मंगळवार, १७ मार्च, २०२०

सहस्त्रकरविक्रम स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले

➖➖➖➖➖➖
महाबली शहाजीराजे
➖➖➖➖➖➖
🙏🙏🙏🙏🙏🙏
शहाजीराजे पाच वर्षाचे असताना मालोजीराजे यांचे एका युद्धात निधन झाले मालोजीराजे नंतर त्यांचे बंधू विठोजी राजे यांनी शहाजी आणि त्यांचे बंधू शरीफजी यांचा सांभाळ केला
   शहाजी आणि शरीफजी यांच्या नावाने राज्य चालविले
     परमानंद हे शिवरायांच्या समकालिन ग्रंथ शिवभारतमध्ये म्हणतात मालोजीराजे यांचे पुत्र शहाजी हे हे वरांसाठी आवश्यक असलेल्या गुणांनी लक्षणांनी युक्त होते ते दानवीर,दयावीर, युद्धवीर आणि महान ओजस्वी होते"
    परमानंदांनी शिवभारतात शहाजीराजांच्या अनेक पैलूंविषयी नोंद केलेली दिसते यामध्ये हे त्यांना इंगित तज्ञ, सुधी म्हणजे उत्तम बुद्धि असलेले, पटू ,आत्म प्रतापी, विविध विजयश्रीचे निवासस्थान असणारे, मोठे चिलखत धारण करणारे, महोत्सायी ,मानीआणि गरुडाप्रमाणे शक्ती असलेले ले असे वर्णन केलेले आढळते.

     शहाजी राजांनी शिवरायांना पुण्याकडे पाठविले त्यावेळेस शहाजी राजांचे द्रष्टेपण कसे व्यक्त झाले हे सांगताना परमानंद त्यांना अर्कद्युतिमत (सुर्याच्या तेजाने युक्त )अर्कज्ञ (सूर्याला जाणनारे) अशी विशेषणे लावली आहे .
     शहाजीराजांनी कर्नाटक प्रदेश कसा जिंकला ते सांगतांना परमानंद म्हणतात शहाजीराजांनी षाड़गुण्याचा प्रयोग करुन आणि विविध प्रकारच्या* सल्लामसलतीच्या जोरावर कर्नाटक प्रेद्श आपल्या नियंत्रनाखाली आणला . शिवाय तिकडचे राजे सुध्दा त्यांच्या सल्याने वागत असल्याचे परमानंदानी नोंदवीले आहे"
    "त्या त्या प्रसंगी योग्य ठरेल  अश्या सल्लामसलतीचा प्रयोग करणाऱ्या बुध्दीमान शहाजीराजांच्या प्रभावामुळे खूप लोकांनी यवनापासून निर्माण झालेले भय टाकून दिले "
➖➖➖➖➖➖➖

षाड़गुण्य
षाड़गुण्य म्हणजे सहा गुणांची अवस्था
संधी
म्हणजे तह करने
विग्रह
म्हणजे सघर्ष वा युद्ध करणे
यान
म्हणजे शत्रुवर केलेली स्वारी
आसन
म्हणजे प्रत्यक्षरित्या कोणतीही हालचाल न करता परिस्थितीचे निरक्षण करत शांत राहणे
सश्रय
म्हणजे गरज पडल्यास आपल्यापेक्षा अधिक बलवान राजाचा आश्रय घेणे
द्वैध
रक्षणासाठी वा आक्रमणासाठी सैन्याच्या दोन आघाड्या करणे 
  या वरील सहा गुणांचे केवळ आंधळेपणाने नव्हे तर आपल्या शत्रुची विविध प्रकारची बळाबळे ,हेरामार्फत मिळालेली माहीती,भौगोलिक परिस्थिती,रणभूमीचे स्वरूप,नैर्सगिक वातावरण,आपल्या शत्रुची राज्यातील आंतरिक परिस्थिती, पिछाडीच्या सरक्षणाची व्यवस्था,यशापयशांची संभाव्यता,इ योग्य त्या गोष्टीचा विचार करुन साथीदाराच्या सल्लामसलतीवर शहाजीराजाकडे ही गुणवत्ता होती .
       सपूर्ण दक्षिण भारतात त्यांनी आपला एक दरारा निर्माण केला होता . शिवरायांनी पुढे स्वराज्य स्थापण केले ,तेव्हा त्यांच्या वडीलांचा दरारा त्यांच्या पाठीशी होता,याचा अर्थ शहाजीराजांनी एकीकडून स्वराज्याची पार्श्वभूमी तयार केली आणि प्रत्यक्ष स्वराज्य स्थापण करणाऱ्या आपल्या पुत्राच्या भोवती अदृष्य स्वरूपात  एक सरक्षक कवचही निर्माण केले .
     सहस्त्रकरविक्रम असलेल्या शहाजीराजांच्या अनेक पराक्रमांची नोंद परमानंदांनी  शिवभारतात केलेली आढळते . 
         शहाजीराजांनी शिवरायांना वयाची ११ वर्ष पूर्ण झाल्यानंतर सनय करुन पुण्याकडे पाठविले
"शाहवर्मा (क्षत्रिय शहाजी) हे सूर्यासारखे तेज असलेले द्रष्ठे राजे होते . शिववर्मा (क्षत्रिय शिवरायांना)यांना जेव्हा बारावे वर्ष लागले ,तेव्हा त्यांनी शंभूच्या शिवलक्षणी अश्या धाकटया भावाला बोलावून घेतले आणि त्याला पुणे प्रांताच्या प्रमुख पदी नियुक्त केले"
असे परमानंदानी नोंदविले आहे .

स्वराज्य संकप्लक शहाजीराजे यांना मानाचा मुजरा
➖➖➖➖➖➖➖

संदर्भ
➖➖➖➖➖➖➖
शिवराय:संस्कार आणि शिक्षण
➖➖➖➖➖➖➖
शद्बाकंन
संजय खांडवे
➖➖➖➖➖➖➖


।१९ फेब्रु १६३० शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला .१६३३ पर्यन्त ते शिवनेरीवरच होते .१६३३ ते १६३५ पर्यन्त जिजाऊसह शिवराय सिंदखेडराजा येथे वास्तव्यास होते .वर्ष दिड वर्ष ते खेड शिवापूरला बापूजी मुदगल यांच्या वाडयात होते पुढे १६३८ ते १६४१ या पाच वर्षात महाबली शहाजीराजे सह कर्नाटकात कंपीली आणि बंगळूर या ठिकाणी होते.हा ११ वर्षाचा काळ म्हणजे शिवरायांचा मुख्य जडणघडणीचा काळ होय .याच काळात जिजाऊ _शहाजीराजे यांनी शिवरायांवर संस्कार केले .तेच त्यांचे गुरू होय .कर्नाटकात शिवरायांच्या शिक्षणाची व्यवस्था शहाजीराजे यांनी आपल्या संकल्पणेतील स्वराज्य समोर ठेवूनच केली .राजनिती,युद्ध कौशल्यासह ते स्वतः संस्कृत विषयात पंडित होते .
   परमानंदांच्या नुसार शिवराय "सनय "हे विशेषण लावले जाते .शहाजीराजे यांनी सनय बनवून शिवरायांना पुण्यास पाठविले .सनय हा शब्द वर -वर पाहता साधा वाटत असला तरी प्रांचीविद्यापंडित  आ ह साळुखे सरांच्या अभ्यासानुसार 'नय' या शद्वाचा वामन शिवराम आपटे यांच्या कोशामधे मिळणारे अर्थ खालिल प्रमाणे आहेत . Guiding, leading managing, behaviour, course of conduct, way of life, prudence, foresight, policy, political wisdom, statesmanship, civil administration, state policy, morality ,justice retitude, equality , plan, design, scheme, maxim, principal ,method, system, doctrine, opinion
याचा मराठीत अर्थ सामान्यपणे मार्गदर्शन, नेतृत्व ,व्यवस्थापन, वागणे, वर्तन शैली, जीवनशैली ,दूरदर्शीपणा, द्रष्टेपणा ,धोरण ,राजकीय शहाणपण ,राजनीति तज्ञता, मुलकी प्रशासन, राज्य धोरण, नैतिकता, न्याय ,सत्य आणि न्याय यावर एकनिष्ठता, सर्वांना समान न्यायपूर्ण वागणूक ,योजना, भावी गोष्टीचा आराखडा, नियोजित प्रकल्प, अनुभवातून प्राप्त करून निश्चित केलेले नियम, तत्व, कामकाजाची पद्धत ,व्यवस्था, सिद्धांत आणि मत  असे अर्थ येतात यावरून किती विविधअंगानी शिवरायांची जडणघडण शहाजीराजे यांनी केली होती हे दिसून येते. याच काळात कर्नाटकी मुककामात १६४० मधे शिवाजी महाराजांचा विवाह निंबाळकर,पवार घराण्यात करून आपल्या आजोळचा जिव्हाळा जोपासत आपसातील संबध दृढ केल्याचे दिसते . पुण्याच्या जहागिरीचा प्रशासकिय कारभार "प्रतिपचंद्ररेखेव"या शिक्याचा उपयोग करून शिवाजीराजे यांच्या नावे सुरू झाला .शहाजीराजे यांच्या अधिकारक्षेत्रात पुणे,इंदापूर,सुपे,चाकण व बारामावळ प्रांताची व्यवस्था शहाजी राजे यांनी लावून दिली होती .दादोजी कोंडदेव हा दिवाण सुबेदार म्हणून शहाजीराजे यांच्या सेवेत होता .याशिवाय विसापूरात बिलाल हबशी,चाकण येथे फिरंगोजी नरसाळा,सुभे प्रांतात संभाजी मोहिते व पुंरंदर येथे नीळकंठराव या आपल्या विश्वासातील माणसांची पोटमुकासदार म्हणून नेमणूक केली होती .या मुलुखातून येणारे उत्पन बाल शिवबा व जिजाऊंस स्वराज्यकार्यात उपयोगी पडत असे अशी रचना दूरदृष्टी ठेवत आपल्या बुध्दीकौशल्यावर शहाजीराजे यांनी निर्माण केलेली दिसते .

स्वराज्य संकप्लक शहाजीराजे यांना मानाचा मुजरा


1 टिप्पणी:

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...