🚩🚩🚩🚩🚩🚩
स्वराज्याच्या आणाभाका घेत स्वराज्य वाढू लागले ,असंख्य किल्ले स्वराज्यात शिवरायांच्या बुद्धीचातुर्य,शौर्य,धाडस व किर्तीने येऊ लागले यासाठी स्वराज्याच्या आड येणाऱ्या स्वकियांचाही बंदोबस्त शिवरायांना करावा लागला .जावळीचा विजय हा त्यातलाच एक भाग होता .या विजयाने कोयने पासून लांब कोकणपर्यन्त स्वराज्य विस्तारले ,नव्हे दुप्पटच झाले .
जावळी च्या दाट किर्र अश्या खोऱ्यात ,अरुंद वाटा,डोंगर दऱ्या हया जंगली श्वापदांचा वावर असलेली अशी होती .जावळी जनू वाघाची जाळीच !हयाच ठिकाणी शिवरायांच्या बुध्दीचार्तुयाचा एक भाग म्हणजे महाराजांचे पुर्वानुमान कौशल्य येथे दिसून येते .पुर्वानुमान म्हणजे पुढे काय होणार किंवा परिस्थिती कशी असणार हे आपल्या बुध्दीपटलावर घासून अनुमान काढणे होय.
महाराजांनी याच ठिकाणचा भोरप्या डोंगर हेरला .त्याचा आकार, रचना ,दगड व पाणी याचा अभ्यास करून मोरोपंताना या ठिकाणी गड बांधण्याचा आदेश दिला .स्वराज्यातील स्थापत्यशास्त्र विशारद अर्जेाजी यादव यांनी हा अभेद्य असा प्रतापगड १६५६ साली बांधून काढला .स्वराज्याचा भगवा ध्वज प्रतापगडावर डौलाने फडकू लागला .हाच प्रतापगड जेव्हा स्वराज्यावर अफजल खानाचे संकट आले तेव्हा स्वराज्य रक्षणासाठी सिद्ध झाला .रडतुडीच्या घाटातून खानाला बोलावून याच जावळीच्या भागात प्रतापगडाच्या साक्षीने त्याच्या चरणी अफजलखान रूपी स्वराज्यावरील संकट संपविले.हे आजही त्या खानाची कबर गडावरून पाहतांना लक्षात येते.
या मोहिमेंत महाराजांचे शौर्य तर दिसतेच त्याचबरोबर अलौकिक बुद्धीमत्तेचेही दर्शन घडते . शञूलाही चक्राउन सोडणारी युद्धाची व्यूहरचना त्याच सोबत विश्वासू जीवाला जीव देणारे शूर स्वराज्याचे मावळे .
*"आम्ही तर जीवीत तृणप्राय समजून शत्रुच्या अंगावर चालून जात आहो.यात यश आले तर ठिकच आहे ;परंतु काही भलताच प्रकार घडला तर तुम्ही घाबरुन जाऊ नका .ठरविलेल्या बेताप्रमाने शत्रुवर चालून जाऊन त्याचा मोड करा व राज्याचे रक्षण करा .तुम्ही सर्व शूर व पराक्रमी आहा .आमची सगळी मदार तुमच्यावर आहे .तुमच्यासारखे इमानी व विर्यशाली पुरुष सहाय्य आहैत म्हणून आम्हास यवनांची पर्वा वाटत नाही .या समयी सर्वाना आपआपल्या शौर्याची व पराक्रमाची पराकाष्टा करावी .तुमची अनुकुलता आहे म्हणून मला अफझुलखानाचा मुळीच हिशोब वाटत नाही .आजपर्यन्त केलेली कमाई आपल्या सहकार्याचे व शौर्याचे फळ आहे .ती आपली कमाई कायम राखण्यास जिवाची पर्वा न करता ह्या कठीण प्रसंगी झटाल तर तुमची किर्ती अधिकच वाढेल ! हे असे वीर्योत्सहाचे उद्दीपन करणारे भाषण ऐकूण सर्व लोकांच्या अंगात स्फुरण आले. ते म्हणाले " आपण आम्हास जी जी आज्ञा कराल तदनुसार वागण्यात आम्ही यत्किंचितही कसूर करणार नाही .त्यासाठी आमचे प्राणही बळी पडले तरी त्याची आम्हाला क्षिती नाही .हे प्राण आपल्या चरणी एकवार वाहिले आहेत .ते आता आमचे नव्हेत ते स्वामिकार्यी गत झाले तर ते आम्ही मोठे भूषण समजू ."*
(कृष्णराव केळूसकर गुरुजी लिखित शिवचरीत्रातून )
सामाजिक स्वांतत्र्य साठी प्रत्यक्ष हातात तलवार घेऊन आपल्या जीवाची पर्वा न करता मोहीमेत उतरणारे पहीले राजे म्हणजे शिवराय .
या मोहीमेत महाराजांनी असंख्य बारकावे अवलंबविले ते आपण पुढे यथावकाश अभ्यासूच !
आज वीर जीवाजी महाले यांची जयंती या निमित्ताने जीवाजी महाले यांच्या स्मृतीस प्रणाम करतो
शिवाजी महाराजांनी या मोहीमेंत अंगरक्षक म्हणून दहा मावळ्याना सोबत घेतले .प्रत्येकाला प्रत्येकाचे काम नेमुण दिले ,महाराजांच्या गुप्तहेर खात्यानुसार शञूचे अनेक बारकावे अभ्यासून त्याच्या तोडीस तोड व्यूहरचना करणे हे ही महाराजांची युद्धनितीच होती .
🚩
*तथैव माहिलो जीवो विश्वजिच्च मुरुबक:।*
🚩
या आशयाचा श्लोक महाराजांच्या समकालिन असलेल्या "शिवभारत "या ग्रंथात २१व्या अध्यायात आला आहे . यात जे दहा अंगरक्षक आहेत त्यांची नावे आढळतात .
*संभाजी कावजी*
*जिवाजी महाले*
*काताजी इंगळे*
*कोंडाजी कंक*
*येसाजी कंक*
*कृष्णाजी गायकवाड*
*सुरजी काटे*
*विसाजी मुंरंबक*
*इब्राहीम सिध्दी*
*संभाजी करवर*
अश्या *शिवराज रक्षक* दहा महावीरांनी गर्जना करून,म्यानातून प्रचंड तलवारी उपसून पर्वतांनी जसे वाऱ्यास अडवावे तसे खानाच्या सैन्यास अडविले असा उल्लेख आढळतो .
ह्या दहा महावीराना आपआपल्या युद्ध व शस्त्र कौशल्यानुसार शञूकडील नेमुन दिलेल्या कामावर पापणीही लवता कामा नये ,जेने करून शञूस संधी मिळेल .
जीवाजी महाले यांची सैय्यद बंडावर बारीक नजर होती .हवेतल्या हवेत मारा करण्यात तरबेज ,चाणक्ष,चपळ महावीर !
खानाच्या पडल्याने शत्रूपक्षात प्रचंड गोंधळ निर्माण झाला ,ठरल्या प्रमाणे मावळे लढू लागले .चवताळून बंडा महाराजांवर वार करणा२ तोच जीवाजीने त्याचा हात हवेतच कलम केला . लाखाचा पोशिंदयाचं रक्षण झालं .
महाराजांचे प्राण वाचले .याच जीवाजीच्या पराक्रमाने महाराजांचे पुढचे २१ वर्ष स्वराज्यासाठी मिळाले .
" *होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी* " ही म्हण रूढ झाली .या महावीर योध्याची आज जयंती
सर्व शिवप्रेमीना हार्दिक
शिवशुभेच्छा
*जय जिजाऊ*
🚩🚩🚩🚩🚩🚩
*संजय खांडवे*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा