सोमवार, २२ जानेवारी, २०२४

छत्रपती राजाराम महाराज

 छत्रपती राजाराम महाराज




🚩🚩🚩🚩🚩🚩




तीन पिढयांची अखंड मेहनत,पारिश्रम ,शौर्य,धाडस,त्याग,पराक्रम,विश्वास,प्रजाहितक्षता याच्या जोरावर आदर्श घेत मराठयांचे साम्राज्य मोठया आत्मविश्वासाने पराक्रम गाजवत होते.




      आईजिजाऊंच्या प्रेरणेतून साकार झालेले....




महाबलीनी सूचीत केलेले स्वराज्याचे स्वप्न 'सनय 'होऊन शिवरायांनी उभे केले होते.




     शिवरायांचा विश्वास ,मॉसाहेबांचीप्रेरणा ही रयतेला स्वराज्यरक्षणार्थ सिद्ध करत होती सोबत तुकोबारायांचे अभंग मावळ्यासांठी प्रेरणा देत होते.लाखाच्या पोशिदयाला जपण्यासाठी प्रत्येक मावळा निधड्या छातीने पुढ येत होता 




   आबासाहेबानंतरही स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा महाराष्ट्राच्या रक्तात भिनली ,अन्यायाविरुध्दची प्रेरणा आबासाहेव देऊन गेले ,स्वराज्यरक्षकाची भूमिका पुढे शंभूराजांनी बलिदान देऊन पूर्णत्वास नेली,आपले प्राण दिले पण स्वाभिमान सोडला नाही,महाराजांनी उभी केलेली गडकोट ही औंरंगजेबाविरुद्ध लढत ठेवा हा संदेश शंभूराजांनी दिला ही रयतेची कळवळ त्यात होती एकदा हातून गेलेले स्वराज्य पुन्हा उभे करणे हे अवघड काम होईल !




    आबासाहेब,मॉसाहेबांच्या तालमित वाढलेली येसूराणीसाहेबांनी धीरगंभीरपणे ही जबाबदारी स्वीकारली,हा भोसले घराण्याचा संस्कार ......




शंभूराजांनी दिलेली बिरूदावली " श्री सखी राज्ञी जयति ।"




      आपल्या पतीच्या पश्चात स्वराज्याची सूत्र सांभाळण्याचा संस्कृतीचा वारसा त्यांना मिळाला अर्कज्ञ,सहस्त्रकरविक्रम,महाबली शहाजीराजे व स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ मॉ साहेब यांच्याकडूनच........




            महाबली शहाजीराजांच्या दक्षिणेतील शिवरायांच्या जडणघडणीतील एक भाग म्हणजे शिवरायांचे सनय होणे ,म्हणजे विविधअंगी ज्ञान प्राप्त करणे. पुढे दक्षिण दिग्विजयात महाराजांनी जिंजी जिंकला त्या जिजींचे अधिकचे बांधकाम करून अभेदय केले,त्याठीकाणी महाडीकांची नेमणुक केली जिंजी अधिक मजबुत केला ,हा शिवचरित्रातील सनयाचाच एक भाग आहे,याची प्रचीती पुढे येते. संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर स्वराज्यावर फार मोठे संकट कोसळले या संकटाला मोठया धैर्याने तोंड देत स्वराज्याचे मनोधैर्य वाढविण्याचे काम महाराणी येसूबाईंनी केले .संभाजीराजे मुघलांच्या कैदेत पडल्यावर सुटकेची काही आशा नव्हती काळाचा वेध घेत येसूराणीसाहेबांनी छत्रपती राजारामांचे मंचकरोहन  ९ फेब्रुवारी १६८९ ला रायगडावर केले . त्यावेळी शंभूपुत्र शाहूराजे केवळ ७ वर्षाचे होते आणि राजाराम राजे हे १९ वर्षाचे होते . वेढा घालण्याचे धाडस मोगलांना शंभूराजे गेल्यानंतरच झाले .२५मार्च १६८९ ला औरंगजेबाचा वजीर असदखान याचा मुलगा इतिकादखान हा औंरगजेबाचा मावसभाऊ याने रायगडला वेढा दिला .येसूराणीसाहेबांच्या मसलतीनुसार  राजारामराजे यांना ५ एप्रिल १६८९ ला ताराराणी ,राजसबाई यांच्यासह प्रल्हाद निराजी,धनाजी जाधव,संताजी घोरपडे यांच्यासह गुप्तपणे रायगड सोडला.जावळी _प्रतापगड _पन्हाळगड मार्गाने अत्यंत शिताफीने जिंजीकडे प्रयान सुरु केले .मराठयांचा हा राजा हुल देवून कर्नाटकात जाईल हा अंदाज मोगली सैन्याला होता . पन्हाळ्याकडे येतांना प्रतापगडाच्या पायथ्याशीही लढाई झाली ती अज्ञात आहे. त्यामुळे या मार्गावर मोगलांनी आपले चौकी पहारे अधिक सक्त केले होते .मोगली सैन्य वेगाने दक्षिणेत एकवटायला सुरुवात झाली होती.मराठे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जय जयकार करत मोगली सैन्यावर छापे घालत होते .अंधाऱ्या रात्री औरंगजेबाच्या छावणीवर गनिमी काव्याने हल्ला करून त्या लाखाच्या सैन्यातून त्याच्या छावणीचा कळस कापून आणला . संभाजी राजे यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा हा हल्ला होता . या अतुलनिय पराक्रमावर रामचंद्रपंत अमात्य म्हणतात " बादशहाचे  डेऱ्याचे कळसच आणून झुलफिकारखान याचे पाच हत्ती आणिले त्यापेक्षा यांची (संताजीची) मर्दुनकी कोठवर वर्णावी "




दुसऱ्या बाजूने धनाजी जाधव रणमस्तखान व शहाबुध्दीन खानाच्या सैन्यास शह देत होत्या .संताजी -धनाजींच्या पराक्रमाने मराठयांमधे एक नवचैतन्य संचारले होते .राजाराम महाराजांनी कर्नाटकाच्या प्रवासास निघण्या अगोदर स्वराज्याची जबाबदारी सचीव रामचंद्रपंत यांच्याकडे सोपविला त्यांच्या सेवेत शंकरजी नारायण यांना ठेवले .संताजी घोरपडे व धनाजी जाधव हे नरवीर नाशिक ते जिंजी पर्यन्तचा प्रान्त लढवत ठेवण्याचे नियोजन केले .सहयाद्रीच्या मदतीने मराठे एक एक किल्ला लढवत ठेवून मोगलांना चकमा देत होते .राजारामराजे पन्हाळ्याच्या वेढयात असतांना तो वेढा मोगलांनी अधिक कडक केला अशा परिस्थितीत सुद्धा २६ सप्टेंबर १६८९ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास राजाराम महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांसह पन्हाळगड सोडला.शत्रूला याची भनक सुद्धा लागली नाही .आग्रावरून सुटकेच्या वेळी जे तंत्र शिवरायांनी वापरले त्याच पध्दतीने राजाराम महाराजांनी अत्यंत शिताफीने आपल्या बुद्धीचार्तुर्याने हा प्रवास जिंजीपर्यन्त केला .येथून महाराजांचा जिंजीचा प्रवास सुरू झाला . या प्रवासावर केशव पंडितांनी एक छोटेखानी काव्याची रचना केली आहे. या प्रवासावर आणि स्वराज्याची दक्षिणेतील राजधानी अत्यंत चातुर्याने ,पराक्रमाने व मुत्सदी युद्ध नितीने राजारामराजेंनी टिकवून ठेवली यात तंजावरच्या मराठा साम्राज्याचीही त्यांना खूप मोठी मदत झाली .प्रवासात बेदनूरच्या राणी चन्नमा हिने राजधर्म पाळत मराठयांच्या राजाचे रक्षण केले . यामुळे रागाने राणीवर चालून आलेल्या सैन्यास संताजी घोरपडेनी हतबल करुन परत पाठवले.तुंगभद्रानदीतील  बेटावर राजारामराजे मुककामास असतांना अब्दुल्लाखानाच्या हल्यात महाराजांनी वेषपरावर्तन करून सुटका केली त्यावेळी राजवस्त्र परिधान करून मीच राजारामराजे आहे हे छातीठोक पणे सांगत आपल्या मराठयांच्या  राजासाठी आत्मबलिदान दिले .या अनामिक वीर मावळ्यांचे नाव इतिहासाला ज्ञात नाही.हा वीर म्हणजे स्वराज्याचा दुसरा शिवाजी काशिदच म्हणावे लागेल .हा  जिंजीचा प्रवास अत्यंत संक्षिप्त आहे यावर अधिक लिखान होणे आवश्यक आहे.त्यांनंतर जिंजी व त्या परिसरातील  छत्रपती राजारामराजे यांच्या पराक्रमाची गाथा घरा-घरात पोहचणेही तितकेच महत्वाचे !




स्वराज्याचे छत्रपती राजाराम महाराज यांनी ही स्वराज्याची राजधानी लढत ठेवली . मराठयांनी त्यांच्या नेतृत्वात औरंगजेबास हैरान करून सोडले ७ वर्ष मुघलांचा वेढा होता ,मुघल झुंजत राहीले पण गडावरची रसद संपली नाही. राजाराम महाराजांनी हा लढा सुरू ठेवला ही त्यांची युध्दनिती होती यावर आता अभ्यास होतांना दिसत आहे.हे शहाजीराजे आणि  शिवरायांचे दुरदृष्टीचे नियोजन होते . रायगड जर धोक्यात आला तर ही महाराजांची पर्यायी योजना शिवचरित्रातून दिसते हेच शिवतंत्र आहे .




आज छत्रपती राजाराम महाराजांची जयंती या निमित्ताने स्वराज्याचे तिसरे छत्रपती  यांना मानाचा मुजरा!








- संजय खांडवे




9011971122

जगतगुरू तुकोबाराय -जयंती विशेष

 जगतगुरू तुकोबाराय -जयंती विशेष




  




भक्ती चळवळीचा पाया महाराष्ट्रातच घातला गेला.भारतात ही चळवळ दक्षिणेकडून उत्तरेकडे कालांतराने सरकत गेली .पुंडलिकाची विठ्ठल भक्ती सर्वश्रृत आहे .अनेक अभ्यासकाच्या मते पुंडलिकाचा कालखंड काढता आला तर वारकरी पंथाचा उदय काळही समजेल .कृतयुगातील हरी,त्रेतायुगातील राम,द्वापरातील कृष्ण हे तिन्हीमिळून साकारलेल्या कलयुगीचा समचरणी विटेवरी उभा असलेला, सर्वाभूती समदृष्टी असलेला विठ्ठल हे वारकरी पंथाचे वैष्णवांचे एकमेव दैवत होय . संतशिरोमनी नामदेवांनी  पंढरीचे वर्णन करतांना म्हटले आहे




 "जेव्हा नव्हते चराचर |तेव्हा होते पढ़रपूर ॥








या पूर्वी विठ्ठल उपासना होत होती विठ्ठल संप्रदायही होता पण संघटीत पध्दतीने वारी करण्याची वारकरी परंपरा संत नामदेव,संत ज्ञानेश्वर यांच्या काळात सुरु झाली .पुढे संत एकनाथांच्या भारुड,किर्तनातून व संत तुकारामाच्या अंभगातून हा विठूरायांच्या वारकरी प्रबोधनाचा मेळा अखंड सुरू होता .संत बहीणाबाईच्या नुसार या वारकरी भक्ती परंपरेचा कळस  तुकारामांच्या रूपाने पूर्ण झाला . तुकारामांच्या गाथेतून भागवत धर्माचे सार सोप्या भाषेत जनमानसात पोहचले.जगण्याचे सार सांगणारी व जगण्याचं बळ देणारे तुकारामांचे जीवनही तेवढेच संकटमय होते .त्याच्या आयुष्यात त्यांनी असंख्य घाव सोसले ,आत्मकेद्री व चिंतनशील तुकारामांनी समाजाप्रती आपले आयुष्य वाहीले होते .स्वतःच्या संसाराबरोबर समाजाच्या संसारासाठीही तुकाराम महाराज जगले .बोल्होबा व कनकई यांच्या पोटी तुकारामांचा जन्म झाला .सावजी व कान्होबा हे त्यांचे बंधू .देहू परिसरातील एक प्रतिष्ठीत धनधान्य सपन्नता त्यांना लाभलेली होती.१३ वर्षाचे असतांनाच त्यांचे लग्न झाले  वडील लवकरच वारले पाठोपाठ आई सुद्धा त्यांना सोडून गेल्या . त्यावेळी तुकारामांचे वय १७ -१८ वर्षाचे होते .त्यांच्या पत्नी रखमाबाई  हया दम्याच्या आजाराने लवकरच गेल्या .त्यांचा मुलगा संताजी सुद्धा आजारपणातच गेला .त्याच वेळी त्यांचे मोठे बंधू सावजी यांच्या पत्नी सुद्धा गेल्या यामधे सावजी घर सोडून गेले .हा सर्व दुःखाचा डोंगर तुकारामांच्या सुरूवातीच्या आयुष्यातच त्यांच्यावर कोसळला.जगण्याचा मंत्र देणारे तुकाराम महाराज कधीही डगमगले नाही.आपल्या कुटुंबाची जबाबदारी त्यांनी अत्यंत निष्ठेने सांभाळली .त्यांच्या डोक्यात कधी नकारात्मक विचार आलाच नाही .त्याच काळात प्रचंड दुष्काळही पडला होता .तत्कालीन धार्मिक, सामाजिक,सांस्कृतिक व राजकिय समाजजीवनाचा अभ्यास तुकारामांना होता .बुडणाऱ्या समाजाला जर वाचवायचे असेल तर मला काहीतरी केले पाहिजे नव्हे तर करावेच लागेल ही भावना त्यांची होती .तुकारामांना अवघे  ४२ वर्षाचे आयुष्य लाभले .त्यांचे चरित्र हे सदैव प्रेरणादायी ठरते.धर्मशास्त्र,वेद,पुराने आदिची चिकित्सा करून मानवजातीच्या कल्याणार्थ आदर्श समाजरचनेचा पाया त्यांनी जगासमोर मांडला .त्यांच्या अभंग गाथेतून मानवी जीवनाशी निगडीत प्रत्येक मुद्दा साध्या व सोप्या भाषेत हातळला गेला.मानवी जीवनात सार्वकालिक मार्गदर्शक ठरणारे विचार या गाथेतून तुकारामांनी मांडले .संत तुकारामांचे अभंगशतक या पुस्तकातुन आईवडील,संत,संगत,हितासाठी उपदेश,शब्द,अनुभव,चमत्कार,संसार,शेती,प्रयत्न,आघात,सत्य,शुद्धता,नम्रता,क्षमा,शांती,प्रसिध्दी,किर्ती,मन,आनंद या विषयावर आधारीत त्यांचा गाथेतून निवडक १०० अभंगांचे विश्लेषण डॉ आ ह साळुके सरांनी त्यांच्या समपर्क भाषेतून केले आहे.शब्द हेच धन,शस्त्र तुकारामांनी तत्कालीन शोषण व्यवस्थेवर थेट पणे प्रहार केलेला दिसतो .तुकोबांनी मांडलेला एक एक शद्ब या स्वातंत्र्य युद्धातील एक एक शस्त्रच होते .व त्यांनी मांडलेला एक एक शद्ब म्हणजे समाजाच्या नव्या रचनेसाठी काळजीपूर्वक ठेवलेला एक एक वीटही होता असे डॉ आ ह साळुके सर मांडतात .त्यांचा प्रत्येक अभंग म्हणजे एक पुस्तकच म्हणावे लागेल .आज आमच्या सारख्या नव वाचकांना तुकारामांच्या अभंगाची गोडी डॉ आ ह साळुंखे सरासारख्या महाविद्वान विचारवंताच्या लेखनातून झाली .विद्रोही तुकाराम या माध्यमातूम तुकारामांचा विद्रोह कळाला.अलिकडच्या काळात विजय गवळी सरांच्या तुकास्त्रामधून अधिकच तुकाराम जवळचे वाटू लागले .गाथा परिवारातील उल्हास पाटिल सरांचे अभंगानुसार प्रत्येक अभंग कसा सार्वकालिक आहे आजही तो आधुनिक समाजव्यवस्थेत कसा लागू पडतो हे उल्हास पाटील सरांच्या विश्लेषणावरून लक्षात येते .या ना त्या कारणाने संत तुकाराम जवळचे वाटू लागतात त्यांचा संघर्ष आजही आपला संघर्ष वाटू लागतो .त्यांचा विद्रोह हा आजही आपला विद्रोह वाटून त्यांच्या विचारांचा अनुयायी बनण्याची प्रेरणा देत राहतो .सर्व जाती धर्माच्या माणसाला संतपदापर्यन्त नेवून पोहचविणारे ; अध्यात्मीक लोकशाहीचा पाया रचणाऱ्या व आपल्या संस्कृतीचे प्रातिके निर्माण करणाऱ्या वारकरी सप्रदायात तुकारामांची गाथा मैलाचा दगड ठरते .




        का जुळते ही नाळ तुकारामांशी ? का भिडतात त्यांचे शद्ब त्रीक्ष्ण हत्याराप्रमाणे ?का वाटत नाही भिड भाड प्रश्न विचारायची ?का गळून पडतो अहंकार ?




का आग्रह धरावासा वाटतो सत्याचा ?




का वाटू लागतात वृक्ष वेली आपली सगी सोयरी ? असे ना ना विध प्रश्न पुढे उभे राहतात प्रत्येक अभंग एक तरी प्रश्न पुढे उभा करतो व ते हयदयाला भिडतात .








  सिद्धीचा दास नव्हे श्रृतीचा आंकिला । होईल विठ्ठला सर्व तुझा ॥




कोणत्याही बाहय शक्तीच्या अधिन न जाता ,अंकित न होतां सर्वशक्तीमान अश्या विठ्ठलाचा पर्याय सामान्याला देतात .कोणत्याही पाप पुण्याचे भय विठोबा समोर त्यांना राहीले नव्हते. पूर्ण पणे विठ्ठला।ला स्वाधिन झाल्याने कशाचेही भय उरले नव्हते .सावळे रूप डोळ्यानी पहावे ,देच सहा शास्त्रे ,चार वेद व अठरा पुराने यांचे सार आहे.शास्त्राचे सार आणि वेदांची मूर्ती असलेला ईश्वर हा माझा प्राणसखा सांगाती आहे .म्हणून मला इतर कोणाची इच्छा नाही ,विठ्ठलाच्या ठिकाणी शुद्ध भाव ठेवणें हाच माझा धर्म व हीच अवघी निती होय . या वारकरी चळवळीत आपल्या कुटुंबाची सेवा व रक्षण करणे हे विठ्ठल उभारणीचे एक कारणच म्हणावे लागेल .समचरणी उभा असलेला विठ्ठल हे समतेचे तत्व आहे.एकादशी,कार्तिकी ,आषाढीला एकत्र येणे ही अध्यात्मीक लोकशाहीची बांधणीच आहे.समतेची भगवी पताका ही त्याचे प्रतिकच आहे.या सामाजिक व सास्कृतिक लढयात साक्षात देवांनाही प्रश्न विचारण्याचे सामर्थ्य निर्माण करुन ईश्वराच्या वर्तनालाही नैतीकतेची कसोटी लावली . त्याच परंपरेने वेदांनाही आव्हाण दिलेले आहे .








वेदांचा तो अर्थ आम्हाची ठावा । येरांनी वाहवा भार माथा ॥








या नंतर तुकारांमांना कोणत्या प्रसंगाना सामोरे जावे लागले तो वेगळा भाग आहे त्याचे विवेचन स्वतंत्र होऊ शकते .




      आता आम्हा भय बा कोणाचे ।




बळ विठोबाचे आले ऐसे ।।




  




 कुणाचेही भय न बाळगता सर्व सामान्याना  कोणत्याही आडकाठी न ठेवता सहज भेटणारा विठ्ठलाचे बळ त्यांच्यात निर्माण झाले .कोणत्याही मूर्तीपूजेचा आग्रह न धरता निर्गुण भक्तीचा मार्ग त्यांनी सांगितला.निर्गुण भक्ती  म्हणजे कुणीही केवळ गंध टिळा लावून नामस्मरण केले तरी तुम्हाला परमेंश्वर भेटू शकतो .कुणीही सान थोर न ठरता समतेची मांडणी करुन आपला व्यवसाय व कुटुंबाचे पालन निष्ठेने करत  ह्या भक्तीमार्गात दृढता निर्माण केली.








कासाया एकांत सेवू वाडा ।




आनंद जो जनामाचि असे ॥








मी जंगलात,वनामधे एकटा राहुण काय करणार आहे ?माझा खरा आनंद माझ्या कुटुंबात, माझ्या समाजात ,माझ्या लोकात राहून त्यांच्या साठी झिजण्यात आहे हा निर्गुण भक्तीचा आदर्श त्यांनी घालून दिला .








योग तप याचि नावे ।




गळीत न्हावे अभिमाने ।।








कोणत्याही प्रकारचे बडेजावपणा न करता योग आणि तप कशाला म्हणायचे तर अहंकार गळून पडतो तोच योग व तप आहे येवढया तोडक्या शद्वात अलौकिक वाटणाऱ्या संकल्पणा तुकारामांनी जन सामान्यात मांडल्या आणि त्या त्याच्या पर्यन्त अभंगाच्या रूपाने पोहचविल्या .हीच भावना सामान्याच्या हयदयात आजही भिडलेलीच आहे .या पवित्र मातीत अशी कुठली जागा नसेल ,त्या ठिकाणा पर्यन्त तुकारामांची  शब्दवाणी  पोहचली नसेल .चराचही  उत्साहाने आज त्यांचे अभंग व्यक्त होतांना जाणवतो .तुकारामांची गाथा बुडविणाऱ्या हातांनी आणि त्यामागच्या शक्तीनेही  कधी  गाथा बुडवत असतांनाही विचार केला नसेल ! आज या मातीत जगतगुरुच्या रूपाने संत तुकाराम वास करत आहे.




       जनमानसात ,घराघरापर्यन्त पोहचलेले अन मुखोतगत झालेले तुकाेबांचे अभंग हाच  परिवर्तनासाठी सर्वात सोपा मार्ग वाटतो,प्रत्येक घरात  जगतगुरू तुकाेबांची गाथा असणे अत्यंत आवश्यक वाटते,तुकोबांची शब्दरत्ने ही खूप महत्वाची मानवी मूल्ये ,नैतिकमूल्ये जपणारी आहेत ,अगदी जन्मापासून मृत्युपर्यन्त जीवनातील प्रत्येक पैलूवर अगदी निर्भिड भाष्य आढळते .




        आजच्या काळात माणूस परिर्वतन आपल्या सोईने स्वीकारतो व घोळ होतो,सुईच न घेता सोईच स्वीकारतो आधुनिकतेच्या गप्पा मारणारे आपण आपल्या मूळच्या आदर्शोंना विसरतो,वास्तवतेला विसरुन कल्पना विलासातील बाबी खऱ्या मानायला लागतो मग श्रद्धा-अंधश्रध्देचा घोळ होतो . मानवी स्वभावच असा आहे की तो अदभूत,विलक्षण,चमत्कारीकबाबीकडे वास्तविक गोष्टीपेक्षा अधिक आकर्षित होतो व त्याच्या कुतुहलाच्या कल्पनाविलासात गुंग होतो .तुकाेबांचा गाथेत वास्तविकता आहे ती समाजाभिमूख ,विज्ञानवादी मन मनाला भिडणारी आहे .




      जगतगुरू तुकोबांचे सपूर्ण चरित्र हे प्रेरणादायी आहे.आज जगतगुरू तुकाराम महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण आपल्या आदर्शाना जपू या ! विचारांच्या रूपाने जीवन सार्थकी करणाऱ्या तुकारामांच्या गाथा ह्या प्रत्येक कुंटुंबात पोहचवू या ! एक नवा संकल्पाने जगतगुरू तुकाराम महाराजांच्या जयंती सोहळा घराघरात या वर्षी पासून साजरा करू या !
















संजय खांडवे




9011971122

मराठा साम्राज्याची जननी -स्वराज्यप्रेरिका जिजामाता

 मराठा साम्राज्याची जननी -स्वराज्यप्रेरिका जिजामाता




🚩🚩🚩🚩🚩🚩




आपल्या महाराष्ट्राच्या या  शौर्य भूमीकडे शिवजन्मानंतर पुढची दिडशे वर्ष तरी वाकडी नजर करण्याची कुणाची मजल झाली नाही,ज्याने हा प्रयन्त केला त्याला याच मातीत दफन व्हावं लागलं हा या मातीचा इतिहास आहे .शेकडो वर्षानंतरही स्वातंत्र्याची ज्योत आपल्या हयदयात तेवत ठेवत रयतेच्या कल्याणार्थ यदु- भोसलेवंशीय या स्वांतंत्र्य संग्राम आपल्या परिने लढत होते.रयतेच्या कल्याणाची भावना व या भूमीविषयीचा आदर हा त्यांच्या चरित्रातुन वारंवार जाणवतो.तत्कालीन परिस्थितीनुसार आपली बुध्दीमत्ता,शौर्य,स्वाभिमान, त्याग,संघर्ष,पराक्रम या जोरावर दोन्ही वंशीयांनी आपले अस्तित्व दाखवत एक दरारा निर्माण केला होता .या विषयावर मातृतीर्थ बुलढाणा जिल्हयाचे इतिहासकार श्री संतोषराव बाहेकर सर यांनी जाधव_भोसले घराण्याचा सखोल अभ्यास करून राजे लखुजी जाधवरावा सह महाबली शहाजीराजे व राजमाता जिजाऊ यांचे चरित्र आपल्या अखंड परिश्रमातून जगासमोर आणण्याचे महान कार्य त्यांनी केले आहे.जाधव -भोसले वंशातील आजपर्यन्त ज्ञात नसलेल्या वीरांचा इतिहास सरांच्या लेखणातून आमच्यासारख्या वाचकांना कळाला या मातीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने आवर्जुन वाचावा.




       खऱ्या अर्थाने मराठा साम्राज्याची पाया भरणी या दोन वंशीयाच्या त्याग व संघर्षात दिसते .मनात स्वाभिमान जागृत ठेवत त्यांच्या नेतृत्वात याच मातीतील अनेक ज्ञात-अज्ञात नरवीरांनी आपले बलीदान दिले.




बाबाजीराजे भोसले यांच्या वंश बेलीत त्यांना मालोजीराजे व विठोजी राजे हे दोन पराक्रमी पुत्र होते.मालोजीराजे यांचा विवाह फलटणचे देशमुख जगपाळराव निंबाळकर यांची बहीण दिपाबाई यांच्याशी झाला .मि.किक्रेड व रा ब. पारसनीस शेडगावकरांच्या बखरीनुसार असे म्हणतात की ,लखुजीजाधवरावांच्या शिफारशीवरून जगपाळरावाने आपली बहीण दिपाबाई मालोजीराजास दिली होती .त्यांच्या पोटी शहाजी व शरीफजी या पराक्रमी वीरांचा जन्तम झाला .विठोजीराजे यांना सुध्दा कर्तबगार आठ पुत्र होती .




     जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज होते.हेमाद्रिकृत व्रतखंडातील राजप्रशस्ती मधील यादवांची वंशावळ इतिहासकार श्री एस ए बाहेकर सरांनी आपल्या आधिकच्या संशोधनातून मांडलेली आहे .




जाधव, आदय देवगिरी घराणे




रामदेव यादव 




शंकर देव (मृत्यु १३३२)




गोविंद देव(१३१२-१३८०)




 ठाकूरजी (१३८० -१४२९)




भुकण देव उर्फ भेतोजी (१४३०-१५००)




 अचलकर्ण उर्फ अचलोजी(१५००-१५४०)




विठ्ठल देव उर्फ विठोजी(१५४० -१५७०)




लक्ष्मण देव उर्फ लखुजी(१५७०-१६२९)




   सिंदखेडराजा ही जाधवांची  राजधानी या ठिकाणी त्यांनी भव्य वाडयाचे निर्माण केले .या परिसरात अनेक पेठा वसविल्या .निळकंठेश्वर ,रामेश्वर,केशवराज आदि मंदिराचा जिर्णोद्धारासह अनेक लोकउपयोगी कामे केली .रंगमहाल,नृत्यमहाल आदि वास्तूची निर्मिती केली,साहित्य ,कला,स्थापत्य यामधे त्यांना ज्ञानासह रुची होती हे यावरुन दिसते .एका स्वतंत्र राज्याची ही नांदीच होती . २४००० पायदळ ,१५००० घोडदळ व ५२ चावडयांचे वतन पुढच्या काळात लखुजी राजे जाधवांनी स्वकर्तुत्वावर उभे केले होते.   




राजे लखुजी व म्हाळसाबाई उर्फ गिरजाबाई यांच्या पोटी १२ जानेवारी १५९८ ला जिजाबाईचा जन्म झाला .




       भोसले -जाधव या दोन घराण्यामधील कर्तबगार वीरांनी त्या काळच्या सामाजिक,आर्थिक,राजकिय व वास्तव परिस्थितीचे भान ठेवत आपला स्वाभीमान राखत वाटचाल केलेली दिसतें.या सर्व बाबी जिजाबाईनी अगदी जवळून अनुभवलेल्या होत्या.




      महाबली शहाजीराजे व राजमाता जिजाबाई यांचा विवाह हा मध्ययुगीन इतिहासाला वळण देणारा ठरला.वेरुळचे भोसले व सिंदखेडचे जाधव हे दोन्ही तुल्यबळ मराठा घराणे होती .या विवाहाने दोन्ही कुटुंबात आनंद व उत्साह होता .प्रामुख्याने या विवाहसंमधी उत्तरकालिन लिखानामधे शहाजी -जिजाबाई यांच्या विवाहातून जाधव -भोसले वैराची कथानके सांगितली गेली .रंगपंचमीच्या दिवशी या दोघाचा विवाह बाबत दरबारात मालोजी राजेनी घोषणा केली होती व विवाह निश्चित केला पण याला जाधवाकडील स्त्रीयांनी लखुजीराजे सोबत ते आपल्या तोडीचे नाहीत असा वाद घातला व दुसऱ्या दिवशी लखुजी जाधवांनी आपण सहज बोललो असे मालोजीस सांगितले.पुढे मालोजीस व विठोजीस नोकरीवरून काढले व ते वेरुळला परत गेले .तेथे त्यांना गुप्त धन सापडले .त्यामधून त्यांनी  आपली फौज जमवली व सिंदखेडला येऊन विवाहाचा दावा केला .यापुढे त्यांनी निजामाचेही लक्ष वळवून विवाहासाठी दबाव आणला  व हा विवाह पार पडला पण या कथानकाला काही अर्थ उरत नाही हे लिखान उत्तर कालिन आहे.मालोजीराजे व दिपाबाई यांच्या विवाहासाठी राजे लखुजी जाधवांनी मध्यस्ती केली नसती.यावरून  त्यांचे नाते संबध त्यांच्या तोडीचे होते असे यावरून दिसते . समकालिन शिवभारतात अशी कोणतीच कथा नाही .परमानंद या विवाहाचे खूप सुंदर वर्णन करतो .शहाजीराजांना ऊतम लक्षणांनी युक्त,दयाशील,युद्धकुशल,महातेजस्वी असे म्हणतो व जिजामातेस विजयलक्षण ,कमलनेत्रा,कुळवान संबोधतो व यासाठी कुबेरासमान लखुजीजाधवांची अनुकुलता दर्शवितो .








सा तं महाशयं प्राप्य वपुरुज्वलम्।




गंगेव गुणगंभीरा व्यराजत महोदधिम् ।।




ज्याप्रमाणे शुभ्र खोल गंगा सागरास मिळाली असता शोभते त्याप्रमाणे तेजपुंज शरीर धारण करणारी गुणवती जिजाबाई गुण गंभीर थोर मनाच्या शहाजी पतींशी संयोग पावून शोभू लागली.हा समकालिन संदर्भ आहे .या  अनैतीहासिक विवाहा प्रसंगीच्या कथानकाचा संदर्भ पुढे खंडागळे हत्ती प्रकरणाशी जोडला जातो व त्यांच्या हाड वैराच्या कथा सांगितल्या जातात .वास्तविक हत्ती प्रकरण हे तात्कालिक प्रासंगिक होते. पुढे भातवडीच्या लढाईत लखुजीराजे यांच्या भमिकेवरून हे लक्षात येते .शिवभारतकारही याचा खुलासा करतो .श्री एस ए बाहेकर सरांनी आपल्या लिखानातून विश्वसनिय संदर्भ देवून याबाबत मांडणी केली आहे. भोसले जाधव असा कोणताही वाद नव्हता हे समकालिन संदर्भावरून दिसून येते.वास्तविक पाहता त्या काळात मराठा सरदारांचा वरचढपणा हा निजाम,आदिल व मोगलशाहीमधील सरदारांना खुपत असे .मलिक अंबरसारखे सरदार त्यांचा द्वेष करत.त्यांना महत्वाच्या मोहीमेंपासून दूर ठेवले जाई .त्याच्या पराक्रमाची दखलही त्या काळात त्यांच्या लेखनकारांनी घेतलेली दिसत नाही .या संघर्षामधून ही सर्व मंडळी जात होती .




राजे लखुजी यांचे वर्चस्व पाहून ,शहाजी राजे सारखी ही दोन शक्ती एकत्र येऊ नये म्हणून की काय ,खंडागळे हत्ती प्रकरण घडविण्यासाठी हवा दिलेली असू शकते यात शंकेला वाव मिळतो .२५ जुलै १६२९ म्हणजे देवगिरीवर निजामाच्या भेटीसाठी आलेले राजे लखुजी,पुत्र अचलोजी,नातू यशवंत तथा अमात्य अशी ४० जनांची अमानवी हत्या करण्यात आली .निजामाच्या डोक्यात त्याच्या वजीराने विष कालवून हा रक्तपात घडवून आणला होता.




      जिजाबाईच्या समोर हे सर्व प्रसंग घडत होते .रयतवत्सल जाधवरावांची ही लेक भोसले कुळाची लक्ष्मी आपला वारसा पुढे तेवत ठेवत स्वराज्याची प्रेरणादायी ठरली .अर्कज्ञ,सहस्रकरविक्रम महाबली शहाजीराजे यांची संकल्पणा त्यांचा त्याग,संघर्ष,पराक्रमातून स्वातंत्र्याची पहाट होण्यास सुरूवात झाली ." शहाजीराजे भोसले यांनी एक निजामपुत्र गादीवर बसवून ,त्यास एका किल्यात बंदीत ठेवून ,नाशिक,त्र्यबकेश्वर,संगमनेर,जुन्न२,ताब्यात घेऊन स्वातंत्र्याचा झेंडा उभारला होता .''असे बादशहानामा सांगतो.१६२९ ते १६३६ पर्यन्त त्यांनी हा कारभार पाहीला.




       जिजाऊमासाहैबांनी स्वराज्यासाठी दोन वीर पुत्राना जन्म दिला .या मधे थोरले पुत्र संभाजी व छत्रपती शिवाजी राजे . शिवनेरीवर १९ फेब्रु १६३० ला  हा शिवसुर्य उगवला .मातृ-पितृ तथा स्वकुलीन पूर्वजांच्या अथक संघर्षाचा ,पराक्रमाचा,त्यागाचा वारसा मातेच्या संस्कारातून सतत पाझरत होता .शिवाजी राजे वयाच्या सहा वर्षापर्यन्त महाराष्ट्रातच होते .शिवनेरी व काही काळ सिंदखेडराजा येथे माता जिजाऊंच्या संस्कारात ते वाढत होते .शिवरायांच्या जन्मानंतर शहाजीराजे यांच्या यशात अधिकाधिक भर पडत गेली .कर्नाटकात बंगलुरु येथे शिवरायांचे बालपण वयाच्या बाराव्या वर्षापर्यन्त गेले .सातव्या वर्षोच शिवबाना लिपिचे ज्ञान झाले .त्यांच्यासाठी शहाजी-जिजाऊंच्या तालमित निष्नात आचार्य नेमले गेले.राजकारण,युद्धकौशल्य या सारखी राजा होण्यासाठी लागणारे संस्कार जिजाऊ-शहाजीराजेंनी शिवबावर केले व वयाच्या १२ व्या वर्षो  शिवबा 'सनय ' होऊन महाराष्ट्रात आले असे समकालिन शिवभारत सांगतो .एका राजाला लागणाऱ्या सर्व बाबी ध्वज,राजमुद्रा,अमात्य तथा विश्वासु सेवक शहाजीराजे यांनी जिजाऊ-शिवबा यांना  पुण्याच्या जहागिरिवर पाठविले.दुसऱ्या बाजू।ला थोरले पुत्र संभाजीराजे  ,तुकाबाई व पुत्र व्यंकोजीराजे यांना सोबत दक्षिणेत ठेवले.ही खऱ्या अर्थाने जिजाऊ-शहाजीराजे यांच्या संकल्पनेतील व प्रेरणेतील "स्वराज्य " म्हणजेच पुढच्या काळातील "मराठा साम्राज्याची" पायाभरनीच होती .स्वराज्यजननीचा हा महान त्याग होतां पती- पुत्रा पासून दुर राहून बाल शिवबाला घडवत रयतेचे राज्य निर्मायचे होते . स्वराज्यासाठी दोन छत्रपती घडविणाऱ्या या मातेचा आदर्श पुढे येसूराणीसाहेब,ताराराणीसाहेब यांनी घेतलेला दिसतो ."श्री सखी राज्ञी जयती ।"  ही शिक्का कटयार घेत आपल्या पतीच्या पश्चात स्वराज्याची सूत्र सांभाळणारी संस्कृती आमची ,आणि त्या संस्कृतीचा वारसा त्यांना जिजाऊ मॉसाहेबाकडूनच मिळाला होता . एका छत्रपतींनी स्वराज्य उभं केल व दुसऱ्या छत्रपतींनी ते आपल्या खांदयावर शेवटच्या श्वासापर्यन्त तोलून धरलें.या पाठीमागे जिजाऊचेंच संस्कार होते .स्वराज्य स्थापनेपासून तर राज्यभिषेकापर्यन्त वेळोवेंळी मॉसाहेबांची प्रेरणा शिवरायासोबत होती. अफजल खानाच्या भेटी वेळी स्वराज्यासाठी पुत्र मोह बाजूला ठेवून छत्रपतींना विजयी आर्शिवाद देणारी राजमाता या मातीने बघीतली.....छत्रपती पन्हाळावेढयात असतांना प्रसंगी हातात तलवार घेऊन राजमाता सज्ज होतांना याच मातीने बघीतलं .......




जननी शिवराजस्य सा राजगिरी वर्धिनी।




महाराजांच्या आग्राभेटीच्या वेळी ते नजरकैदेत असतांना यशश्वीपणे स्वराज्य सांभाळण्याचं काम याच मातेने केले.....




एक लोककल्याणकारी छत्रपती  रायगडी सुवर्ण सिंहासनाधिश्वर होतांना याची देही आणि याची डोळा या मातेने बघीतले.....रायगडी छत्रपती सिहासनाधिश्वर होणे ही गोष्ट काही सामान्य नव्हती.हा शेकडो वर्षाच्या गुलामगिरीचा अंत होता ,ही एक सार्वभौमत्वाची नांदी होती नव्हे तर मध्ययुगीन इतिहासातील पहिला स्वातंत्र्य दिवसच होता .




      पुढच्या काळात या स्वराज्य रक्षणार्थ अनेक बलिदाने झाली याचे कारण एकच मॉसाहेब जिजाऊ व छत्रपती शिवरायांनी घालून दिलेला आदर्श,स्वाभिमान व अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची शिकवण हेच आहे .यातूनच पुढे " मराठासाम्राज्य " अटकेपार गेले.दिल्लीच्या तत्खाला हलविण्याची ताकद मराठयात निर्माण झाली .




शंभूछत्रपतींनी ९ वर्ष आपल्या खांद्यावर स्वराज्य तोलून ठेवले त्यांच्या बलिदानानंतर राजाराम महाराजांनी आपल्या हयातीत ११वर्ष औरंगजेबास झुलत ठेवले ,रायगडावरून प्रतापगड,सज्जनगड,सातारा,पन्हाळा असा प्रवास करत छत्रपती राजाराम महाराज मोगलांना शह देत होते ,येसूराणीसाहेबांनी शंभूराजानंतर राजारामाचे मंचकरोहन केले व या मराठयाच्या राजास पकडण्यासाठी ओरंगजेबाने आपले सैन्य जंग जंग पछाडले होते




     पन्हाळगडावर राजाराममहाराज असतांना मोठया शिताफिने आपल्या अनेक सरदारासह वेषांतर करून ते जिंजीकडे निघाले




संताजी ,धनाजी,बहिजी ,खंडो बल्लाळ व आपले गुप्तहैरासह मार्ग क्रमण करत होते 




वाटेत अनेक मावळे शहिद झाले यात एका बेटावर छावणी असताना मोगलीसरदारानी (अबदुल खान)अचानक छापा टाकला  मराठयांनी जोरदार शह दिला यात मराठयाचा राजा पकडला गेला म्हणून त्यांना आनंद झाला पण तो नकली निघाला ,शिवा काशिदांसारखे एका अनामिक मावळयाचे आत्मबलिदान स्वराज्यासाठी झाले पुढे पन्हाळगड ते वेल्लोर हे अंतर ३३ दिवसात कापले 




   शिवरायांनी जिंजीचा किल्ला अभेदय करून ठेवला होता स्वराज्याची पुढची राजधानी जिंजी ,मद्रासकडील समुद्र किनाऱ्यापासून तर नाशिक पर्यन्त ,सहयाद्रीच्या कान्या कोपऱ्यात राजारामांच्या नेतृत्वात स्वराज्यच भगवं निशान फडकत होत  या काळात बहिर्जी घोरपडे, मालोजी घोरपडे, संताजी जगताप, रूपाजी भोसले ,।बिदनूरच्या चन्नमा राणी,मानसिंग मोरे, प्रल्हाद, निराजी, कृष्णाजी अनंत, निळो मोरेश्वर, खंडो बल्लाळ, बाजी कदम इत्यादीनी मोलाची साथ दिली .महाराणी येसूबाई व छत्रपती शाहूनी २९ वर्ष स्वराज्यासाठी वनवास भोगला.संताजी घोरपडे,धनाजी जाधवासारखी नरव्याघ्र आपल्या पराक्रमाची शर्थ लावून लढत राहिली  .पुढची सात वर्ष महाराणी ताराराणी साहेबांनी मोघलांना सळो की पळो करुन सोडले .लाखाचा लवाजमा घेऊन येणारा इराणपासूनचा बादशहा याच मराठा साम्राज्यात हतबल होऊन संपला.




 "जिजाऊ -शहाजी राजेची प्रेरणा,शिवरांयांचे प्रजावात्सल्य म्हणजेच स्वराज्य ,आणि स्वराज्य म्हणजेच स्वातंत्र्य   पुढे ते साहित्यवीर,स्वराज्यरक्षक संभाजीराजे यांनी आपल्या खांद्यावर पेलले या स्वातंत्र्य युद्धात छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाईसाहेब सरकार,संताजी घोरपडे,धनाजी जाधव छत्रपती थोरले शाहूराजे ,द ग्रेट मराठा महादजी शिंदे पर्यन्त त्यांच्यासोबत सर्व जाती धर्माची मावळे या स्वांतत्र्यसमरात लढली.




अटकेपार भगवा झेंडा फडकविणारे हेच स्वराज्यजननी जिजामातेचे "मराठा साम्राज्य ".




















संजय खांडवे




9011971122

शनिवार, १३ जानेवारी, २०२४

जिजा माऊली गे तुला वंदना ही.

 🚩🚩🚩🚩🚩🚩

*जिजा माऊली गे तुला वंदना ही......*..

🚩🚩🚩🚩🚩🚩

इसवीसनाच्या शेकडो वर्षा पूर्वी पासूनच या भारतवर्षात सोन्याचा धूर निघत होता याचे पुरावे आजही या देशात आहेत .आर्थिक समृध्दता लाभलेला आपला देश सामाजिक दृष्टयासुद्धा एकसंघ होता .कला ,साहित्य,संस्कृती यामधेही पुढेच होता .सुरत बंदर मार्गे रोम ,युरोप आदी देशासोबत आपला मसाले,हस्तीदंत या सारखा व्यापर चालत असे .आजच्या भाषेत आपला GDP ग्रेड नुसार म्हटले तर A+होता  असे म्हणावे लागेल .

       आठव्या शतकात अरबचा सेनापती महम्मद बीन कासिम च्या रुपाने झाले .त्याने सिंधचा राजा दाहिर याचा पराभव केला .इ.स़ १० व्या शतकाच्या अखेरीस महम्मद गझनी आला .१२ व्या शतकात महम्मद घोरीने पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करुन दिल्ली जिंकली .पहील्या आक्रमणापासून ५०० वर्षा पर्यन्त लुटीचा मुख्य उद्देश ठेवत आक्रमणानी उत्तर भारत त्रस्त होता .पुढे या आक्रमणी सत्ता दिल्लीच्या सत्तेवर आल्या .देवगिरीच्या आतिक्षय समृध्द अश्या साम्राज्याचाही अस्त झाला .१४ व्या शतकात हया सत्ता पुढे दक्षिणेकडे सरकल्या .विजयनगरचे साम्राज्य लयास गेले व बहामणी साम्राज्य आले .या सर्वामधे अंर्तगत सत्ता संघर्ष सुरु झाला .उत्तरे कडे अकबर,जहागिर,शहाजहान,औरंगजेब यांचा अंतर्गत सत्ता संघर्ष सुरुच होता .दक्षिणेतही बहामणी साम्राज्याचे विघटन होऊन जसे बहामनी साम्राज्याच्या काळात देवगिरी म्हणजे आत्ताचा दौलताबाद वर त्या प्रांताचे सुभेदार त्यांनी नेमले होते ते स्वतंत्रपणे कारभार करून पुढे १४९८ च्या काळापर्यंत निजामशाहीत रूपांतरित झाले होते .अगदी तशाच वैयक्तिक महत्त्वाकांक्षे पोटी अदिलशाही,कुतुबशाही,बरीदशाही,इमादतशाही, याशाह्या अस्तित्वात येऊन संघर्ष करू लागल्या .गुलामगिरीच्या काळोखात रयत त्रस्त होत चालली होती पाचही शाह्या सत्ता पिपासून वृत्तीने आपसात भांडत होत्या . सुरूवातीला लुटीच्या उद्देशाने आलेल्या हया परकीय सत्ता येथे स्थिरावल्या व महसूली कर, जिझिया कर,सारा,खंडनी आदी माध्यमातून ह्या सत्ता शोषण करू लागल्या .जिंकून घेतलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावण्याची क्षमता त्यांच्याकडे नसल्याने ते स्थानिक सरदारांची मदत घेत असत त्यांना चाकरीत ठे वून या कामात त्यांना स्थानिक जमीनदार,जहागीर दार त्यांच्या पदरी आपल्या लष्करी सामर्थ्यनुसार मदत करुन त्यांच्या दरबारी राहून आपल्या पदरात पाडून घेण्यात धन्यता मानत असत .

          सामान्य रयतेचे मात्र यात शोषण होत असे . शेकडो वर्षाची गुलामगिरीची जळमटे एवढी साचली की त्याचे ओझे सोसण्यातच आयुष्य संपून जात असे . सामान्य रयतेला तर वारकरी, महानुभाव, नाथ आदि संतांच्या प्रबोधन परंपरा सोडल्या तर या मातीतल्या माणसांच्या मनामध्ये कुठल्याही स्वातंत्र्याची आस उरली असावी असे दिसत नव्हते .

          याच काळात देवगिरीच्या यादव साम्राज्याचे वारस या परकीय आक्रमणा मुळे देवगिरी पासून दूर राहून मनात स्वराज्याची ज्योत तेवत ठेवून होते .जदूराय म्हणजे राजे लखुजी जाधवराव .सिंदखेडराजा येथे आपली स्वतंत्रतेचीच तयारी त्यांनी सुरु केली होती .२४००० पायदळ,१५००० घोडतळ व ५२ चावडयाचे वतन सांभाळूत रयतवत्सल राजाच्या रूपाने हे जाधवराव घराणे शेकडोवर्षापासून हिरावून घेतलेल्या या मातीच्या मुक्तीसंग्रामासाठी झटत होत . आडगाव राजा ,मेहूणाराजा,देऊळगाव राजा ,किनगावराजा या सिंदखेडराजाच्या चार दिशेला असणाऱ्या गावांना(राजा) किल्ल्याचे स्वरूप देत त्या ठिकाणी आपले मजबूत असे गडकोट निर्माण करण्याचे काम सुरू करून त्या ठिकाणी आपल्या घरातील कर्तबगार जाधव रावांना नियुक्त करत त्या त्या दिशांची जणू जबाबदारीचं दिली असल्याचे जाणवते. युद्धाचा प्रसंग ज्यावेळेस नसे त्यावेळेस ही जाधव राव मंडळी रयतेत रममान होत असे.        सिंदखेड राजा परिसरात त्यांनी अनेक लोक उपयोगी कामे केलेली दिसून येतात . याच जाधवराव कुलवंशीयांच्या समकालात महाराष्ट्रात भोसले वंशीयांची  मूळवस्ती झाली .मालोजी राजे या भोसले कुलवंशातील कर्तबगार पुरुष होते पुढे इंदापूरच्या लढाईमध्ये त्यांना वीर मरण आले त्यांच्या पत्नी दीपाबाई उर्फ उमाबाई या सती जाण्यासाठी निघाल्या त्यावेळेस विठूजींनी दीपाबाईंचे सांत्वन करून मुले लहान आहेत हे सांगून त्यांना सती जाण्यापासून परावृत्त केले होते. शहाजी व शरीफजी याच विठोजींच्या तालमीत तयार होऊन पुढे सिद्ध झाले होते. याच काळात म्हाळसाई आणि राजे लखुजी यांच्या पोटी स्वराज्याच्या जननी राजमाता जिजाऊ यांनी जन्म घेतला. जाधवांच्या पदरी असलेले बजरंग भाट यांचे एक कवन उपलब्ध आहे. त्यामध्ये ते म्हणतात,


 जगदंबे कृपेने झाली मुलगी म्हाळसाबाईला।

 तीच जिजामाता प्रसिद्ध सर्वांना।

 फसली सन १००७ पौष पौर्णिमा सूर्योदयाला।

 राणी म्हाळसा महालाला चौकाचे नैऋत्य कोणाला।

    12 जानेवारी 1598 रोजी स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांचा पौष पौर्णिमेला सूर्योदयासमयी सकाळी सहा वाजता, गुरुवारला जन्म झाला.


अगदी बालपणापासून हातात तलवार घेणाऱ्या व रयतेत रमणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना स्वातंत्र्याची प्रेरणा येथेच मिळाली. सत्य व न्यायासाठी स्वाभिमानाने लढणे त्यांना याच संस्कारात मिळाले. मुलगी झाली म्हणून हत्तीवरून साखर वाटणाऱ्या या लखुजी जाधवांना जिजाई चे व तिच्या स्वाभिमानाचे नवल वाटे. अर्कज्ञ,सहस्त्रकरविक्रम ,महाबली अश्या नानाविध बिरुदावली इतिहाला ज्या शहाजीराजे यांना लावाव्या लागल्या . त्या महापराक्रमी शहाजीराजे यांच्यासोबत जिजाऊंचा विवाह झाला. 


सा तं महाशयं प्राप्य विभ्रती व पुरुज्वलम ।

गंगेव गुणगंभीरा व्यराजत महोदधिम।।


ज्याप्रमाणे शुभ्र व खोल व गंगा सागरास मिळाली असता शोभते तशीच तेजपुंज शरीर धारण करणारी गुणवती जिजाबाई या गुणगंभीर शहाजीराजास संयोग पाहून शोभू लागत आहेत असे वर्णन शिव भारतकार दुसऱ्या अध्यायात करतो.

भोसले - जाधव या कुटुंबियांच्या बाबत बखरकारांनी ऐकिव माहितीवरून अनेक कल्पित कथा रचलेल्या दिसतात. जिजाऊ शहाजीराजे यांच्या विवाहापासून अशा कल्पित कथा रचल्या गेल्या .शिवरायांच्या समकालीन शिवभारतातही बखरकारांनी दिलेल्या कथा येत नाहीत. रंगपंचमीच्या कथा कल्पित असल्याचे अभिप्राय इतिहासाचार्य वा.सी. बेंद्रे देतात. त्याच पद्धतीने मातृतिर्थ बुलढाणा जिल्ह्यातील ज्येष्ठ इतिहासकार संतोष बाहेकर यांचे "सिंदखेडचे जाधव आणि त्यांचे मराठ्यांच्या इतिहासातील कार्य'" या संशोधनपर प्रबंधामध्ये त्यांनी भोसले- जाधवां च्या संबंधावर सविस्तरपणे संशोधन केल्याचे दिसते. दोन कुटुंबातील निर्माण झालेले वितुष्ठ हे खंडागळे हत्ती प्रकरणातून झाले व त्याचे कारण तात्कालिक होते. निजाम पुत्र आपल्या मांडीवर बसून स्वतः सिंहासनावर आरूढ होऊन त्यांनी स्वतंत्र राज्यकारभार चालविला नाशिक, त्रंबक ,संगमनेर ,जुन्नर कोकण ताब्यात घेऊन स्वातंत्र्याचा झेंडा उभारला होता असे बादशहानामा स्पष्टपणे नोंदवतो. शिवनेरी सह अन्य गड ताब्यात घेऊन गोदावरी ,प्रवरा, नीरा, भीमा आदी नद्या काठचा प्रदेश क्रमाक्रमाने पादाक्रांत करून सह्याद्री सुद्धा ताब्यात आणला होता. दिल्ली येथील मुघल बादशहा याने शहाजीराजे यांचे महत्व जाणून आदिलशहा सोबत करार केला व शहाजीराजे यांची रवानगी कर्नाटक प्रांतात केली.

      या  या अगोदरच्या  काळात निजामशहाच्या एका मंत्र्याने त्याचे कान भरून राजे लखुजी यांच्या विरुद्ध द्वेष निर्माण करून लखुजीराजे स्वतंत्र राज्य निर्माण करू पाहत आहे या भीतीने जाधवराव घराण्यातील राजे लखुजीरावसह त्यांचे भावंड, अमात्य आदी 40 जणांचा दौलताबाद येथे 25 जुलै 1629 रोजी निर्दयपणे रक्तपात केला गेला. प्रत्यक्ष शिवभारतात नोंद आहे की ज्यावेळी जाधव रावांचा अंत झाला त्यावेळी मेरू पर्वत जणू पडला , सूर्य जसा खाली पडला, वरुणाचा जसा दाह झाला तसा जाधरावाचा अंत अत्यंत अहितकारक झाला अशी नोंद आहे .

 स्वातंत्र्याची ज्योत या या दोन्ही घराण्यात सदैव तेवत होती . एखाद्या प्रवाहासोबत वाहत जाणे त्यांना कधी जमलेच नाही.

    या सर्व घटना आई जिजाऊंनी अगदी जवळून पाहिल्या होत्या . या दोन्ही कुळांचे संस्कार जिजाऊ वर होते . आपल्या डोळ्यासमोर वडील, भाऊ, दिर यांच्या चिता जळताना त्यांनी बघितल्या होत्या. याच धामधुमीच्या काळात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय ,आई जिजाऊंच्या गर्भामध्येच संघर्षाचा काळ अनुभवत होते. हत्तीवर, गडावर, वाघावर आरोहण करावे. शुभ्रछत्राखाली सुवर्ण सिंहासनावर स्थिर बसावे. झेंडा उंच उभारावा व फडकवावा. धनुष्यबाण, भाला चिलखत, तलवार धारण करून लढाया कराव्यात व विजयश्री मिळवावी धर्मस्थापना करावी असे डोहाळे पडणे म्हणजेच  एत्तदेशीयांचे हिंदवी स्वराज्य उभे राहण्याचे संकेतच होते. शिव जन्मानंतर आई जिजाऊ आणि शहाजीराजे यांनी बाल शिवबांना काही काळ महाराष्ट्रात आणि जवळपास बारा वर्षाचे होईपर्यंत कर्नाटकामध्ये छत्रपती होण्यासाठी जे काही संस्कार लागतात ते सर्व संस्कार बाल शिवबांवर केले म्हणजेच त्यांना "सनय" होऊन पुण्य नगरीत म्हणजेच पुणे येथे तत्कालीन राजकीय परिस्थिती नुसार जिजाऊ सह पाठविले. बेचिराख झालेले पुणे पुन्हा वसविले. लाल महाल बांधण्यात आला आणि हा लाल महाल स्वराज्याच्या स्थापनेचे क्रांतीकेंद्र ठरला. या गुलामीत खितपत पडलेल्या समाजाला तारण्यासाठी जिजाऊंनी आपले संपूर्ण आयुष्य वाहून दिले.आईजिजाऊ साहेबांचे स्वराज्याचे स्वप्न व शहाजीराजे यांची संकल्पना प्रत्यक्षात उतरण्यासाठी बऱ्याच गोष्टीचा त्याग करत योग्य नियोजनासह त्यांनी सत्यात उतरविले .ही गोष्ट काही सामान्य नव्हती .गुलामीची जाणिव करून देत ,प्रत्येकाच्या मनात स्वाभिमान निर्माण केला .अन्याय ,अत्याचार,असत्य या विरोधात शेकडो वर्षाची मनावरील जळमटे काढून लढायला शिकवले. स्वराज्यासाठी दोन महान छत्रपती घडविले. या सोबतच लखुजीराजे यांच्या निधनानंतर त्यांनी आई म्हाळसाबाई व अचलोजी यांची विधवा पत्नी तथा त्यांचा पुत्र सृजनसिंह उर्फ संताजी याला आपल्यासोबत  ठेवले.  संताजी वर देखील आई जिजाऊंची खूप मोठी माया होती. संभाजी राजे सोबत संताजी उर्फ सृजनसिंह हे अगदी सावलीप्रमाणे त्यांच्यासोबत असायचे संताजी हा संभाजी राजे सोबत एका युद्धात मारले गेले. त्यानंतर संताजींची बायका मुलं आई जिजाऊ यांच्या सोबत होती याच संताजींचा मुलगा शंभू सिंह उर्फ संभाजी जाधव हा छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जीवाला जीव देऊन स्वराज्यासाठी लढत होता. अफजलखानाच्या प्रसंगी संभाजी जाधव यांनी शिवरायांच्या अंगरक्षकाची जबाबदारी पार पडली होती. 13 जुलै 1660 रोजी  पावनखिंडीच्या लढाईत महाराजांच्या रक्षणार्थ संभाजी उर्फ शंभू सिंह जाधव हे सिद्धी जौहरचा जावई सिद्धी मसुद यांच्यासोबत लढत असताना धारातीर्थी पडले होते. या शंभूसिंहासही घडविण्यात आई जिजाऊंचा महत्त्वाचे योगदान होतं. एवढं जाधव भोसले कुळाचं नातं आई जिजाऊ जपत होत्या. पुढील काळात धनाजी जाधव यांचे सुद्धा स्वराज्यकार्यात मोठे योगदान राहिले. संकट समई प्रसंगी हातात तलवार घेऊन त्या लढण्यासही सज्ज झाल्या.

या लोककल्याणकारी ,रयतेच्या राज्यासाठी त्या काळच्या व्यवस्थेविरुध्द रयतेची एकजूट करुन त्यांच्या मन,मस्तक अन मनगटाला बळ दिले.

          माता,मातृभूमी व माणसे हे तीन मकार लोककल्याणकारी राज्याची स्थापना करून मना मनात रुजविले . दुर्ग दुर्गेश्वर रायगडी पुत्र शिवरायांना सिंहासनाधीश्वर पाहून राजमाता धन्यता पावली.

स्वराज्यजननी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम.

➖➖➖➖➖➖

संजय खांडवे

बुलढाणा,९०११९७११२२

गुरुवार, ११ जानेवारी, २०२४

जिजाईस वंदितांना

 *जिजाईस वंदितांना....*


मातृशक्तीची ताकद किती प्रचंड असते हे जिजाऊंच्या रूपाने संपूर्ण जगाने बघितले. एका कर्तृत्ववान स्त्रीने जर ठरवले तर ती असाध्याचे साध्य करू शकते.  स्त्रीशक्ती मधील प्रचंड आत्मविश्वास, जिद्द ,स्वाभिमान जागृत झाल्यावर युग परिवर्तनाचे सामर्थ्य त्या शक्तीमध्ये निर्माण होते मुळात जगातील प्रत्येक संस्कृतीच्या मुळाशी स्त्रीच असते हे अभ्यासांती सिद्ध झाले आहे .विश्ववंदनीय ठरलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेल्या एत्तद्देशियांच्या हिंदवी स्वराज्याची खरी प्रेरणा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ठरते हे वैश्विक सत्य आहे, त्याला कुणीही नाकारू शकत नाही.

      मराठ्यांनी इतिहास घडविला, लिहिला मात्र नाही! मराठा आपल्या आणि आपल्या मातीचा इतिहास कधी विसरले नाही म्हणून पराक्रमांचा इतिहास घडविणे शक्य झाले. भोसले -जाधव वंशियांमध्ये प्रखरतेने जाणवते .महाराष्ट्रात इतरही घराणे होते, पण प्रश्न तोच येतो इतिहास लिहिण्याचा !अनेक पराक्रम घडले पण लेखणी आपली नव्हती, मुघलांच्या दरबारी ही व्यवस्था पूर्वापार चालत आलेली होती. तीच आदिलशाहीत होती, तीच निजामशाहीत होती. त्यांनी केलेला पराक्रम ते लिहून ठेवत परंतु मराठ्यांच्या बाबतीमध्ये हे शक्य नव्हतं. मराठ्यांचं खाणं, पिणं अन झोपणंही घोड्यावरचच! सर्व काळ धामधुमीचाच! इतिहासाच्या पानापानात हे आपल्याला जाणवते. शहाजीराजे कुठे! तर कर्नाटकात!! राजमाता जिजाऊ शिवबासह लोककल्याणकारी राज्याची घडी बसवण्यासाठी कुठं, तर पुण्यात! सुखाचे जीवन जगू शकत होते, पण रयतेच्या कल्याणाचा ध्यास घेतलेल्या महामानवांना कुठलं सुख! त्यांचं सुख म्हणजे रयतेचे पालन हेच होते. वडील लखुजीराजे जाधवांची हीच परिस्थिती, दौलताबादी असतांना निजामशाहीच्या कपट-कारस्थानात बेसावध असतांना 40 आप्त-स्वकीय व अमात्यासह रक्ताच्या थारोळ्यात पडले, कारण एकच राजकीय स्वातंत्र्याची मशाल पेटवत स्वाभिमानाच्या लख्खप्रकाशाकडे घेऊन जाणारा या महापुरुषांचा प्रवास होता. शाह्या, पातशाहयांच्या दरबारी असलेल्या लेखनिकांनी जशी दखल मराठ्यांच्या पराक्रमाची घ्यायला हवी होती ती घेतलेली दिसत नाही. आपल्या बादशहाच्या हातचं राखून पराक्रमाची नोंद करणे हे पदरी असलेल्यांच काम! हे अनेक समकालीन नोंदी व पत्रव्यवहारावरून लक्षात येते, तेव्हाही वाघांच्या पराक्रमांच्या इतिहासाचे लेखन शिकारी करत होता.

      बखरकार आणि कथाकारांनीही बहुतेक कथानकातून तोच अन्याय केलेला दिसतो . इतिहासाचा शास्त्र म्हणून अभ्यास केल्यावर समकालीन असो वा उत्तरकालीन असो त्यामधील निरर्थक कल्पनेला कवडीचाही आधार सापडत नाही. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी सेतू माधव पगडी यांचे "शिवचरित्र- एक अभ्यास" हे पुस्तक प्रकाशित केले यामध्ये संपादित पहिल्या भाषणामध्ये ते म्हणतात म्हणतात "केवळ इतिहास वाचल्यानंतर तो इतिहास खरा आहे असे समजण्याची वृत्ती राहू नये, ते म्हणतात पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की हा इतिहास लेखक कोण आहे. हा कोणत्या वातावरणात वाढला आहे .याच्यावर कोणते संस्कार झाले आहेत. कोणत्या गोष्टीचा यांना आनंद वाटतो आणि कोणत्या गोष्टीचे याला दुःख होते. कोणत्या गोष्टी अनुल्लेखनाने तो टाळतो आणि कोणत्या आवर्जून लिहितो या गोष्टी आपण पहिल्यांदा लक्षात घेतल्या पाहिजेत". समकालीन शिवभारत, सभासद बखर पासून उत्तरकालीन मराठ्यांच्या इतिहासातील साधनांचा काही घटनांचा तर्कशुद्ध मांडणी करून उहापोह केलेला आहे .ते आपल्या विद्यार्थ्यांनाही सांगतात की "ना मूलं लिख्यते किंचित" आधार असल्याशिवाय लेखणी उचलणार नाही हे भारतीय परंपरेचे ब्रीद आहे. वाचताना कोणतीही गोष्ट प्रमाण मानू नका तुम्ही मुळाकडे जा Rational Thinking म्हणजे तर्कशुद्ध विचारसरणी तुम्ही शिका. इतिहासकार कृष्णराव केळुसकर, इतिहासाचार्य वा सी बेंद्रे, डॉ जयसिंगराव पवार, डॉ संतोष बाहेकर ,डॉ आ ह साळुंखे, कॉम्रेड शरद पाटील या महान व्यक्तींच्या साहित्यातून इतिहासाकडे बघण्याची एक नवीन दृष्टी निर्माण होते.

     राजमाता जिजाऊंच्या दैदीप्यमान इतिहासही अनंत काळापर्यंत काळाच्या पडद्याआडच होता. जिजाऊ जन्मापासून बखरकारांनी अनेक कल्पित कथांचे मनोरे उभे केले. समकालीन शिवभारत या परमानंद कृत संस्कृत काव्यग्रंथाचा अभ्यास करता त्या ग्रंथात मात्र या कथा, दंतकथा येत नाहीत. भोसले -जाधव घराण्यातील बरेच लिखाण हे ऐकिव माहितीवर झाले असेच दिसते या दोन्ही घराण्यात विवाह संबंधातून वितुष्ठतेला सुरुवात झाली असे बखरकार सांगतात ,पण इतिहासकार  डॉ संतोष बाहेकर यांनी लिहिलेल्या जिजाऊंच्या चरित्र ग्रंथात केलेले चिकित्सकपणे विवेचन बखरकारांच्या लेखणीस पुराव्यासह उत्तर देतात. रंगपंचमीची कथा देखील कल्पित असल्याचा अभिप्राय इतिहासाचार्य वा सी बेंद्रे देतात. शिवभारत कार शहाजींना उत्तम लक्षणांनी युक्त, दानशिल, दयाशील ,युद्ध कुशल व महातेजस्वी असल्याचे वर्णितो . जिजाऊंना विजय लक्षणा, कमलनेत्रा गुणवान, गुणगंभीर आणि कुलवान असलेली कुबेर पुत्री संबोधितो.

         जिजाऊ विवाहनंतर भोसले कुळात आल्यावर मोठे वैभव प्राप्त होण्यास सुरुवात झाली. जणू काही पृथ्वीची शोभा असलेली विनयशील जिजाईने या कुळात प्रवेश केला .सेवेत तत्पर असलेली कुलवान सून म्हणून त्यांनी जागा मिळवली .आपल्या पतीशी अत्यंत प्रिय बोलणारी , शीलाचे रक्षण करण्यास अत्यंत दक्ष असलेली ,विनयाची मूर्तीमंत देवता जिजाई होत्या. पतीव्रता स्त्रियांना आदर्श वर्तनाचा आदर्श पत्नी धर्माचा मार्ग दाखविणारी मार्गदर्शिका होत्या .दोन्ही कुलांना मान्य असलेली व आपल्या नातेवाईकांना आपला आदर्श आचरणातून वागण्या- बोलण्यातून आनंद देणारी ती एक आदर्श शाक्ती होती. पतीप्रमाणेच सदगुण, सतशील असलेल्या जिजाऊंचे परमानंद पहिल्या अध्यायात वर्णन करतो हे वर्णन फार महत्त्वाचे आहे. जिजाऊंच्या इतिहासातील अनेक पैलू शिवभारतातून स्पष्ट होतात.

     मराठा सेवा संघाने जिजाऊंचा सत्य इतिहास जगासमोर मांडण्याचे फार मोठे काम केले आहे .आज सिंदखेडराजा या जिजाऊ जन्मस्थळी लाखो लोक 12 जानेवारीला एकत्रित येतात आणि हा जागतिक स्तरावरील जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. अनेक वर्षापासून अपेक्षित असलेल्या जिजाऊ जन्मोत्सवास जागतिक मान्यता मिळाली. "जय जिजाऊ" या जय घोषाची भारतासह साता समुद्रा पार ख्याती गेली. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या प्रयत्नांनी शेकडो एकरवर हजारो कोटीची जिजाऊ सृष्टी आता साकारत आहे. दरवर्षी या महोत्सवात लाखो रुपयांची पुस्तकांची विक्री होते. विचारांची देवाण-घेवाण होते. इतिहासाचं चिकित्सक, विश्वासअर्ह साधनांचा वापर करून तर्कशुद्ध मांडणीतून आम्ही इतिहास लेखन व वाचन करायला शिकलो ते याच तालमीतून आज हा लेख त्यामुळेच लिहू शकलो.


" जय जिजाऊ जय शिवराय" .


♾️♾️♾️♾️♾️

संजय खांडवे

बुलढाणा

9011971222

रविवार, ७ जानेवारी, २०२४

सत्यशोधक येतोय

 *सत्यशोधक येतोय.......!!!*

➖➖➖➖➖➖      

राष्ट्रपिता महात्मा फुले यांचे कार्य एवढे मोठे  आहे की त्यांच्या कार्यावर कितीही साहित्य  निर्माण झाले तरी ते त्यांच्या कार्यापुढे कमीच म्हणावे लागेल. आज परिस्थिती अशी झाली आहे की वाचायला कुणाकडे वेळ नाही. सर्वांना आयते हवे आहे. चित्रपटे, नाटके, सिरीयल्स, वेब सिरीज एवढीच माध्यमे काय ती उरलीत की काय लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ! असे वाटायला लागले आहे. अन यातही सत्य असत्याचा मेळ बघावाच लागतो नाहीतर पुन्हा पूर्वीप्रमाणेच नाटके, कथा ,कादंबरी , चित्रपटातून विकृत मांडणी होत राहणार. पण आता ते शक्य नाही त्यानंतर अनेक इतिहासकारांनी आपले आयुष्य खर्ची घालून सत्यशोधनाचे काम केले आहे आणि आता त्या सुपीक भूमीत अनेक नवतरुण अभ्यासक त्यांचा प्रचार व  प्रसार करताना आजकाल दिसतात. मग  अनैतिहासिक बाबी महापुरुषांच्या चित्रपट, नाटकांमधून जोडण्याची हिंम्मत आता तरी मात्र कुणाची उरली नाही. मागच्या काळात डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्राचा चिकित्सकपणे अभ्यास करून छत्रपती संभाजी राजे हे छोट्या पडद्यावर मांडले. तळागाळात ते पोहोचल्याने चिरकाल लक्षात राहण्यासारखे आहे. बरीच आपली माणसे छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनाशी संबंधित घटनांची चर्चा करताना अमोल कोल्हे यांच्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजे या सिरीयल मध्ये दाखविलेल्या बाबीवर चर्चा करताना अन संदर्भ देतांना दिसून येत होती. नाटके आणि चित्रपटाच्या माध्यमातून सत्य मांडणी झाली तर ते प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून राहते.

      सामाजिक दायित्व समोर ठेवून महापुरुषांचे विचार जनमानसात पोहोचले पाहिजे याच उद्देशाने सत्यशोधक हा महात्मा फुले यांच्या जीवन चरित्रावर आधारित चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. महात्मा फुले यांच्या जीवनावर 1950- 52 मध्ये प्र .के. अत्रे दिग्दर्शित पहिला चित्रपट तयार झाला होता. या चित्रपटाच्या मुहूर्ताला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर , कर्मवीर भाऊराव पाटील, शाहीर अमर शेख स्वतः उपस्थित होते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या चित्रपटात स्वतः संत गाडगेबाबांनी अभिनय केला होता. पण हा चित्रपट पडद्यावर टिकू शकला नाही. जवळपास 70 वर्षानंतर निलेश जळमकर दिग्दर्शित, प्रवीण तायडे, सुनील शेळके ,आप्पा बारोटे, भीमराव पट्टेबहादूर ,विशाल वाहूर वाघ यांनी निर्मित केलेला सत्यशोधक चित्रपट हा  5 जानेवारीला म्हणजे वस्ताद लहुजी साळवे यांची पुतणी, मुक्ता साळवे यांच्या जयंतीला प्रदर्शित होतोय. 2016 मध्ये या चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात झाली प्रचंड अभ्यास व माहिती घेऊन या सर्व टीमने महात्मा फुले यांचा सत्य इतिहास या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाला प्रदर्शित होण्याअगोदरच दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहे. जर्मनीचा बेस्ट डायरेक्टर पुरस्कारही या चित्रपटाला मिळालेला आहे.

      सत्यशोधक हा चित्रपट सत्याच्या अगदी जवळ नेणारा ठरणार आहे यात शंकाच नाही. महात्मा फुले यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, त्यांनी निर्मिलेल्या चळवळीचा, सत्याच्या आग्रहाचा, समाजोध्दारार्थ निर्मिलेल्या साहित्याचा, परिवर्तनाच्या विचारांचा अन त्यांनी केलेल्या संघर्षाचा, त्यांच्या वरील झालेल्या आघातांचा हा चित्रपट त्या प्रसंगांना जीवंतपणा निर्माण करणारा असणार आहे.

      1855 ला तृतीय रत्न या नाटकातून शिक्षणाचे महत्त्व त्यांनी सांगितलं .अज्ञानातून अस्तित्व संपते आणि गुलामगिरी येथे हा संदेश त्यांनी या साहित्यातून दिला. सार्वजनिक सत्यधर्म यामधून संवादात्मक शैलीतून व प्रश्नोत्तराच्या माध्यमातून चिकित्सा करत प्रस्थापित व्यवस्थेवर प्रचंड घाव घातले. स्त्री- पुरुष समानतेचा मंत्र देऊन संपूर्ण देशभर मानव समूहाच्या जातपात विरहित समाज जागृतीचे कार्य केले. कृषीच्या आधुनिकीकरणाचा आग्रह धरत जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा आसूड लिहिला .आजही शेतकऱ्यांचा संघर्ष काळात या महात्म्याच्या आसुडाचा आवाज कानात कडाडतांना दिसतो. निश्चितच समता फिल्म्स निर्मित व अभिता फिल्म प्रस्तुत या चित्रपटात या महात्मा फुले यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचा समावेश असेल.

        छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करून त्यावर कुळवाडी भूषण हा पोवाडा रचून रायगडावरील महाराजांच्या समाधीचा शोध लावला. "श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय" हा ट्रेलर मधील शिवरायांचा जयघोष सर्व काही सांगून जातो. आदर्श पती कसा असावा व पत्नी धर्म काय असतो हे या चित्रपटाचे सार मानावे लागेल. सावित्रीबाईंची ज्योतिरावांना मिळालेली आयुष्यभराची साथ व या प्रस्थापित व्यवस्थेत विद्रोहाची भूमिका घेऊन समाजातील शूद्र अति शुद्रांसाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्याचा संघर्ष ,स्त्री शिक्षणासाठी घेतलेला ध्यास  थरार निर्माण करणारा असणार आहे. त्यातच वस्ताद लहुजी साळवे यांची भूमिका ही चित्रपटातील त्यांच्या संवादावरून लगेच लक्षात येते की हा सत्यशोधकाचा सत्य इतिहास प्रेक्षकांना संपूर्ण तीन तास खेळवून ठेवणारा असणार आहे. या माध्यमातून या संघर्षमय इतिहासाचं जागरण निश्चितच होणार आहे. चित्रपटाचे निर्माते सुनील शेळके यांनी हा चित्रपट "संस्काराची शाळा" आहे असे म्हटले आहे. मग विद्यार्थ्यांनी अवश्य बघावा असा हा चित्रपट आहे. ज्ञानाने स्वयंप्रकाशित असलेल्या ज्योतिबांनी अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी क्रांती केली ही क्रांती फुले वाहणारा प्रत्येक जन निश्चितच प्रेरित होणार आहे. शिक्षणाच्या तिसऱ्या डोळ्याचे महत्व जाणणार आहे .अविद्येने अज्ञानाच्या अंधारात चाचपडत बसलेल्यांची गुलामगिरी तोडणार आहे. शेतकऱ्यांच्या हातातील आसूड कडाडणार आहे. अशी खात्री या चित्रपटाच्या निमित्ताने वाटते. प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाने हा चित्रपट सहकुटुंब आपल्या मित्र परिवारासह बघावा असाच हा चित्रपट आहे. सत्याची कास धरणारा महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस ताकदीने या विचारामागे उभा राहणार आहे. निश्चितच या चित्रपटाच्या पडद्यापर्यंत खेड्यापाड्यातूनही माणसं येतीलच, या मातीशी प्रामाणिक राहून प्रत्येक सत्यशोधकी अनुयायाचे हे सामाजिक दायित्व आहे. आपल्या मातृतिर्थ बुलढाणा जिल्ह्याची  सत्यशोधकी चळवळीशी  जवळचे नाते आहे. 1882 साली याच विचारांनी प्रेरित होऊन "स्त्री- पुरुष तुलना" हा क्रांतीकारक ग्रंथरचना करणाऱ्या ताराबाई शिंदे यादेखील आपल्या बुलढाण्याच्याच! महात्मा फुले यांचे पहिले चरित्र लेखन करणारे सत्यशोधक पंढरीनाथ सिताराम पाटील  की ज्यांनी विदर्भात सत्यशोधकी चळवळ आपल्या खांद्यावर घेऊन शिक्षण क्षेत्रातही फार मोठी क्रांति केली ते देखील या मातृतिर्थ बुलढाणा जिल्ह्याचेच! त्यांच्यासोबतच पुढील काळात बुलढाणा जिल्ह्यात अनेक सत्यशोधकी विचारवंतांनी समाजासाठी आपला देह झिजवण्याचे  काम केले आहे .   चित्रपटाचे निर्माते बुलढाणा येथील अभिता फिल्म्स प्रोडक्शन लिमिटेड चे सुनिल शेळके हे सुद्धा आपले सामाजिक दायित्वाचे भान ठेवत महापुरुषांचे विचार पोहोचण्याचे काम करत आहे. या संपूर्ण टीमला हार्दिक शुभेच्छा.


➖➖➖➖➖♾️


संजय खांडवे, बुलढाणा

9011971122

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...