शनिवार, १० ऑक्टोबर, २०२०

होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी



 🚩🚩🚩🚩🚩🚩

स्वराज्याच्या आणाभाका घेत स्वराज्य वाढू लागले ,असंख्य किल्ले स्वराज्यात शिवरायांच्या बुद्धीचातुर्य,शौर्य,धाडस व किर्तीने येऊ लागले यासाठी स्वराज्याच्या आड येणाऱ्या स्वकियांचाही बंदोबस्त शिवरायांना करावा लागला .जावळीचा विजय हा त्यातलाच एक भाग होता .या विजयाने कोयने पासून लांब कोकणपर्यन्त स्वराज्य विस्तारले ,नव्हे दुप्पटच झाले .

     जावळी च्या दाट किर्र अश्या खोऱ्यात ,अरुंद वाटा,डोंगर दऱ्या हया जंगली श्वापदांचा वावर असलेली अशी होती .जावळी जनू वाघाची जाळीच !हयाच ठिकाणी शिवरायांच्या बुध्दीचार्तुयाचा एक भाग म्हणजे महाराजांचे पुर्वानुमान कौशल्य येथे दिसून येते .पुर्वानुमान म्हणजे पुढे काय होणार किंवा परिस्थिती कशी असणार हे आपल्या बुध्दीपटलावर घासून अनुमान काढणे होय.

       महाराजांनी याच ठिकाणचा भोरप्या डोंगर हेरला .त्याचा आकार, रचना ,दगड व पाणी याचा अभ्यास करून मोरोपंताना या ठिकाणी गड बांधण्याचा आदेश दिला .स्वराज्यातील स्थापत्यशास्त्र विशारद अर्जेाजी यादव यांनी हा अभेद्य असा प्रतापगड  १६५६ साली बांधून काढला .स्वराज्याचा भगवा ध्वज प्रतापगडावर डौलाने फडकू लागला .हाच प्रतापगड जेव्हा स्वराज्यावर अफजल खानाचे संकट आले तेव्हा स्वराज्य रक्षणासाठी सिद्ध झाला .रडतुडीच्या घाटातून खानाला बोलावून याच जावळीच्या भागात प्रतापगडाच्या साक्षीने त्याच्या चरणी अफजलखान रूपी स्वराज्यावरील संकट संपविले.हे आजही त्या खानाची कबर  गडावरून पाहतांना लक्षात येते.

    या मोहिमेंत महाराजांचे शौर्य तर दिसतेच त्याचबरोबर अलौकिक बुद्धीमत्तेचेही दर्शन घडते . शञूलाही चक्राउन सोडणारी युद्धाची व्यूहरचना त्याच सोबत विश्वासू जीवाला जीव देणारे शूर स्वराज्याचे मावळे .

         *"आम्ही तर जीवीत तृणप्राय समजून शत्रुच्या अंगावर चालून जात आहो.यात यश आले तर ठिकच आहे ;परंतु काही भलताच प्रकार घडला तर तुम्ही घाबरुन जाऊ नका .ठरविलेल्या बेताप्रमाने शत्रुवर चालून जाऊन त्याचा मोड करा व राज्याचे रक्षण करा .तुम्ही सर्व शूर व पराक्रमी आहा .आमची सगळी मदार तुमच्यावर आहे .तुमच्यासारखे इमानी  व विर्यशाली पुरुष सहाय्य आहैत म्हणून आम्हास यवनांची पर्वा वाटत नाही .या समयी सर्वाना आपआपल्या शौर्याची व पराक्रमाची पराकाष्टा करावी .तुमची अनुकुलता आहे म्हणून मला अफझुलखानाचा मुळीच हिशोब वाटत नाही .आजपर्यन्त केलेली कमाई  आपल्या सहकार्याचे व शौर्याचे फळ आहे .ती आपली कमाई कायम राखण्यास जिवाची पर्वा न करता ह्या कठीण प्रसंगी झटाल तर तुमची किर्ती अधिकच वाढेल ! हे असे वीर्योत्सहाचे उद्दीपन करणारे भाषण ऐकूण सर्व लोकांच्या अंगात स्फुरण आले. ते म्हणाले " आपण आम्हास जी जी आज्ञा कराल तदनुसार वागण्यात आम्ही यत्किंचितही कसूर करणार नाही .त्यासाठी आमचे प्राणही बळी पडले तरी त्याची आम्हाला क्षिती नाही .हे प्राण आपल्या चरणी एकवार  वाहिले आहेत .ते आता आमचे नव्हेत ते स्वामिकार्यी गत  झाले  तर ते आम्ही मोठे भूषण समजू ."*


    (कृष्णराव केळूसकर गुरुजी लिखित शिवचरीत्रातून )


सामाजिक स्वांतत्र्य साठी  प्रत्यक्ष हातात तलवार घेऊन आपल्या जीवाची पर्वा न करता मोहीमेत उतरणारे पहीले राजे म्हणजे शिवराय .

   या मोहीमेत महाराजांनी असंख्य बारकावे अवलंबविले ते आपण पुढे यथावकाश अभ्यासूच !

     आज वीर जीवाजी महाले यांची  जयंती  या निमित्ताने जीवाजी महाले यांच्या स्मृतीस प्रणाम करतो

शिवाजी महाराजांनी या मोहीमेंत अंगरक्षक म्हणून दहा मावळ्याना सोबत घेतले .प्रत्येकाला प्रत्येकाचे काम नेमुण दिले ,महाराजांच्या गुप्तहेर खात्यानुसार शञूचे अनेक बारकावे अभ्यासून त्याच्या तोडीस तोड व्यूहरचना  करणे हे ही महाराजांची युद्धनितीच होती .

🚩

*तथैव माहिलो जीवो विश्वजिच्च मुरुबक:।*

🚩

या आशयाचा श्लोक महाराजांच्या समकालिन असलेल्या "शिवभारत "या ग्रंथात २१व्या अध्यायात आला आहे . यात जे दहा अंगरक्षक आहेत त्यांची नावे आढळतात .

*संभाजी कावजी*

*जिवाजी महाले*

*काताजी इंगळे*

*कोंडाजी कंक*

*येसाजी कंक*

*कृष्णाजी गायकवाड* 

*सुरजी काटे*

*विसाजी मुंरंबक*

*इब्राहीम सिध्दी*

*संभाजी करवर*

अश्या *शिवराज रक्षक* दहा महावीरांनी  गर्जना करून,म्यानातून प्रचंड तलवारी उपसून पर्वतांनी जसे वाऱ्यास अडवावे तसे खानाच्या सैन्यास अडविले असा उल्लेख आढळतो .

ह्या दहा महावीराना आपआपल्या युद्ध व शस्त्र कौशल्यानुसार शञूकडील नेमुन दिलेल्या कामावर पापणीही लवता कामा नये ,जेने करून शञूस संधी मिळेल .

  जीवाजी महाले यांची सैय्यद बंडावर बारीक नजर होती .हवेतल्या हवेत मारा करण्यात तरबेज ,चाणक्ष,चपळ महावीर !

 खानाच्या पडल्याने शत्रूपक्षात प्रचंड गोंधळ निर्माण झाला ,ठरल्या प्रमाणे मावळे लढू लागले .चवताळून बंडा महाराजांवर वार करणा२ तोच जीवाजीने त्याचा हात हवेतच कलम केला . लाखाचा पोशिंदयाचं रक्षण झालं .

महाराजांचे प्राण वाचले .याच जीवाजीच्या पराक्रमाने  महाराजांचे पुढचे २१ वर्ष  स्वराज्यासाठी मिळाले .



" *होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी* " ही म्हण रूढ झाली .या महावीर योध्याची आज जयंती 

सर्व शिवप्रेमीना हार्दिक

शिवशुभेच्छा



*जय जिजाऊ*

🚩🚩🚩🚩🚩🚩


*संजय खांडवे*

बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

स्वराज्यातील दुर्गसंपदा भाग २



 



सकलशास्त्रकोविद छ्त्रपती संभाजी राजे भोसले यांनी बुधभूषण या ग्रंथांच्या द्वितिय अध्यायात दुर्ग निरूपण या भागात दुर्ग प्रकार सांगितले त्याची माहीती या भागात आपण घेऊ या .

        'दुर्ग 'या शब्दाचा मूळ अर्थच दुर्गम असलेला ,जाण्या येण्यास अत्यंत कठीण,अवघड असा हा दुर्ग असतों दुर्गाला किल्ला असेही म्हटले जाते या सर्व बाबींचे विवेचन संभाजीराजे दुर्गाविषयी देतात .तो कसा असावा ,गडाचा कुठला भाग कोठे असावा याचे शास्त्र शुद्ध विवेचन  छत्रपती युवराजांच्या शास्त्रानुसार आपण पुढील भागात पाहणार आहोतच .



धन्विदुर्गं महीदुर्ग नरदुर्ग तथैव च ।

वार्क्ष चैवाम्बुदुर्गं च गिरिदुर्ग तथैव च ॥


छत्रपती संभाजी राजे आपल्या बुधभूषण या ग्रंथात दुर्ग निरूपण या भागात दुर्गाचे सहा प्रकार सांगतात .

 १)नरदुर्ग

 २)वार्क्षदुर्ग

 ३)धन्विदुर्ग

 ४)अम्बु दुर्ग

 ५)महीदु र्ग

 ६)गिरि दु र्ग


असे सहा प्रकार शंभूराजे बुधभूषण या ग्रंथात द्वितिय अध्यायामध्ये सांगतात .


  नरदुर्ग 

हा दुर्ग म्हणजे माणसांनी वेढलेला ,शूरविरांची दुर्गम व्युहरचना केलेला,गूढ भूलभुलैय्या ,चक्रव्युव्हाप्रमाणे एकमार्गी लढवैय्यानी तटासह वेढलेला किल्ला तर्क चतुरंगसैन्याने तयार होतो


वार्क्षदुर्ग (वनदु र्ग )

घनदाट जंगलाचे सरक्षण असणारा दुर्ग ,वन ह्या दुर्गाचे सरक्षण करतो .हा गर्द झाडी मध्ये सशस्त्र सैन्याने सज्ज असा किल्ला असत्तो .


 धन्विदुर्ग

हा दुर्ग म्हणजे धर्नूधारींनी सुसज्ज असा असतो .हा अनेक प्रकारच्या प्रगट -अप्रगट योध्यानी व्युहरचना केलेला असतो.     


अब्दुर्ग (जलदुर्ग)

चारही बाजूने पाण्याने वेढलेला हा दुर्गप्रकार आहे .पाण्यामधील मजबूत खडक असलेल्या बेटावर हा दुर्ग उभारला जातो.शेकडो वर्षापासून अश्या दुर्गाची प्रचंड दगडापासून बनविलेली तटबंदी या दुर्गाचीं वादळ वाऱ्यात ,प्रचंड लाटातही सरक्षण करत असतात .पिण्याच्या गोड्या पाण्यासह लागणाऱ्या इतर सर्व सोयी गडावर आढळतात .जंजीरा ,विजयदुर्ग,खांदेरी,सिधुदुर्ग ही महाराष्ट्रातील जलदुर्ग होय .जंजीरा स्वराज्यात आणण्यासाठी संभाजीराजे यांनी त्याचा बाजूलाच पदम् दुर्गाची निर्मिती केली होती .


महीदुर्ग 

हा भूईकोट किल्याचा प्रकार आहे.खंदकांनी वेढलेला जमीनीवरील हा भूईकोट किल्ला असतो .बारा हात उंच बुरुज /तटबंदी त्यावर फिरण्यास प्रशस्त फांजी व तटबंदीवरील चर्या किल्ला अजिंक्य बनवतात .चाकण ,अहमदनगर ,सोलापूर येथील किल्ले भूईकोट प्रकारात येतात .

लाल किल्ला याच प्रकारात येतो .किल्याच्या चारही बाजूने खंदक खोदून त्यात सुसर मगरी सोडून त्याला अधिक दुर्गम केले जात असे .नळदुर्ग हा भूईकोट किल्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला आहे .


गिरिदुर्ग

या प्रकारात किल्याच्या चारही बाजूने पर्वत ,दरी,कातरकडा असतात .चारही बाजूने दुर्गसरक्षणार्थ तटबंदी व बुरुज असतात .

संभाजी राजे यांनी गिरिदुर्ग हा अत्यंत प्रशंसनिय मानला आहे .गिरिदूर्गाविषयी विवेचन करतांना स्वतंत्र श्लोक बुधभूषण मध्ये आला आहे.


सर्वेषामेव दुर्गाणां गिरिदुर्ग प्रशस्यते ।

दुर्ग च परिखोयेतं वप्राट्टालकसंयुतम ॥


या सहा दुर्गामध्ये गिरिदु र्ग हा प्रशंसनिय व प्रशस्त मानला जातो .दुर्ग हा वप्र आणि अट्टालक यांनी युक्त असावा .असे शंभूराजे म्हणतात .स्वराज्याचे तोरण तोरणागड हा गिरिदुर्ग जिकूनच बांधले गेले .स्वराज्याची पहीली राजधानी राजगड हा गिरिदुर्गच !

दुर्गदुर्गेश्वर राजधानी रायगड हा सुद्धा गिरिदूर्ग प्रकारातच येतो .स्वराज्यातील बहुतेक किल्ले हे गिरिदुर्ग प्रकारात येतात .

     असे सहा दुर्गप्रकाराचे विश्लेषण शंभूराजे यांनी केले आहे .महाराष्ट्राचे खरे वैभव या दुर्गातच आहे .हे शंभूनृपाने जाणले होते .

         या व्यतिरिक्त दुर्गाचे त्यांच्या वैशिष्टयावरून इतर प्रकार पडतात .

मृददुर्ग 

मातीपासून तयार केलेला किल्ला

अश्मदुर्ग

निव्वळ दगडापासून तयार केलेला किल्ला.

इष्टीकादुर्ग

विटा व चुन्यामध्ये बांधलेला किल्ला.

मरुदुर्ग

वाळवंटात बांधलेला किल्ला.

दारूदुर्ग व मेंढेकोट

वेळू व लाकडांनी बांधलेला किल्ला .

नृदुर्ग

हत्ती,घोडे,रथ,पायदळ असे चतुरंग सेनेचे सरक्षण असलेला किल्ला.

असे इतरही प्राचीन ग्रंथात दुर्गाविषयी नोंदी आहेत .पुढील भागात आपण शंभूराजानी दुर्गावरील प्रत्येक भागाचे महत्व व उपयोगीतेचे विवेचन केले आहे ते आपण पाहणार आहोच शिवाय गडाचे प्रत्येक भाग व त्याचे महत्व जाणून घेणार आहोत .



क्रमश:


सदर्भ

 १)बुधभूषण

२)दुर्ग शोध गड किल्याचा



संजय खांडवे



गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

प्रकांड पंडीत कृष्णराव अर्जुनराव केळूसकर गुरुजी

 


धर्मशास्त्र,अर्थशास्त्र,शिक्षणशास्त्र,समाजशास्त्र,तत्वज्ञान,इतिहास हया विषयावर आपल्या साहित्यातून विस्तृत स्वरूपात लिखान करनारे प्रकांड पंडीत ,बहुजनसमाजाचे वाड़मयमहर्षोंच ज्यांना म्हणता येईल असे कृष्णराव अर्जुन केळूसकर यांचा साहित्य विश्वातील कार्य पाहता नतमस्तक व्हावे असेच आहे .
        आज त्यांचा जन्मदिवस एक आठवण म्हणून का होईना वाचून जे काही लिहावसं वाटलं ते मांडतोय !
    गीताशास्त्राचे वास्तविक रहस्य सामान्य लोकांना उत्तम रितीने अवगत व्हावे ,गीतेतील प्रत्येक श्लोकाचा अन्वय व त्यातील प्रत्येक पदाचा अर्थ वाचकास कळावा या उद्देशाने त्यांनी सान्वय,सार्थ,सटीक गीतेवरील भाष्य केले आहे .८९० पानाचा हा श्लोकासह विधिध अंगानी टिपनी सह हा महाग्रंथ मांडला आहे .विदवानापासून विदयार्थापर्यन्त आवडेल अश्या ग्रंथाची रचना केली .
        संत तुकाराम,गौतमबुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज या युगपुरूषांचे चरित्र सर्वप्रथम मराठीतून लोकासमोर मांडले .
पुढे हेच गुरुजींचे बुद्धचरीत्र बाबासाहेंबांच्या जीवनातील प्रेरणादायी भाग ठरुन ऐतिहासिक क्रांती घडवून गेले .
१८९६ साली  पद्य स्वरुपातील तुकोबांचे र्चारत्र जगासमोर मांडले.
        तात्कालिन उपलब्ध इतिहास साधनांचा अभ्यास करून १९०६ साली छत्रपती शिवाजी महाराजांचे  विस्तृत स्वरूपात ,क्रमवांर घटनासह अभ्यासपूर्ण असे चरित्र लिहून काढले .
     या ग्रंथासाठी श्री छत्रपती शाहू महाराज सरकार ,श्रीमत महाराज बापूसाहेब कागलकर,श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड या ग्रंथासाठी उदार आश्रय दिला .इंदूरचे श्रीमंत तुकोजीराजे होळकर यांनी या शिवचरित्राच्या ४००० प्रति खरेदी करुन जगभरातील ग्रंथालयाला वाटप केल्या .शिवराय जगाच्या कान्याकोपऱ्यात पोहचविले .१९२० साली या ग्रंथाची दुसरी आवृती प्रकाशित झाली .
         या महान कार्याला मानाचा मुजरा !
   आपण नककीच हया दुर्मिळ,अभ्यासपूर्ण साहित्याचा लाभ घेऊन महान युगपुरूषांची चरित्र जाणून घ्यावी ही अपेक्षा .

जय जिजाऊ

संजय खांडवे

रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

आदयक्रांतीकारक राघोजी भांगेरे

जागतिक आदिवासी दिवस










आज जागतीक आदिवासी दिवस
विश्वाची निर्मिती कशी झाली ,माणूस कसा तयार झाला याबाबत असंख्य संशोधने आहेत ,संकल्पपणा आहेत पण या पृथ्वीवरील पहिला मानवी वंश विकसित होत समुहाने राहू लागला तो म्हणजे आदिवासी !
 मातृभूमीत आपल्या मातीशी एकनिष्ठ असलेला समाज !
महाराष्ट्रात उत्तर दक्षिण पसरलेल्या भव्यदिव्य अश्या सहयाद्रीमध्ये  पदभ्रमंती करत असतांना नगर जिल्हयातील अकोले तालुक्यात ,नेम राजुर परिसरात तीन दिवस भ्रमंती करतांना आदिवासी समाजातील क्रांतीकारी क्रांतीवीरांचा अपरिचित इतिहास प्रथमच स्थानिक व इतर संदर्भतून कळाला .पराक्रमी व वैभवशाली इतिहासापासून आपण अनभिज्ञ राहिलो याची जाणिव मात्र नककीच झाली .
    आदयक्रांतीवीर राघोजी भांगेरे यांची मातृभूमी म्हणजे हा परिसर ,कळसूबाई परिसरातील देवगाव हे त्यांचे जन्मगाव .
रमाबाई व रामजी यांच्या पोटी राघोजीचा जन्म झाला ,बालपणापासूनच विविध शस्त्र चालविण्यात त्यांना त्यांच्या वडीलांनी पारंगत केले होते .त्या परिसरातील डोंगरदऱ्या, गड कोट,कातरकडा,वाटा,पडवाटा ,गुफा आदि राघोजीनी बालपणीच पिंजून काढल्या होत्या .
    क्रांतीकारी विचारांची बीजे आपल्या मनात घेत ,स्वराज्याचा विचार म्हणजे स्वाभीमान बाळगणारा हा मावळा आपल्या मातृभूमी व माणसे यांच्या रक्षणार्थ सज्ज झाला होता .उंचपुरे पिळदार शरीर ,धारदार डोळे ,शञूला पाहूनच धडकी भरायला लावणारे होते ,नुसत्या नावाने थरकाप उडायचा असे व्यक्तीमत्व !
       "इंग्रजांचा येथे अधिकार नाही ,ही मावळी मायभूमी आहे आमची तिच्या रक्षणाची जबाबदारी आमची आहे " 
पारतंत्र्याच्या जोखंडाला उलटविणारा हा क्रांतीकारक होता . जीवाला जीव देणारे साथीदार म्हणजे घेवाजी आव्हाळ,बाळा ठाकूर,धर्मा मुंडा,राया ठाकर,शिवा न्हावी,जाणकु धौंडगा,अंतोबा लाटे ,खंडू साबा,देवाजी नाना अशी कितीतरी क्रांतीकारकांची नावे स्थानिक पटा पटा सांगत होती .
    रतनगडावर राघोजीने पहिले बंड केले .जुलमी सरकार व सावकाराविरोधात राघोजी व त्यांच्या साथीदारांनी पहीले बंड केले .राघोजी कुणावरही अन्याय होऊ नये या मताचा होता .स्त्रियाबद्दल त्याच्या मनात अत्यंत आदराची भावना होती .त्या परिसरात राघोजीचे शौर्य व कार्य दुमदमू लागले .

राघोजीने केला बंड
बागडीच्या पाण्यापाशी !

हे गाणे गुणगुणले जाते .बागडीची माची त्या परिसरात प्रसिद्ध आहे .उंच अश्या भव्य डोंगरावर हा सपाट भाग ,या ठीकाणी गुरे चरायला असतात .त्या ठिकानी असलेल्या गुहामध्ये राघोजी व त्यांच्या सहकार्याचे वास्तव्य होते .इंग्रजाना अश्या ठिकाणी पोहचणे फार कठिण ! ही जागा त्यांच्या वास्तव्यासाठी त्यांनी काही काळ निवडली .त्या माथ्यावर वर्षभर पिण्याचे पाणी त्या बागडीत असते .बागडी म्हणजे भांडे ,भाडयासारखा तो पाणी साठविण्याचा भाग  त्या माचीवर आहे .याच ठिकाणाहून त्यांनी इंग्रजाविरूद्ध,जुलमी सावकाराविरूद्ध  बंड पुकारले .
     त्यांचा तळकोकणातील प्रसंग,गौरीपुरी येथील इंग्रजांच्या छावणी वरील हल्ला ,नाशीक हवेली वरील आदी प्रसंग स्थानिक सांगतात .सामान्याच्या न्याय हककासाठीचे हे कार्य दिसून येते .
     त्यांचा बुधा नावाचा साथीदार इंग्रजांनी पकडले होते ,रघुजीचा पत्ता सांग त्यांना पकडून दया यासाठी पाच हजार देऊ केले .नाहीतर गोळया खा अशी धमकी दिली .जीवाचा जीवलग इंग्रजांना उंच टेकडी कडयावर घेऊन गेला व वरुन शेकडो फुट दरीत उडी मारून मृत्यु पत्कारला पण दगाबाजी केली नाही .या मातीला राघोजीची गरज आहे याचे भान या बुधाजीला होते .अशी माणसे तयार केली राघोजीने .
   सातऱ्याचे प्रतापसिहराजे भोसले यांनी राघोजीचे कार्य बघून त्यांना सातऱ्याला आमत्रित केले .त्यांना शस्त्र सैन्य आदीची मदतही केली होती त्यांचा आदर सत्कारही केला होता.
     १८४५ साली जुन्नर येथे इंग्रजाविरूद्ध  उठाव केला यात मुंबई प्रांतापासून इंग्रजांनी दखल घेत १०००० सैन्य तोफगोळयासह राघोजी व त्यांच्या सहकार्या विरोधात उभे केले .मैदानी भागात आल्याने त्यांचे असंख्य साथीदार मातीसाठी कामी आले .हतबल होऊन राघोजीनी त्या ठिकाणाहून आपली सुटका केली .पुढे गोसाव्याच्या वेषात भूमीगत राहून आपले कार्य सुरू ठेवले .इंग्रज त्यांच्या मागावर सुरुच होते .त्या भागातील अनेक गडाच्या पायऱ्या इंग्रजांनी ब्लास्टीग करून उडविल्याच्या खुणा आहेत .आजही अंनंद,मदन,कुलंग यासारख्या गडावर सामान्य माणूस सहज जाऊचं शकत नाही .
        ह्माच स्वातंत्र्यंच्या लढाईत ,भूमीगत असतांना इंग्रजांनी पढ़रपूर येथे राघोजीना कैद केले .एकतर्फि निर्णय देत त्यांना फाशी सुनवली .२ मे १८४८ ला आदयक्रांतीकारक राघोजी भांगेरे या मातीसाठी शहीद झाले .

आज ऑगष्ट् क्रांती दिवस ,भारतीय स्वातंत्र्य लढयाचे रनशींग फुकले गेले या लढयात कामी आलेल्या हुतात्माना नतमस्तक होण्याचा दिवस !
   तसाच जागतिक आदिवासी दिवसह आजचं !
आदयक्रांतीकारक राघोजी भांगेरे सारखे त्यांच्यासोबत लढणारे असंख्य आदिवासी बांधव या मातीच्या प्रेमापोटी आपला स्वाभिमान जपत अमर झाले ,त्यांच्या कार्यासही सलाम !

संजय खांडवे
बुलढाणा



शनिवार, ११ जुलै, २०२०

300 बादल मावळे,वीर बाजी प्रभू देशपांडे,शंभूसिंह जाधव,विठोजी काटे या शूर मावळयांनी साक्षात यमालाही रोखून धरले ते याच गजापूरच्या पावनखिंडीत

  हिंदवी परिवार महाराष्ट्र राज्य या परिवाराचा सदस्य म्हणून आदरनिय श्री शिवरत्न शेटये सर यांच्या मार्गदर्शनात

वर्षातून दोन मोहीम आम्हाला करायला मिळतात त्यापैकि पन्हाळगड ते पावनखिंड ही एक मोहीम होय .





शिवप्रतापभूमी मध्ये अफजली संकट गाडून संपूर्ण जगाला संदेश दिला की आमची माती अन माणसं याकडे वाकडी नजर केल्यास काय परिणाम होतो .या विजयानंतर महाराज दुसऱ्याच दिवशी मोहिमेंवर निघाले पुन्हा विजयी घोडदौड सुरु झाली एकाच महिन्यात महाराजांनी पन्हाळा स्वराज्यात घेऊन कोल्हापूर प्रांतावर आपला वचक बसवला .या भागात बरेच किल्ले बिनहरक़त मिळाले.मात्र रांगणा खेळणा छापे घालून घ्यावे लागले .खेळणा किल्ला घेण्यास बरेच प्रयास झाले म्हणून याचे नाव विशालगड पडले
.

             गडाचे बांधकाम अत्यंत प्राचीन आहे ११/१२ व्या शतकात हा रांगडा किल्ला बांधला गेला असावा .शिलहार राजा भोज याची ही राजधानी होती .पुढे यादव ,बहामनी,विजापूरकर,मराठे,मोगल यांचे अधिपत्य या गडावर होते .
         



याच सज्जाकुटीमध्ये शिवराय व शंभूराजाची भेट झाली होती.दोघा पिता पुत्राचे मायेचे नाते याच वास्तुने अनुभवले .इतिहासालाही ज्ञात नसेल अशी गुप्त खलबते रयतेच्या कल्याणार्थ झाली असतील तीच ही इमारत .याच ठिकाणी हिरडस मावळ प्रांतातील बांदल सरदार,बाजीप्रभू,फुलाजी प्रभू,शंभूसिह जाधव,गंगाधर पंत,विठोजी काटे ,शिवा काशिद या नरवीरासोबत मसलते ठरली ,तीच ही वास्तु .




महाराज राजदिंडी दरवाजामधून गडउतार झाले.याच वाटेतून त्या रात्री पावसात निवडक बांदल मावळे व सरदारासह आशाड शुद्ध पौर्णिमेंला दोन पालख्या निघाल्या.तरबेज भोयासह स्वराज्याचे छत्रपती व विर शिवा काशिंदांना आपल्या मजबूत खांद्यावर पेलून पुढे गुढगाभर चिखल ,नदया ,नाले पार करत ही स्वराज्यनिष्ठ मावळे निघाले होते .







               या बंदिस्त विहिरीचा वापर सैनिकांना पाणी पिण्यासाठी असे .शञूने यात विष कालवू      
                                        
नये  म्हणूण  बंदिस्त आहे तीच ही अंधा२ बावडी




अवघ्या दोन चार महिण्याअगोदरची भेट पण शिवरायांवर जिवापाड प्रेम करणारी मावळे याच मातीत जन्मले .स्वराज्यावरील अगाध विश्वास ,या मातीतील प्रत्येक मावळ्याचा स्वाभिमान जागृत करत प्रसंगी अन्यायाविरूध्द लढतांना प्राणही देण्यास धजंत नसे .
   "लाख शिवा काशिद गेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे "
ह्या प्रेरनेने वीर शिवा काशिदांनी आपला मृत्यु समोर दिसत असतांनाही स्मामीनिष्ठता जपत स्वराज्यासाठी आपले बलिदान दिले .
     सोंगातल्या शिवाजीचीही पाठ जिंवंतपणे सिध्दी पाहू शकला नाही तर खऱ्या शिवाजी महाराजांची तर दूरच ....

शिवाजी महाराज होऊन मरायलाही भाग्यच लांगतं .....

आज वीर शिवा काशिंदांचे बलिदान म्हणजे स्वराज्याचा एक खांबच आहे 

मातीसाठी कामी आलेल्या वीरांच्या चरणी हा देह सदैव नतमस्तक राहील



गडांवर कामासाठी  येणारे लोकासाठी हत्ती ,घोडे  बांधण्यासाठी  ही जागा असायाची


गडांवरील वीर शिवाजी काशीद यांचे  पुर्णाकृती स्मारक

 




 






  







कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर पन्हाळगड ते पावनखिंड या पायदळ मोहीमेत खंड.

    दरवर्षी हिंदवी परिवार ,महाराष्ट्राच्या वतीने जुलै महिन्यात पन्हाळगड ते पावनखिंड या पायदळ मोहीमेचे  आयोजन करण्यात येत असते.या मोहीमेत संपुर्ण महाराष्ट्रातून ८०० स्री पुरूष मावळे सामील होत असतात. मी गेल्या ५ वर्षापुर्वी बुलडाणा जिल्ह्यातून एकटाच या मोहीमेला जाण्यास सुरूवात केली आहे.मागच्या वर्षी संजय खांडवे सर आणि किशोर पवार सर हे माझ्यासोबत सामील झाले आहेत.कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर यावर्षी पन्हाळगड ते पावनखिंड मोहीम स्थगित केली आहे.
   मित्रांनो शिवरायांचा संपुर्ण इतिहास हा आव्हाने ,संकटे ,शत्रूशी लढाई,धावपळ अशा रोमांचकारी प्रसंगानी ओथंबून भरलेला आहे.यापैकी एखादा प्रसंग आपण अनुभवावा या हेतूने आम्ही या मोहीमेत सामील होत असतो.शिवरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळा ते पावनखिंड या मार्गाने पायदळ जावून आपणही त्या मार्गावर जीवनाचे काही क्षण खर्च करावे हा हेतू यामागे असतो.
   या वर्षी शरीराने जरी या मोहीमेला जाता आले नाही तरी घरबसल्या मनाने आणि विचाराने या मोहीमेचे स्मरण करून आम्ही ही मोहीम पुर्ण करणार आहोत.
   दरवर्षी ११,१२,१३ जुलै असे तीन दिवस ही मोहीम राबली जाते.१० जुलैला पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या नेबापूर गावजवळील शिवसृष्टीत आम्ही सगळे मावळे मुक्कामी जमा होतो.तेथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी तयार होऊन नेबापूर येथील वीर शिवा काशीद यांच्या समाधीजवळ सकाळी ८.३० वा.हजर होतो.तेथे हिंदवी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डाँ.शिवरत्न शेटे सरांचे वीर शिवा काशीद यांच्या बलीदानावर अंगावर शहारे आणणारे व्याख्यान होते.उपस्थित सर्व मावळे वीर शिवा काशिदच्या बलिदानाच्या इतिहाने प्रेरीत होऊन वीर शिवा काशिदच्या नावाचा जयजयकार करून समाधीवर नतमस्तक होतात.वीर शिवा काशिदच्या समाधिला अभिवादन करून पन्हाळा किल्याच्या पुर्व दिशेने आम्ही गड चढून वीर शिवा काशिदच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ येऊन त्यांना अभिवादन करतो व पुढे निघतो.
   गडाच्या मध्य भागावर आल्यावर वीर बाजीप्रभू देशपांडे  यांचा पुतळा लागतो त्या पुतळ्याजवळ आल्यावर पुतळ्याला सर्वजन अभिवादन करतात आणि तेथून पुढे गडाच्या पश्चिम दिशेकडे निघतो.
    गडाच्या पश्चिमेकडे आल्यावर गड उतरण्याच्या अगोदर पुसाटी बुरूजाजवळ सर्व मावळ्यांच्या हाताला ओळखपट्टी बांधली जाते जी पुर्ण मोहीम संपेपर्यंत हाताला बाधून ठेवावी लागते. तेथेच पुढील मोहीमेच्या सूचना दिल्या जातात.मोहीमेदरम्यान या सूचनांचे तंतोतंत पालन करावे  लागते.जो नियम मोडतो त्याला कायमस्वरूपी मोहीमेतून काढून टाकण्यात येते.यानंतर महाराज ज्या मार्गाने गड उतार झाले होते त्या पायदळ वाटेने आम्ही गड उतार होतो.
    गड उतार झाल्यावर तुरकवाडी हे गाव लागते तेथून थोडे पुढे गेल्यावर चढाई लागते.चढाई चढून गेल्यावर म्हाळुंगे हे गाव लागते.म्हाळुंगे गावातून थोडे पुढे चढून गेल्यावर मसाई पठार सुरू होते .हे पठार जवळपास १२ कि.मी.सलग आहे.पठाराच्या सुरूवातीला माथ्यावर आम्ही सर्व मावळे सोबत आणलेला जेवनाचा डब्बा खातो आणि पुढे निघतो.नंतर सतत चालल्यावर पठाराच्या मध्यभागी मसाई देवीचे  मंदिर आहे .तेथे थोडावेळ बसून परत पुढे चालायला लागतो.पठार संपल्यावर पठार उतरून खाली आल्यावर कुंभारवाडी हे गाव लागते.कुंभारवाडीतून पुढे गेल्यावर खोतवाडी हे आमच्या मुक्कामाचे ठिकाण असते.
    खोतवाडी हे छोट गाव आहे.त्यामुळे त्या दिवशी प्रत्येक घरी आमच्या ८०० मावळ्यांची राहण्याची सोय केलेली असते.भोजन व्यवस्था प्राथमिक शाळेत असते व सध्याकाळचे प्रबोधन पण तेथेच होते.अशा प्रकारे नेबापूर ते खोतवाडी असा २० कि.मी.पायदळ प्रवास करून खोतवाडीत मुक्काम करतो.
     दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व तयार होऊन शाळेत चहा व नास्त्यासाठी जमा होतो.चहा व नास्ता झाल्यावर तेथेच दुपारचा जेवनाचा डब्बा प्रत्येकाच्या सोबत दिला जातो.दुसऱ्या दिवशीचा प्रवास हा खडतर आणि रोमांचकारी आहे.सुर्यप्रकाश जमीनीवर पोहचत नाही अशी दाट झाडी ,स्वच्छ पाण्याचे खळखळणारे ओढे ,भातशेती फणसाची झाडे अशा निसर्गाच्या विविधतेने नटलेल्या मार्गावरून आमचा पायदळ प्रवास सुरू होतो.मार्गात मंडईवाडी ,धनगरवाडी,कळवेवाडी,रिंगेवाडी ,माळेवाडी,पाटेवाडी ,सुकामळा,म्हाळसवडे,मान धनगरवाडी आणि शेवटी पांढरेपाणी येथे मुक्कामाला पोहचतो.
  पांढरेपाणी येथे मुक्काम करून सकाळी ८.०० वा.नास्तापाणी करून ५ कि.मी .अंतरावर असलेल्या पावनखिंडीकडे प्रवास सुरू होतो.साधारपणे सकाळी १०.०० वा.सर्व मावळे पावनखिंडीत जमा होऊन पावनखिंडीत शहीद झालेल्या ४०० मावळ्यांच्या बालिदानाचा इतिहास डाँ.शिवरत्न शेटे यांच्या ओघवत्या आणि वीर रसाने भरलेल्या व्याख्यानाने मोहीमेची सांगता होते.४०० मावळ्याच्या बलीदानाचा इतिहास ऐकून सर्व मावळे त्या स्थळावर नतमस्तक होऊन त्या स्थळाची पावन माती आपल्या कपाळाला लावून जड अंतकरणाने पुढच्या वर्षी पुन्हा येण्याच्या इराद्याने आपल्या परतीच्या प्रवासाला निघतात.
   यावर्षी कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर पन्हाळगड ते पावनखिंड या पायदळ मोहीमेत खंड पडल्यामुळे सर्व मावळे अस्वस्थ झाले आहे.त्यामुळे ही महामारी लवकर संपून हिवाळी मोहीमेकडे सर्व आतुरतेने बघत आहेत.
*वीर शिवा काशिद ,बाजीप्रभू ,फुलाजीप्रभू देशपांडे ,हिरडस मावळचे बांदल बंधू आणि अनामिक ४०० मावळ्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!*

  धन्यवाद !
पी.जी.सवडदकर 
शिवकुंज ,शिवाजी नगर ,चिखली 
ता.चिखली जि.बुलडाणा
मो.नं.9822194166

बुधवार, २४ जून, २०२०

जालना स्वारी नंतर महाराजांनी या गडावर केले होते दिर्घकाळ वास्तव्य

पट्टगड /विश्रामगड



नाशिक -नगर सिमेलगत नगर जिल्हयातील अकोले तालुक्यात उत्तर दक्षिण दक्षिण पसरलेल्या सहयाद्रीच्या पर्वतरांगेत हा किल्ला येतो .संगमनेरवरुन जातांना अकोले-राजूर-वाकी-मानेरे-देवगाव -खिरवडी मार्गे या विश्रामगडावर जाता येते .दुसरा ठाणगाव मार्गे सिन्नरवरुनही जाता येते .याच परिसरात महाराष्ट्राचे एव्हरेस्ट कळसूबाई शिखरही आहे .दुर्गप्रेमीसाठी अत्यंत अवघड श्रेणीत येणारे गिरिदुर्ग अलंग,मदन,कुलंग याच डोंगर रांगेत येतात .हरिशचंद्रगड ,रतनगड,भंडारदरा धरण,सानंददरी याच परिसरात येतात .

 खिरवडी मार्गे गेल्यास अगदी पट्टया प्रमाणे पसरलेला हा दुर्ग नजरेस पडतो म्हणून याला पट्टागड असे जुने नाव आहे .गडाच्या अगदी पायथ्यापर्यन्त गाडी जाते व गडावर चढाई करतांना आत्ता कृत्रीम रस्ता तयार केला गेला आहे .त्र्यंबक दरवाज्याच्या बाजूने वनविभागाने एक कमान उभी केली आहे त्या ठिकाणी नाममात्र शुल्क आकारून नाव नोंदणी केली जाते .या ठिकाणी गडावर सापडलेल्या काही प्राचीन वस्तु जतन करून ठेवलेल्या दिसतात (तलवार,नाणी,दागिणे,खडे,आदि ) गडाची चढाई करतांना गडाची नकाशासह माहिती दर्शविणारे फलक लावलेले आहेत .भककम नैर्सगिक तटबंदी सोडता ज्या ठिकाणी गरज आहे अश्या ठिकाणी मजबुत तटबंदीचे अवशेष आढळतात .वाटेत या गडावर असंख्य गुहा कोरलेल्या अाहे,त्यात पाण्याचे टाके सुद्धा आहेत तसा ह्या गडाचे बांधकाम शेकडो वर्षापूर्वीचे {१२व्या -१३ व्या शतकातील}असावे असे दिसते .अलीकडच्या काळात ग्रामस्थानी पट्टादेवीचे मंदिर बाधलेले वाटेत दिसते गडावर पोहचताच अंबरखाना नजरेस पडतो याला राणीमहलही म्हणतात . एवढी एक इमारत गडावर बऱ्यापैकी दिसते यात आता आतमध्ये शिवचरित्रावरील असंख्य प्रसंग शिल्पामध्ये साकारलेले दिसतात .बाहेर शिवरायांचे सुंदर स्मारक आहे .बघताचक्षणी प्रत्येकजन नतमस्तक होतो येतांना वाटेत त्र्यंबक दरवाजाही लागतो .अंबरखान्याच्या मागच्या बाजूस उंचावर बालेकिल्ला असावा असे अवशेष् आहे .या किल्ल्याची उंची १३९२ मीटर आहे .

अंबरखाण्याच्या मागच्या बाजूने चालत गेले की दगडात कोरलेली पाण्याची भव्य टाकी दिसते हे पाणी आजही पिण्यासाठी वापरले जाते








‌समोर पठारावरून सोनटेकडीकडे जातांना पाण्याचे १२ टाके दिसतात शुद्ध पाण्याने भरलेले हे टाके आहेत यापैकी काही टाके लिक  असल्याने त्यात पाणी दिसत नाही .या टाक्यातील निघालेल्या दगडापासून गडाचे बांधकाम होत असे .सोनटेकडी वरुन टेहाळनी करतांना C अाकाराची कातरकडा दिसते . समोरच औंढा किल्ला दिसतो .या टेकडीवर जातांना काळजी घ्यावी लागते प्रचंड वेगाने वारे वाहतात व बाजूला खोल दरी आहे .सुरक्षा म्हणून लोखंडी कटघरे लावली आहे .पण काळजी घेणे महत्वाचे .




                     हा किल्ला बाराव्या शतकात बांधला गेला पण शिवचरीत्रात या किल्ल्याचे वेगळे महत्व आहे , १६७२ मध्ये मोगलाकडून हा किल्ला मोरोपंत पिगळे यांनी स्वराज्यात आणला होता .शिवरायांच्या १८३०६ दिवसाच्या आयुष्यात त्यांनी राजगडावरील काही दिवस सोडले तर इतर दिवस त्यांची रयतेच्या सुखासाठी सतत घोडदौड सुरु होती त्यांच्या आयुष्यात  थोडी देखील उसंत त्यांनी घेतलीच नाही .या किल्यावर मात्र शिवरायांनी १६७९ मध्ये १७ दिवस विश्रामासाठी वास्तव्य केले कारणही तसेच होते ,शिवरायांनी जालना शहरावर स्वारी केली व यास्वारीनंतर रायगडाकडे परतत असतांना रनमस्तखान त्यांचा पाठलाग करत आला होता.सोबत बर्हिजी नाईक होते त्यांना या भागाची बरीच माहीती होती.रनमस्तखानाला चुकवत ते महाराजांना सुरक्षीत पट्टगडावर घेऊन आले .महाराजांनी १७ दिवस या किल्ल्यावर आराम केला .जातांनी या किल्ल्याला विश्रामगड असे नाव दिले .शिवरायांच्या वास्तव्याने अन पदस्पर्शने पावन झालेला हा गड भ्रंमंती करत असतांना प्रत्येक शिवप्रेमीना या गडाचा काना अन कोपरा एक प्रेरणा देवून जातो .
     पेशव्यानी सुध्दा या गडाचा उपयोग थंड हवेचे ठिकाण म्हणून केला.अश्या या किल्ल्यास एकदा तरी भेट दयावी .





      संजय खांडवे
      9011971122

‌       


प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...