घरात पोहचणेही तितकेच महत्वाचे !




स्वराज्याचे छत्रपती राजाराम महाराज यांनी ही स्वराज्याची राजधानी लढत ठेवली . मराठयांनी त्यांच्या नेतृत्वात औरंगजेबास हैरान करून सोडले ७ वर्ष मुघलांचा वेढा होता ,मुघल झुंजत राहीले पण गडावरची रसद संपली नाही. राजाराम महाराजांनी हा लढा सुरू ठेवला ही त्यांची युध्दनिती होती यावर आता अभ्यास होतांना दिसत आहे.हे शहाजीराजे आणि  शिवरायांचे दुरदृष्टीचे नियोजन होते . रायगड जर धोक्यात आला तर ही महाराजांची पर्यायी योजना शिवचरित्रातून दिसते हेच शिवतंत्र आहे .




आज छत्रपती राजाराम महाराजांची जयंती या निमित्ताने स्वराज्याचे तिसरे छत्रपती  यांना मानाचा मुजरा!








- संजय खांडवे




9011971122

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...