शनिवार, २१ मार्च, २०२०

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांची माझी जीवनगाथा :अल्प परिचय




प्रबोधन कार केशव सिताराम ठाकरे  म्हणजे महाराष्ट्राच्या  धार्मिक,सामाजिक,राजकिय,सांस्कृतिक,साहित्य क्षेत्रात आलेले वादळच म्हणता येईल अस कोणते क्षेत्र त्या काळात तरी उरले नव्हते असेच म्हणता येईल त्यांनी  ,कला,साहित्य,नाटक,चित्रपट,वृत्तपत्र,छायाचित्रकार,शिक्षक,टंकलेखक,वक्ते,विचारवंत,इतिहासकार,पटकथा संवादलेखक आदि क्षेत्रामध्ये त्या काळात फार मोठे कार्य केलेले आहे
    प्रबोधनकारांचे चरित्र खूप प्रेरणादायी वाटते सुरूवातीस प्रबोधनकाराबद्दल केवळ ऐकूण होतो पण त्यांचे साहित्य वाचत असतांना प्रबोधनकार म्हणजे एक विद्यापिठच वाटू लागले .प्रबोधनकार म्हणजेच शिवसेना प्रमुख मा बाळासाहेब ठाकरे यांचे वडील या ठाकरे घराण्याने महाराष्ट्राला बरच काही दिलय !
     याच उत्सुकतेतून प्रबोधनकांरांचे समग्र वाड़मय भाग एक हाती घेतला व वाचायला सुरुवात केली यामध्ये एकूण २१ प्रकरणे आहेता विभागवार तपशीलासह मांडणी आहे .कुसुमाग्रजांची प्रस्तावना लाभलेली आहे त्यांत त्यांनी "समाजपरिवर्तनाची ध्वज खांद्यावर वाहणारे हे व्यक्तीमत्व किती मनस्वी बहुरंगी आणि होते जिद्दीचे होते याचा प्रत्यय या आठवणीवरून येतो " प्रारंभीच्या काळात दारीद्राचे दशावतार बघावे लागले अनेक आघात सहन करावे लागले ,अनेक व्यवसाय स्वीकारावे लागले असे सांगतात
    कुसुमाग्रजांनी सांगीतलेल एक वाक्य प्रबोधनकारा बाबत मनात नितांत आदर अन उर्जा देणारे वाटते ''आर्थिक विवचंना असतानाही त्यांनी आपली लेखनी द्रव्यासाठी व सन्मानासाठी कुणाच्या स्वाधीन केली नाही "
या पुस्तकातून असंख्य गोष्टीचा उलगडा होताना दिसतो आज प्रबोधनकार के सी ठाकरे यांची जयंती त्यांना विनम्र अभिवादन करून त्यांचे प्रेरणादायी जीवनगाथा जरुर वाचावी...........

तुर्ताच एवढेच ........
प्रबोधनकारास मानाचा मुजरा


       
     

शुक्रवार, २० मार्च, २०२०

जंजाळा किल्ल्यावरील त्या शिल्पाचा गोंडवाना राज्याशी जुळलेला काय इतिहास असेल ? एक भ्रंमंती मधील प्रश्न

 जंजाळगडाचा वेताळगडाकडे जाणारा दरवाजा
 गडावरील मुख्य इमारती वरील हत्तीवर सिह स्वार असलेले शिल्प
 महादरवाज्याकडे दरीतून जाताना
 महादरवाज्याकडे जातांना
   गडावरील दक्षिण बाजूस असलेला तलाव
 गडाच्या मध्यभागी असलेला राणी महलचा भाग
  हत्तीवर सिंह स्वार असलेले शिल्प
 सय्यदपीर बाबा दर्गा जवळ लेखअसलेले शिल्प

 सय्यदपीर बाबा दर्गा जवळ असलेला तलाव
                         गडाचा मध्य भाग
                       गडावर भ्रंमती करतांना


             दक्षिणेकडील गडाचा दरवाजा
सायंकाळी गडउतार होताना
गोंडवाना राज्याचे चिन्ह या प्रकारचे आहे





जंजाळा किल्ला /वैशागड /तलतम गड

वेताळगड -रुद्रेश्वरलेणी हा प्रवास करत दुपारी ३ वाजता वेताळवाडी गावात आलो व सोयगावकडे निघालो वाटेत एका ठिकाणी बऱ्याच प्राचीन समाध्या दिसल्या .त्या कुणाच्या असतील हया हेतूने जाणुन घ्यावे म्हणून आम्ही चौकशीसाठी थांबलो  ,त्या ठीकाणी स्थानिकानी काही माहीती समाधानकारक दिली नाही पण तुम्ही जंजाळा किल्ला आता जाऊ शकता असे सांगितले म्हणून आम्ही निघालो.
           हळदा -अंभई -विरगाव -जंजाळा गाव असा दिड तासाचा प्रवास करत जजाळा गावांत पोहचलो .गावातून किल्ला सहज दिसतो त्या गावातून पाहताना किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील वाटत नाही कारण इतर तीन बाजूला हा गिरीदुर्ग आहे गावात पुरेसे पाणी सोबत घेऊन शेतामधून वाट काढत ,अगदी गाडी खाली बऱ्याच ठिकाणी घासत आम्ही किल्ल्याच्या जवळपास पोहचलो ,शेतात काम करणारी माणस आमच्याकड कुतुहलाने बघत होती ,या किल्याकडे कुणीही भटकत नसावं हा आमचा अंदाज खरा ठरणार याची यात्री आम्हाला दक्षिण बाजूचे प्रवेश द्वार पाहून झाली .प्रचंड तटबंदी मधून हा दरवाजा आहे पण दरवाज्याचे अवशेष मात्र दिसत नाही .या ठिकाणावरून पुढे गेले की गडाचा पूर्ण भाग दिसायला लागतो गडाच्या पूर्व व पश्चिम बाजूस खोल दऱ्या दिसतात ,पश्चिमेकडील बाजू चढण्यास फार कठीण आहे ,गडाची ही एक भक्कम बाजू आहे या बाजूने शत्रु चालून येणे अशक्यच ! पूर्वबाजूस वेताळगड पूर्ण दिसतो ,अगदी त्या गडावरील बहुतेक हालचाली सहज समजत असाव्यात असे वाटते .संपूर्ण गडाला मजबुत अशी तटबंदी असावी ,कारण काही ठीकाणचे अवशेष सोडले तर तटबदी आजही शाबुत आहे . 
      दक्षिण बाजूला सुरुवातीलाच एक तलाव आहे मार्च मध्येही या तलावात बरेच पाणी होते त्या भागातील व जंगलातील प्राणी या ठिकाणी पाण्यासाठी येतात . तलावाच्या काठापासूनच दाट झाडीत जुन्या इमारतीचेच अवशेष दिसतात .गडावर पूर्वी फार मोठी वस्ती असावी असे यावरुन दिसते .आम्हाला पूर्वबाजूस म्हणजे वेताळवाडी किल्याच्या बाजूला दाट झाडीत गडाचा प्रचंड असा दरवाजा दिसला ,आम्ही तटबंदीमधून रस्ता काढत दरीत उतरलो व पाऊलवाटेचा आसरा घेत दरवाज्या पर्यन्त पोहचलो .दोन्ही बांजूने प्रंचंड बुरुज व आत गेल्यावर उत्तरेकड उघडणारी दरवाज्याची कमान दिसली ,दोन्ही बाजूने इमारती ,त्याखाली गुप्त असलेली मोठी खोली होती आत काय असेल याची खात्री नाही कारण जगली भाग आणि आजूबाजूला कुणीही गडावर वावरणारे किवा स्थानिकही नाही ,कोरिवकाम केलेले दगड खाली पडलेले ,त्यामधून झाडे वर आलेली,दरवाजा सुद्धा झाडाझुडपानी बंदीस्त होता  आम्ही पुढे निघालो ,व बालेकिल्यासारखा दोन मोठया बुरुजावर पडक्या इमारती होत्या ,त्या बुरुजाच्या अवतीभोवतीसुद्धा काही बांधकामाचे अवशेष तेथे होते .
  गडावरील त्या बांलेकिल्ल्याच्या बुरुजावर एक शिल्प होते यात सिहाने आपल्या पंजामध्ये हत्तीला पकडलय  ! (हत्तीवर सिंह स्वार) याविषयी पुढे आम्ही जी माहीती घेतली की या प्रकारचे शिल्प हे प्राचीन गोंडवाना राज्याचे राज्य चिन्ह आहे . आमच्या सोबत मोहीमेत असणारे आमचे मित्र राजेश साळवे सरानी हे खात्रीपूर्वक सांगितले .गोडराजाचे मध्यभारतात मोठे साम्राज्य होते .या गडाच्या इतिहासाबाबतीत आम्हाला असलेल्या माहीती नुसार १५५३ मध्ये अहमदनगरच्या बुऱ्हाननिजामशहाने हा जिंकला व त्यानंतर १६३१ मध्ये शहाजहानने जिंकला अशी माहीती मिळते या किल्ल्यावरुन दुरवरचा भाग न्याहळता येतो विस्ताराने मोठा असलेल्या या किल्ल्याला जरंडीगावाच्या बाजूने ,सोयगावच्या बाजूने ,वेताळगडाच्या बाजूने व जंजाळा गावाच्या बाजूने दरवाजे आहेत फारशी भाषेतील  तीन अोळीचे शिलालेख ही आढळतात .स्थानिकाच्या माहीतीनुसार ५२ बुरुज या किल्याला आहे.एक चोर दरवाजा ,राणी महल,पडक्या सहा खोल्याचा वाडा  ,सय्यद कबीर पीर दर्गा, तीन पाण्याचे तलाव या ठिकाणी आहे. आम्ही त्या पडक्या राणी महलापासून पुढे गेलो, दाट झाडीमधे छत कोसळलेला सहा खोल्यांचा वाडा दाट सिताफळाच्या झाडी उगवलेल्या अवस्थेत होता . तेथून पूर्वेला प्रचंड दोन झाडे भिंतीवर घेऊन उभी असलेली एक चांगल्या स्थितीमधील इमारत दिसली .थोड चालत गेल्यावर पूर्व दिशेला तोंड असलेले प्रचंड नक्षीकाम असलेले ते प्रार्थनास्थळ असावे समोरच गडावरील दुसरा तलाव आहे .
   सूर्य मावळंतीला आला होता अंधार पडू नये म्हणून आम्ही परतीच्या प्रवासाला म्हणजे गडउतार होण्यास निघालो वाटेत गडावरील सय्यदपीर बाबाचा दर्गा लागला तेथेच फारशी भाषेतील शिलालेख आहे . बाजूलाच खोल खोदलेला पाण्याचा गडावरील तिसरा तलाव आहे .अंधार पडत चालला होता तेथून आम्हाला वाकाटक काळातींल ,पाचव्या शतकातील घटत्कोच ही बौध्द लेणी खुणवत होती ,जजाळा गावापासुन अर्धा तास पायी अंतरावर होती पण अंधारा मुळे पुढच्या मोहीमेतील एक भाग म्हणून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो..............


क्रमशः

संजय खांडवे
बुलढाणा
9011971122

मंगळवार, १७ मार्च, २०२०

सहस्त्रकरविक्रम स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले

➖➖➖➖➖➖
महाबली शहाजीराजे
➖➖➖➖➖➖
🙏🙏🙏🙏🙏🙏
शहाजीराजे पाच वर्षाचे असताना मालोजीराजे यांचे एका युद्धात निधन झाले मालोजीराजे नंतर त्यांचे बंधू विठोजी राजे यांनी शहाजी आणि त्यांचे बंधू शरीफजी यांचा सांभाळ केला
   शहाजी आणि शरीफजी यांच्या नावाने राज्य चालविले
     परमानंद हे शिवरायांच्या समकालिन ग्रंथ शिवभारतमध्ये म्हणतात मालोजीराजे यांचे पुत्र शहाजी हे हे वरांसाठी आवश्यक असलेल्या गुणांनी लक्षणांनी युक्त होते ते दानवीर,दयावीर, युद्धवीर आणि महान ओजस्वी होते"
    परमानंदांनी शिवभारतात शहाजीराजांच्या अनेक पैलूंविषयी नोंद केलेली दिसते यामध्ये हे त्यांना इंगित तज्ञ, सुधी म्हणजे उत्तम बुद्धि असलेले, पटू ,आत्म प्रतापी, विविध विजयश्रीचे निवासस्थान असणारे, मोठे चिलखत धारण करणारे, महोत्सायी ,मानीआणि गरुडाप्रमाणे शक्ती असलेले ले असे वर्णन केलेले आढळते.

     शहाजी राजांनी शिवरायांना पुण्याकडे पाठविले त्यावेळेस शहाजी राजांचे द्रष्टेपण कसे व्यक्त झाले हे सांगताना परमानंद त्यांना अर्कद्युतिमत (सुर्याच्या तेजाने युक्त )अर्कज्ञ (सूर्याला जाणनारे) अशी विशेषणे लावली आहे .
     शहाजीराजांनी कर्नाटक प्रदेश कसा जिंकला ते सांगतांना परमानंद म्हणतात शहाजीराजांनी षाड़गुण्याचा प्रयोग करुन आणि विविध प्रकारच्या* सल्लामसलतीच्या जोरावर कर्नाटक प्रेद्श आपल्या नियंत्रनाखाली आणला . शिवाय तिकडचे राजे सुध्दा त्यांच्या सल्याने वागत असल्याचे परमानंदानी नोंदवीले आहे"
    "त्या त्या प्रसंगी योग्य ठरेल  अश्या सल्लामसलतीचा प्रयोग करणाऱ्या बुध्दीमान शहाजीराजांच्या प्रभावामुळे खूप लोकांनी यवनापासून निर्माण झालेले भय टाकून दिले "
➖➖➖➖➖➖➖

षाड़गुण्य
षाड़गुण्य म्हणजे सहा गुणांची अवस्था
संधी
म्हणजे तह करने
विग्रह
म्हणजे सघर्ष वा युद्ध करणे
यान
म्हणजे शत्रुवर केलेली स्वारी
आसन
म्हणजे प्रत्यक्षरित्या कोणतीही हालचाल न करता परिस्थितीचे निरक्षण करत शांत राहणे
सश्रय
म्हणजे गरज पडल्यास आपल्यापेक्षा अधिक बलवान राजाचा आश्रय घेणे
द्वैध
रक्षणासाठी वा आक्रमणासाठी सैन्याच्या दोन आघाड्या करणे 
  या वरील सहा गुणांचे केवळ आंधळेपणाने नव्हे तर आपल्या शत्रुची विविध प्रकारची बळाबळे ,हेरामार्फत मिळालेली माहीती,भौगोलिक परिस्थिती,रणभूमीचे स्वरूप,नैर्सगिक वातावरण,आपल्या शत्रुची राज्यातील आंतरिक परिस्थिती, पिछाडीच्या सरक्षणाची व्यवस्था,यशापयशांची संभाव्यता,इ योग्य त्या गोष्टीचा विचार करुन साथीदाराच्या सल्लामसलतीवर शहाजीराजाकडे ही गुणवत्ता होती .
       सपूर्ण दक्षिण भारतात त्यांनी आपला एक दरारा निर्माण केला होता . शिवरायांनी पुढे स्वराज्य स्थापण केले ,तेव्हा त्यांच्या वडीलांचा दरारा त्यांच्या पाठीशी होता,याचा अर्थ शहाजीराजांनी एकीकडून स्वराज्याची पार्श्वभूमी तयार केली आणि प्रत्यक्ष स्वराज्य स्थापण करणाऱ्या आपल्या पुत्राच्या भोवती अदृष्य स्वरूपात  एक सरक्षक कवचही निर्माण केले .
     सहस्त्रकरविक्रम असलेल्या शहाजीराजांच्या अनेक पराक्रमांची नोंद परमानंदांनी  शिवभारतात केलेली आढळते . 
         शहाजीराजांनी शिवरायांना वयाची ११ वर्ष पूर्ण झाल्यानंतर सनय करुन पुण्याकडे पाठविले
"शाहवर्मा (क्षत्रिय शहाजी) हे सूर्यासारखे तेज असलेले द्रष्ठे राजे होते . शिववर्मा (क्षत्रिय शिवरायांना)यांना जेव्हा बारावे वर्ष लागले ,तेव्हा त्यांनी शंभूच्या शिवलक्षणी अश्या धाकटया भावाला बोलावून घेतले आणि त्याला पुणे प्रांताच्या प्रमुख पदी नियुक्त केले"
असे परमानंदानी नोंदविले आहे .

स्वराज्य संकप्लक शहाजीराजे यांना मानाचा मुजरा
➖➖➖➖➖➖➖

संदर्भ
➖➖➖➖➖➖➖
शिवराय:संस्कार आणि शिक्षण
➖➖➖➖➖➖➖
शद्बाकंन
संजय खांडवे
➖➖➖➖➖➖➖


।१९ फेब्रु १६३० शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला .१६३३ पर्यन्त ते शिवनेरीवरच होते .१६३३ ते १६३५ पर्यन्त जिजाऊसह शिवराय सिंदखेडराजा येथे वास्तव्यास होते .वर्ष दिड वर्ष ते खेड शिवापूरला बापूजी मुदगल यांच्या वाडयात होते पुढे १६३८ ते १६४१ या पाच वर्षात महाबली शहाजीराजे सह कर्नाटकात कंपीली आणि बंगळूर या ठिकाणी होते.हा ११ वर्षाचा काळ म्हणजे शिवरायांचा मुख्य जडणघडणीचा काळ होय .याच काळात जिजाऊ _शहाजीराजे यांनी शिवरायांवर संस्कार केले .तेच त्यांचे गुरू होय .कर्नाटकात शिवरायांच्या शिक्षणाची व्यवस्था शहाजीराजे यांनी आपल्या संकल्पणेतील स्वराज्य समोर ठेवूनच केली .राजनिती,युद्ध कौशल्यासह ते स्वतः संस्कृत विषयात पंडित होते .
   परमानंदांच्या नुसार शिवराय "सनय "हे विशेषण लावले जाते .शहाजीराजे यांनी सनय बनवून शिवरायांना पुण्यास पाठविले .सनय हा शब्द वर -वर पाहता साधा वाटत असला तरी प्रांचीविद्यापंडित  आ ह साळुखे सरांच्या अभ्यासानुसार 'नय' या शद्वाचा वामन शिवराम आपटे यांच्या कोशामधे मिळणारे अर्थ खालिल प्रमाणे आहेत . Guiding, leading managing, behaviour, course of conduct, way of life, prudence, foresight, policy, political wisdom, statesmanship, civil administration, state policy, morality ,justice retitude, equality , plan, design, scheme, maxim, principal ,method, system, doctrine, opinion
याचा मराठीत अर्थ सामान्यपणे मार्गदर्शन, नेतृत्व ,व्यवस्थापन, वागणे, वर्तन शैली, जीवनशैली ,दूरदर्शीपणा, द्रष्टेपणा ,धोरण ,राजकीय शहाणपण ,राजनीति तज्ञता, मुलकी प्रशासन, राज्य धोरण, नैतिकता, न्याय ,सत्य आणि न्याय यावर एकनिष्ठता, सर्वांना समान न्यायपूर्ण वागणूक ,योजना, भावी गोष्टीचा आराखडा, नियोजित प्रकल्प, अनुभवातून प्राप्त करून निश्चित केलेले नियम, तत्व, कामकाजाची पद्धत ,व्यवस्था, सिद्धांत आणि मत  असे अर्थ येतात यावरून किती विविधअंगानी शिवरायांची जडणघडण शहाजीराजे यांनी केली होती हे दिसून येते. याच काळात कर्नाटकी मुककामात १६४० मधे शिवाजी महाराजांचा विवाह निंबाळकर,पवार घराण्यात करून आपल्या आजोळचा जिव्हाळा जोपासत आपसातील संबध दृढ केल्याचे दिसते . पुण्याच्या जहागिरीचा प्रशासकिय कारभार "प्रतिपचंद्ररेखेव"या शिक्याचा उपयोग करून शिवाजीराजे यांच्या नावे सुरू झाला .शहाजीराजे यांच्या अधिकारक्षेत्रात पुणे,इंदापूर,सुपे,चाकण व बारामावळ प्रांताची व्यवस्था शहाजी राजे यांनी लावून दिली होती .दादोजी कोंडदेव हा दिवाण सुबेदार म्हणून शहाजीराजे यांच्या सेवेत होता .याशिवाय विसापूरात बिलाल हबशी,चाकण येथे फिरंगोजी नरसाळा,सुभे प्रांतात संभाजी मोहिते व पुंरंदर येथे नीळकंठराव या आपल्या विश्वासातील माणसांची पोटमुकासदार म्हणून नेमणूक केली होती .या मुलुखातून येणारे उत्पन बाल शिवबा व जिजाऊंस स्वराज्यकार्यात उपयोगी पडत असे अशी रचना दूरदृष्टी ठेवत आपल्या बुध्दीकौशल्यावर शहाजीराजे यांनी निर्माण केलेली दिसते .

स्वराज्य संकप्लक शहाजीराजे यांना मानाचा मुजरा


रविवार, १५ मार्च, २०२०

समाजातील अंधश्रद्धा व संतांचे विचार


समाजातील अंधश्रद्धा व संतांचे विचार
〰〰〰〰〰〰〰
समाजाच्या   विकासातील एक प्रमुख अडथळा म्हणजे समाजात पसरलेली अंधश्रद्धा, श्रद्धा असावी पण  ती आंधळी नसावी पण आपल्याला अंधश्रद्धेने प्रचंड प्रमाणात बंदिस्त केलेले दिसते बरेचसे विकासाचे मार्ग हे या अडथळ्यांमुळे ध्येयापर्यंत उशिरा पोचवतात अन आपला माणूस मागे पडतो
आजच्या काळात यशस्वी समजतात जो आर्थिक दृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या मजबूत आहे मग तो इतर क्षेत्रात आपोआपच  समोर जाताना दिसतो पण दोन्हीसाठी तो मानसिक दृष्ट्या निरोगी असेल,त्याची वैचारीक बैठक मानवीमूल्य जपणारी असेल तर त्याला यशाचे अधिक अगं सापडतात त्याच्या विचारांच्या कक्षा रुंदावतात तो संकुचित राहत नाही आणि तो समाजाकडे  सकारात्मक दृष्टीने  बघायला लागतो,यात समाजाच्या हिताच्या दृष्टीने तो सरसावतो,
आपला इतिहास सांगतो की स्वराज्य स्थापनेसाठी जिजाऊंनी पुणे वसविले व त्या ठिकाणची फुटकी  कवटी चप्पल  व पहार शिवरायांच्या हाताने उध्वस्त करुन त्याठिकाणी बाल शिवबाच्या हाताने सोन्याचा नागर चालविला ती भूमी कसायला मुक्त केली व त्याठिकाणी वस्ती करून पुणे शहर वसविले आणि खऱ्या अर्थाने अंधश्रद्धेला मुठ माती देण्याचं काम जिजाऊंनी व शिवबा यांनी मिळून केले शहाजीराजांनी  पूर्वी पासून कल्पिलेल्या स्वप्नाला  उभारी मिळाली. समाज ,रयत भयमुक्त करण्याचे पहिले काम आऊसाहेबांनी शिवबांना सोबत घेऊन केले ,नाहीतर आज रस्त्याने साधा लिंबू दिसला तर आई लेकराला बाजूने घेऊन जाते या मानसिकतेतील तुम्ही आणि आम्ही आहोत.

आपल्या समाजात सुरु असलेल्या रूढी व परंपरा या फार या जुन्या आहेत बहुतेक परंपरा आपली  स्मृति जपणाऱ्या आहेत संस्कृती जपणाऱ्या आहे पण कालानुरूप काही रूढी घुसविलेल्या किंवा प्रवाहानुसार आलेल्या दिसतात.त्याची चिकित्सा करून त्या बाजूला करणे अत्यंत महत्वाचे वाटते,मुळात आपली संत परंपरा हेच सांगते,बाराव्या शतकापासून नामदेव -ज्ञानदेव -तुकाेबांच्या भागवत धर्माची पताका ही जनमानसात सामान्याची प्रबोधनाची दिशा दाखविणारी ठरली .
         समाजाला खऱ्या अर्थाने या संत विचारांचा आधार घेऊनच समाजात विकासात्मक व सकारात्मक परिवर्तन होणे शक्य आहे .समाजातील अंधश्रध्देवर याच विचारांनी प्रहार केले ,शोषणमुक्त समाजासाठी हीच संतपरंपरा झटती मध्ययुगीन काळात भारतातील जुलमी शासनकाळात ह्याच संतपरंपरेने स्वातंत्र्यांची ज्योत जीवाची पर्वा न करता तेवत ठेवली .
         जनमानसात ,घराघरापर्यन्त पोहचलेले अन मुखोतगत झालेले तुकाेबांचे अभंग हाच समाज परिवर्तनासाठी सर्वात सोपा मार्ग वाटतो,प्रत्येक घरात तुकाेबांची गाथा असणे अत्यंत आवश्यक वाटते,तुकोबांची शब्दरत्ने ही खूप महत्वाची मानवी मूल्ये ,नैतिकमूल्ये जपणारी आहेत ,अगदी जन्मापासून मृत्युपर्यन्त जीवनातील प्रत्येक पैलूवर अगदी निर्भिड भाष्य आढळते .
        *आजच्या काळात माणूस परिर्वतन आपल्या सोईने स्वीकारतो व घोळ होतो,सुईच न घेता सोईच स्वीकारतो* आधुनिकतेच्या गप्पा मारणारे आपण आपल्या मूळच्या आदर्शोंना विसरतो,वास्तवतेला विसरुन कल्पना विलासातील बाबी खऱ्या मानायला लागतो मग श्रद्धा-अंधश्रध्देचा घोळ होतो . मानवी स्वभावच असा आहे की तो अदभूत,विलक्षण,चमत्कारीकबाबीकडे वास्तविक गोष्टीपेक्षा अधिक आकर्षित होतो व त्याच्या कुतुहलाच्या कल्पनाविलासात गुंग होतो .तुकाेबांचा गाथेत वास्तविकता आहे ती समाजाभिमूख ,विज्ञानवादी मन मनाला भिडणारी आहे .
      जगतगुरू तुकोबांचे सपूर्ण चरित्र हे प्रेरणादायी आहे
*कासाया एकांत सेवू वाडा ।*
*आनंद तो जनमाचि असे ॥*
  मी जंगलात एकटा राहून काय करू ,मला खरा आनंद या समाजात राहण्याचा आहे व मी त्यासाठी झिजेल हे तुकोबांचे विचार समाजातील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकुटुंबासह पर्यायाने समाजालाही तारणारे आहेत . जगण्याचा समाजाभिमूख मंत्र तुकाेबांनी आपल्या गाथेतून दिला आहे .स्वतःच्या संसाराबरोबर समाजाचाही संसारासाठी तुकोबांनी आपल्या आयुष्याची ४२ वर्ष घालविली .गाथेतीत प्रत्येक अभंग प्रेरणादायी आहे समाजातील अंधश्रद्धा घालवायची असेल ,भयमुक्त समाजव्ययस्था बघायची असेल तर तुकोबांचे प्रत्येक अभंग संदर्भ ,आशय व विवेचनासह तरूणापर्यन्त घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यन्त पोहचने  व कुटुंबात सामुहीक बसून त्यावर चर्चा करने गरजेचे वाटते .
*आता आम्हा भय बा कुणाचे ।*
*बळ विठोबाचे आले ऐसे ॥*
अश्या पध्दतीने तुकाेबांनी जनमानसात विठोबा पाठीराखा करून सामान्याना अध्यात्मिक बळ देण्याचे काम केलेले दिसते.
         *तुका म्हणे माना मान ।*
*हे बंधन नसावे॥*
     मान अपमानाचे बंधन नसावे ,हे घातक आहे यामुळे समाजातील नाती तुटतात .समाजात मान -पानाच्या असंख्य प्रथा आहेत यातूनच आपण दुरावत जातो ,संकुचित होतो हा ४०० वर्षापूर्वीचा संदेश आज समाजात जाणे गरजेचे वाटते.
   असे हजारो अभंग आहेत की जे प्रेरणादायी व जीवन सफल करणारे आहेत याचे प्रवचन नाही तर घरा-घरात चिंतन होणे गरजेचे आहे .
कुंटुंबस्तरावर एक संस्काराचा भाग म्हणून तुकाेबांची गाथा महत्वाची  आहे .
तुर्तांच येवढेच ........!
तुकोबांचे अभंगांचे विवेचन पुढे असेच सुरु ठेवू या !



संजय खांडवे
बुलढाणा
९०११९७११२२

शुक्रवार, १३ मार्च, २०२०

कळसुबाई शिखर

                                                                  कळसुबाई शिखर

शिखराच्या मध्यभागी कळसुबाईचे देऊळ आहे भगवा रंग आणि गोल घुमट असलेलं मंदिर आपलं  लक्ष्य वेधून घेत, मंदिरा शेजारी त्रिशुंलं आणि काही घंटा बांधलेल्या आहेत ..मंदिराच्या आत बसून देवीचं दर्शन घेतलं एका वेळेस दोन जण बसतील एव्हडीच जागा आत आहे

          
कळसुबाई आणि हरिश्चंद्रगड यामध्ये मोठे घनदाट अभयारण्य आहे. येथे बिबट्या, कोल्हे, रानडुक्कर, नीलगाय, ससे, भेकरे, सांबर, हरीण, शेकरू मांजर, रानमांजर, चिंकारा, उदमांजर, तरस असे अनेक प्राणी आढळतात. शिवाय मोर, पोपट, दयाळ, ससाणा, कृष्ण गरुड, शिंपी, सुगरणी, बगळे, करकोचे, खंड्या, याशिवाय स्थानिक तसेच परदेशी पक्षांचा मुक्त विहार येथे असतो.

भंडारदऱ्याहून सहा किलोमीटर अंतरावर बारी हे गाव लागते तेथून आपला कळसुबाईकडे पायी जाण्याचा प्रवास सुरु होतो. बारी गावापासून शेतातून मार्ग काढ्त डोंगराच्या पायथ्याशी पोहचायचे आणि मग डोंगर चढायला घ्यायचा.

कळसुबाई शिखरावर सोालापूरचे इतिहासकार श्री शिवरत्नजी शेटे सर ,प्रा सवडतकर सर,पवार सर, रामदास काकडे

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...