सकलशास्त्र,विचारशील,धर्मज्ञ,शास्त्रकोविद स्वराज्यरक्षक शंभूराजे.....
शेकडो वर्षापासून गुलामीत खितपत पडलेल्या या मातीत भोसले कुळवंशीयांनी स्वातंत्र्याचे स्वप्न पाहीले ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी तीन पिढया झटल्या तेव्हाकुठे आई जिजाऊंच्या प्रेरणेने ,शहाजीराजांच्या संकल्पणेने ,शिवरायांच्या धाडस,बुद्धीचातुर्य,विश्वास,अखंडसावधानतेच्या जोरावर स्वराज्य उभं राहीलं. ही काही सामान्य गोष्ट नव्हती !
पुढे स्वराज्याच्या दुसऱ्या छंत्रपतींनी हे स्वराज्य आपल्या खांदयावर पेलून ठेवत स्वराज विस्तार केला.इतिहाचार्य वा सी बेद्रे यांचे शंभूचरित्रावरील संशोधन व लेखन हे शंभूचरित्राला योग्य दिशा देण्याच महान कार्यच आहे .इतिहासाचार्य कमल गोखलेही व इतिहाचार्य जयसिंगराव पवार सरही तेवढेच महत्वाचे !
"शहाजी महाराजांच्या महत्वकांक्षेतून सूचित झालेल्या व शिंवाजी महाराजांनी साकार केलेल्या हिंदवी स्वराज्याचा संभाजीराजे यांनी हिरेरीने सांभाळ केला".
या एका वाक्यात मी खरे स्वराज्य रक्षक अनुभवले .
अगदी बालपणा पासून आपल्या शंभुबाळाने असंख्य वादळे अनुभवली ,कुणाच्या वाटयाला येऊ नये येवढं दुःख एकटया शंभूराजांनी तुमच्या अामच्या कल्याणार्थ सोसले. कळतही नव्हतं त्या वयात मातृछत्र हरवलं , पुढं विदवत्ता व शौर्य हा दागिना धारण केलेल्या शंभूराजांनी ते पार करत अगदी आग्राभेटीचा थरार अन त्यानंतरचा स्वराज्यासाठी घडलेला अाग्रा ते राजगड प्रवासही आपल्या मृत्युच्या बातमीसह अनुभवला . पुढे त्यांनी गाजविलेला पराक्रम हा शद्वात बसवून सांगणेही शक्य नाही . पण अनेकांच्या लेखण्या शभूराजांचं विद्वत्ता व शौर्य लिहण्यास धजावल्याचं नाही उलट कथा,नाटकामधून वेगळेच चित्र रंगविले गेले पण सत्य जास्त काळ लपवून ठेवता येत नसत कारण असत्याला बुड नसतं ते कुठही लवंडतेच ! इतिहास हा साधनावर लिहला जातो ,संदर्भावर तपासला जातो तुमच्या आमच्यासारखी माणसं हया साधनांना,साहित्याना,संदर्भाना आपल्या बुध्दीपटलावर घासतात मगचं स्वीकारतात ,म्हणून हे शक्य झालं .
शंभूराजांनी एकही लढाई हरली नाही आपल्या तलवारीच्या पात्यावर स्वराज्य पेलले,मोगल ,इंग्रज,पोर्तुगीज ,सिध्दी यांना सळो की पळो करून सोडले होते ही शौर्याची,पराक्रमाची व धाडसाची एक बाजू खूप महत्वाची आहे यात अर्कज्ञ शहाजीराजे,मॉसाहेब व छत्रपती शिवरायांच्या कार्याचा वारसा त्यांना खूप काही देवून जातो या पराक्रमावर संदर्भ घेंत खूप काही लिंहणं अजूनही बाकी आहे असं मला वाटतं .
ज्या वयात तुम्ही आम्ही घरातले बाळ होतो त्या वयात शंभूराजांनी संस्कृत भांषेवर प्रभूत्व मिळवून " बुधभूषण " या संस्कृत ग्रंथाची निर्मिती म्हणजे शेकडो वर्षानंतर या मातीमधली प्रतिभा उजळण्याचे साहित्य क्षेत्रातील महान कार्य होते अगदी प्रत्येक भारतीय कुटुंबाने हा ग्रथ आपल्या घरातील प्रत्येक सदस्याचा मन -मस्तिष्का पर्यन्त पोहचवावा असाच आहे. भोजपूरी भाषेतील नखशीख,नाईकाभेद,सातसतक या सारख्या महान ग्रंथांची निर्मिती ह्या साहित्यवीराने केली .
जगातील बहुतांश भाषेचे ज्ञान शंभूराजेंना होते .संस्कृत इतकिच हींदी भाषेचे ज्ञानही त्यांना होते .केशव पुरोहीत यांनी "राजाराम चरितम" या ग्रंथात शंभूराजांना सकलशास्त्र,विचारशील,धर्मज्ञ व शास्त्रकोविद असे म्हटले आहे .
शंभूराजांचा बुधभूषण हा ग्रंथ अनुवादक डॉ प्रभाकर ताक़वाले सर यांचा अथक परिश्रमातून व संपादक अँड शैलजा मोळक व जिजाई प्रकाशन यांच्या माध्यमातून हातात आला . शंभूराजांच्या संस्कृत श्लो काचा अर्थ व अन्वयार्थ वाचकापर्यन्त पोहचला.हे एक ऐतिहासिक कार्यच म्हणावे लागेल. या साठी मराठा सेवा संघाचें संस्थापक शिवश्री पुरूषोत्तम खेडेकर साहेबांची अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना लाभलेली आहे या ग्रंथामधून शंभू राजाचे विविध क्षेत्रात असलेले अगाध ज्ञान लक्ष वेधणारे आहे .
पहिल्या अध्यायात आलेला ४ था श्लोकात शंभूराजे म्हणतात
अज्ञान कृष्णसर्पेण दंशिता भुवि मानवा :।
तेषा जीवन हेत्वर्थम नौमि जांड़गुलिकं गुरुम ।।
अर्थ : या पृथ्वीवरी माणसे अज्ञानाच्या कृष्णसर्पने डसली गेली आहेत ,त्यांना जीवंत ठेवण्यासाठी गुरू नावाच्या विषवैदयकाची हेतुपुरस्पर निवड केली आहे त्यास मी नमन करतो यामधून अथांग ज्ञानसागररूपी छत्रपती ज्ञानार्जनाचे मोल लक्षात अाणून देतात.प्रस्तुत ग्रंथात संभाजीराजे विविध विषयावर भाष्य करतांना दिसतात ,यावर स्वतंत्रपणे लिहणे आवश्यक वाटते.एकटा बुधभूषण मधील भाष्य बघितले की शंभूराजे म्हणजे प्रकांडपंडीत विदवत्तेचे महामेरु आहेत हे लक्षात येते .
यामध्ये
राजनीति वरील भाष्य
देव देवतांना पूर्वजांना वंदन
स्वकुलावर काव्य
राज्यांची अंगे
राजाचे सहाय्यक
अमात्य
राजपुत्र शिक्षण व त्याचे कर्त्यव्य
दुर्ग संपत्ती,दुर्ग प्रकार
दुर्ग रचना,धान्य कोठारे
दुर्गाध्यक्ष
राजाची कर्त्यव्य
राजाचे दोष
राजावरील संकटे
राजाचे आक्रमण
प्रकिर्ण ज्ञान
पशु,पक्षी,वनस्पती विषयी ज्ञान
आदी बाबीवर शंभूराजांनी भाष्य केले आहे हे प्रत्येक शिवशंभूप्रेमीनी नककीच अभ्यासावे .
अर्थात सकलशस्त्रशास्त्र पारंगत शंभूराजांनी अगाध ज्ञानाची निर्मिती केली अाहे .तीचा सखोल अभ्यास होऊन समोर येणे गरजेचे अाहे
आज एकत्रितपणे शंभूराजांचे साहित्य कुठे उपलब्ध नाही .यावर विचार होउन त्याची माडणी होणे गरजेचे आहें
आज बुध्दीरूपी दागिना परिधान केलेल्या बुधभूषणकार छत्रपतीची जयंती
जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा !
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
संजय खांडवे
9011971122
"

खूप छान माहिती दिली आपण👍🏻
उत्तर द्याहटवा