शिवराज्यभिषेक ,उत्सव रयतेच्या स्वातंत्र्याचा !*
➖➖➖➖➖➖➖➖➖
शिवजन्मापुर्वी सुमारे ४०० वर्षापासून आपल्या भारतीय भूमीवर परकीयांच्या आक्रमणानी कहर केला होता.त्रस्त रयत जुलमी शासकांच्या अाघाताने मेटाकुटीस आली होती .एखादया अनामिक आशेवर ही रयत कसतरी जगत होती .या काळात महाराष्ट्रात संत परंपरा आपली भागवती पताका डोक्यावर घेऊन प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकाचा विचार करुन त्यांच्यात नैतिक बळ देण्याचं काम करत होते . संत नामदेव -ज्ञानदेव -चोखोबा -गोरोबा -सावता -तुकोबा ही संत श्रृखला आपलं काम करत होती .या काळात समाजात झालेला भेदाभेद ,स्वार्थी प्रवृती परकीयांना पोषक ठरली एके काळी ज्या भारतवर्षातून सोन्याचा धूर निघायचा तिथली रयत भयाने ग्रस्त झालेली,अन्यायात रक्ताळलेली, मायमाऊलीच्या आर्त किंकाळीने शेकडो वर्षापासून स्वातंत्र्याची वाट आसवलेल्या डोळ्यानी बघत होती .एक दिवस ती पहाट नककीच उगवेल या भाबडया आशेवर ही रयत जगत होती .
जदूरायाचे जावाई शहाजीराजे भोसले ,राजे लखुजी जाधव हयानी त्या काळात आपल्या मनात स्वातंत्र्य,स्वाभिमान जागृत ठेवत तशी आस रयतेच्या मनात निर्माण करायला सुरूवात केली होती ,युद्धाचा प्रसंग नसे तेव्हा ही मंडळी रयतेच्या सुख -दुःखात रममान होत असत .जाधवरावांनी सिंदखेडचा कायापालट केला रयतवत्सलतेचे विचार बालपणीच जिजामातेनी अनुभवले. यशापयाशाच्या चर्चां,राजकिय डावपेच,न्यायनिवाडे,लढाईचे नियोजन,प्रशासन ह्या बाबी अगदी जवळून पाहिल्या . वैभवाचा परमोच्च शिखर त्या काळात वऱ्हाड परिसरात वाटू लागला. लखूजीराजे जाधवांनी विजयाच्या प्रेरीका असलेल्या जिजाऊंचा शहाजीराजे भोसले यांच्याशी विवाह लावून दिला .
शिवरायांच्या समक्ष त्यांनी कवी परमानंद कृत " शिंवभारत " या ग्रंथात या विवाहाचा उल्लेख येतो .शहाजीराजांच्या व जिजाऊंच्याअनेक गुणांचे वर्णन या ग्रंथात आले आहे .
" *जिजू: जागर्ति जगजीतले ।* "
शहाजीराजांच्या पत्नी जिजू या पृथ्वीतलावर जागृत आहे .ही जागृती स्वराज्य प्रेरीकेच्या रूपाने महाबली शहाजी राजे यांच्या संकल्पणेला अधिक बळ देण्याचे काम करत होती .यातूनच स्वाभिमानाने जगायला शिवविणाऱ्या स्वराज्याची पायाभरणी होत होती .संपूर्ण दक्षिणभारतात शहाजीराजेनी दरारा निर्माण केला होता .१६२९ ते १६ ३६ या काळातच शहाजीराजे यांची घोडदौडच सांगते की स्वराज्याचं वेड त्यांनी रयतेला कस लावून दिलय .
*शाह: आहिजहानस्य येदलिस्य च सेनया ।*
*अयुध्यत समास्तिस्त्र सहस्त्रकरविक्रम ॥*
सूर्याला जसे हजारो किरणे असतात तसे हजारो बाहू असलेले शहाजी यांनी शहाजहान व अदिलशहा यांच्यासोबत तीन वर्ष युध्द केले असे कवी परमानंद लिहतो .
शिवजन्माची शिवनेरीवरील रम्य पहाट याच स्वराज्याच्या स्वातंत्र्य उत्सवाची नांदी होती.शिवशंभूसारखे वंशंवर्धक पुत्र ही माता स्वराज्यासाठी घडवत होती शिवनेरीवर शंभू -जयंतिचा विवाहाने पुढे वाटचाल सुरु झाली .
शिवरायांचे बालपण हे महाराष्ट्रातील धामधुमीच्या काळात शहाजीराजे सह बंगळुरुमध्ये गेले त्या ठिकाणी निष्नात अध्यापकांची व्यवस्था शहाजीराजे यांनी केली .युद्धकला,राजकारण,डावपेच,युद्धतंत्र,प्रशासन आदिसह विविध भाषा व लिपि मध्ये शिवबा पारंगत झाले खुद्द शहाजीराजे हे संस्कृत विषयाचे गाढे पंडीत होते.
*आख्याति लिखितुं यावदाचार्यो ।*
*तावद द्वितियपेश्ये विलिख्य तमदर्शयेत ॥*
कवी परमानंद आपल्या ग्रंथात सांगतो शिवरायांना पहीला वर्ण शिकविला तोपर्यत (त्याअगोदरच ) ते दुसरा वर्णही लिहून दांखवत असत येवढी विदवत्ता बालपणीच शिवरायामध्ये होती .
वयाच्या ११ व्या वर्षी शिवराय' सनय ' झाले म्हणजे एका राजा होण्यासाठी जी पात्रता लागते ते सर्व गुण अवघ्या बालवयात त्यांनी धारण केले . राजा बनन्याची पूर्ण क्षमता असलेले पूर्ण संस्कार उभयतांनी त्यांच्यावर केले .प्रत्यक्ष युद्धतंत्र,राज्यकारभार,प्रजापालन,कृतज्ञता व नैतीकता हे संस्कार घरातच झाले . व पुण्यात वयाच्या १२ व्या वर्षी अमात्य,धनदौलत,सैन्यासह दाखल झाले . शहाजी राजे यांनी दिलेला भगवा ध्वज व स्वराज्याचा अर्थ सांगणारी राजमुद्रा ही ह्याच शिवराज्यभिषेकाची एका रयतेच्या स्वातंत्र्याचीच पहाट होणार असल्याचीच नांदी होती . हा आत्मविश्वास शहाजीराजे आणि जिजाऊ यांना होता .सोन्याचा नांगर चालवून उध्वस्त केलेली शापीत जागा पुण्यभूमी केली . रयतेच्या डोळ्यात स्वराज्याचे स्वप्न तरळू लागले .पुण्यात स्वराज्याची' साक्ष देणारा लाल महाल उभा राहीला . भूमी कसणारी हातं अधिक जोमाने कामाला लागली व बळकट झाली व प्रसंगी स्वराज्यासाठी हाती शस्र घेण्यास सज्ज होऊ लागली .मन -मस्तक -मनगट मजबूत होण्याचे काम सुरू झाले . सहयाद्रीच्या साक्षीने बारा बलुत्याना एकवटून गट -तटाचे वाद तंटे मिटवून ,जे आले त्यांच्या सह जे आले नाही त्यांच्याविना या स्वराजकार्यास सुरूवात झाली .शिवरायांनी तोरण्यावर स्वराज्याचे तोरण बांधून हया गिरिदुर्गाच्या साक्षीने भगवा ध्वज फडकू लागला .
शिवरायांचे धाडस,शौर्य,बुंध्दीचातुर्य या जोरावर अनेक किल्ले स्वराज्यात जोडल्या गेले .हे संपूर्ण राज्य रयतेचे आहे या भावनेने हे स्वराज्य उभे केले विश्वासानं माणसं जवळ आली प्रसंगी प्राण देण्यासही मागे हटली नाही .लाख मेंले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहीजे ही भावना कृतीतून निर्माण झाली .स्वराज्याच्या रक्षणार्थ राजांनी गड किल्ले निर्माण केले . त्या गडाची निमिर्ती कार्य त्यांचे दिलेली नावे ही सार्वभौमत्व लोककल्याणकारी कार्याचीच साक्ष देतात . १६५६ मध्ये अरजोजी यादवाच्या वास्तुस्थापत्य कलेतून बांधलेला प्रतापगड १६५९ साली आलेले अफजलखानाच स्वराज्यावरील संकट परतावून लांवतो हे शिवरायांचे पुर्वानुमान कौशल्य कीती अगाध होते हे सांगून जाते .गड कोठे व का बांधावा हे तंत्र लक्षात येते .१० नोव्हे १६५९ ला अफजलखान संपतो,जीवाजी महाला,संभाजी कावजी व अन्य मावळ्याच्या पराक्रमाने व शिवरायांच्या युध्दतंत्राने शिवप्रताप घडतो येवढयामोठया विजयाचा कोणताही जल्लोश न करता शिवराय ११ नोव्हे ला लगेच पन्हाळगडाच्या मोहीमेवर निघतात व सातारा मार्गे जात अवध्या १८ दिवसात पन्हाळ्यावर स्वराज्याचा भगवा फडकवितात ही एका श्रेष्ट प्रजाहीतदक्षतेसाठी सदैव झटत असलेल्या छत्रपतीची घोडदौड होती .
शिवराय १८३०६ दिवस जगले त्यांचे बालपणीचे दिवस सोडले तर इतर दिवस केवळ अन केवळ रयतेच्या कल्याणार्थ झटतच राहीले .
सिध्दी जोहर स्वराज्यावर चालून आला त्या वेळेस शिवराय मिरजेच्या वेढयावर होते ते तेथून सुरक्षित राजगड,रायगड किंवा प्रतापगडावरही जाऊ शकत होले पण आपण स्वतःपन्हाळ् गडावर जाऊन स्वत्तःला वेढयात अडकवून घेतले सिध्दी स्वराज्यात न घुसता पन्हाळ्याकडे वळला रयतेला होणारा त्रास त्यांनी स्वतः जीव धोक्यात घालून थांबविला .शिवा काशिदांसारखी,विठोजी काटे,शंभूसिह जाधव,बाजीप्रभू देशपांडे ,जवळपास ३०० बांदल देशमुख मंडळी लाखाचा पोशिंदा जगविण्यासाठी कामी आली .
याच वेळी शाहीस्तेखानाच संकट लाखाचं सैन्य घेऊन चालून येत होत ,फिरंगोजी नरसाळे चाकण धैर्याने राखत होते त्या वेळी राजगडावर राहणाऱ्या शिवाजी राजांच्या आई जिजाबाई ह्या हातात तलवार घेऊन सज्ज झाल्या होत्या हे खालिल श्लोकात परमानंद सांगतात .
*जननि शिंवराजस्य सा राजगिरी वर्धनी ।*
*जिजानां गिरीदुर्गनामवने वहिता भवत् ॥*
अशी ही महान माणसे लोकल्याणार्थ सिद्ध झाली होती . शिवचरित्रातील प्रत्येक प्रसंग अन्याय अत्याचाराविरूध्द लढण्यासाठी स्वाभिमान निर्माण करणारा आहे .पुढे महाराजांनी पुरंदरवरील संकटही मोठया धैर्याने ,चाणक्षतेने व अखंड सावधानता बाळगत परतवून लावले .
या स्वराज्याच्या कामात मुरारबाजी ,तानाजी मालुसरे सह अगणित ज्ञात अज्ञात मावळ्याचे बलिदान दुर्गदुगैश्वर रायगडाची उंची आभाळाच्याही वर टेकवून गेली .
आई जिजाऊंच्या आज्ञेने शिवरायांनी राज्यभिषेकाची योजना आखली . भोसले कुळवंशीयांचे अथक पारिश्रम ,मावळ्याचे बलीदान यावर उभे राहिलेले राज्य ,६ जून ला क्षत्रियकुलवंत सिहासनाधिश्वर छत्रपती शिवरायांच्या रूपाने एका ऐतिहासिक पर्वास सुरूवात झाली .
३२ मन सोन्याच्या सिहासनावर आरूढ होऊन स्वतंत्र राज्यकारभारास सुरूवात झाली . स्वंतत्र कालगणना शिवराज्यभिषेक शक सुरू करून शिंवराय शककर्ते झाले .समस्त मानवजातीचा उद्धार होईल अशी दिर्घकालिन धोरण व रचनाकरणार नितीवंत राजा रयतेला मिळाला .स्वतंत्र शद्बकोषाची निर्मिती,शिवराईची निर्मिती,स्वतंत्र शेतसारा धोरण,कृषी,पर्यावरण,जलव्यवस्थापण,न्यायव्यवस्था,व्यापार,आरमार,लष्कर,महसूल आदि लाेककल्याणकारी बाबी ह्या अधिक धोरणात्मक पद्धतीने छत्रपतीच्या आदेशाने अधिक प्रभावी राबविल्या जाणार हा आनद स्वराज्याचा प्रत्येक माणसाच्या मनात होता . प्रशासनात न्याय दंड आदी बाबीमध्ये अधिक सरलता निर्माण करणारा हा सोहळा होता .देशभरातून ,विदेशातून हया सोंहळ्यास हजारो महत्वाच्या व्यक्ती छत्रपतीच्या राज्यभिषेकास हजर होत्या .मराठा साम्राज्याच्या सार्वभौमत्वाचा ,रयतेच्या आनंदोत्सवाचाच हा सोहळा होता .आई जिजाऊंच्या डोळ्यातील एक एक आनंदाश्रु त्याची साक्ष देत होता .रायगडावर राज्यभिषेकापूर्वीची ती रात्र अगदी रोशनाईने दुर्गेश्वरास झळाळून टाकणारी होती .गडावर येणाऱ्या प्रत्येक मावळ्याचं या स्वराज्यासाठी खूप मोठ योगदान होत .हजारो मावळ्याच्या बलीदानाने शेकडो वर्षाची गुलामगिरी मोडीत काढणारा हा सुवर्ण क्षणत हत्ती ,घोडे,पालख्या,नजराने,रोशनाईने अजूनच उजळून आला असेल.
क्षत्रियकुलवतंस महाराजाधिराज सिहासनाधिश्वर छत्रपती शिवाजी महाराज या सुवर्णदिनी अभिक्षिक्त राजे म्हणून ३२ मन सोन्याच्या सिहासनावर आरूढ झाले शिवरायांना सार्वभौम राजे म्हणून विश्वात अधिकृत मान्यता मिळाली अदिलशाही,निजामशाही,मोगलशाहीच्या तख्ताला या मराठयाचा इतिहासातील सुवर्णक्षणाने हादरा दिला .या क्षणानंतर सामाजिक,राजकीय,सांस्कृतीक क्षेत्रात आमुलाग्र बदल होऊन स्वराज्याची महती सपूर्ण विश्वात पोहचणार होती . याची प्रचिती शिवरायांच्या दक्षिण दिग्वीजय मोहीमेवरुन येते.
म्हणून ही गोष्ट काही सामान्य राहीली नव्हती शिवराज्याभिषेक एक अलौकीकअजरामर घटना ठरली.
*माता -मातृभूमी -माणसे* या त्रिसूत्रीवर आधारलेल स्वराज्य अन्याया विरूद्ध पेटून उठण्याची प्रेरणा देंत राहते .
जय जिजाऊ
जय शिवराय
*संजय खांडवे*
*बुलढाणा*
*9011971122*






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा