सहयाद्रीच्या पर्वत रांगेत हरिशचंद्रगड,चावंडगड ,महिषगड या नाणेघाट परिसरात प्राचीन मार्गावरील सरक्षणार्थ बांधलेला हा हडसर /पर्वतगड येतो .सातवाहन,शिलाहार,यादव,या काळाचाही हा किल्ला साक्ष देतो .
जयराम पिंडे यांच्या पर्णालपर्वतग्रणाग्रहणाख्याम या संस्कृत ग्रंथात हडसरचा उल्लेख येतो .
तथैव चामुंडगिरी हरिशचंद्रस्तथैन च।
महिषोप्यड्सरस्तांवद गृहीतावतिसंगरात ॥
चावंड,हरिशचंद्र,महिषगड,हडसर,हे किल्ले शिवाजी राजांनी जिंकून घेतल्याचा उल्लेख आहे .
सहस्त्रकरविक्रम शहाजीराजे यांनी १६३६ -३७ मध्ये मोगलांशी केलेल्या माहुलीच्या तहात या किल्याचा उल्लेख येतो.१७०२ मध्ये मराठयाकडून औंरगजेबाने जिंकून घेतला पुढे १७४८ मध्ये मराठयानी हा गड पुन्हा जिंकून घेतला .१८१८ मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला .गडावर पोहचण्यासाठी दक्षिणेकुडून म्हणजे हडसर गावाच्या बाजूने खुंटीची वाट व खिंडीची वाट आहे .गडाला वळसाघालून आल्यावर पेठेची वाडी कडून पायरीचा राजमार्ग आहै .आम्ही पेठेची वाडी या गावकुसात आमची वाहणे उभी करुन सोबत पाण्याचा पुरेसा साठा सोबत घेऊन चढाई सुरू केली .
सरळ चढाईच्या पायऱ्या या गडाच्या मुख्य द्वाराकडे घेऊन जातात .एकाच दगडात कोरलेल्या नळीच्या पायऱ्या मन वेधून घेतात व दक्षिण बाजूस खिंडीची वाट दृष्टीस पडते.मुख्य दरवाज्यातून वर जातांना एकाच पाषाण काताळात कोरलेल्या नक्षीकामासह सदरी दिसतात .ही वाट पायऱ्या सह वळणघेत गडावरील पहील्या पाण्याच्या टाक्या पर्यन्त घेऊन जातात .त्या टाक्याच्या काठावर एक सुंदर छोटे शिवलिंग कोरलेले दिसते .आम्ही दक्षिण बाजूच्या कातर कडेने जाताना एक मोठा मातीचा तलाव दिसतो त्यात पाणी आहे व त्या तलावार्तगत छोटे छोटे टाके दिसतात .गाळ साचल्याने ते अदृष्य झाल्यासारखे दिसतात .त्या खालोखाल असलेल्या टाक्याचे गाळ उपसण्याचे काम सुरु आहे.त्या ठिकाणी एक समाधीही दिसते .पुढे गेल्यावर जमीनीत कोरलेले धान्याचे कोठार आहे एकाच अंखड दगडात शैलगृहाची निर्मिती आहे.नागमोडी वळने घेत वाट तयार करण्यात आली आहे ही वाट चौकात पोहचते व तीनही बाजूने धान्याची कोठारे आहे .बाहेर ओसरी सारखा भाग असून छोटे द्वार झरोके निर्माण करुन आत खाली सात ते आठ फुट खोल व १५X१५ फुट मापाच्या खोल्या धान्य साठविण्यासाठी आहेत .आत गर्द अंधार आहे .आतून काळवंडलेले या धान्य कोठारात राख दिसते .ही आग शेकडो वर्षापूर्वी धान्याला लागली होती त्याची ही राख असल्याचे सांगीतल जाते . पावसाचे व पाझरणारे पाणी कोठारात येऊ नये म्हणून दगडात पन्हाळ कोरलेले दिसते .धान्याच्या अगदी वरच्या भागात पाण्याने भरलेला तलाव आहे हे विशेष .
गडाला फेरफटका मारत पूर्व दिशेला पोहचताच पूर्वेकडील खोल कातरकडा दिसते. शत्रूला चढाई करण्यास अशक्यच आहे .या भागात अनेक पाण्याचे टाके आहे .जीवंत पाण्याची झरे सुद्धा दिसतात . गडावर काही पाळीव गाय व दिसतात .पूर्वी खाजगी जनावरे चरायला यायची पण वनविभागाने ही जनावरे गडउतार करण्यात आली पण काही जनावरे ही सापडली नाही त्यांची ही वंशावळ गडावर मुक्तसंचार करतांना दिसतात .खुंटीच्या वाटेच्या बाजूने प्रचड बुरुज आहे .प्रचंड मोठया दगडाच्या अवशेषात शैलगृहात देवीचे मंदीर आहे .त्यासमोर पाण्याने भरलेले दगडात कोरलेले पाण्याचे टाके आहेत .सपूर्ण गडाला गोल भ्रमंती करुन आल्यावर तलावाजवळ पोहचतो त्या ठिकाणी बाहेर नंदी असलेले। शिवमंदीर आहे .दक्षिणेला राजवाड्याचे दगडी अवशेष आहेत .
हिंदवी परीवाराच्या माध्यमातून आदरनिय शिवरत्न शेटे यांच्या प्रेरणेने संपूर्ण परिवारासोबत ही मोहीम यशस्वीपणे पार पडली .
संजय खांडवे
बुलढाणा
हडसर गडाची उत्तरेकडील कातरकडा ,पाठीमागे पेठेची वाडी आहे
गडावर जाण्याचा मुख्य राज मार्ग
एकाच पाषाणात कोरलेला दरवाजा

मुख्य दरवाज्यात असलेली सैनिकासाठी दगडात कोरलेली नक्षीकाम असलेली खोली
।गडाच्या उत्तरे कडील बाजूस जुन्नर वरून येताना हडसर या गावाकडून ही खिंडीची वाटनळीच्या पाषाणात कोरलेल्या पायऱ्या
पाण्याच्या टाकीच्या बाजूला असलेले शिवलिंग
सेवाभावी संस्थेकडून टाक्यातील साचलेला गाळ काढने सुरू आहे
गडावरील तलाव
धान्यकोठाराकडे जाण्यासाठी कोरलेला मार्ग
धाान्य कोठार
जीवंंत् झरा
खुंटी ची वाट






























