जंजाळगडाचा वेताळगडाकडे जाणारा दरवाजा
गडावरील मुख्य इमारती वरील हत्तीवर सिह स्वार असलेले शिल्प
महादरवाज्याकडे दरीतून जाताना
महादरवाज्याकडे जातांना
गडावरील दक्षिण बाजूस असलेला तलाव
गडाच्या मध्यभागी असलेला राणी महलचा भाग
हत्तीवर सिंह स्वार असलेले शिल्प
सय्यदपीर बाबा दर्गा जवळ लेखअसलेले शिल्प
सय्यदपीर बाबा दर्गा जवळ असलेला तलाव
गडाचा मध्य भाग
गडावर भ्रंमती करतांना
दक्षिणेकडील गडाचा दरवाजा
गडावरील मुख्य इमारती वरील हत्तीवर सिह स्वार असलेले शिल्प
महादरवाज्याकडे दरीतून जाताना
महादरवाज्याकडे जातांना
गडावरील दक्षिण बाजूस असलेला तलाव
गडाच्या मध्यभागी असलेला राणी महलचा भाग
हत्तीवर सिंह स्वार असलेले शिल्प
सय्यदपीर बाबा दर्गा जवळ लेखअसलेले शिल्प
सय्यदपीर बाबा दर्गा जवळ असलेला तलाव
गडाचा मध्य भाग
गडावर भ्रंमती करतांना
दक्षिणेकडील गडाचा दरवाजा
सायंकाळी गडउतार होताना
गोंडवाना राज्याचे चिन्ह या प्रकारचे आहे
जंजाळा किल्ला /वैशागड /तलतम गड
वेताळगड -रुद्रेश्वरलेणी हा प्रवास करत दुपारी ३ वाजता वेताळवाडी गावात आलो व सोयगावकडे निघालो वाटेत एका ठिकाणी बऱ्याच प्राचीन समाध्या दिसल्या .त्या कुणाच्या असतील हया हेतूने जाणुन घ्यावे म्हणून आम्ही चौकशीसाठी थांबलो ,त्या ठीकाणी स्थानिकानी काही माहीती समाधानकारक दिली नाही पण तुम्ही जंजाळा किल्ला आता जाऊ शकता असे सांगितले म्हणून आम्ही निघालो.
हळदा -अंभई -विरगाव -जंजाळा गाव असा दिड तासाचा प्रवास करत जजाळा गावांत पोहचलो .गावातून किल्ला सहज दिसतो त्या गावातून पाहताना किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील वाटत नाही कारण इतर तीन बाजूला हा गिरीदुर्ग आहे गावात पुरेसे पाणी सोबत घेऊन शेतामधून वाट काढत ,अगदी गाडी खाली बऱ्याच ठिकाणी घासत आम्ही किल्ल्याच्या जवळपास पोहचलो ,शेतात काम करणारी माणस आमच्याकड कुतुहलाने बघत होती ,या किल्याकडे कुणीही भटकत नसावं हा आमचा अंदाज खरा ठरणार याची यात्री आम्हाला दक्षिण बाजूचे प्रवेश द्वार पाहून झाली .प्रचंड तटबंदी मधून हा दरवाजा आहे पण दरवाज्याचे अवशेष मात्र दिसत नाही .या ठिकाणावरून पुढे गेले की गडाचा पूर्ण भाग दिसायला लागतो गडाच्या पूर्व व पश्चिम बाजूस खोल दऱ्या दिसतात ,पश्चिमेकडील बाजू चढण्यास फार कठीण आहे ,गडाची ही एक भक्कम बाजू आहे या बाजूने शत्रु चालून येणे अशक्यच ! पूर्वबाजूस वेताळगड पूर्ण दिसतो ,अगदी त्या गडावरील बहुतेक हालचाली सहज समजत असाव्यात असे वाटते .संपूर्ण गडाला मजबुत अशी तटबंदी असावी ,कारण काही ठीकाणचे अवशेष सोडले तर तटबदी आजही शाबुत आहे .
दक्षिण बाजूला सुरुवातीलाच एक तलाव आहे मार्च मध्येही या तलावात बरेच पाणी होते त्या भागातील व जंगलातील प्राणी या ठिकाणी पाण्यासाठी येतात . तलावाच्या काठापासूनच दाट झाडीत जुन्या इमारतीचेच अवशेष दिसतात .गडावर पूर्वी फार मोठी वस्ती असावी असे यावरुन दिसते .आम्हाला पूर्वबाजूस म्हणजे वेताळवाडी किल्याच्या बाजूला दाट झाडीत गडाचा प्रचंड असा दरवाजा दिसला ,आम्ही तटबंदीमधून रस्ता काढत दरीत उतरलो व पाऊलवाटेचा आसरा घेत दरवाज्या पर्यन्त पोहचलो .दोन्ही बांजूने प्रंचंड बुरुज व आत गेल्यावर उत्तरेकड उघडणारी दरवाज्याची कमान दिसली ,दोन्ही बाजूने इमारती ,त्याखाली गुप्त असलेली मोठी खोली होती आत काय असेल याची खात्री नाही कारण जगली भाग आणि आजूबाजूला कुणीही गडावर वावरणारे किवा स्थानिकही नाही ,कोरिवकाम केलेले दगड खाली पडलेले ,त्यामधून झाडे वर आलेली,दरवाजा सुद्धा झाडाझुडपानी बंदीस्त होता आम्ही पुढे निघालो ,व बालेकिल्यासारखा दोन मोठया बुरुजावर पडक्या इमारती होत्या ,त्या बुरुजाच्या अवतीभोवतीसुद्धा काही बांधकामाचे अवशेष तेथे होते .
गडावरील त्या बांलेकिल्ल्याच्या बुरुजावर एक शिल्प होते यात सिहाने आपल्या पंजामध्ये हत्तीला पकडलय ! (हत्तीवर सिंह स्वार) याविषयी पुढे आम्ही जी माहीती घेतली की या प्रकारचे शिल्प हे प्राचीन गोंडवाना राज्याचे राज्य चिन्ह आहे . आमच्या सोबत मोहीमेत असणारे आमचे मित्र राजेश साळवे सरानी हे खात्रीपूर्वक सांगितले .गोडराजाचे मध्यभारतात मोठे साम्राज्य होते .या गडाच्या इतिहासाबाबतीत आम्हाला असलेल्या माहीती नुसार १५५३ मध्ये अहमदनगरच्या बुऱ्हाननिजामशहाने हा जिंकला व त्यानंतर १६३१ मध्ये शहाजहानने जिंकला अशी माहीती मिळते या किल्ल्यावरुन दुरवरचा भाग न्याहळता येतो विस्ताराने मोठा असलेल्या या किल्ल्याला जरंडीगावाच्या बाजूने ,सोयगावच्या बाजूने ,वेताळगडाच्या बाजूने व जंजाळा गावाच्या बाजूने दरवाजे आहेत फारशी भाषेतील तीन अोळीचे शिलालेख ही आढळतात .स्थानिकाच्या माहीतीनुसार ५२ बुरुज या किल्याला आहे.एक चोर दरवाजा ,राणी महल,पडक्या सहा खोल्याचा वाडा ,सय्यद कबीर पीर दर्गा, तीन पाण्याचे तलाव या ठिकाणी आहे. आम्ही त्या पडक्या राणी महलापासून पुढे गेलो, दाट झाडीमधे छत कोसळलेला सहा खोल्यांचा वाडा दाट सिताफळाच्या झाडी उगवलेल्या अवस्थेत होता . तेथून पूर्वेला प्रचंड दोन झाडे भिंतीवर घेऊन उभी असलेली एक चांगल्या स्थितीमधील इमारत दिसली .थोड चालत गेल्यावर पूर्व दिशेला तोंड असलेले प्रचंड नक्षीकाम असलेले ते प्रार्थनास्थळ असावे समोरच गडावरील दुसरा तलाव आहे .
सूर्य मावळंतीला आला होता अंधार पडू नये म्हणून आम्ही परतीच्या प्रवासाला म्हणजे गडउतार होण्यास निघालो वाटेत गडावरील सय्यदपीर बाबाचा दर्गा लागला तेथेच फारशी भाषेतील शिलालेख आहे . बाजूलाच खोल खोदलेला पाण्याचा गडावरील तिसरा तलाव आहे .अंधार पडत चालला होता तेथून आम्हाला वाकाटक काळातींल ,पाचव्या शतकातील घटत्कोच ही बौध्द लेणी खुणवत होती ,जजाळा गावापासुन अर्धा तास पायी अंतरावर होती पण अंधारा मुळे पुढच्या मोहीमेतील एक भाग म्हणून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो..............
क्रमशः
संजय खांडवे
बुलढाणा
9011971122














कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा