➖➖➖➖➖➖➖
स्थान : ता. सोयगाव , जि . छत्रपती संभाजी नगर उंची : ६२५ मी.बुलढाण्यावरून धाड - पिंपळगाव रे - गोळेगाव - उंडणगाव - हळदा घाटात हा किल्ला दिसतो पुढे हा रस्ता सोयगावला जातो . सिल्लोड - अजिंठा रोड वरील गोळेगाव या गावावरून वरील मार्गाला जाता येते .➖➖➖➖➖➖➖➖➖
विदर्भ - मराठवाडा - खान्देश या सिमेलगत जगप्रसिद्ध अजिंठा लेणी समूह आहे . या लेणी पाहण्यासाठी अन अभ्यासण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात . याच लेणी समूहाच्या पाठीमागे छत्रपती संभाजी नगर जिल्हात असलेला वेताळवाडी किल्ला आहे . याला स्थानिक लोक हळदी घाटामुळे हळदया किल्ला म्हणतात . तसेच वाडीचा किंवा वसईचा किल्ला असेही याला म्हटले जाते . वरील दिलेल्या मार्गापैकी गोळेगाव वरून उंडणगाव व तेथून उजव्या बाजूला वळून सोयगाव रोडने आपण हळदा या गावात पोहचतो . याच रोडने दोन - तीन कि .मी . अंतरावर हळदा घाट लागतो एक दोन वळण घेतले की आपल्याला हा किल्ला दिसतो . पाहताच क्षणी कुणीही असो त्या वास्तुला पाहून हर्ष झाल्या शिवाय राहत नाही कारण या भागात दूर - दूर पर्यन्त किल्ला नावाची वास्तु दृष्टीस पडतच नाही त्यातल्या त्यात हा गिरिदुर्ग असल्याने त्याचे बुरुज व तटबंदी पाहून अधिकच आकर्षक वाटतो . हळदा घाटात बाजूला गाडी पार्कीग साठी काही जागा आहे . हया परिसर जाणारे येणारे तुरळक वाहणे सोडता जवळपास कुणीही आढळत नाही . सार्वत्रिक सुटी असली तर काही तुरळक पर्यटक येतात कारण हा सुंदर किल्ला अजूनही लोकांपर्यन पोहचलेला दिसत नाही . एक पूर्ण दुर्ग म्हणजे अर्थात गिरिदुर्गा साठीचे जे निकष असतात ते सर्व निकष हा दुर्ग पुर्ण करतो . महाद्वार , इतर द्वार , चोर दरवाजा , एकेरी व दुहेरी मजबूत तटबंदी , तोफ ,नगारखाना ,बालेकिल्ला , महल आदि अवशेष , धान्य कोठार , पाणी तलाव ही सर्व आपल्याला या किल्ल्या वर आपल्याला बघायला मिळतात . दोन किंवा तीन तासात हा किल्ला बऱ्यापैकी पाहता येतो काही पाऊल वाटा सोडल्या तर हा चढाई करण्यास फारसा अवघड किल्ला नाही . गाडी पार्क करून पाऊल वाटेने पाच दहा मिनिटात दरवाज्या पर्यन्त पोहचतो . प्रथम दर्शनी दुरून हा दरवाजा नाही तर बुरुज वाटतात . दोन बुरुजाच्या मधून वळण घेतले की आपल्याला दरवाजा दिसतो . या दरवाज्याच्या दोन्ही वरच्या बाजूस जंजाळा किल्ल्यावर जसे क्षरभ चिन्ह आहे तसेच या ठिकाणी सुद्धा आहे . पाठीमागच्या बाजूला दरवाज्यापेक्षा ही मोठा व उंच बुरुज आहे . यावर ( मॅची कोलेशन ) म्हणजे जंग्या आहेत अश्याच पूर्ण तटबंदीला व दराज्याच्या वरही आहेत . बाहेर आलेले सज्जे नक्षीकाम केलेले असून ते बुरुजाची शोभा अधिक वाढवतात , या शत्रूचा हल्ला झाल्यावर यातून गरम पाणी , तेल , शिसे किंवा रेती ओतून शत्रूवर हल्ला करता येत असे दरवाज्या वरील जंग्या मधून किल्ल्याचा दरवाजा जर बाहेरून शत्रूने पेटवून दिला तर पाणी सुद्धा ओतता येत असे व लक्षही ठेवता येत असे अशी ही रचना आहे व महत्वाचे म्हणजे आजही ते मजबूतीने जसेच्या तसे शेकडो वर्षापासून उभे आहे . दगड , चुना ,शिसे आदि मजबूत बांधकाम केलेला हा दरवाजा म्हणजे जंजाळा दरवाजा आहे . साधारणपणे किल्ल्याच्या दरवाजांना स्थानिक दिशा दर्शकानुसार व वैशिष्टयानुसार नावे दिली जात असत ह्या बाजूला जंजाळा किल्ला असल्याने याचे नाव त्यावरून पडलेले दिसते आत आल्याबरोबर उजव्या बाजूला सैनिकांच्या विश्राम तथा किल्ल्या वरील कामकाजासाठी ही असावी . पायरी चढून पुढे आपल्याला किल्ल्याची पहिली तटबंदी दिसते . संपूर्ण किल्ल्याला ही तटबंदी गोल फिरून पाठीमागील वरील उंच बुरूजाला मिळते . जागोजागी या तटबंदीला बुरुज आहेत या जंग्या आहेत या तटबंदीवरून सैनिकास शस्त्र - दारूगोळा व इतर रसद पोहचविता येत असे . उजव्या बाजूला कपारात एक पाण्याचे टाके आहे . तटबंदी व बुरुजावरील सैनिकांसाठी येथूनच पाणी पुरविल्या जात असे आता मात्र त्या गुहेत मोठ्या प्रमाणात वटवाघूळींचे वास्तव्य आहे . पाठीमागे बुरुजावर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहे . बुरूजा वरून खाली बुरुजावर बांधलेल्या खोलीत जाण्यासाठी L आकाराचा एकमार्गी जीना आहे हा रस्ता दरवाज्या वरील बुरुजाच्या खोलीत पोहचतो आत कमानी आकाराची मोठी खोली असून यात दारुगोळा व राहण्याची व्यवस्था केली जायची . बुरुजावरील जंग्या खाली दरवाज्यापर्यन्त येणाऱ्या शत्रूवर व हळदा घाटावर लक्ष ठेवणे व मारा करण्यासाठी आहे हे पाहताच क्षणी लक्षात येते . पुढच्या तटबंदीवर गडावरील एक तोफ आहे आता साग वाणी तोफ गाड्यावर ती डौलात उभी आहे . या किल्ल्याच्या बुरुजांचा अभ्यास केला तर या बाजूने चढत्या क्रमाने हे बुरुज एकमेकांच्या संपर्कात असल्याचे दिसतात . यावरून या किल्ल्याची अभेदयता सिध्द होते .सर्वोच्च शिखरावर असतेल्या दुसऱ्या तटबंदीमधील बुरुजा वरुन पहिल्या तटबंदी व बुरुजावर लक्ष ठेवता येते . शत्रूने पहिली तटबंदी जरी भेदली तरी त्याला दुसरी त्यापेक्षाही अवघड आहे . या तटबंदीवरही बालेकिल्ला शाबूत ठेवून गड लढत ठेवता येतो . पूर्व बाजूस वळण घेत बालेकिल्ल्यावर पोहचता येते . पूर्वेकडील पहिली तटबंदी व बुरुज झाडा झुडूपात दिसतात . वर आल्यावर सिताफळींच्या झुडूपात अनेक इमारतीचे अवशेष आहेत .जमीनीत असलेला दगडी तेल तुपाचा रांजण व त्याच्या बाजूला पडका बुरुज व धान्यकोठार आहे . पाश्चिम-पूर्व बाजूस भव्य तटबंदी व बुरुज आहे . वेताळवाडी धरण व जंजाळा किल्ला येथून दिसतो . उत्तरेकडे जातांना या गडाचा भाग निमुळता होत जातो वाटेत एक भव्य कोरीव व बांधिव तलाव आहे त्याच्या समोरच छत नसलेली पडकी इमारत आहे . उत्तरेकडे आपल्याला अनेक कमानीची छत नसलेली इमारत दिसते . याला बारादरी किंवा हवा महल स्थानिक लोक म्हणतात . जेव्हा ही इमारत परिपूर्ण होती तेव्हा येथील सौदर्य व वातावरण कसे असेल याची कल्पना येथे आल्यावर कळते . समोर खाली वेताळवाडी गाव व पुढे सोयगाव शहर दिसते . या बाजूने अत्यंत चांगल्या स्थितीत असलेला वाडी दरवाजा आहे . या ठिकाणी सुध्दा प्राचीन इमारतीचे चांगल्या स्थितीतील अवशेष आहे . कपारीत या ठिकाणी छोटे पाण्याचे स्त्रोत आहे . पूर्वी याचा वापर होत असे . पूर्व बाजूस गडाच्या बाहेर जाणारा एक छोटा चोर दरवाजा आहे . प्राचीन काळापासून या भागाला विशेष महत्व होते हे पूर्वेकडील बाजूस असलेल्या रुद्रेश्वर लेणी वरून समजते पण ती अर्धवटच आहे .बहामणी, मोगल , निजाम या मध्ययुगीन राजवटीत या किल्ल्यावर विशेष वावर होता व्यापारी व प्रशासकीय शहर बऱ्हाणपूर मुळे या मार्गास पहारेकरी म्हणून वसलेला हा किल्ला होता . प्राचीन काळापासून या परिसरातील असलेल्या गड किल्ल्यांचा इतिहास समोर येणे आवश्यक आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा