तळागड - दुर्गेश्वराचा पहारेकरी
ता. तळा जि. रायगड
पुणे वरून ताम्हणी घाट मार्गे १३० कि.मी , मुंबई गोवा महामार्गावरील इंदापूर पासून पश्चिमेस १६ कि.मी. ,उंची १००० फुट
प्राचीन काळापासून किल्ला हा सामान्य रयतेसाठी फार मोठा आधार असायचा स्वराज्यात तर रयतेचे आश्रयस्थान म्हणून किल्याची मुख्य भूमिका असायची . आप आपल्या कालखंडात राजे - महाराजे राज्याच्या सुरक्षतेसाठी मिलट्री बेस कॅम्प सारखे या किल्ल्याना महत्व देत असत . किल्ल्याचा एक बुरुज एक शताग्नी म्हणून काम करायचा म्हणजे १०० शत्रू सैन्याशी एकाच वेळी लढण्याची त्या एका बुरुजाची क्षमता असायची . मग किल्ल्याला जेवढे मजबुत बुरुज व तटबंदी तेवढेच त्याची शत्रुशी लढण्याची शक्ती मोठी असायची . गडावरील पाणी व्यवस्थापण ,धान्यसाठवण व दारूगोळाशस्त्रागारादि बाबी अधिक बळकट बनविण्याचे काम करायचे .
शिव भारतात एक श्लोक आहे .
न दुर्ग दुर्गमित्येव दुर्गम मन्यते जनाः ।
तस्य दुर्गमता सर्व यत्प्रभुस्तस्य दुर्गमः॥
प्रभुणां दुर्गमं दुर्ग प्रभू दुर्गेण दुर्गमः ।
अदुर्गमत्वा दुभयोर्विदवीपेन दुर्गमः॥
गड केवळ अवघड आहे म्हणून लोक त्याला दुर्गम मानत नाही . दुर्गाचा स्वामी दुर्गम असणे ही गडाची खरी दुर्गमता आहे . किल्ल्या मुळे राजा जिंकण्यास कठिण होतो व राजामुळे किल्ले अजिंक्य होतात . किल्ला आणि राजा याचा सहसंमंध परमानंद येथे विषद करतो . रामचंद्र पंत अमात्यांच्या आज्ञापत्रातही गड किल्याचे निकष सांगितले आहे.
कोकणात असलेला तळागड हा दुर्गदुर्गेश्वर रायगडाचा एक अभेदय पहारेकरी सारखा उभा आहे . इंदापूर पासून १६ कि मी असलेला हा किल्ला पुरंदरच्या तहात महाराजांनी १२ किल्ले जवळ ठेवतांना तळागड देखील स्वराज्यात ठेवला होता .मिर्झा राजे जयसिंगाच्या तपशिला प्रमाणे रायगडा सोबत इतर ११ किल्ल्यामधे तळागड होता . हा किल्ला चढाईस फारसा वेळ लागत नाही . तळे हे गाव या किल्ल्याच्या भोवती वसलेले आहे. या गावात अन परिसरात छोटी मोठी तळे आहेत ह्या तळ्यांचा अन गावाच्या नावाचा संमंध असावा . गावातूच अगदी मुख्य रस्त्यावरून गडाचे दर्शन होते . दोन्ही टोकाकडे निमुळता होत गेलेला लांब जहाजा सारखा हा किल्ला दिसतो . त्याच्या दिशेने गावातील सिमेन्ट रस्ता आपल्याला गडाच्या अगदी पायथ्याशी घेऊन जातो . गावातील गावदेव म्हसोबा देवता या ठिकाणी विराजमान आहे . येथून वळणा - वळणाचा रस्ता वरच्या दिशेने घेऊन जातो लाकडी चाकावर बसविलेली तोफ असलेल्या एका सपाट उंचवटयावर जातो . तटबंदीचे वलय येथूनच दिसायला सुरु होतात . कमीत कमी जागेत अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी तटबंदी वर दुहेरी तटबंदी बांधलेली दिसते . पुन्हा थोडे वर दगडी पायऱ्या ने चढत गेल्यावर एक पडझड झालेला प्रवेशद्वारा सारखा भाग दिसतो . याठीकाणी देखील एक तोफ बघायला मिळते . थोड़े पुढे चालत गेले की एक व्यक्ती चालत जाईल येवढ्या जागेत दगडात पायऱ्या कोरलेल्या आहेत . या पायऱ्याच्या अगदी खाली एक मार्ग दिसतो पण तो आता बंद आहे . त्या ठिकाणी एक चौकी सारखी गोलाकार दगडी इमारत होती आता केवळ चौथरा आहे . समोरच काताळाच्या उतारावर भुयारा सारखी . कोरलेली पाण्याची खांब टाके दिसून येतात . त्या वरच्या वाटेत उजव्या बाजूस काताळावर वीर हनुमानाची मुर्ती कोरली आहे बाजूलाच आनखी एक भुयारात कोरलेले पाण्याचे टाके आहे . या ठिकाणी हनुमान दरवाज्याचे अवशेष दिसून येतात .या दरवाज्यावर असलेले क्षरभशिल्प हनुमान मुर्ती जवळ ठेवलेले आहे . समोर चालत जातांना डाव्या बाजूला पाया मजबूत असलेली तटबंदी आहे व पुढील मोकळ्या जागेत तीन तोफा आहेत . वळण घेत पुढे वर चालत जातांना दगडी पायऱ्या आहेत डाव्या हाताला मजबुत तटबंदी आहे. वाटेत डाव्या बाजूस तटबंदीला अर्धवर्तुळाकार बुरुज आहे या ठिकाणी आता एक तोफ ठेवलेली आहे . आता आपण अगदी गडाच्या पठारावर पोहचतो या ठिकाणी देखील एक दरवाजा पूर्वी काळी होता चार स्तरावर तोफा अन चौकीची योजना या वाटेने तिहेरी तटबंदीच्या स्थापत्यात दिसून येते . गडाच्या या पठारावर फारशी मोकळी जागा नाही अनेक इमारतीचे अवशेष दिसून येतात पण किल्याच्या काताळावर तंतोतंत बांधलेली मजबूत तटबंदी अगदी आजही त्याच अवस्थेत आहे . गडाच्या पूर्वेस उजव्या बाजूला ध्वजस्तंभ दिसतो व या ठिकाणी वाडया सारखी इमारत असून त्यावर टेहाळणी बुरुज आहे . बुरुजावर जाण्यासाठी दोन्ही बाजूने पायऱ्या आहेत . या इमारती मधील जंग्या व खिडक्या मधून सर्वदूर नजर ठेवून मारा करता येतो . निमुळत्या जहाजासारख्या असणाऱ्या अगदी मध्यभागावर पाण्याची तीन टाकी कोरलेली आहे यावरून या किल्ल्याचे प्राचीनत्व सिद्ध होते . अगदी समोरच एक उध्वस्त वास्तु आहे तिला लक्ष्मी कोठी म्हणतात . बाजूलाच तरबंदी मध्ये शौचकुप आहे . त्याच्या समोर पुन्हा पाण्याची सात टाके कोरलेली आहेत . पाण्याच्या टाकी समुहा समोर छत नसलेले शिवमंदिर आहे गाभाऱ्यात शिवलिंग आकाराचे काताळात कोरले आहे आता त्या ठिकाणी नवीन शिवलिंग आहे . पुढं हा किल्ला अधिक निमुळता होत जातो व मजबुत अशी तटबंदी दिसून येते . समोरच अगदी टोकावर एक बुरुज आहे . वर चढण्यास काही पायऱ्या आहेत बुरुजाची स्थिती चांगली असून चऱ्या व जंग्या दिसून येतात हे या गडाचे अगदी शेवटचे टकमक टोकासारखे टोक आहे . या गडाला चढण्यास पाऊण तास व फेर फटका मारण्यास अर्धा - पाऊण तास लागतो .
या गडावरून उत्तरेकडे घोसळगड दिसतो . पूर्वेस सावित्री नदीचे पात्र आहे पश्चिमेस समुद्र खाडी आहे. जवळच कुडे -मांदाडच्या बौध्द लेण्या असून आता त्या ठिकाणी विकासकामे सुरु असल्याची दिसतात . रायगड,हरिहरेश्वर , काशीद बीच , मुरुड जंजीरा , दिघी बंदर ही पर्यटन स्थळे या गडापासून जवळच आहे . प्राचीन सागरी व्यापारी मार्गावर तळागडचे विशेष महत्व तर होतेच पण स्वराज्यात हा किल्ला रायगडाचा पहारेकरी म्हणून होता . १६४८ च्या काळात हा स्वराज्यात आला होता . अफजली संकट काळात सिद्धीनं या किल्ल्यास वेढा दिला होता पण त्याला घेता आला नाही . महाराजांच्या महानिर्वाणानंतर मात्र सिद्दीनं हा किल्ला ताब्यात घेतला होता .
संजय खांडवे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा