प्रतिकुलतेमधून मार्ग शोधणाऱ्या महाराष्ट्राच्या मातीतले आम्ही .......
शेकडो वर्षापासून महाराष्ट्राच्या मातीने असंख्य बदल पाहीले,शोषित -शोषकांचा खेळ पाहिला,न्याय -अन्यायाच्या गोष्टी अनुभवल्या,परकियांची आक्रमणे अनुभवली .याच मातीने परिवर्तनाची नांदी ठरणाऱ्या जगाला प्रेरणादायी ठरणाऱ्या क्रांतीनेही जन्म घेतला ,सह्याद्रीच्या साक्षीने पेटून उठलेल्याची बलीदाने बघितली .बाराव्या शतकापासून आपल्या बुद्धीचा कस लावत सत्याचा शोध घेत समाजाच्या अगदी शेवटच्या घटकाचा विचार करुन त्यांचे जीवनमान उंचवणारे कार्य करत संत नामदेव,संत ज्ञानेश्व२,संत एकनाथ,चक्रधर स्वामी ,संत गोरोबा,संत चोखोबा,संत सावता,संत जनाबाई ,संत तुकाराम आदि वारकरी संताची अध्यात्मीक बळ देणारी सामान्याची मन,मस्तक,मनगट मजबुत कराणारे महान कार्य बघितले .कित्येक ज्ञात,अज्ञातांनी ह्या मातीसाठी देह झिजविला .
ज्ञान,विज्ञान,साहस,शौर्य,प्रेरणा,आदर्श ही या मातीच्या कणा-कणात आहे.प्रतिकुलतेतही मार्ग काढण्याची परंपरा आपल्या महाराष्ट्राला आहे ,सतत सत्यासाठी संघर्ष करणाऱ्या विचारांचा वारसदार आपला महाराष्ट्र अाहे .शेकडो वर्षाच्या गुलामगिरी नंतर रयतेचा रांजा दुर्गदुर्गेश्वर रायगडी सिहासनाधिश्वर झाले ही गोष्ट काही सामान्य नव्हती त्या पाठीमागे तीन पिढयाचे अथक परिश्रम ,संघर्ष,नियोजन व त्याग आदी गोष्टी येतात आणि हेच सातत्य त्या सुवर्णक्षणास कारण ठरते .
आज संपूर्ण जगाला एका भयावह कोविड 19 अश्या संकटाने घेरले अाहे त्याचे कारण अतिसूक्ष्म असा विषाणू आहे पण त्याची होणारी साखळी मात्र विघातक आहे व आपला देशही त्याला अपवाद नाही ,आज एकाच वेळी या साखळीचा वेढा पडलाय . रयत त्रस्त झाली आहे भविष्याचे चिंता मनात येत आहे,आत्मविश्वासाच्या बुरुजांना तडा जात आहे .आर्थिक संकटाचे काळे ढगही दिसायला लागले आहे, एकाच वेळी संकटाची श्रृखलाच येताना दिसत अाहे पण अखंड सांवधानता ठेवत नियोजन पूर्ण काम आपली सरकारं करतांना दिसत आहे याला तुमची आमच्या सारख्या संविधानात्मक मूल्ये जपणारी माणसं तन-मन-धनासह साथ लॉकडाऊनचे नियम पाळून देत आहे.मागच्या अनेक पिढयाच्या हयातीतही एवढी कठीण परिक्षा पाहीलेल्याचा सांगोपांगही चर्चाही नाही .सोन्यासारख्या माणसांचा जीव महत्वाचा हा उद्देश पुढे ठेवून आपण लढत अाहोत.लॉकडाऊन,कोरनटाईन या सारख्या तहाची ,संधीची योजना आखून आपली पोलिस यंत्रणा,आरोग्य यंत्रनेमधील पोलिस अधिकारी,शिपाई,डॉक्टर्स,नर्स,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स आपआपल्या कार्यक्षेत्रात एका निष्णात योध्याप्रमाणे घराबाहेर निघून लढत अाहेत.ढासाळलेल्या अर्थव्यवस्थेची बुरूजे कशी पुन्हा उभारायची हा आत्मविश्वास याच मातीत आहे हा इतिहासाचा वारसाच आम्हाला लाभलाय .
आता आहे त्या ठिकाणाहून आपण करत असलेल्या व्यवसाय ,नोकरीतून थोडसं अधिकच काम करून राष्ट्रनिर्माणाच महान कार्य एक कोविड योद्धा म्हणून येणाऱ्या काळात तुम्हा आम्हाला करायचे आहे.राष्ट्रप्रथम ही संकल्पणा सार्थ ठरवायची जबाबदारी आपल्यावर येऊन पडली आहे. "आमचं कर्म शिवराय " ह्या ब्रीदानुसार "शिव जागर मंच "ह्या माध्यमातून शिवविचारांचा प्रचार प्रसार करत कार्य करत राहणारे शिवविचारी सदस्याचा आमचा विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या लोकांचा मंच आहे.सामाजिक,सांस्कृतिक,क्रिडा,कला,साहित्य,शिक्षण,आरोग्य आदि क्षेत्रासाठी काम या माध्यमातून अाम्ही खारिचा वाटा उचलून अामचं कर्म शिवराय ह्या हेतूने करत आहोत , अश्या असंख्य सेवाभावी लोक व संस्था या संक़टकाळी पुढ येतांना दिसत आहे .हीच आपल्या मातीत असलेली सकारात्मकता आहे.
अाज आपल्या आर्थिक ,शैक्षणिक,व्यावसायिक,कृषी, लघुउदयोग या बाबीवर दुरोगामी परिणाम टाळण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे . ही आपल्याशी संमधीत क्षेत्र आहे यात आपला थेट सहभागही नोदविता येतो .
लॉकडाऊनच्या काळातही आपण आहे त्या जागेवरुन आपल योगदान देऊ शकतो .हया बाबी प्रसिद्वी शिवाय करण्याचं काम मंच करत आहे.
खारीचा वाटा महत्वाचा !
प्रतिकुलतेमधूनही मार्ग कसा काढायचा हे महत्वाचे ,हे कामही आपण साखळी पद्धतीने करुन कृषी उदयोग जसे भाजीपाला ,फळे,धान्य आदी
लघु उदयोग जसे दुध,अंडी,कुकुटपालन,मत्सउदयोग,मसाले आदि
कारागिर /कौशल्यावर आधारीत जसे वर्कशॉप,मोटार मैकेनिक,इलेक्ट्रीशीयन,प्लबर आदी
या व्यावसायिकांना सर्व नियम पाळून शिथिलतेच्या काळापासून उभ करण्याच महत्वाचं काम करावे लागेल. मंचच्या संपर्कातून ते करण्याच काम आम्ही करतच आहोत .लक्षात आलेल्यांचा कृषी मालाचे वितरणही सुरक्षा ठेवून करण्याच काम करतोय .गरज आपल्या संपर्काची आहे . एकमेकांच्या संवादातून आपल्याला प्रश्न सोडवत स्वयंपूर्णतेकडे जाणेही राष्ट्राच्या हितार्थ ठरेल.
"बुट पॉलिश ते तेल मालिश " या व्यावसायिकतेकडे कोणतीही लाज न बाळगता वळावे लागणारच आहे .अंगीभूत कौशल्यावर आधारींत व्यवसाय उभारणीला येणाऱ्या काळात संधी मिळू शकते ,आमच्या शिव जागर मंचाशी जुळलेले कुलमखेड येथील सुनिल कानडजे हे एक चांगले उदा आहे .प्रतिकुल परिस्थितीवर मात करत त्या व्यवसायातील दर्जेदार कौशल्य आत्मसात करुन जिद्द,चिकाटी व प्रामाणिकपणा अंगीकारुन अगदी शुन्यातून आपला व्यवसाय उभा करणारे ठरले .इडली-डोसा व्यवसायातून त्या त्यांनी आपल्या कुटुंबाची प्रगती साधली आहे .
कोविड १९ या संकटावर तर आपण निश्चितच मात करणार आहोत ! या संकटानंतर उगवणारी पहाट ही नवीन असणार आंहे .आपले कौशल्य ,जिद्द,चिकाटी व प्रामाणिकपणा समोर ठेवून आपण नव्या दमाने पुढ जाऊ या ! यात शिव जागर मंच निश्चितच आपली मदत करेल. अशी माणसं या मंचानं उभी केलीय !
शेवटी येणाऱ्या काळात एक तुकोबांचा अभंग लक्षात घ्या
ढाल तलवारे गुंतीले हे कर । म्हणे मी झुंजार कैसे झुंजु ?॥
बैसविले मला येणे अश्वावरी। धावू पळू तरी आता कैसा ?॥
कितीही प्रतिकुल परिस्थिती जरी असली तरीही तिला काडीइतकेही महत्व न देता कर्त्यव्य पार पाडणारी माणसे महान होतात .
जय जिजाऊ
जय शिवराय
शिव जागर मंच बुलढाणा
.








































