नाशिक -नगर सिमेलगत नगर जिल्हयातील अकोले तालुक्यात उत्तर दक्षिण दक्षिण पसरलेल्या सहयाद्रीच्या पर्वतरांगेत हा किल्ला येतो .संगमनेरवरुन जातांना अकोले-राजूर-वाकी-मानेरे-देवगाव -खिरवडी मार्गे या विश्रामगडावर जाता येते .दुसरा ठाणगाव मार्गे सिन्नरवरुनही जाता येते .याच परिसरात महाराष्ट्राचे एव्हरेस्ट कळसूबाई शिखरही आहे .दुर्गप्रेमीसाठी अत्यंत अवघड श्रेणीत येणारे गिरिदुर्ग अलंग,मदन,कुलंग याच डोंगर रांगेत येतात .हरिशचंद्रगड ,रतनगड,भंडारदरा धरण,सानंददरी याच परिसरात येतात .
खिरवडी मार्गे गेल्यास अगदी पट्टया प्रमाणे पसरलेला हा दुर्ग नजरेस पडतो म्हणून याला पट्टागड असे जुने नाव आहे .गडाच्या अगदी पायथ्यापर्यन्त गाडी जाते व गडावर चढाई करतांना आत्ता कृत्रीम रस्ता तयार केला गेला आहे .त्र्यंबक दरवाज्याच्या बाजूने वनविभागाने एक कमान उभी केली आहे त्या ठिकाणी नाममात्र शुल्क आकारून नाव नोंदणी केली जाते .या ठिकाणी गडावर सापडलेल्या काही प्राचीन वस्तु जतन करून ठेवलेल्या दिसतात (तलवार,नाणी,दागिणे,खडे,आदि ) गडाची चढाई करतांना गडाची नकाशासह माहिती दर्शविणारे फलक लावलेले आहेत .भककम नैर्सगिक तटबंदी सोडता ज्या ठिकाणी गरज आहे अश्या ठिकाणी मजबुत तटबंदीचे अवशेष आढळतात .वाटेत या गडावर असंख्य गुहा कोरलेल्या अाहे,त्यात पाण्याचे टाके सुद्धा आहेत तसा ह्या गडाचे बांधकाम शेकडो वर्षापूर्वीचे {१२व्या -१३ व्या शतकातील}असावे असे दिसते .अलीकडच्या काळात ग्रामस्थानी पट्टादेवीचे मंदिर बाधलेले वाटेत दिसते गडावर पोहचताच अंबरखाना नजरेस पडतो याला राणीमहलही म्हणतात . एवढी एक इमारत गडावर बऱ्यापैकी दिसते यात आता आतमध्ये शिवचरित्रावरील असंख्य प्रसंग शिल्पामध्ये साकारलेले दिसतात .बाहेर शिवरायांचे सुंदर स्मारक आहे .बघताचक्षणी प्रत्येकजन नतमस्तक होतो येतांना वाटेत त्र्यंबक दरवाजाही लागतो .अंबरखान्याच्या मागच्या बाजूस उंचावर बालेकिल्ला असावा असे अवशेष् आहे .या किल्ल्याची उंची १३९२ मीटर आहे .
अंबरखाण्याच्या मागच्या बाजूने चालत गेले की दगडात कोरलेली पाण्याची भव्य टाकी दिसते हे पाणी आजही पिण्यासाठी वापरले जाते
समोर पठारावरून सोनटेकडीकडे जातांना पाण्याचे १२ टाके दिसतात शुद्ध पाण्याने भरलेले हे टाके आहेत यापैकी काही टाके लिक असल्याने त्यात पाणी दिसत नाही .या टाक्यातील निघालेल्या दगडापासून गडाचे बांधकाम होत असे .सोनटेकडी वरुन टेहाळनी करतांना C अाकाराची कातरकडा दिसते . समोरच औंढा किल्ला दिसतो .या टेकडीवर जातांना काळजी घ्यावी लागते प्रचंड वेगाने वारे वाहतात व बाजूला खोल दरी आहे .सुरक्षा म्हणून लोखंडी कटघरे लावली आहे .पण काळजी घेणे महत्वाचे .
हा किल्ला बाराव्या शतकात बांधला गेला पण शिवचरीत्रात या किल्ल्याचे वेगळे महत्व आहे , १६७२ मध्ये मोगलाकडून हा किल्ला मोरोपंत पिगळे यांनी स्वराज्यात आणला होता .शिवरायांच्या १८३०६ दिवसाच्या आयुष्यात त्यांनी राजगडावरील काही दिवस सोडले तर इतर दिवस त्यांची रयतेच्या सुखासाठी सतत घोडदौड सुरु होती त्यांच्या आयुष्यात थोडी देखील उसंत त्यांनी घेतलीच नाही .या किल्यावर मात्र शिवरायांनी १६७९ मध्ये १७ दिवस विश्रामासाठी वास्तव्य केले कारणही तसेच होते ,शिवरायांनी जालना शहरावर स्वारी केली व यास्वारीनंतर रायगडाकडे परतत असतांना रनमस्तखान त्यांचा पाठलाग करत आला होता.सोबत बर्हिजी नाईक होते त्यांना या भागाची बरीच माहीती होती.रनमस्तखानाला चुकवत ते महाराजांना सुरक्षीत पट्टगडावर घेऊन आले .महाराजांनी १७ दिवस या किल्ल्यावर आराम केला .जातांनी या किल्ल्याला विश्रामगड असे नाव दिले .शिवरायांच्या वास्तव्याने अन पदस्पर्शने पावन झालेला हा गड भ्रंमंती करत असतांना प्रत्येक शिवप्रेमीना या गडाचा काना अन कोपरा एक प्रेरणा देवून जातो .
पेशव्यानी सुध्दा या गडाचा उपयोग थंड हवेचे ठिकाण म्हणून केला.अश्या या किल्ल्यास एकदा तरी भेट दयावी .
संजय खांडवे
9011971122





















































