🚩🚩🚩🚩 *शंभूराजे*
एके काळी सुवर्णकाळ अनुभवलेल्या या मातीसाठी इ .सनाचे १२ वे १७ शतकातील मधला ५०० वर्षाचा कालखंड म्हणजे महाराष्ट्रातील राजकिय संघर्षाबरोबर सामाजिक व सांस्कृतिक संघर्षासाठी तेवढाच महत्वाचा आहे .याच काळात संत परंपरेने एक चळवळ उभी केली .आपल्या कुटुंबाचे रक्षण करत खऱ्या अर्थाने अध्यात्मिक समतावादी लोकशाहीचा पाया याच काळात रचला जात होता.वर्ण, जात श्रेष्ठत्व नाकारत समतेची भगवी पताका याच वारकरी चळवळीतून उभी राहीली . शोषणाविरूद्ध लढण्याचे बळ व स्वाभिमान यातून मिळत गेला . *राजमाता शिवमाता जिजाऊंची प्रेरणा,अर्कज्ञ ,स्वराज्य संकंल्पक शहाजी राजे* यांचे त्याग ,निती ,बुद्धीमत्ता यातून शिवरायांनी प्रेरणा घेत रयतेचे लोककल्याण कारी स्वराज्य उभं केले .
*इतिहाचार्य वा सी बेद्रे यांचे सत्य शंभूचरित्रासाठी आपले आयुष्य खर्चि घातले .त्यांचे अनंत उपकार आहेत . *नाटक,कथा,कांदंबरीना खरा इतिहास समजणाऱ्यांनी वा सी बेद्रे यांनी लिहलेलं शंभूचरित्र जरूर वाचावे* . ते या चरित्रात सुरुवातीलाच अभ्यासपूर्ण पणे लिहतात " *शहाजी महाराजांच्या महत्वकांक्षेतून सूचित झालेल्या व शिवाजी महाराजांनी साकार केलेल्या हिंदवी स्वराज्याचा संभाजी राजे यांनी हिरेरीने सांभाळ केला*''
शंभूराजेनंतर कोणतेही कारण नसतांना झिझलेल्या विकृत लेखणी साठी वा सी बेद्रे सरांचे हे संशोधन म्हणजे खऱ्या अर्थाने पहिल्यांदा शंभूचरित्राला न्याय देणारे होते .पण आजही या मातीसाठी लढणाऱ्या या छाव्याचे सत्य चरित्र या मातीत राहणाऱ्यांनी तरी अजून समजून घेतलय !
वयाच्या आठव्याच वर्षी ज्या तत्खाला हादरुन सोडायचे आहे त्या दिल्लीच्या बादशहा समोरची स्वाभिमान,स्वातंत्र्याची प्रेरणा देणारी डरकाळी याच पिता -पुत्रांची होती.
अजूनही भल्या-भल्या इतिहासकारांनाही चक्राऊन सोडणारा आग्रा सुटकेचा मार्ग व घटनाक्रम त्यांच्या लेखणी थांबवून जातो .
ही निती,चातुर्य,गोपनियता ,अखंड सावधानता,अचुक नियोजन कौशल्य।शंभूराजे बालपनातच अनुभवत होते. जीवंतणीच आपल्या मुलाचे श्राद्ध घालण्याची घटना म्हणजे शिवतंत्राचाच भाग होता .पुढच्या काळात या पिता -पुत्रांनी स्वराज्यासाठीचे शिवतंत्र तर शञूला हतबल करुन सोडणारेच होते .इतिहासालाही त्याची निटशी उकल करता आलेली दिसत नाही .
शंभूराजांना लाभलेल्या अवघ्या ३२ वर्षामधे पुढचे लाखो वर्ष ही विसरले जाणार नाही येवढे महान कार्य त्यांनी या संघर्षमय अल्प आयुष्यात केले . सकल शस्त्र,युद्धनिती मधे पारंगत असलेल्या शंभू राजांनी स्वतः हातात तलवार घेवून शेकडो लढाया केल्या .यात एकही लढाई न हरणारा रणधुंरंदर योद्धा म्हणजे छत्रपती संभाजी राजे होय .शब्दातही मांडणी न करता येणारे पराक्रम शंभूराजांनी गाजविले.प्रचंड विश्वास स्वराज्याच्या रयतेत निर्माण करत जीवाला जीव देणारी माणसं उभी केली .पुढे रांजांच्या बलिदानानंतर फक्त छत्रपतींच्या नावावर,प्रेरणेवर दिडशे वर्ष बेभान होत शत्रूशी लढत राहीली .
एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात लेखणी घेऊन त्या काळात साहित्य क्षेत्रातही मोठी क्रांती संभाजीराजे यांनी केलेली दिसते .हा वारसा त्यांना आपले आजोबा महाबली शहाजीराजे की जे सुद्धा संस्कृत विषयाचे गाढे पंडित होते .त्यांचे काकासाहेब संभाजीराजे यांनासुद्धा विविध भाषेचे ज्ञान होते .राजमाता जिजाऊ यांचे संस्कार,छत्रपती शिवरायांचा सहवास त्यांना बरेच काही देऊन गेला .
शिवभारत या शिवरायांच्या समकालिन ग्रंथात तर परमानंद म्हणतो
*आख्याति लिखितुं यावदाचार्यो।*
*तावद द्वितियपेश्ये विलिख्य तमदर्शयेत ॥*
लहानपणी शिवरायांचे आचार्य दुसऱ्यादिवशी जो पाठ शिकवायचे त्याची तयारी ते आदल्या दिवशीच करून यायचे .हे संस्कार भोसले वंशीयामधे अगोदरच होते .
बालवयातच नऊ भाषेचे नुसते ज्ञानच नाही तर त्यावर प्रभूत्व सुद्धा होते .शिवराज्याभिषेक प्रसंगी शंभूराजे इंग्रज आधिकाऱ्यासोबत इंग्रजी मधूनच संवाद साधत होते .या प्रसंगी राज्याभिषेकासाठी आलेले गागाभट्ट यांनी संभाजी राजे यांचे संस्कृत भाषेवरील ज्ञान व प्रभूत्व पाहून आश्यर्य चकित झाले .त्यांनी संभाजी राजे यांच्यावर संस्कृत मधून 'समयनय 'हा ग्रंथ लिहून त्यांना आदरपूर्वक अर्पण केला.
वयाच्या अवध्या १४ व्या वर्षी " *बुधभूषण* " हा संस्कृत ग्रंथ लिहून काढला .या ग्रंथातील दुर्गाभ्यास,पशु,पक्षी,प्राणी,फळे,फुले,वनस्पती याबद्दलचे सखोल ज्ञान खूप काही सांगून जाते .राजाची कर्त्यव्य काय ?राजपुत्राची कर्त्यव्य काय ? युद्ध तंत्र,प्रकिर्ण निती या बाबत आजही लागू होतील असे विश्लेषण शंभू राजे या ग्रंथात करतांना दिसतात .
*सातसतक,नखशिख,नाईकाभेद या कला ,तत्वज्ञान आदि विषयावर विवेचन करणारे लिखानही या ग्रंथातून शंभूराजेंनी केलेले दिसते . *केशव पुरोंहीत याने* " *राजाराम चरितम" या ग्रंथात संभाजी राजे यांची स्तुती करतांना त्यांना *सकलशास्त्र,विचारशिल आणि धर्मज्ञ शास्त्रकोविद* म्हटले आहे .
बुधभूषण मधील *तृतीय अध्यायात प्रकिर्ण नीति* मधील श्लोकात शंभूराजे म्हणतात
*को लाभो गुणिसंगमः किमपरं प्राज्ञैतरै: संगति:।*
*का हानिः समयच्युतिर्निपुणता का धर्मतत्वे रतिः ॥*
*कः शुरो विजितोद्रिय: प्रियतमा कामुव्रता किं धनम।*
*विदया कि* *सुखमप्रवासगमनं राज्ञः किमाज्ञा फलम्॥*
या श्लोकातुन ते सांगत आहेत की,लाभ *कुठला चांगला आहे ?*
तर गुणी माणसांची भेट होणे हा लाभ चांगला आहे.आज आपण धन लाभ,पुत्र लाभ ,सत्तेचा लाभ आदि लाभाची अपेक्षा करतो .त्या वेळी मात्र राजांना मात्र गुणी माणसं हवी होती .
*काय श्रेष्ठ नाही ?* तर
मूर्ख माणसांची संगत श्रेष्ठ नाही .आताच्या काळात नवतरुनांना फार महत्वाचे आहे.
*हानी कोणती ?*
तर आयत्या वेळी हातून चुक घडणे ही मोठी हानी म्हणजे नुकसान आहे हे शंभूराजे सांगतात .म्हणजे आबासाहेबांची अखंड सावधानतेची शिकवण येथे दिसते .
*निपुणता कोणती ?*
तर चांगल्या आचरणासाठीची आवड असणे .की जे भोसले वंशीयांनी सदैव जपलेल दिसते .
*खरा शूर कोण ?*
ज्याने स्वतः च्या इंद्रियावर विजय मिळविला आहे तोच खरा शुर आहे .प्राचीन भारतीय तत्वज्ञानही यामधून जाणवते .
*खरी प्रियतमा कोण ?*
तर जी व्रतधारी म्हणजें सदैव पाठीशी राहते अशी सहचरिणी होय.
*खरी संपत्ती कुठली ?*
तर शंभूराजे म्हणतात ती "विदया" आहे .कालरूपी अज्ञानाच्या सर्पाने ही पृथ्वी डसली गेली आहे तिच्या कल्याणार्थ गुरूचा जन्म झाला आहे .त्या गुरुला वंदन असो अश्या आशयाचा श्लोक बुधभूषण मधे शंभूराजांनी मांडलेला आहे. या विदयेचे अनर्थ पुढे महात्मा फुले यांनी जाणले होते .
*खरे सुख कोणते ?*
फार न हिंडणे हे खरे सुख शंभू राजे मानतात .
*खरा राजा कोण ?*
जेव्हा प्रजा राजाची आज्ञा निष्ठेने पाळते व त्याचे फलित मिळते तो राजा खरा आहे असे शंभू राजे म्हणतात.
प्रयत्नप्रधान वृत्तीला प्राधान्य देणारा हा श्लोक आहे .यामधील नऊ प्रश्नाची उकल संपूर्ण सफल आयुष्यासाठीचे सार सांगून जातात .
येवढा विदवान ,चारित्र्यवान छत्रपती आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला सांगीतलाच गेला पाहिजे .केवळ तलवार घेऊनच नाही तर लेखणी घेऊन छत्रपती साहित्यवीर कसे झाले हे सांगणे महत्वाचे !
*जय जिजाऊ*
*जय शिवराय*
*संजय खांडवे*🚩
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा