*महाराष्ट्रातील लोकप्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे*
आपल्या महाराष्ट्राच्या मातीला प्रबोधनाची अखंड परंपरा लाभलेली आहे. महात्मा फुले यांच्या रूपाने महाराष्ट्रभरात एक नवक्रांती निर्माण झाली आणि एक विचारशील क्रांती पुरुष म्हणून त्यांचे साहित्य ,विचार व कार्य पुढील काळात मार्गदर्शक ठरले .1890 मध्ये महात्मा फुले दिवंगत झाले आणि या प्रबोधनकारी चळवळीला शाहू महाराजांच्या रूपाने पुन्हा एकदा एक नवीन नेतृत्व मिळालं. राजकीय स्वातंत्र्या बरोबरच सामाजिक स्वातंत्र्य किती महत्त्वाचे आहे हे जाणून शाहू महाराजांनी बहुजन समाजास ''गती" व "मती " देण्याचे कार्य केले . त्याच काळात शाहू महाराजांच्या सोबत सत्यशोधक चळवळीचे लोकप्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांनीही काम केले .
17 सप्टेबर 1885 ला पनेवल कुलाबा येथे जन्मलेले प्रबोधनकार ठाकरे महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या चळवळीमधील एक निडर ,चिकित्सक ,प्रखर प्रवक्ते,साहित्यिक ,लेखक,इतिहासकार तथा संपादक होते .त्यांनी आपल्या परखड व कठोर भाषेत समाजातील दुर्लक्षित घटकांचे प्रश्न अत्यतं प्रभावीपणे नुसते मांडलेच नाही तर प्रत्यक्ष ते सोडविण्यासाठी निर्णायक भूमीकाही घेतल्या .त्यांनी लिहलेल्या क्रांतीकारी साहीत्यात महात्मा फुले यांचा आदर्श जाणवतो .लोकहीतवादी आगरकरांचीही प्रेरणा दिसते .महाराष्ट्राच्या धार्मिक,सामाजिक,राजकिय,सांस्कृतिक,साहित्य क्षेत्रात आलेले वादळच म्हणता येईल त्यांनी ,कला,साहित्य,नाटक,चित्रपट,वृत्तपत्र,छायाचित्रकार,शिक्षक,टंकलेखक,वक्ते,विचारवंत,इतिहासकार,पटकथा संवादलेखक आदि क्षेत्रामध्ये त्या काळात फार मोठे कार्य केलेले आहे अस कोणते क्षेत्र त्या काळात तरी उरले नव्हते की ज्या मधे प्रबोधनकारांनी काम केले नसेल़.
त्या काळात बालविवाह, विधवा केशवपन, देवळा मधील पुजाऱ्यांची अरेरावी, हुकूमशाही, अस्पृश्यता , हुंडाबळी याविरूध्द सदैव जागृत राहत लढा दिला.माझी जीवनगाथा या समग्र आत्मचरित्रपर वाड़मयात या विषयीचे अनेक प्रसंग त्यांनी लिहले आहे .त्यांचे वाड़मय वाचत असताना आपण जी "ठाकरे शैली" म्हणतो ती खऱ्या अर्थाने जाणवते .जणू काही प्रबोधनकार स्वतः आपल्या समोर बोलत असल्याचा भास हे वाड़मय वाचतांना प्रत्येक वाचकाला नककीच होतो .हिंदू ह्यदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे वडील म्हणजे प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे त्यांच्यामधील तोच बाणा आणि तोच परखडपणा आमच्या पीढीने बाळासाहेबांमधे पाहिला हे प्रबोधनकारांच्या साहित्यामधीत शैलीवरून कळते . त्यांचे साहित्य हे महाराष्ट्रातील तळागाळातीत लोकांच्या जीवनशैलीतील एक भागच होता . आपल्या प्रभावशाली इतिहासा बरोबरच त्यांनी सामाजिक समस्याची उकलही आपल्या साहित्यातून करण्याचे अनमोल काम केले .कोदंण्डाचा टणत्कार,दगलबाज शिवाजी,देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे,खरा ब्राम्हण,भिक्षुकशाहीचे बंड,हिंदू धर्माचे दिव्य ,ग्रामण्याचा इतिहास ही त्यांची काही गाजलेली साहित्य होय . माझी जीवनगाथा हे त्यांचे खंडमय आत्मचरित्र होय.याशिवाय उठ मराठा उठ , श्री गाडगेबाबा, संस्कृतीचा संग्राम, काळाचा काळ, शेतकऱ्यांचे स्वराज्य, कुमारीकांचे शाप, रंगो बापूजी,वत्कृत्वशास्त्र व कला, समर्थ रामदास, पंडिता रमाबाई असे विविध साहित्याची विषय त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून हाताळले आणि त्या काळात महाराष्ट्रामध्ये फार मोठी वैचारिक चळवळ उभी केली.
प्रबोधनकार नेहमी म्हणायचे की "मी राजकारणी नसून समाजकारणी आहे. मी पुस्तकी सुधारक नव्हे, सुधारणाग्रणीची पुस्तके वाचून किंवा व्याख्याने ऐकून माझ्या मनाचा कल हिंदूच्या सुधारणा वादाकडे वळलेला नाही. माझे बालपण व तारुण्य मुळात अशा काळात गेले की त्यावेळी पांढर पेशा समाजात संताप जनक रुढी बोकाळलेल्या होत्या." प्रबोधनकारांनी त्या काळात ओळखले होते की शहरी संस्कृतीत चार दोन लोक शिकून समाजामधे जागृती करून त्यांना त्यांचा हक्क मिळवून देवू शकतो पण माझ्या तळागाळात अनिष्ठ रूढी परंपरेच्या विळख्यात अडकलेल्या माझ्या ग्रामीण भागातील बांधवांचे काय ? शहरी भागापेक्षा त्यांचा टक्काही फार मोठा होता .अभयाने लिहणारे व बोलणारे सत्वशील इतिहास भक्त म्हणून ख्याती असलेले प्रबोधनकार ठाकरे हे यामुळेच लोकप्रबोधनकार ठरतात .
माझी जीवनगाथा मधे ते लिहतात "ठाकरे " मूळचे भोर संस्थानातील पाली गावचे.तेथे आजही ठाकरे घराणे असावी , पालकर ठाकरेंशी नावापुरता संबंध आला त्यापुढे नाही ."धोडपकर" असेही त्यांचे जादा आडनाव आहे. पण त्यांचे वडील किंवा ठाकरे बंधू या आडनावाच्या आड वळणाला फारसे कधी गेले नाही नाशिक जिल्ह्यात धोडप नावाचा किल्ला आहे तेथे आमच्यापैकी एक पूर्वज किल्लेदार होते इंग्रजांनी या किल्ल्याला वेढा दिला बरेच दिवस या धोडपकरांनी त्यांना दाद दिली नाही. किल्ल्यावरचा दाना- वैरण संपला आणि त्यांनी दिलेल्या निकरीचा लढयात ते कामी आले. तेव्हापासून धोडपकर हे आडनाव आमच्या घराण्याला चिकटले. मात्र सगळेच ठाकरे धोडपकर नाहीत.त्यांचे आजोबा भिकोबा धोडपकरांनी हेच आडनाव पुढं आमरण चालविले. ठाण्यावरून त्यांच्या आजोबा यांची बदली पनवेलच्या स्मॉल कॉज कोर्टात झाली. तेथे त्यांनी एक लहान घर बांधले आणि धोडपकरांचे ते "पनवेल कर "बनले. आजोबांनी आमरण जरी धोडपकर आडनाव चालवले तरी त्यांच्या वडिलांनी मात्र शाळेत त्यांचे नाव घालताना " ठाकरे" आडनावाची पुनर्घटना केली आणि ती आजवर चालत आली आहे याच " ठाकरे " नावाची छाप आजही महाराष्ट्रावर दिसते .
दशावतारी दारिद्रय अनुभवलेल्या या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे एक वेगळेच वलय दिसते .बावीस वेळा आषाढी -कार्तिकेची वारी करणारे त्यांचे आजोबा प्रचंड स्वाभिमानी ,अभयी,विज्ञाननिष्ठ होते त्यांचे अनेक प्रंसंग जीवनगाथेत आहेत. प्लेगच्या देवीचा प्रसंग प्रत्येक वाचकाने वाचावा असाच आहे.
प्रबोधनकारांचा या पुढील ज़ीवन प्रसंग अधिकच संघर्षमय आहे .संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमंती करणाऱ्या प्रबोधनकारांवर राजर्षी शाहू महाराजांनी पुत्रवत प्रेम केले .त्याना हे कार्य करत असतांना त्रासही झाला .पुण्यात तर त्यांच्या द्यरासमोर अनेकदा मेलेले गाढवेही टाकली गेली .जीवंतपणी स्वतः प्रेतयात्राही त्यांनी पाहिली पण,घाबरतील ,डगमगतील ते "ठाकरे " कसले!
"समाजपरिवर्तनाची ध्वज खांद्यावर वाहणारे हे व्यक्तीमत्व किती मनस्वी बहुरंगी आणि जिद्दीचे होते याचा प्रत्यय या आठवणीवरून येतो " प्रारंभीच्या काळात दारीद्राचे दशावतार बघावे लागले अनेक आघात सहन करावे लागले ,अनेक व्यवसाय स्वीकारावे लागले असे सांगतात
कुसुमाग्रजांनी सांगीतलेल एक वाक्य प्रबोधनकारा बाबत मनात नितांत आदर अन उर्जा देणारे वाटते ''आर्थिक विवचंना असतानाही त्यांनी आपली लेखनी द्रव्यासाठी व सन्मानासाठी कुणाच्या स्वाधीन केली नाही "
या भूमीच्या दशेच्या काळात दिशा देण्याचे काम विचारांशी प्रामाणिक असलेल्या निर्भिड लोकप्रबोधनकारांनी केले .प्रत्येक तरूणांनी त्यांचे साहित्य अभ्यासावे येवढचं त्यांच्या जयंती निमित्ताने.............!
लोकप्रबोधनकारास विनम्र अभिवादन
संजय खांडवे
9011971122