*क्षितिजावरचा उगवता सूर्य.........*
एक व्यक्ती अनेक आघाड्यावर जेव्हा काम करते व त्या कामात ती आपली गुणवत्ता सिद्ध करते किंवा आपली ओळख निर्माण करते त्यावेळेस त्या व्यक्तीला "अष्टपैलू" म्हटले जाते आपण बहुदा हा शब्द क्रिकेटच्या संदर्भात अनेक वेळा वापरतो व तो त्या खेळा इतकाच मर्यादितही राहतो. त्या क्षेत्रातील विविध बाबीमध्ये निपुण असणारी व्यक्ती त्या-त्या क्षेत्रात अष्टपैलू ठरते, परंतु अनेक क्षेत्रात एक व्यक्ती आपल्याला यशश्वीवीपणे काम करताना दिसते त्यावेळेस मात्र असे व्यक्तिमत्व अष्टपैलूच्याही पलीकडचे असते.मुळात हिऱ्याला साधारणतः आठ पैलू असतात .त्याला कनोरे असेही म्हणतात त्याला तासून ही बनतात व मग सर्व अंगाने अनंत काळापासून दडपलेला हिरा चमकतो.आपले अस्तित्व सिद्ध करतो . असेच व्यक्तिमत्त्व म्हणजे सुरेश देवकर सर ! पश्चीम विदर्भातील सहकार तथा सामाजिक क्षेत्रातील एक उगवता सूर्यच !
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले .त्यांचे वडील स्व.बाबुराव देवकर हे आर्मीमधे होते आई गीताई व बाबा सोबत मध्यप्रदेश मधील सागर या ठिकाणी बहीण व दोघे भाऊ असा परिवार अत्यंत आनंदाने राहत होता .सरांचे दुसरी पर्यन्तचे शिक्षणही तेथेच झाले पण सेवेत असतांना बाबांना झालेल्या दुःखापतीमुळे त्यांना मूळ गावी परतावे लागले. बरेच वर्ष इलाज चालला पण त्या आजारात बाबा त्यांना सोडून गेले .मुळात देंशसेवेच्या कार्यातच अत्यंत कमी वयात बाबा सोडून गेले ,त्यावेळी सरांचे वय अकरा बारा वर्षाचे होते . आईंनी काबाड कष्ट करून त्यांना शिकवल .धामणगाव -धाड या ठीकाणी उच्चप्राथमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केले.पुढे बुलढाणा येथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेत व जिजामाता महाविद्यालयात ते शिकले.वडीलांच्या शिस्तीचा आदर्श व आईचे संस्कार व सोबत आपली जिद्द,धैर्य,बुध्दीमत्ता ,विचार,स्वभाव व महत्वाची आपली मेहनत यशाच्या शिखराकडे नेत होती. सर्वप्रथम त्यांना मलकापूर तालुक्यातील आव्हा या ठिकाणी तलाठी या पदावर नियुक्ती मिळाली अत्यंत तुटपुंजा पगार असल्याने त्यांनी आपलं पुढील शैक्षणिक काम सुरूच ठेवलं होतं येणाऱ्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेला त्यांनी संधी समजून आपलं काम सुरू ठेवलं होतं.त्यांच्यासाठी ती एक -एक पायरीच होती पुढे तलाठ्याची नोकरी सोडून त्यांनी पैठण तालुक्यात ग्रामसेवक या पदावर नियुक्ती मिळवली. यामध्ये त्यांचा थोडा का होईना पगार वाढला होता, पण तिथेही त्यांचे मन रमले नाही .पुढे आयटीआय अकोला या ठिकाणी त्यांना भाषा निर्देशक म्हणून नियुक्ती मिळवली त्या ठिकाणीही त्यांनी काही वर्ष काम केलं तेथेही ते थांबले नाहीत पुढे अजून परीक्षा देत राहिले आणि या काळातच त्यांनी आपलं बीएडचं शिक्षणही पूर्ण केलं होतं म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून त्यांना वैजापूर या ठिकाणी नियुक्ती मिळाली. या दरम्यान त्यांनी राज्यसेवेच्या ही परीक्षा उत्तीर्ण करत मुलाखतीपर्यंत मजल मारली होती . त्यावेळी परभणी जिल्हा परिषदेमध्ये माध्यमिक शिक्षकांच्या जागा निघाल्याने त्यांनी जिल्हा परिषद प्रशाला शेवाळा या ठिकाणी माध्यमिक शिक्षक या पदावर नियुक्ती मिळवली तेथे त्यांनी वर्षभर काम केले . जिल्हा बदलीने त्यांनी आपला स्व जिल्हा गाठला आणि स्व जिल्ह्यात त्यांनी जिल्हा परिषद प्रशाला धाड या ठिकाणी बदली करून घेतली .येथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली.जीवा भावाची अन विश्वासाची नाती या प्रवासात त्यांनी आपल्या विचार- आचारातून निर्माण केली .सहकार अधिकारी असलेल्या अश्याच एका जीवाभावाच्या मित्राने सहकार क्षेत्रात येण्याचा सल्ला दिला व सुरूवात झाली.ते नेहमी म्हणतात "एक चांगला दाना मातीत पेरा असे हजारो चांगली दाने मिळतात मग मी अशी चांगली माणसे अन विचार पेरण्याचा ध्यास घेतलाय़ ! आणि याची प्रेरणा मला शिवचरित्रातून मिळते "
आज आदिती अर्बन हा वटवृक्ष उभा राहीलेला आपण पाहतो .त्याचे ब्रीदही तसेच आहे ," नाते विश्वासाचे आणि जिव्हाळ्याचे '' एक प्रचंड मोठा आदिती अर्बन परिवार त्यांनी उभा करून हजारो कुटुंबांना रोजगार उभा केला आहे .त्यांच्या संस्थेत काम करणारा प्रत्येक सदस्य ही संस्था आपली आहे याच भावनेनच काम करतो हा त्यांनी आपल्या माणसांमधे निर्माण केलेला प्रचंड विश्वास आहे हेच दाखवतो .
सहकार क्षेत्रात तर आहेच पण त्यांचे वाचनही अत्यंत दांडगे!
हलवूनि खुंट। आधी करावा बळकट॥
मग तयाच्या आधारे। करणे अवघेची बरे ॥
तुकोबांच्या विचारांचा त्यांचावर विशेष प्रभाव असल्याने
एवढ्या व्यापामधून आठवड्या महिन्याला नवीन आलेली पुस्तके विकत घेऊन वाचणे हा त्यांचा छंदच ! स्वतःचे घरातील सुसज्य ग्रंथालयाच आहे. नुसते पुस्तक वाचून ते थांबत नाहीत तर त्यावर तासंन -तास चर्चाही ,यातून चिकित्सा, तर्क आणि अनुमान आणि मग पुढे आपल्या विवेक बुद्धीवर तासणे हा त्यांचा या प्रचंड व्यापांमधील छंद आवाक करणारा आहे. इतिहास विषयक पुस्तकांची त्यांना विशेष आवड ! आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा त्यांना सार्थ अभिमान! शिवचरित्राचा अभ्यास तर त्यांचा सतत चालूच असतो. महाराजांचा विषय तर त्यांच्या चालण्या- बोलण्यातून सुरूच असतो. शिवचरित्रातील आठवणी न काढणारा दिवस त्यांचा तर कधी उगवलाच नसेल !
त्यांचा याच अभ्यासू व दुरदृष्टी मधून त्यांनी त्यांच्या लक्षात की, प्रत्येक जिल्हयाला वृत्तपत्र क्षेत्रात मुखपत्र आहे पण आपल्याच जिल्हयाला नाही , की जे एकाच वेळी सपूर्ण जिल्हयात रोज पोहचते ,म्हणून आपल्या शहरातून सपूर्ण विदर्भात व पुढे मराठवाडयात रोज प्रकाशीत होणारे दैनिक आता आपल्या मातृतिर्थ बुलढाणा जिल्हयातून रोज प्रकाशीत होऊन ओळख निर्माण व्हावी जनसामान्याच्या प्रश्नानां वाचा फुटावी.साहित्यिकांना,लेखकांना,कवींना संधी मिळावी हया हेतूने त्यांनी " दैनिक महाभूमि" या वृत्तपत्राचा लवकरच प्रकाशनाचा मानस योंजिला असून युद्धपातळीवर काम सुरू आहे .महीनाभरात ते वाचकांच्या हातात पडेलच !
यासोबतच त्यांना आनखी एक व्यासंग ! ऐतिहासिक वास्तूंना भेट देणे .त्यांचा अभ्यास करणे. तज्ञामार्फत त्या समजून घेणे .गड ,लेणी, मंदिरे ,बारव, विरगळ आदी ऐतिहासिक प्रतीके अभ्यासासह जतन व संवर्धनावर त्यांचा कृतीयुक्त जोर असतो.शिवजागर मंच सदस्य म्हणून त्यांचा या कार्यात सक्रिय सहभाग असतो .या प्राचीन वास्तुच्या सवर्धनासाठी ते स्वतः या व्यस्ततेमध्ये सुद्धा वेळ देतात. ही गोष्ट काही सामान्य नाही.आपल्या परिसरातील अशी फार कमी ऐतिहासिक स्थळे असतील की जे त्यांनी भेट देवून पाहिले नसतील. फक्त भेटच नाही तर वेळ देऊन समजून घेण्याची त्यांची वृत्ती खरच अनुकरणीय आहे. ऐतिहासिक स्थळावर तर सुट्टीच्या दिवशी अख्खा दिवस घालवतात. एवढं करूनही कितीही दूर जावो आपण घरी नऊच्या आत पोहोचलो पाहिजे हा त्यांचा मानस असतो. वैयक्तिक जीवन मात्र त्या अत्यंत साधेपणाने जगतात.प्रचंड मित्राच्या गोतावळ्यात वावरणारा हा माणूस मित्रांना आपल्या जीवनात मोठं स्थान देतात.आपल्या माती अन माणसाप्रती प्रचंड कृतज्ञ असलेल्या या अष्टपैलू व्यक्तीमत्वाचा आज वाढदिवस !
"ज्ञानाबरोबर ज्ञानाचा दर्प नव्हे ,तर सुगंध दरवळायला हवा "
हा आदनिय आ. ह. साळूंखे सरांचा विचार आपणास तंतोतंत लागू पडतो .
हा सुंगध असाच सालो साल दरवळत राहो या शिवशुभेच्छा !
आई जिजाऊ त्यांना उदंड आयुष्य देवो!
➖➖➖➖
संजय खांडवे
9011971122