*एक महापर्व : लखुजीराजे जाधवराव*🚩
➖➖➖➖➖➖
राजा भिल्लम देवाने देवगिरीच्या अभेद्य किल्ल्याचे निर्माण केले सिंघनदेव ,कृष्णदेवराय, रामदेव राय,शंकर देव हरपाल देव ,यांच्या काळात यादवांचे साम्राज्य नर्मदा नदी पासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलेले होते यामध्ये आताच्या भौगोलिक परिस्थितीनुसार उत्तर कर्नाटक मध्य प्रदेश चा काही भाग गुजरातचा काही भाग व महाराष्ट्राचा समावेश होतो यादव साम्राज्याची राजधानी अत्यंत अजिंक्य अशी होती. यादवांच्या साम्राज्यात कला ,साहित्य, संस्कृती भाषा व स्थापत्य आदी बाबींचा विकास झालेला दिसतो. संत ज्ञानेश्वरांचा कालखंड तसेच माहीम भटांनी चक्रधर स्वामींचे चरित्र सुद्धा याच कालखंडात लिहिले. वास्तु शिल्पांची उत्कृष्ट उदाहरण असलेले बरेच मंदिरे सुद्धा याच काळातील आहेत. असे सुख समृद्धीने नटलेले स्वकियांचेच वैभवशाली राज्य या या भूमीवर होते.
1294 मध्ये देवगिरीवर पहिली स्वारी उत्तरेकडून झाली अल्लाउद्दीन खिलजी याने तत्कालीन यादव राजे रामदेवराय यांचा पराभव केला त्याने संपन्न अशा यादव राज्यातून अमाप संपत्ती खंडणीच्या रूपाने घेऊन तो दिल्लीच्या दिशेने परतला .त्याने यादव राजांना आपले मांडलिक बनवले . शेकडो वर्षाची स्वतंत्रता एक प्रकारे बंदिस्त झाली .पुढील काळात रामदेवरायांनी परिस्थिती पाहून खंडणी देणे खंडित केले पण लगेच अल्लाउद्दीन ने 1307 ला त्याचा सेनापती मलिक काफुर याला देवगिरीवर पाठवले त्याने रामदेवरा यांना कैद करून दिल्लीस घेऊन गेला . पुढे दिल्लीच्या बादशहाचे मांडलिकत्व स्वीकारून रामदेवराय पुन्हा आपल्या राज्यात परतले त्यानंतर त्यांचा मुलगा शंकर देव हा राजा झाला. त्यांनी अत्यंत स्वतंत्र वृत्तीने आपला राज्यकारभार चालविला सुलतानाला हे लक्षात येतात त्याने 1312 मध्ये पुन्हा हा मलिक काफुर पाठविले. या लढाईत शंकर देवाला अत्यंत अमानुषपणे ठार मारले गेले व देवगिरी दिल्लीला जोडली गेली. पुढे काफुर हा दोन वर्ष देवगिरी तच वास्तव्य करून होता. उत्तरेत अंतर्गत बंडाळ्या सुरू झाल्याने खिलजीने त्याला परत बोलावले या परिस्थितीचा चा फायदा घेत दक्षिणेतील हिंदू राजांनी सुलताना विरुद्ध एकत्र येण्यास सुरुवात केली त्याचे नेतृत्व शंकर देवाचा मेहुणा हरपालदेव यांनी केले.अत्यंत स्वतंत्र वृत्तीने वागणाऱ्या हरपाल देवाने देवगिरी ताब्यात घेऊन सुलतानाच्या लोकांना हाकलून लावले .या धक्क्याने अल्लाउद्दीन खिलजी मरण पावला. दिल्लीची गादी मिळविण्याच्या सत्तासंघर्षात मलिक काफुर सुद्धा मारला गेला. 1313 मध्ये मुबारक खिलजी गादीवर आला त्याने 1318 मध्ये देवगिरीवर स्वारी करून हरपाल देवाला अत्यंत क्रूरपणे ठार मारले यामध्ये देवगिरीचे बलशाली असे यादव साम्राज्य लयास गेले या साम्राज्याचा अस्त होणे ही इतिहासाला कलांटी देणारी घटना होती देवगिरीच्या अजिक्य यादवांचा पराभव होणे ही सोपी गोष्ट नव्हती तो एक चिकित्सेचा स्वतंत्र भाग आहे.
शंकर देवाचा मुलगा गोविंद देव याचे पालन पोषण हरपाल देवाने केले होते या गोविंद देवाने सुद्धा पुढे संघर्ष चालूच ठेवला त्यानेही स्वतंत्र होण्याच्या हालचाली सुरु ठेवल्या होत्या. त्यानंतर ठाकूरजी जाधवराव हे गादीवर आले हे ठाकुर जी 1440 च्या सुमारास मृत्यू पावले त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा भुकन देव हे वतनावर आले. वंशपरंपरेने अचलकर्ण उर्फ अचलोजी त्यानंतर विठ्ठल उर्फ विठुजी हे मनसबदारीवर आले. हा कालखंड विजयनगरच्या साम्राज्याच्या लयास जाण्याच्या समकालीन आहे. सर्व शाह्या आपसातील सत्तासंघर्षात लढत होत्या. यात सामान्याचे हाल होत होते .विठ्ठल देवाचे पुत्र लक्ष्मण देव उर्फ लखुजी जाधव राव हे देशमुखी वतन व मनसबदारीवर आले. त्यावेळी ते निजामशाहीच्या चाकरीत होते या सत्तासंघर्षात मराठा सरदार आपल्या पराक्रमाने वंशपरंपरेने शौर्य गाजवत अस्तित्व टिकून होते तत्कालीन राजकीय परिस्थिती सुद्धा त्याच प्रकारची होती शाह्यामध्ये होणारे संघर्ष, उत्तरेकडून मोगलांच्या स्वाऱ्या यामध्ये प्रत्येक शाही आपले बळ वाढवण्यासाठी पराक्रमी मराठे सरदारांना आपल्या बाजूने करून घेत. जाधव वंशा मध्ये पराक्रमाची परंपरा तर होतीच पण ते अत्यंत स्वाभिमान व प्रजावत्सल होते. यादव अर्थात जाधवरावांचा इतिहास या देवगिरीशी निगडित आहे यादवांच्या काळातील स्वतंत्र व सार्वभौम असे राज्य नष्ट झाले तरी त्यांच्या वंशीयामध्ये ही प्रेरणा जागृत होतीच हे समकालीन घटनांवरून समजते. तात्कालीन परिस्थितीनुसार आपले महत्व ,अस्तित्व टिकून ठेवत व मनात स्वातंत्र्याची प्रेरणा ठेवूनच ते वागताना दिसतात. त्यांनी पराक्रम, साहस,शौर्य, बुद्धिमत्ता व मुत्सद्दीपणा यामधून एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. अजिंक्य असणारा देवगिरीचा किल्ला राजे लखुजी जाधवराव यांनी प्रत्यक्ष स्वारी करून जिंकला होता मोठ्या युक्तीने अगदी मोजक्या सरदारांसह वैरण वाहून नेणाऱ्या वेडबिगारांच्या वेशात गवतात शस्त्रे लपवून किल्ल्यात प्रवेश मिळवला. इतिहासात प्रथमच हा अभेद्य किल्ला आपल्या युद्ध कौशल्यावर जाधव रावांनी मुर्तजा निजामशहा यांना जिंकुन दिला . ही नोंद जाधवरावांच्या मूळ बखरीत आढळते या पराक्रमाने लखुजी राजे जाधवराव यांना पंच हजारी मनसबदार बनविले 24000 सैन्या 15000 घोडदळ व 52 चावडयांच्या वतना सह त्यांनी आपले अस्तित्व दाखवून दिले. सिंदखेड परगाना त्यांना जहागिर म्हणून देण्यात आला. सोळाव्या शतकात सिंदखेड ची देशमुखी मुळे घराण्याकडे होती त्या ठिकाणी रविराज ढोणे हा हळूहळू पुंडाई करू लागला होता. त्याने मुळे घराण्याची कत्तल घडवून जबरदस्तीने सिंदखेडची देशमुखीचा उपभोग घेऊ लागला होता या कत्तली मधून यमुनाबाई ही मुळे घराण्यातील एक स्त्री आपला जीव वाचवून लखूजीराजे जाधवरावाकडे मदतीसाठी पोहचली .त्यावेळी ते पैठण परगण्यातील लासनेर येथे छावणी करुन राहत होते .यमुनाबाईच्या तक्रारीवरून आपल्या सैन्यासह ते सिंदखेडला आले व सर्व चौकशीअंती त्यांनी रात्री रवीराव ढोणे यांच्यावर हल्ला केला यात रविराव ढोणे ठार झाला. यमुनाबाई ने 1573 मध्ये सिंदखेडचे देशमुखी वतन लखुजी राजे यांच्या नावे करून दिले. यापूर्वी सिंदखेड ,परतुर , खेंडले (साखरखेर्डा), मेहकर ही जहागिरी त्यांच्याकडे होती त्या खर्चासाठी निजामाने गाडगापूर ,वैजापूर, फुलब्बी, कन्नड ,दाऊरवाडी , पैठण, सेंदुरा बाद मेहकर, लोणार,रिसवड, बामणी ,पिंपळगाव, कुरहे, मंगळूर हे महाल खर्चाकरिता लावून दिले होते.
लखुजी राजे जाधवराव यांचा 1550 ते 1600 हा निजामशाहीतील कालखंड खूप महत्त्वाचा आहे निजामांच्या अंतर्गत संघर्षात जाधव रावांचे एक स्वतंत्र अस्तित्व होते द्क्षिणी फळीतील एक मातब्बर सरदार म्हणून त्यांनी आपला दबदबा निर्माण केला होता. पुढच्या काळात या अंतर्गत संघर्षात लखुजीराजे, उदाराम देशमुख हे निजामशाही विरुद्ध मोगलांकडून घडले होते.जेव्हा जहांगीर बादशहाने दक्षिण जिंकण्यासाठी कार्य हाती घेतले तेव्हा त्याच्याविरुद्ध मलिक अंबर व निजामाच्या बाजूने राहून मालोजीराजे, लखुजीराजे ,शहाजीराजे व इतर मराठा सरदार यांनी पराक्रम गाजवून मोगलांना रोखलेले दिसते. जेव्हा जेव्हा मलिक अंबरला साहाय्य करायचे सोडले तेव्हा तेव्हा मलिक अंबरला माघार घ्यावी लागल्याचे दिसते मराठा सरदारांच्या वरचढपणा मलिक अंबर सारख्याना खपत नव्हता. मराठा सरदार मधील एक्य त्याच्या डोळ्यात खुपत असे.त्यांच्या नेतृत्वात स्वतंत्र मोहीमा सुद्धा त्यांना देत नसत .या सरदारांचे पराक्रम ही लेखन कर्ता दुजा भाव ठेऊनच करत असेल असे वाटते .
1623 या काळात देवगिरीवर खंडागळे हत्ती प्रकरण घडले. मोगलांविरुद्ध एकत्र येऊन लढण्यासाठी लखुजीराजे जाधवराव,उदाराम देशमुख ,मलिक अंबर शहजादा खुर्रमच्या बापाविरुध्दच्या बंडाला सहकार्य करण्यासदर्भात विचार विनिमय करण्यासाठी दरबार भरला होता .या बैठकीनंतर एकच गोधळ उडाला .या बाबत सविस्तर वर्णन शिवभारतकार आठव्या अध्यायात करताना दिसतो.
*ततः खंण्डार्गलाख्यस्य नृपस्याग्रेसरः करी ।*
*मर्दयन्नन्यसैन्यानि प्रचचाल बलाद्बली।।*
खंडागळे राजांचा बलवंत हत्ती सैन्य तुडवत निघाला होता. एखाद्या हत्तीने गर्जना केल्या कळपातील हत्तीला ती गर्जना सहन होत नाही त्याप्रमाणे त्या हत्तीची गर्जना जाधव रावांच्या दत्ताजीस सहन झाली नाही. या धामधुमीत विठुजी- संभाजी -खेळोजी खंडागळेच्या मदतीला धावले या संघर्षात दत्ताजी मारले गेले. देवगिरी वरून निघालेले राजे लखुजी जाधव राव ते पुन्हा परत फिरले. क्रोधाने लालबुंद झालेल्या जाधवलारावांना पाहून पृथ्वी,अरण्ये, द्विपे व त्यावरील पर्वते कापू लागली. असे शिवभारत कार वर्णन करतो. या युद्धात विठुजी राजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी भोसले मारले गेले यात उभयतांना पश्चाताप झाला त्यानंतर जाधव भोसले हाड-वैराच्या कथा रचल्या गेल्या, पण त्या निराधार वाटतात दोन प्रतिभावंत वंशामध्ये उद्भवलेले वितुष्ट प्रासंगिक स्वरूपाचे होते. याची प्रचिती 1624 च्या भातवडीच्या लढाईत लखुजीराजे जाधवराव यांच्या भूमिकेवरून लक्षात येते.
1626 मध्ये मलिक अंबरचा मृत्यू झाला .निजामशाही वर अवकळा आली . मलिक अंबर नेहमी त्यांचा द्वेष करत असे .त्याचा या सुडाच्या धोरणाने लखुजी राजे जाधव रावांनी निजामशाही सोडली होती. यानंतर दिल्लीच्या बादशहास सोडून ते पुन्हा निजामशाही आले त्यावेळी शिवभारतकार त्यांना निजामाचा कैवारी कर्तुत्ववान बलाढ्य राजा जाधवराव असे संबोधतो. निजामाच्या पदरी असलेल्या दृष्ट सरदारांनी त्याचे कान भरले. जाधवरावांच्या दक्षिणेतील चढत्या आलेखाची भिती व द्वेष बाळगत एक प्रकारे विषचं कालवले. निजामाला सज्जनही ही दुर्जन वाटू लागले आणि हाजी हाजी करणारे दुर्जन सज्जन वाटू लागले.
देवगिरीवर निजामाच्या भेटीसाठी आलेले अत्यंत तेजस्वी लखुजी राजे जाधव राव त्यांचे पुत्र व आमात्य यांच्यासह या दरबारात त्यांचा अपमान झाला. याचा संताप स्वाभिमानी जाधवरावांना आला आला. ते परत जात असताना निजामाचा सेनापती हमीद व इतरांनी जाधवराव मंडळींना दारापाशी घेरले. बेसावध अवस्थेत निशस्त्र व संख्येने कमी असलेल्या जाधव रावांचा संघर्ष कमी पडला .त्यांच्यावर चारही बाजूने वार झाले. वयाच्या ऐंशीव्या वर्षी सुद्धा लखुजी राजे जाधवराव मोठ्या शर्थीने लढले. त्यांचा पुत्र अचलोजी व नातू यशवंतरावसह जाधवराव मंडळी रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली. याचा साक्षीदार देवगिरी होता भारतकार आठव्या अध्यायात म्हणतो
*यथा मेरोर्विपर्यासःपातो भानुमतो यथा।*
*यथा हयन्त:कृतान्तस्य दाह:पत्युरपां यथा॥*
*तथा यादवराजस्य तदा तत्र बदात्यय:।*
*सप्तनामपिलोकानामभूदल्पहितावह:।।*
जसे मेरुपर्वताचे उलथून पडणे, किंवा सूर्याचे खाली पडणे ,किंवा यमा चा अंत होणे,किंवा वरुनाचा दाह होणे. तसा जाधवरावांचा येथील झालेला अंत सातही लोकांस अत्यंत अहितकारक झाला. 25 जुलै 1629 च्या या घटनेने महाबली शहाजीराजे भोसले राजमाता जिजाबाई यांना खूप मोठा हादरा बसला. लगेच शहाजीराजांनी सुद्धा निजामशाही सोडली. ही घटना महाराष्ट्राच्या इतिहासातील क्रान्तिकारी घटना होय मनात स्वातंत्र्याची ज्योत तेवत प्राणपणाने लढणारे ती माणसे होती पुढे स्वराज्य कार्यात या जाधवरावांचे मोलाचे योगदान दिसते. या मातीच्या रक्षणार्थ या जाधवराव मंडळीची पराक्रम,स्वामिनिष्ठता व बलिदानाची श्रृखलाच दिसते .
लखुजीराजे जाधवरावांच्या नंतर त्यांच्या पत्नी म्हाळसाबाई,अचलोजींच् च्या पत्नी आणि त्यांचा मुलगा संताजी उर्फ सुजन सिंह ही पुण्यात येऊन जिजाऊंकडे वास्तव्यास होती. संताजी जाधवराव यांची कन्या काशीबाई यांचा विवाह जिजाऊंनीच शिवरायांसोबत लावून दिला होता. दक्षिणेत कनकगिरीच्या लढाई संभाजी राजे व संताजी यांना विश्वासघात करून अफजलखानाने मारले होते .पुढे संताजी पुत्र शंभू सिंह जाधव राव हे सुद्धा अगदी सावलीसारखे शिवरायांच्या सोबत असत स्वराज्य कार्यात एकमेकांना जपण्यासाठी जाधव -भोसले वंशीयांची जोड शहाजीराजे व जिजाऊ यांनी पुढील काळात विचारपूर्वक लावून दिलेली दिसते .शंभुसिंग जाधवराव पावन खिंडीत पहिल्या प्रहरात सिद्दी मसूदशी लढताना धारातीर्थी पडले. ही त्यांची स्वराज्यनिष्ठताच होय . शिवपुत्र संभाजी राजे यांच्या बलिदानानंतर मोगलांना सळो कि पळो करून सोडणारे धनाजीराव जाधवराव हे शंभू सिंह जाधव राव यांचेच पुत्र होते. शिवकन्या रानुबाई या सुद्धा जाधव घराण्यातच होत्या . एवढे मोठे योगदान या मंडळीचे स्वराज्य कार्यात होते. या प्रजा वत्सल वंशीयांचा मध्ययुगीन कालखंडातील वटवृक्ष म्हणजे लखुजीराजे जाधवराव हेच होय .
*संदर्भ*
*_राजे लखुजी जाधवराव चिकित्सक ग्रंथ प्राचार्य डॉ एस ए बाहेकर*
*_कवीद्र परमानंदकृत श्रीशिवभारत*
*संजय खांडवे*
9011971122































































