धर्मशास्त्र,अर्थशास्त्र,शिक्षणशास्त्र,समाजशास्त्र,तत्वज्ञान,इतिहास हया विषयावर आपल्या साहित्यातून विस्तृत स्वरूपात लिखान करनारे प्रकांड पंडीत ,बहुजनसमाजाचे वाड़मयमहर्षोंच ज्यांना म्हणता येईल असे कृष्णराव अर्जुन केळूसकर यांचा साहित्य विश्वातील कार्य पाहता नतमस्तक व्हावे असेच आहे .
आज त्यांचा जन्मदिवस एक आठवण म्हणून का होईना वाचून जे काही लिहावसं वाटलं ते मांडतोय !
गीताशास्त्राचे वास्तविक रहस्य सामान्य लोकांना उत्तम रितीने अवगत व्हावे ,गीतेतील प्रत्येक श्लोकाचा अन्वय व त्यातील प्रत्येक पदाचा अर्थ वाचकास कळावा या उद्देशाने त्यांनी सान्वय,सार्थ,सटीक गीतेवरील भाष्य केले आहे .८९० पानाचा हा श्लोकासह विधिध अंगानी टिपनी सह हा महाग्रंथ मांडला आहे .विदवानापासून विदयार्थापर्यन्त आवडेल अश्या ग्रंथाची रचना केली .
संत तुकाराम,गौतमबुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज या युगपुरूषांचे चरित्र सर्वप्रथम मराठीतून लोकासमोर मांडले .
पुढे हेच गुरुजींचे बुद्धचरीत्र बाबासाहेंबांच्या जीवनातील प्रेरणादायी भाग ठरुन ऐतिहासिक क्रांती घडवून गेले .
१८९६ साली पद्य स्वरुपातील तुकोबांचे र्चारत्र जगासमोर मांडले.
तात्कालिन उपलब्ध इतिहास साधनांचा अभ्यास करून १९०६ साली छत्रपती शिवाजी महाराजांचे विस्तृत स्वरूपात ,क्रमवांर घटनासह अभ्यासपूर्ण असे चरित्र लिहून काढले .
या ग्रंथासाठी श्री छत्रपती शाहू महाराज सरकार ,श्रीमत महाराज बापूसाहेब कागलकर,श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड या ग्रंथासाठी उदार आश्रय दिला .इंदूरचे श्रीमंत तुकोजीराजे होळकर यांनी या शिवचरित्राच्या ४००० प्रति खरेदी करुन जगभरातील ग्रंथालयाला वाटप केल्या .शिवराय जगाच्या कान्याकोपऱ्यात पोहचविले .१९२० साली या ग्रंथाची दुसरी आवृती प्रकाशित झाली .
या महान कार्याला मानाचा मुजरा !
आपण नककीच हया दुर्मिळ,अभ्यासपूर्ण साहित्याचा लाभ घेऊन महान युगपुरूषांची चरित्र जाणून घ्यावी ही अपेक्षा .
जय जिजाऊ
संजय खांडवे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा